जागतिक वाघ दिन आणि माणूस
“जंगलामध्ये वाघाचा शोध घेत भटकंती करणे व वाघ कदाचित आधीच तुम्हाला पाहात असेल याची जाणीव असण्यासारखा दुसरा थरार नाही.” — शालन गोरसे कॉस्ट्यू
शालन गोरसे कॉस्ट्यू ही एक अमेरिकी मनोरंजन पत्रकार आहे. ती ई न्यूज, डिस्कव्हरी चॅनल व ट्रॅव्हल चॅनल या वाहिन्यांसाठी तिने केलेल्या कामासाठी ओळखली जाते. ती व तिचे पती फिलिप कॉस्ट्यू यांनी अनेक शैक्षणिक व पर्यावरणविषयक दूरचित्र वाहिन्यांवरील कार्याक्रमांची निर्मिती व सादरीकरण केले आहे. अर्थातच, श्रीमती शलान यांनी त्यांच्या कामामुळे जंगलांमध्ये भरपूर भटकंती केली असेल व वाघच तुम्हाला पाहात असेल हे त्यांचे निरीक्षण अतिशय अचूक आहे. कारण मी स्वतः देखील ती भावना अनुभवली आहे, म्हणूनच म्हणतात वाघाच्या अस्तित्वामुळे कोणत्याही जंगलामध्ये अतिशय फरक पडू शकतो. यामुळेच हा प्राणी वन्यजीवनाच्या निसर्ग साखळीमध्ये अतिशय विशेष आहे. लेखाचा विषय जागतिक व्याघ्र दिन असल्यामुळे, मी सुरुवातीच त्यांचे शब्द वापरले. हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून ओळखला जातो, वाघांच्या संवर्धनाविषयी जागरुकता वाढविण्यासाठी तो दरवर्षी २९ जुलैला साजरा केला जातो. क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच वाघाचे अस्तित्वही पृथ्वीवरील जेमतेम दहा देशांमध्ये आहे, मात्र वन्यजीवनाविषयी बोलताना वाघ हा जगभरात चर्चेचा विषय ठरतो (क्रिकेटप्रमाणेच), ही वस्तुस्थिती आहे. रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे २०१० साली झालेल्या व्याघ्र शिखर परिषदेपासून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या परिषदेमध्ये वाघांचा अधिवास असलेले सर्व देश पहिल्यांदा त्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करण्यासाठी भेटले. तेव्हापासून, व्याघ्र संवर्धनासाठी हा दिवस साजरा केला जातो किंवा पाळला जातो हा शब्द योग्य होईल.
अनेक लोक, अगदी कार्यकर्तेही म्हणतील की आपल्याकडे वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जंगल दिवस, वन्यजीवन दिवस व इतरही अनेक दिवस असताना आपल्याला जागतिक व्याघ्र दिनाची काय गरज आहे?मी त्यांना दोष देत नाही, कारण सामान्य जनामध्ये वन्यजीवनाविषयी जागरुकता नसल्यामुळे व्याघ्र दिन साजरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाघ हा निसर्गचक्रातील केवळ साखळी असला तरीही तो अतिशय महत्त्वाची साखळी आहे, ज्याप्रमाणे क्रिकेट संघामध्ये कप्तान हा अकरा खेळाडूंपैकीच एक असतो, मात्र तरीही त्याचे स्थान विशेष असते कारण तो संघाला एकजूट ठेवतो, त्याचप्रमाणे वाघामुळेही जंगलातील संतुलन टिकून राहाते. कोणत्याही जंगलामध्ये वाघ असणे म्हणजे त्या जंगलामध्ये सर्व प्रकारची झाडे-झुडुपे व प्राणी असले पाहिजेत ज्यामध्ये विविध झाडे, वेली, गवत, बांबू व इतरही अशा अनेक बाबींचा समावेश होतो ज्या प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी आवश्यक असतात. त्यानंतर वाघासाठी जलाशयही आवश्यक असतात, म्हणजे तिथे पाणथळ जीवनही असले पाहिजे. जेव्हा कोणत्याही जंगलामध्ये जेंव्हा वाघ असतो तेंव्हा जसा वाघाला चोरट्या शिकाऱ्यांपासून धोका असतो पण अनेक माणसेही जंगलातील इतर घटकांपासून लांब राहातात उदाहरणार्थ अवैध लाकूड तोड किंवा त्या जंगलातील लहान प्राण्यांची शिकार करणे, त्यामुळे वाघ एकप्रकारे त्या जंगलाचा संरक्षकच असतो. म्हणूनच जेव्हा वाघाचे संरक्षण होते, तेव्हा आपण प्रत्यक्षात एका जीवन चक्राचे संरक्षण करत असतो. म्हणूनच जागतिक व्याघ्र दिन हा वाघाच्या जंगलातील भूमिकेला केलेला सलाम आहे.
