डॉन नावाचा भटका कुत्रा, एक निनावी मुलगा, एक दुर्दैवी वाघ आणि आपला समाज!
“प्रत्येक
समाजाची जी वर्तणूक असते
त्यानुसार तिथे गुन्हेगार तयार होतात. त्याचप्रमाणे प्रत्येक समुदाय ज्याप्रकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह करतो, त्याप्रमाणे त्यांना कायदा राबविणारी व्यवस्था मिळते”… रॉबर्ट केनडी.
रॉबर्ट
फ्रान्सिस केनडी, ज्यांना आरएफके या आद्याक्षरांनी व
बॉब या उपनावानेही ओळखले
जाते, ते एक अमेरिकी
राजकारणी व वकील होते.
विचित्र योगायोग म्हणजे त्यांचे प्रसिद्ध भाऊ जॉन एफ केनडी जे
अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्यांच्याप्रमाणेच रॉबर्ट यांचीही हत्या करण्यात आली. म्हणून लेखाची सुरुवात करताना त्यांचे गुन्हेगारी व समाजाविषयीचे वरील
शब्द मला वापरावेसे वाटले. या लेखाच्या शीर्षकामध्ये
शहराचा उल्लेख असला तरीही हा लेख मायबाप
सरकारकडून रस्ते किंवा वाहतूक सुधारण्याच्या अपेक्षांविषयी नाही (अर्थात, थोडासा आहे) तर तो एकूणच
लोकांविषयी व समाजाविषयी आहे
(म्हणजेच आपल्या पुण्यातील नागरिकांविषयी). कारण हा विषय केवळ
पुणे शहरच नव्हे तर एकूण पुणे
प्रदेशातील आपल्यापैकी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नेहमीप्रमाणे, दोन नवीन गोष्टी (किंबहुना तीन, तिसऱ्या गोष्टीविषयी मी सगळ्यात शेवटी
बोलेन) होत्या ज्यांनी माझे लक्ष वेधले व खरेतर मी
सहजपणे भावनाविवश होणारी व्यक्ती नाही (म्हणूनच मी बांधकाम व्यावसायिक
होऊ शकतो, जो माझ्या उपजीविकेचा
व्यवसाय आहे), तरीही त्या गोष्टीमुळे मी आतून हेलावून
गेलो होतो. पहिली एका भटक्या कुत्र्याविषयी होती जो लँबोर्गीनीखाली (३ कोटी
रुपयांहून अधिक किमतीची रेसर कार) मरण पावला. दुसरी एका ७ वर्षाच्या मुलाची
होती, जो एक भारतीय
बनावटीच्या कारखाली आल्याने मरण पावला! तुम्ही म्हणाल की त्या मुलाची
बातमी झाली तर काही हरकत
नाही परंतु एक भटका कुत्रा
रस्त्यावर एका कारखाली मरण पावला तर त्यात काय
मोठेसे, तेच त्याचे भवितव्य असते. नाहीतर “कुत्ते की मौत मरना” ही
कुप्रसिद्ध हिंदी म्हण कशी तयार झाली असती, असे वाटते की लँबोर्गिनीच्या मालकालाही
असेच वाटले असावे. दुर्दैवाने जरी हा कुत्रा कारखाली
आल्याने त्याचा मृत्यू झाला, परंतु त्याचे सुदैव होते की लोक त्याच्या
मृत्यूचा विरोध करण्यासाठी एकजूटीने उभे राहिले व त्यांनी त्याच्या
मृत्यूवरून गदारोळ करायला सुरुवात केली. त्या कार मालकाच्या दुर्दैवाने हा सगळा घटनाक्रम
त्या चौकातील सीसी टीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला होता (हे त्या कुत्र्यासाठी
खरोखरच सुदैव म्हणायचे) व त्यामध्ये असे
दिसले की कुत्रे कारच्या
चाकांखाली येत आहे हे कारच्या मालकाला
दिसत होते त्यानंतरही त्याने गाडीचा वेग वाढवला व बिचाऱ्या कुत्र्याला
काही अंतर फरफटत नेले, व त्या ठिकाणाहून
पळ काढला, त्या बिचाऱ्या कुत्र्याचे काय झाले आहे हे तपासण्याची तसदी
त्याने घेतली नाही.
