Tuesday 2 August 2022

कान्हाचे जंगल ! जादुभरे


 




                                       







कान्हाचे जंगल ! जादुभरे

मी जंगलांमध्ये जो काही वेळ घालवला त्यातून मला अपरिमित आनंद मिळाला, तोच आनंद मी आता इतरांनाही देणार आहे. मला असे वाटते सर्व वन्यजीवन त्याच्या नैसर्गिक भोवतालामुळे आनंदी असते. निसर्गामध्ये दुःख नसतेअथवा पश्चात्तापही नसतो. पक्ष्यांच्या थव्यातील एखाद्या पक्ष्याला किंवा प्राण्यांच्या कळपातील एखाद्या प्राण्याला एखादा ससाणा पक्षी उचलून नेतो किंवा एखादा वाघ बिबट्या त्याची शिकार करतो. जे उरले आहेत ते त्यांची वेळ आज आली नव्हती म्हणून आनंद व्यक्त करतात उद्याची चिंता करत बसत नाहीत” …  जिम कॉर्बेट (जंगल लोर)

पुन्हा एकदा जंगलातील भटकंतीविषयी लिहीतोय पुन्हा एकदा (नेहमीप्रमाणे) जिम यांचे शब्द माझ्या मदतीला आले आहेत. मी जंगलांमध्ये, विशेषतः कान्हासारख्या माझ्या आवडत्या जंगलांमध्ये घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांच्या आठवणींचे दरवाजे उघडताना, माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीशिवाय (जी केवळ लेखक नाही) दुसऱ्या कुणाचे शब्द आणखी समर्पक असू शकतात. मी प्रत्येक वेळी जंगलाला भेट देताना, मी वर दिलेले त्यांचेच शब्द जगतो. जिम कॉर्बेट हे आफ्रिका भारतामध्ये हिमालयातील जंगलांमध्ये अतिशय नावाजलेले वन्यजीवप्रेमी होते ते वाघांच्या संदर्भात तसेच वन्यजीवन संवर्धनासंदर्भात त्यांनी केलेल्या कामासाठी ओळखले जातात. अर्थात (दुर्दैवाने) जिम हे नरभक्षक वाघांचे शिकारी म्हणून अधिक ओळखले जातात, जे त्यांना कधीच आवडत नसे. त्यांची शिकारीचे अनुभव सांगणारी पुस्तके अधिक प्रसिद्ध असली तरीही त्यांच्या जंगल लोर सारख्या जंगलांविषयींच्या पुस्तकांमधून आपल्याला जंगलांविषयी सर्वांगीण माहिती मिळते.

मी जेव्हा स्वतः जंगलांना भेट द्यायला सुरुवात केली तेव्हा, जंगल आपल्याशी ज्या भाषेत बोलते ती समजून घेण्यासाठी मला या सगळ्या पुस्तकांची अतिशय मदत झाली. हा तुम्हाला पॉटरचे फार चित्रपट किंवा स्टार वॉर्स मालिका पाहण्याचा परिणाम आहे असे वाटू शकते कारण त्यातही अशीच अगम्य भाषा वगैरे असते. मात्र तुम्ही जंगलात घालवलेला वेळ तुम्हाला तिथे ज्याप्रकारचे प्राणी दिसतात ते आठवा, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की ते स्टार वॉर्स किंवा हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेच्या सफरीपेक्षा कमी नाही. जेव्हा कान्हासारखे जंगल असते तेव्हा तुमचे सीटबेल्ट घट्ट बांधा कारण हा प्रवास केवळ खाचखळग्यांचाच (शब्दशः) नाही तरचित्तथरारकही आहे. कान्हाच्या बाबतीत सर्वात मुख्य सर्वोत्तम बाब म्हणजे तेथील परिसर. सदाहरित साल वृक्ष अथांग पसरल्यासारखे वाटतात या घनदाट साल वृक्षांच्या सागरात मध्ये-मध्ये पसरलेले गवताचे विस्तीर्ण पट्टे म्हणजेच कुरणे डोंगर आहेत. पिवळसर चिखलाने माखलेल्या रस्त्यांवर प्रत्येक वळणावर तुम्ही काही तरी विशेष दिसेल अशी अपेक्षा करू शकता, असे आहे कान्हा!