जेव्हा एका तरुण पत्रकार मुलीने व्याघ्र दिनाविषयी माझे विचार जाणून घेण्यासाठी कॉल केला, तेव्हा त्याविषयी माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद झाला. मला आश्चर्य वाटले की तिने तिच्या प्रश्नांमधून अनेक पैलूंना स्पर्श केला होता ज्यामुळे मी सुद्धा विचारप्रवृत्त झालो, म्हणूनच मी माझ्या लेखासाठी हे प्रश्नच वापरण्याचा विचार केला, ते खालीलप्रमाणे आहेत…
सायली :नमस्कार, व्याघ्र दिनाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.
१. महाराष्ट्रामध्ये/भारतामध्ये या प्रजातीची सद्यस्थिती काय आहे… मी प्रजाती म्हणजे वाघ असे गृहित धरतो, व उत्तम (किंवा चांगली बातमी म्हणूयात) बाब म्हणजे भारत हा एकमेव असा देश आहे जेथे वाघांची संख्या वाढत आहे, संपूर्ण जगभरात मात्र उलट परिस्थिती आहे. आपण सर्वांनी सरकारचे (केंद्रीय व राज्य) तसेच प्रत्येक व्यक्तीचे, संघटनेचे अभिनंदन केले पाहिजे जी जंगलाच्या यंत्रणेचा भाग आहे ज्याला आपण वन संवर्धन असे म्हणतो. त्याचवेळी, दर वर्षी साधारण १५० हून अधिक वाघ माणसाच्या हस्तक्षेपामुळे मारले जातात ही पण वस्तुस्थिती आहे व ते आपण नियंत्रित करणे आवश्यक आहे अशी या प्रजातीची सध्याची परिस्थिती आहे.
२. सरकारने वाघांचे संरक्षण करण्यासाठी काय केले आहे?... प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यापासून म्हणजेच वाघांच्या संवर्धनासाठी समर्पित अभयारण्याची निर्मिती करण्यापासून, ज्याची सुरुवात १९७४ पासून झाली, सरकारने वाघांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. व्याघ्र कृती दलाच्या शिफारसीनुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची डिसेंबर २००६ साली स्थापना करण्यात आली. भारताच्या पंतप्रधानांनी प्रोजेक्ट टायगर व भारतातील अनेक व्याघ्र अभयारण्यांच्या व्यवस्थापनाचे फेरनियोजन करण्यासाठी याची स्थापना केली. राज्य सरकारनेही अनेक वन उद्यानांची तसेच अभयारण्यांची स्थापना केली तसेच म्हणजे वाघांचे माणसांपासून संरक्षण होऊ शकेल. एनटीसीए दरवेळी योग्य प्रकारेच काम करते असे म्हणता येत नसले तरीही, वाघांच्या संवर्धनासाठी पूर्णपणे समर्पित प्रयत्न करते पण त्याला सर्वसमावेशक धोरणाची जोड आवश्यक आहे हे नमूद करावेसे वाटते.