मी
कुत्रा कारच्या टायरखाली येतानाचा सीसी टीव्ही फुटेजचा हा व्हीडिओ पाहिला
आहे व तो अतिशय
वेदनादायक आहे (कोणाचेही मृत्यू दर्शन हे वेदनादायकच असतो),
परंतु त्यापेक्षाही चालकाचा दृष्टिकोन अधिक धक्कादायक होता व माझ्या लेखाचे
हेच कारण आहे, ते म्हणजे इतरांच्या
आयुष्याविषयी पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवणारा दृष्टिकोन. विरोधाभास म्हणजे, सदर कारचा मालक पुण्यातील एक अतिशय मोठा
सराफ आहे व ज्या चौकामध्ये
त्याच्या उंची कारने कुत्रा ठार झाला, त्याच चौकात त्यांच्या दुकानाचे मोठे भित्तीफलक लावलेले आहेत, ज्यावर मोठ्या अभिमानाने त्यांच्या दागिन्यांची डिझाईन दाखविण्यात आली आहेत व कौटुंबिक मूल्ये
व जीवनाविषयी संदेश लिहीलेला आहे. त्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक घटना झाली.
एका शेतकरी माणसाच्या गाडीने एका दुचाकीला धडक मारली, ही दुचाकी एक
महिला चालवत होती व तिच्यामागे तिचा
७ वर्षांचा मुलगा होता. तो मुलगा त्या
शेतकऱ्याच्या कारच्या चाकांखाली आला. तरीही तो माणूस गाडी
चालवतच राहिला मुलगा जवळपास २०० मीटरपर्यंत गाडीसोबत फरफटत गेला व त्यातच त्याचा
मृत्यू झाला. एका आईसाठी तिचा मुलगा एका कारखाली फरफटत जाताना पाहणे हा किती भयंकर
अनुभव असेल व ती अगतिक
होती. इथेही कार चालकाला कल्पना होती की तो एका
दुचाकीला धडकला आहे, त्याने तिथल्या तिथे थांबायला हवे होते. त्यामुळे त्या लहान मुलाचे आयुष्य कदाचित वाचले असते, ज्याप्रमाणे लँबोर्जिनीचा चालक त्या कुत्र्याला धडकल्यानंतर थांबला असता तर त्याचे प्राण
वाचले असते, परंतु तोही थांबला नाही.
हा
दृष्टिकोनच माझ्या लेखाचा विषय आहे कारण त्यातून दोन गोष्टी दिसून येतात: एक म्हणजे, समाज
इतरांच्या आयुष्याविषयी किती निष्काळजी झाला आहे व दुसरे म्हणजे
आपली कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा किती कमकुवत, जीची भीतीच कोणाला वाटत नाही! निष्प्रभावी झाली आहे ज्यामध्ये आपल्या न्याय यंत्रणेचाही समावेश होतो. अपघाताच्या दोन्ही घटनांमध्ये (खरेतर मी त्याला अपघात
म्हणू शकत नाही, परंतु कायदा तसे म्हणतो) सहभागी पुरुष ड्रायव्हर तंदुरुस्त, निरोगी व चांगल्या मानसिक
स्थितीमध्ये होते (किंबहुना त्यापैकी जो सराफ आहे
तो तर समाज माध्यमांवर
इन्फ्लूएन्सर आहे, त्याच्या तंदुरुस्तीसाठी तो काय-काय
करतो याविषयी नेहमी व्हीडिओ पोस्ट करत असतो) व त्यांनी हे
कृत्य दिवसा-ढवळ्या गजबजलेल्या रस्त्यावर केले. त्यांची वाहनेही सुस्थितीत होती, म्हणजे कारचा ब्रेक लागला नाही किंवा एखादा भाग काम करत नव्हता वगैरे असे काहीही नव्हते. त्यांनी जेव्हा अपघातातील संबंधित पीडितांना धडक दिली, त्यांच्यापैकी कुणीही एकदाही थांबण्याचा व मृताची मदत
करण्याचा विचार केला नाही. कुत्र्याच्या प्रकरणातील चालकाने तर आधी तो
गाडी चालवत होता ही बाबच धुडकावून
लावली. परंतु तोच गाडी चालवत होता हे सीसी टीव्हीच्या
दृश्यांमधून अगदी ढळढळीतपणे स्पष्ट झाले, त्यामुळे नंतर त्याला कबूल करावेच लागले. तसेच शहराच्या या भागामध्ये एकच
लँबोर्गिनी कार आहे हे त्याचे आणखी
एक दुर्दैव, नाहीतर ही त्याची कारच
नाही असे तो सरळ म्हणाला
असता. या
दोन्ही पुरुषांची आपापली कुटुंबे आहेत, ते सुशिक्षित आहेत
व तरीही ते अपघातानंतर अशाप्रकारे
वागण्याइतके असंवेदनशील किंवा निर्लज्ज कसे असू शकतात हे मला समजण्याच्या
पलिकडचे आहे. एकूणच समाजासाठी हे अधिक घातक
आहे, कारण पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून,
एक मित्र म्हणून, एक वरिष्ठ म्हणून,
एक सहकारी म्हणून एकमेकांना मदत करण्यात व जीवनाचा आदर
करण्यात आपण कमी पडत आहोत. मूल्ये, मानवता, करुणा, चांगुलपणा, दयाळूपणा, मदत व यासारख्या इतर
शब्दांचे काय झाले, आपण एकमेकांना ते समजून का
सांगत नाही, या विषयावर लेख
लिहीण्याचे माझे हेच कारण आहे.