मी भारतीय पिट्टा(एक रंगीबेरंगी स्थलांतरित पक्षी)इतक्याच नियमितपणे कान्हाला दरवर्षी भेट देतो, मात्र गेली तीन वर्षे हा योग आला नव्हता. माझी कार जशी चिरई डोंगरीवरून (मुख्य महामार्गावरील एक गाव जेथून कान्हा जंगल सुरू होते) मुख्य रस्त्यावरून निघाली, तेव्हा मला आसमंतात भरलेला साल वृक्षांचा गंध जाणवत होता माझ्या हृदयाची धडधड कारच्या वेगापेक्षाही वाढली. माफ करा, लेखन जरा फारच नाट्यमय होते आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण मी प्रत्येक वेळी कान्हाला भेट देतो तेव्हा माझ्याबाबतीत असे होते, त्यामुळे असो. मे महिन्याची अखेर होती माझ्या अनेक पूर्वीच्या अनेक कान्हा भेटींमध्ये जसे झाले होते त्याचप्रमाणे यावेळी ही ढगांनी मला चकवलेपूर्वी मला  काळ्या ढगांनी आच्छादलेले आकाश पाहिले की उदास वाटत असे कारण याचा अर्थ वाघ दिसण्याची शक्यता कमी आहे. मात्र आता असे वाटत नाही कारण जंगलांनी मला संयम शिकवला तिथल्या वेगवेगळ्या भावनांची आनंद घ्यायला शिकवले जे तुमच्या बायकोच्या किंवा जिवलग मैत्रीणीच्या मूड पेक्षाही झपाट्याने बदलतात फक्त त्यासोबतच प्रवास करणे इतकेच तुमच्या हातात असते. अशाप्रकारे, पहिल्या सफारीची सुरुवात झाली ढगाळलेल्या आकाशाने, सुदैवाने आमचा नेहमीचा अतिशय अनुभवी चालक हुड घालून तयार होता, तसेच पाऊसही सुरू होता. मी प्रत्येक वेळी जंगलाला भेट देतो तेव्हा माझ्या मनामध्ये (खरेतर माझ्या हावरट मनामध्ये) एक छुपी इच्छा असते की मला हे पाहायला मिळावे, ते दिसावे अशाप्रकारची. मात्र आजकाल मी माझ्या इच्छांना आवर घालायला शिकलो आहे, नाहीतर तुमच्यासमोर असलेल्या इतर गोष्टींची  गम्मत तुम्हाला जाणवत नाही, असे असले तरीही कुठेतरी सुप्त इच्छा मनामध्ये असतेच. यावेळी मध्ये बराच काळ गेला होता. मी कान्हामध्ये अनेकदा बिबट्या पाहिला आहे, मात्र मला तो कधीही पावसात दिसला नव्हता, त्यामुळे ती सुप्त इच्छा मला आतून अस्वस्थ करत होती. मात्र मला माहिती होते की कान्हामध्ये बिबट्या दिसणे हेच दुर्मिळ होते पावसाळ्यात तर तो दिसणे जवळपास अशक्य असते. कान्हामधील पावसाची मुख्य समस्या म्हणजे, त्याच्यासोबत सोसाट्याचे वारे वाहतात विजा कडाडतात जे अतिशय भयाण वाटते. त्यामुळे आजूबाजूला असलेला प्रत्येक प्राणी