३. आपल्या राज्यात कोणत्या भागांमध्ये वाघांची संख्या चांगली आहे?... आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता, प्रामुख्याने राज्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजेच विदर्भात वाघांची संख्या चांगली आहे. ताडोबा, पेंच, मेळघाट प्रकल्प, उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, बोर, ज्ञानगंगा, टिपेश्वर अशी अनेक अभयारण्ये आहेत जो वाघांचा अधिवास आहे व तिथे त्यांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्याच्या या भागामध्ये शहरीकरण कमी झाले आहे त्यामुळे वाघांना त्यांची जागा मिळाली आहे, मात्र त्यांना शिकारीसाठी प्राण्यांची समस्या आहे ज्यामुळे वाघ गुरे-ढोरे किंवा पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य करतात ज्यामुळे मनुष्य व प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. राज्याच्या इतर भागांमध्ये, पश्चिम भागात मात्र फक्त एक व्याघ्र प्रकल्प आहे तो म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
४. कोणते जंगल वाघांची अधिक चांगल्याप्रकारे काळजी घेते?... अर्थातच वाघांची काळजी घेण्यासाठी व्याघ्र प्रकल्प ही उत्तम अभयारण्ये असतात, तुम्ही प्राणी संग्रहालय व जंगलामध्ये काय फरक आहे हे समजून घेतले पाहिजे. कोणत्याही जंगलामध्ये वाघ स्वतःच्या मर्जीने जगतो व त्याला माणसाने तयार केलेल्या सीमा समजत नाहीत, मात्र माणसांना या सीमांचे पालन करावे लागते, बरोबर? यावर नियंत्रण ठेवणे सोपी गोष्ट नसते, विशेषतः वन विभागाकडे पायाभूत सुविधा कमी असतात व त्यांना इतर विभागांशी तसेच वाघांच्या अवतीभोवती राहणाऱ्या माणसांशीही लढण्यासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. माणसांनाही दोष देता येणार नाही, कारण आजूबाजूला वाघ वावरत असताना तिथे राहणे ही कोणत्याही माणसासाठी सोपी गोष्ट नाही.
५. तुमच्यामते, भविष्य काय आहे?... म्हणजे तुम्हाला वाघाचे भविष्य म्हणायचे आहे? सध्यातरी वाघ माणसे त्यांच्यासाठी कोणता मार्ग निश्चित करतात यावर अवलंबून आहे, त्यानुसारच वाघांचेही भविष्य ठरेल. या उत्तरातून जर स्टार वॉर्स किंवा हॅरी पॉटरचे तत्वज्ञान डोकावत असेल तर माझा त्याला नाईलाज आहे, कारण एक म्हणजे मला दोन्ही गोष्टी अतिशय आवडतात व दुसरे म्हणजे ते खरे आहे. वाघ किंवा इतर कोणत्याही प्रजाती त्यांच्या भविष्याचा विचार स्वतःहून करू शकत नाहीत व ते करू शकले तरीही ते अतिशय कमजोर आहेत किंवा त्यांच्या मुख्य शत्रूएवढे म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माणसाएवढे समर्थ नाहीत. म्हणूनच, आपण माणसे जोपर्यंत वाघांच्या भविष्याविषयी विचार करायला सुरुवात करत नाही, तो पर्यंत ते चांगले असेल किंवा वाईट हे सांगणे अवघड आहे. सध्यातरी ते अवघड वाटते आहे, कारण प्रश्न फक्त संख्येचा नाही कोणतीही प्रजाती अनुकूल परिस्थिती असेल तर प्रजनन करू शकते (माणसांप्रमाणेच), मात्र संख्या वाढल्यानंतर त्यांच्यासाठी जागेचा प्रश्न आहे (पुन्हा माणसांसारखेच) जो प्रजननाचा परिणाम आहे! आपण एकीकडे आपलीच लोकसंख्या नियंत्रित करू नसल्यामुळे माणसांनाच व्यवस्थित निवारा, अन्न देऊ शकत नाही, त्यामुळे वाघांच्या नव्या पिढीला वाढण्यासाठी जागा कुठून मिळेल? या प्रश्नाला आमचे जे उत्तर आहे (म्हणजे कृती आहे) त्यातून वाघांचे भविष्य ठरणार आहे.
६. असे दिवस साजरे केल्याने उपयोग होतो असे तुम्हाला वाटते का? …असे दिन साजरे केल्यामुळे, काही अपाय होणार नाही हे नक्की, बरोबर? आपण व्याघ्र दिनासारख्या दिवसांचा वापर ज्या लोकांना वाघांच्या गरजा माहिती नाहीत, जे केवळ अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी वाघांची छायाचित्रे काढून ती पोस्ट करण्यातच धन्यता मानतात, ज्यांना वाघ पाहण्यासाठी जंगलात जाणे व त्यांची छायाचित्रे काढणे परवडू शकते, अशा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून त्यांना जागरुक केले पाहिजे. मुख्य व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन्य जीवन पर्यटन सर्वांना परवडणारे व्हायला हवे व सर्व पुर्णपणे खुली झाली पाहिजेत, कारण प्रत्येक माणसांचा वाघांवर हक्क आहे म्हणजे त्याचे राजसी सौंदर्य पाहण्याचा हक्क आहे, कारण असे झाले तरच प्रत्येक जण वाघांचे भविष्य अधिक चांगले बनविण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकेल.
७. व्याघ्र संवर्धनाच्या मोहिमेमध्ये हातभार लावण्यामागे तुमची प्रेरणा काय होती?... मी वाघांची संख्या सर्वाधिक असलेल्या विभागातून म्हणजे विदर्भातून वाढलो आहे. माझ्या पर्यावरणाच्या अभ्यासामुळे मला त्यांच्या अधिवासांविषयी, जंगलांविषयी तसेच निसर्गाचा समतोल साधण्याविषयी जाणून घेता आले. तसेच मी व्यवसायाने स्थापत्य अभियंता (व एक बांधकाम व्यावसायिकही) असल्यामुळे मी माणसांसाठी घरे बांधतो, त्यामुळेच वाघांसाठी तसेच त्यासोबत संपूर्ण निसर्ग जीवनचक्रासाठी कोण जागा बांधेल किंवा तयार करेल, असा प्रश्न मी स्वतः विचारतो, त्यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी मी जो थोडाफार हातभार लावतो त्यामागची प्रेरणा हीच आहे. आणि मी हे केले नाही तर, कोण करेल?
शेवटी मी एवढेच म्हणेन की, मानसी तुझे आभार, तुझ्या प्रश्नावलीमुळे मला वाघांविषयीचे माझे विचार सविस्तर मांडण्याची संधी मिळाली व मी तुम्हाला सांगतो, की आपल्यापैकी प्रत्येक जण जीवन जगतो पण आता आपण जगणे व तगणे यातील फरक समजून घेण्याची वेळ आली आहे. जो तगला आहे त्याने इतरही तगतील याची खात्री केली पाहिजे, विशेषतः जे कमजोर आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे, कारण जो सर्वात शक्तीशाली आहे तोच टिकून राहील याचा अर्थ केवळ शक्तीशालीच प्रजातीच टिकून राहतील असे नाही, तर सर्वात शक्तीशाली प्रजाती संपूर्ण जीवन चक्रास तग धरून राहण्यास मदत करेल. माणसामध्ये हे समजून घेण्याची क्षमता असल्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणूनच माणूसच ”व्याघ्र दिन” साजरा करू शकतो किंवा त्याचे पालन करू शकतो, मात्र वाघ “मानव दिन” साजरा करू शकत नाही, हे लक्षात ठेवा!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
ईमेल - smd156812@gmail.com
You can read our English version @below link.
https://visonoflife.blogspot.com/2022/
No comments:
Post a Comment