इथे,
विद्यार्थी असताना मी दिलेल्या कल
चाचण्यांपैकी एक मला आठवते
आहे, त्यामध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता की केळीच्या सालावर
पाय घसरून पडणारी एखादी व्यक्ती पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? बहुतेक विद्यार्थ्यांचे उत्तर असे, की आम्ही लगेच
त्या माणसाची मदत करायला जाऊ, परंतु बरोबर उत्तर होते (म्हणजे परीक्षकांच्या मते) तुम्ही ते दृश्य पाहून
आधी हसाल. ते उत्तर कदाचित
मानसशास्त्रानुसार बरोबर असेल, परंतु माझ्यामते ते चुकीचे होते
कारण त्यातून तुम्हाला इतरांच्या दुःखाबाबत असंवेदनशीलपणा शिकवला जातो. आपण विद्यार्थ्यांना इतरांना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा ते सर्वप्रथम ते
त्यांना मदत करण्याचा विचार करतील असेच शिकवले पाहिजे, आपल्या मूळ स्वभावानुसार प्रतिसाद देण्यास नाही. आपल्या घरांपासून ते शाळांपर्यंत ते
कामाच्या ठिकाणांपर्यंत समाजामध्ये नेमके हेच होताना दिसत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर अलिकडेच समृद्धी
महामार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातामध्ये जेव्हा बसला आग लागली तेव्हा
त्याच मार्गावरून जाणारी इतर वाहने मदत करण्यासाठी थांबली नाहीत तर सरळ पुढे
निघून गेली. कारण बहुतेक लोक दुर्घटनेतील पीडित व्यक्तींना मदत करण्यापासून चार हात लांब राहतात व याची कारणे
केवळ स्वार्थीपणा नाही तर इतरही अनेक
आहेत. जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण हे सांगितले पाहिजे
कारण आपण अपघात नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक वाहनाच्या मागे पोलीस लावू शकत नाही; ही वस्तुस्थिती आहे,
लोकांनीच एकमेकांच्या आयुष्याची काळजी घेतली पाहिजे, नाही का?
मुद्दा केवळ इतर लोकांच्या आयुष्याची काळजी करण्याचा नाही तर मला आपल्याभोवती दिसत आहे की राज्याच्या या तथाकथित सांस्कृतिक राजधानीत लोक स्वतःच्या आयुष्याचीही काळजी करत नाहीत. दररोज सकाळी (खरेतर, कोणत्याही वेळी) मी जेव्हा बॅडमिंटन कोर्टकडे माझ्या गाडीने जात असतो व रस्त्यावरचा सिग्नल लाल असतो, तेव्हाही सगळ्या वयोगटाचे, लिंगाचे व व्यवसायाचे, बहुतेक वाहन चालक जर तिथे वाहतूक पोलीस नसेल तर धडाधड लाल सिग्नल तोडून पुढे जात असतात.मला आश्चर्य वाटते की, केवळ तरूणच नाहीत तर अगदी मध्यम वयीन आयाही ज्यांच्या पाठीला त्यांची लेकरं चिटकून बसलेली असतात (त्यांनी हेल्मेट घातलेले नसते हे सांगायची गरज नाही), तसेच आजोबाही, सिग्नल तोडताना मला दिसतात. आपण आपल्या मुलांना काय शिकवत आहोत, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. विनोद म्हणजे, जेव्हा आपण लाल सिग्नल तोडण्यासारख्या मूलभूत कायद्याच्या नियमांचे पालन करण्याविषयी विचारतो तेव्हा असे कारण दिले जाते की आम्ही पुढे सरकलो नाही तर मागून मोठी वाहने हॉर्न वाजवत राहतात व अनेकदा आम्हाला धडक मारण्याची भीती घालतात, हे देखील खरे आहे, पण परत वृत्तीचा प्रश्न आला समाजाच्याच!!