अडोशासाठी धाव घेतो अशावेळी प्राणी दिसणे अवघड होते. तुम्ही जिप्सीला प्लास्टिकचे हुड घातल्यावर, बाजूचा भाग झाकला गेल्याने तुमच्या दृष्टीवर मर्यादा येते जे काही जिप्सीच्या समोर येईल तेवढेच केवळ दिसते. आणि बिबट्या हा असा प्राणी नाही (किमान कान्हामध्ये तरी) जो पावसामध्ये रस्त्यावरून चालत जाईल. तरीही जेव्हा समोरून येणाऱ्या एका जिप्सीने आम्हाला सांगितले की पुढे एका झाडावर बिबट्या बसला आहे तेव्हा आम्हाला विश्वासच बसला नाही कारण असे असेल तर हा जिप्सीवाला तेथून परत  निघालाच कसा (वाईट शंकेखोर मन)?याचे कारण सोपे होते कारण त्या जिप्सीला हूड नव्हतेच त्यांना व्यवस्थित आडोसा मिळत नव्हता. मी खरोखरच सांगतो ज्यांनी कान्हामध्ये खुल्या जंगलात भर पावसात मधोमध अडकणे म्हणजे काय असते हे अनुभवलेले नाही, त्यांच्यासाठी हे कमकुवत हृदयाच्या माणसाचे काम नाही. माझ्यामते जिप्सी तेथून निघून जाण्याचे हे एकमेव कारण असावे. त्यांना जिथे बिबट्या दिसला, तेथे अतिशय उत्साहाने तो अजूनही तिथेच असेल या आशेने आम्ही पुढे गेलो.माझी सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी, साल वृक्षाच्या फांदीवर एक बिबट्या आरामात बसलेला होता. हुडमधून गळणारे पाणी माझ्या चष्म्यावर साचलेल्या धुक्यामुळे हिरव्या पानांच्या गर्दीत तो दिसणे खरोखरच अवघड होते. मात्र वैतागता या सगळ्या अडचणींवर मात करत मी बिबट्या पाहू शकलो याचा मला अतिशय आनंद झाला, त्यामुळेच त्याचे दिसणे अधिक थरारक होते. आम्ही झाडावरचा बिबट्या पाहात जवळपास तासभर घालवला, पावसामुळेच तो बहुतेक इतका वेळ तिथे थांबला असावा तो अगदी आरामात बसलेला असताना, आम्हाला मात्र स्वतः कोरडे ठेवून जिप्सीच पुढे मागे हलवून बिबट्याची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करायचा होता. कारण झाडांच्या कनातीमुळे अचूक छायाचित्रे काढण्यासाठी केवळ एकाच खिडकीचा वापर करता येणार होता. मी स्वतःला आठवण करून दिली की हे कान्हा आहे ते तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवणार नाही. नंतर पुढील तीन सफारींमध्ये मी माझ्या मनात तिथला परिसर शक्य तितका साठवून घेण्याचा प्रयत्न करत होतो दोन्ही दिवस पाऊस आमच्यासोबत लपंडाव खेळत होता, मात्र आम्हाला वाघही दिसला.

मी जंगल आहे जंगल मी आहे"...

दुसऱ्या दिवशी सकाळीही आम्ही पावसाच्या जोरदार सरी अनुभवल्या, हा वळवाचा पाऊस होता. पूर्वी असा पाऊस पडल्यानंतर मी वाघांचे कुतूहल वाटणारे वागणे अनुभवले आहे. वाघ  रस्त्यावर येतात रस्त्यावर साठलेले पावसाचे पाणी पितात. त्यांना कदाचित पावसाचे ताजे पाणी त्यात मिसळलेल्या मातीची चव आवडत असावी! मी जेव्हा आमच्या गाईडपाशी याचा उल्लेख केला, त्याला म्हणालो भाई, फिकर ना करो, रास्ते का पानी पिने कोई टायगर ही जायेगा रोड पर (म्हणजे, भाऊ, पावसामुळे काळजी करू नका, एखादा वाघ पावसाचे पाणी पिण्यासाठी नक्कीच रस्त्यावर येईल), माझे म्हणणे खरे ठरले ज्युनिअर बजरंग (वाघाचे स्थानिक नाव) रस्त्यावरील पावसाचे पाणी पिण्यासाठी आला. काहीवेळा जंगलात  मोठ्या लेन्स बाजूला ठेवण्याचे धाडसही लागते असे व्यावसायिक वन्यजीवन छायाचित्रकार केदार भट यांनी, तरुण छाया चित्रकारांच्या संमेलनाला संबोधित करताना म्हटले होते. मी त्यांच्याशी १००% सहमत आहे कारण वाघाचे अगदी जवळून छायाचित्र घेण्याचा आनंद अवर्णनीय असतो, तुम्हाला त्याच्या शरीरावरील प्रत्येक केस दिसत असतो ते डोळे तुमची लेन्स भेदत तुमच्याकडे आरपार पाहात असतात. मात्र वाघाचा जंगलातील रुबाब काही औरच असतो, तो जंगलाशी एकरूप झालेला असतो. मी ज्युनिअर बजरंगला असेच पाहिले, ७०० एमएम च्या लेन्समधून ५०० एमएमच लांब उभे राहण्याचे धाडस केले (काही क्षण). वाघ जंगलातील रस्त्यांवरून ज्याप्रकारे चालतो त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, जेव्हा रस्त्याच्या दुतर्फा साल वृक्षांचे जंगल असते तेव्हा त्या संपूर्ण परिसराची तुलना चित्रपटाच्या मोठ्या पडद्याशीही होऊ शकत नाही,अगदी ७० एमएम सिनेमा-स्कोप चित्रपटाच्याही नाही. धुळकट रस्ते, हिरवीगार झाडे, पावसाचे ताजे थेंब, या पार्श्वभूमीवर ठिपकेदार हरिणांचे इशारा देणारे चित्कार, प्रत्येक बघ्याने श्वास रोखून धरलेला असताना, तो चालत आला आणि रस्त्याच्या कडेला साचलेल्या डबक्यातून त्याने पाणी प्यायले. ज्युनिअर बजरंगने आम्हाला हे संपूर्ण दृश्य दाखवले रस्त्याच्या कडेला असलेल्या घनदाट झाडीत तो गायब झाला, त्याचप्रमाणे ठिपकेदार हरणांचे इशारा देणारे चित्कारही थांबले. हे संपूर्ण नाट्य साधारण २० मिनिटे चालले असेल मात्र आमच्यासाठी जणू काळ कायमचा थांबला होता, तुम्ही जंगलातून हेच परत घेऊन जाता, म्हणजेच आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी.

कान्हामध्ये वन विभागाने अलिकडेच (म्हणजे साधारण वर्षांपासून) रात्रीच्या सफारी सुरू केल्या आहेत हा अनुभव तुम्ही अजिबात चुकवू नये असा आहे, तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सफारीसाठी पहाटे वाजता उठावे लागेल अशी काळजी वाटत असेल, तर तुम्ही सकाळची सफारी एकवेळ रद्द करू शकता. रात्रीची सफारी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी नंतर सुरू होते तुम्हाला त्यामध्ये कोअर विभागाभोवतालचे जंगल पाहाता येते. मी खरोखरच सांगतो यावेळी जंगल अनुभवण्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, कारण मिट्ट काळोख म्हणजे काय हे तुम्ही तेव्हा अनुभवू शकता. आपल्या शहरी जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने काळोख अनुभवायला मिळतच नाही कारण आपण दिवे बंद केले तरीही आपल्याभोवती असलेल्या शेकडो साधनांच्या प्रकाशामुळे सगळे काही उजळून निघते. जमीनीवरील दिव्यांचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे आकाशही नेहमी निळसर करडे किंवा पांढरे असते. मात्र जंगलामध्ये तुमच्याभोवती कृत्रिम प्रकाश देणाऱ्या कोणत्याही वस्तू नसताना अंधरामध्ये माणसांपेक्षा प्राणी कित्येक पटीने सरस आहेत याची तुम्हाला जाणीव होते. अनेकजण म्हणतील की तुम्हाला काही दिसतच नसेल (म्हणजेच वाघ) तर कशाला वेळ वाया घालवायचा, कारण बफऱ क्षेत्रात तुम्हाला दिवसाही काही दिसत नाही. परंतु जंगलामध्ये रात्री अधिक चैतन्य असते कारण मार्टिन, साळिंदर, तरस असे निशाचर प्राणी सूर्यास्तानंतर शिकारीसाठी बाहेर पडतात. वाघालाही रात्रीच शिकार करायला आवडते, अर्थात तुम्ही रात्रीच्या सफारीमध्ये छायाचित्रे काढू शकत नाही. मात्र जंगलातले प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपायचे नसतात, काही क्षण तुम्ही स्वतः फक्त अनुभवायचे असतातव रात्रीची सफारी अशीच असते. रात्रीच्या सफारीमध्ये आम्हाला एक वाघ दिसला, त्यामुळे तुम्हाला रात्रीच्या सफारीमध्ये फारसे काही पाहायला मिळत नाही हा गैरसमजही दूर झालासगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बफर कोअर या सगळ्या सीमारेषा माणसांनी त्यांच्या व्यवस्थापन यंत्रणेसाठी तयार केल्या आहेत.वाघासाठी किंवा जंगलातल्या कोणत्याही प्राण्यासाठी जंगल हे फक्त जंगल असते ते कुठेही फिरण्यासाठी मुक्त असतात. त्यामुळे, तुम्हाला जंगलाच्या कोअर क्षेत्रामध्ये दिवसाच्या मुख्य सफारीमध्ये वाघ किंवा कोणताही मोठा प्राणी दिसण्यासाठी जेवढे नशीब लागते तेवढेच रात्रीच्या सफारीमध्येही लागते. रात्रीच्या सफारीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणारी दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही डोळ्यांव्यतिरिक्त (पाहणे) इतर ज्ञानेंद्रियांनी जंगल अनुभवायला शिकता, तुम्ही गंध ओळखायला शिकता, आजूबाजूचे अगदी लहानात लहान आवाज ऐकायला शिकता अंधारामध्ये तुमची दृष्टिही अधिक तीक्ष्ण होते.  

आम्हाला जंगलातील अनेक अधिकारी स्थानिकही भेटले, पर्यटकांनी त्यांना आवर्जून भेटावे तरच तुम्ही जंगलांना काय परत देऊ शकता हे तुम्हाला जाणवेलकान्हासारख्या जंगलांना एकीकडे निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे तिथे दुसरीकडे हा भाग आधुनिकीकरणासोबत येणाऱ्या जीवनाच्या सुखसोयींपासून वंचित आहे. याचसाठी आपण अनेक बाबतीत मदतीचा हात पुढे करू शकतो ज्यामुळे स्थानिकांचे जीवन थोडे सुधारेल. प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन किंवा गवंडीकाम तसेच सौर साधनांची दुरुस्ती यासारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देऊन आपण त्यांचा कौशल्य विकास घडवू शकतो (क्रेडेईच्या सदस्यांनी आवर्जून वाचावे). वनविभागासोबत काम करणाऱ्या संघटनांना आर्थिक मदत देऊनही तुम्ही योगदान देऊ शकता, कारण हे जंगलांप्रति आपले कर्तव्य आहे असे माझे कळकळीचे सांगणे आहे. तुम्ही कान्हा किंवा इतर जंगलांसाठी काय योगदान देता येईल याविषयी कोणतीही माहिती हवी असेल किंवा काही मदत हवी असेल तर तुम्ही आमच्या ईमेल पत्त्यावर पत्र लिहू शकता, तसेच माझ्या लेखाच्या खाली दिलेल्या दुव्यावर जाऊन आमच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

कान्हासारख्या जंगलामध्ये खरेतर दोन दिवस अतिशय कमी आहेत, मात्र माझे पुढील कार्यक्रम नियोजित असल्याने मी अतिशय जड अंतःकरणाने पुन्हा लवकर येण्याचे आश्वासन देऊन साल वृक्षांचा निरोप घेतला!

संजय देशपांडे     

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल - smd156812@gmail.com

Jungle bell id- junglebell.pune@gmail.com

You can read our english version @below link.

 https://visonoflife.blogspot.com/2022/07/kanha-rains-leopards-tigers-sal-trees.html


No comments:

Post a Comment