इथेच
माझ्या लेखाचा दुसरा भाग येतो (दुर्दैवाने, पुन्हा सरकारशी संबंधित), लोकांना आता कायद्याची व दंड करण्याच्या
त्याच्या ताकदीची भीती वाटत नाही, समाजामध्ये होत असलेली ही सर्वात वाईट
गोष्ट आहे. अपघातांच्या या दोन्ही घटनांमध्ये
सीसी टीव्ही फुटेज उपलब्ध होते तसेच त्या शेतकरी ड्रायवरला
जमावाने घटनास्थळीच पकडले त्यामुळे पुढील कारवाई करणे शक्य झाले. परंतु आपले कायदे लोकांना त्यांचा आदर करायला लावण्यात किंवा दहशत वाटायला लावण्यात का अपयशी ठरत
आहेत हा एक मोठा
प्रश्न आहे. याचे उत्तर आहे, कायद्याची अंमलबजावणी करणारी कमकुवत (मी भ्रष्ट म्हणणार
नाही कारण त्याचा निवाडा मी करू शकत
नाही) यंत्रणा, ज्यामध्ये न्यायव्यवस्थेचाही समावेश होतो, ज्यामध्ये जुने-पुराणे वाहतूक कायदे आहेत व ते राबवणारी
कमकुवत यंत्रणा आहे, ज्यामुळे हे खटले वर्षानुवर्षे
प्रलंबित असतात. यामुळेच अपघाताच्या प्रकरणांमधील आरोपींच्या मनातील शिक्षेची भीती निघून जाते.याचा एक तिसरा पैलूही
आहे, (माफ करा मी माझी शपथ
मोडतोय) तो म्हणजे वाहतुकीसंदर्भातील
निकृष्ट पायाभूत सुविधा (कमी मनुष्यबळ), रस्त्यांवर पडलेले खड्डे, बंद पडणाऱ्या सिग्नल यंत्रणा, दयनीय सार्वजनिक वाहतूक व त्यामुळे रस्त्यांची
कोंडी करणारी खाजगी वाहने व ही यादी
कधीही न संपणारी आहे.
यातही
रुपेरी किनार म्हणजे समाज पुढे आला व अपघाताचे प्रकरण
माध्यमांमध्ये (विशेषतः भटक्या कुत्र्याचे), तसेच अधिकाऱ्यांकडे व पोलीसांकडे लावून
धरले व संबंधित चालकावर
गुन्हा दाखल करायला लावला. हे योग्यच झाले,
कारण हा तुमच्या व
माझ्या तसेच आपल्या प्रियजनांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मग ते अगदी
एखादे कुत्रे का असेना. आपणच
जर त्यांच्या आयुष्याचे रक्षण केले नाही तर सरकार आपल्या
आयुष्याचे रक्षण करेल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो, बरोबर?
सरते
शेवटी तिसरी घटना होती आपल्या राज्याच्या पश्चिमेकडील एका जंगलामध्ये (विदर्भामध्ये) वाहनाची धडक बसून एक वाघ जखमी
झाल्याची ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर फिरत होती. तो बिचारा वाघ,
जखमी अवस्थेत असहाय्यपणे स्वतःचे शरीर ओढत चालला होता, या इजांमुळे त्याचा
नंतर मृत्यू झाल्याची बातमी मला मिळाली. इथेही, चालकाचा (म्हणजेच समाजाचा) दृष्टिकोनच कारणीभूत आहे, कारण जेव्हा आपण जंगलातून वाहने चालवत असतो, तेव्हा सरकारकडे जंगलात चांगले रस्त बांधण्यासाठी पुरेसा निधी किंवा पैसे नसले, तरीही वन्यजीवन वाचविण्यासाठी आपण आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित करू शकतो, नाही का? ”जगा व जगू द्या” हा
आयुष्याचा मूलभूत मंत्र आपल्याला कोण शिकवणार आहे, हा प्रश्न मी
आज आपल्या सगळ्यांना विचारणार आहे, इथे आपण आपल्याला आरामात वाहने चालवता यावीत यासाठी बांधलेल्या रस्त्यांवर एक भटका कुत्रा
असुरक्षित आहे, वाघही असुरक्षित आहे व मनुष्याचाच लहान
मुलगाही असुरक्षित आहे (हे तिघेही मरण
पावले आहेत). हे जोपर्यंत आपल्याला
जाणवत नाही तो तोपर्यंत डॉन
नावाचा भटका कुत्रा, अनोळखी मुलगा व आपल्यापासून लांब
कुठल्यातरी जंगलात असलेला वाघ या सगळ्यांच्या आत्म्याला
शांती लाभो, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना!
संजय
देशपांडे
संजीवनी
डेव्हलपर्स
ईमेल:
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment