"वन्यजीवनाशिवाय जंगल म्हणजे
फक्त एक निसर्गरम्य देखावा." … लुईस क्रिस्लर
लुईस ई. ब्राउन क्रिस्लर या एक अमेरिकी लेखक, चित्रपट निर्मात्या व संवर्धक
आहेत. त्यांनी लांडग्यांविषयी व आर्क्टिकमधील वन्यजीवनाविषयी पुस्तकेही लिहीली आहेत. ज्यामध्ये आर्क्टिकक वाईल्डचाही समावेश होतो.
मी, आर्क्टिक वाईल्ड वाचलेले
नाही, वाचायची इच्छा
मात्रा निश्चितच आहे. परंतु ताडोबाविषयीच्या
(दुसरे काय) एखाद्या लेखासाठी लुईस यांचे शब्द वापरण्याची इच्छा होती व म्हणूनच वरील अवतरण वापरले आहे. तुम्हाला असे वाटत असेल की मला ताडोबानी वेडे केले आहे तर ते मान्य करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत
नाही. याचे कारण केवळ ताडोबातील वाघ नसून तेथील समृद्ध
वन्यजीवन आहे! मी जेव्हा वन्यजीवन म्हणतो
तेव्हा त्याचा अर्थ वाघ तसेच त्यांच्यासोबत संपूर्ण परिसंस्था किंवा जीवनचक्र असा
होतो ज्यामध्ये माणसे व अगदी माणसे जी वाहने वापरतात त्यांचाही
समावेश होतो.
ताडोबाला यावर्षीच्या उन्हाळ्यात दिलेली ही माझी सीझन संपतांनाची शेवटची भेट होती आणि इथे मला जवळपास पाच दिवस सलग राहता आले व ताडोबाचा बहुतेक सर्व भाग फिरता आला (म्हणजे
पुन्हा एकदा). या काळात बऱ्याच घटना घडल्या ज्यामुळे मला केवळ
अनेक उत्तम छायाचित्रे काढण्याची संधीच मिळाली नाही तर त्या काळात मला ताडोबातील
संपूर्ण वन्यजीवनाचे अधिक जवळून निरीक्षण करता
आले व अभ्यास करता आला, ज्यामुळे या ठिकाणाच्या मी
अधिकच प्रेमात पडलो. मी इतके वेळा ताडोबाविषयी लिहीण्याचे हेही एक कारण आहे.
प्रत्येक जंगलाचे वन्यजीवन आपापल्या परीने विशेष असते. परंतु आपण ताडोबासारख्या
ठिकाणाचा का अभ्यास करू शकत नाही (म्हणजे
त्यापासून शिकू शकत नाही), जे ईतरत्रही वन्यजीवन संवर्धनासाठी
वापरता येऊ शकते ज्यामुळे अन्य ठिकाणीही वन्यजीवन वाढवता
येऊ शकते कारण बहुतेक ठिकाणी वन्यजीवन संवर्धनासाठी सिस्टिमवर बराच ताण असतो ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे अगदी
अलिकडेच वर्तमानपत्रात एक बातमी आली होती की गेल्या
चार वर्षात जवळपास ९५,००० हेक्टर वनजमीन वनेतर वापरासाठी रुपांतरित करण्यात आली
आहे. ही अधिकृत आकडेवारी आहे यावरून तुम्ही प्रत्यक्षात आकडेवारी काय असेल याची
कल्पना करू शकता, बरोबर? याच बाबतीत ताडोबासारखी
ठिकाणे इतरांसाठी आदर्श ठरतात कारण इथे वाघ (म्हणजे वन्य प्राणी) व माणसे सौहार्दाने
राहतायेत (काही संघर्षाचे क्षण असतात परंतु ते तर माणसाच्या कुटुंबातही होतात) तर हे इतर ठिकाणी का होऊ
शकत नाही. याचे मुख्य कारण एक म्हणजे आपले अज्ञान व दुसरे म्हणजे आपली हाव.
दुसऱ्या कारणासाठी मी फारसे काही करू शकत नाही, परंतु पहिल्या कारणासाठी म्हणजे
अज्ञानासाठी, मी ताडोबाने मंत्रमुग्ध होण्यासोबतच त्याविषयी लिहीत राहतो. लोकांना फक्त वाघांविषयी आकडेवारी सांगून किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील
पीडितांना किती नुकसानभरपाई दिली जाते किंवा किती चौरस किमी वनक्षेत्र आहे हे
सांगून किंवा त्यांना सुंदर छायाचित्रे दाखवून नव्हे तर वन्यजीवनाविषयी संवाद व चर्चा घडवून हे
करणे आवश्यक आहे. यातूनच आपल्याला वन्यजीवन व त्याच्या संवर्धनाविषयी मिथके,
सकारात्मक बाबी, नकारात्मक बाबी व गैरसमज समजून घेता येतील.
मी अलिकडेच माझ्या ताडोबाच्या सफारीची छायाचित्रे फेसबुकवरील एका ग्रूपवर प्रसिद्ध
केली होती, जो वाघांसाठी समर्पित आहे
(टायगर्स ऑफ इंडिया), त्यावर मी एका वाघिणीविषयी लिहीले होते, जी एका रानडुकराची
शिकार करून तो खात होती, आणि तिच्या पाठीमागे ताडोबातील रिसॉर्ट
होती, यामध्ये मी अशा दृश्यांचे महत्त्व नमूद केले होते. त्यानंतर त्या ग्रूपवर जी
चर्चा सुरू झाली ती वन्यजीवनाविषयी अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी एक
उत्तम धडा ठरली (माझ्यासाठीही). त्यामुळेच मी ही चर्चा शक्यतो आहे त्या स्वरूपात द्यावी
असा विचार केला …
प्रसिद्ध करण्यात आलेले छायाचित्र व मजकूर:
हे प्राणी संग्रहालयातील छायाचित्र नाही, हे ताडोबातील दृश्य आहे!
वाघीण मुक्तपणे शिकार करते व शिकारीवर दिवसाढवळ्या ताव मारत आहे व अनेक लोक हे दृश्य त्यांच्या हॉटेलच्या व्हरांड्यातून सुद्धा पाहू शकतात, लोकहो हे
पाहताना फारच भारी व थरारक वाटत असेल तरीही तुम्ही या वाघीणीच्या अवतीभोवती
असलेल्या झोपड्यांमध्ये राहात असता व तुमच्या दैनंदिन कामांसाठी या रस्त्यावरून रात्रीच्या
अंधारात तुम्हाला चालत जावे लागते तेव्हा हे सोपे नसते. त्याचवेळी, त्या वाघीणीसाठीही सतत माणसांच्या नजरेसमोर राहणे सोपे नसते व तरीही
वाघीण व माणूस या दोघांनीही हे आयुष्य स्वीकारले आहे व आनंदाने जगत आहेत, हे सहजीवनाचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. वनविभाग तसेच स्थानिकांनी
अनेक दशके काम करून हे यश मिळवले आहे व म्हणूनच ताडोबाला खऱ्या अर्थाने केवळ
वाघांची भूमी नव्हे सहजीवनाची भूमी असे म्हटले जाऊ शकते. “कॉलरवाली वाघीणीची मेजवानी,
ताडोबातील उन्हाळा, २४” (सोबत छायाचित्र जोडण्यात आले होते)
त्यानंतर खालीलप्रमाणे टिप्पणी व उत्तरांचे सत्र सुरू झाले, मी ग्रूपचा
खाजगीपणा जपण्यासाठी त्यातील सदस्यांची नावे १, २ व ३ अशी दिली आहेत, त्याला काही
हरकत नसावी, परंतु त्यांचे शब्द मात्र आहेत तसेच देण्यात आले आहेत …
सदस्य १
अतिशय छान वर्णन करण्यात आले आहे. आपले वन्यजीवन केवळ निसर्गाप्रती आपला सांस्कृतिक आदर व त्याची आराधना यामुळेच
ते टिकून आहे असे वाटते, नाही तर हे सगळे बरेच आधी नष्ट झाले असते!
सदस्य २
वन्यजीवन व माणसांच्या सहजीवनाचे हृद्य वर्णन ज्याविषयी या फेसबुक ग्रूपवर
क्वचितच चर्चा होते. ताडोबातील वाघ व
माणसांदरम्यान सहजीवनाचे हे बोलके छायाचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल
आभार. माझा प्रश्न असा आहे: इतर राष्ट्रीय
अभयारण्यांमध्ये याचे अनुकरण का केले जात नाही, जेथे वाघ आहेत? कदाचित, ताडोबा वाघ व माणसांमधील सौहार्दपूर्ण
सहजीवन दाखवेल, या अभूतपूर्व गोष्टीचा भारतातील इतर व्याघ्र अभयारण्यामध्ये
अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास करणे योग्य ठरेल.
सदस्य ३
प्रिय सदस्य २ ताडोबातील वाघांची संख्या वाढली आहे व म्हणून ते पाळीव
प्राण्यांसारख्या सहज मिळणाऱ्या शिकारीसाठी जंगलातून बाहेर येतात. अशाप्रकारची
दृश्ये काही प्रमाणात पिलिभीत, दुधवा, रणथंबोर येथे आढळून आली आहेत. अशाप्रकारचे सहजीवन
दीर्घकाळात चांगले नाही. ज्या वाघीणीला अन्नासाठी
पाळीव प्राण्यांना मारायची सवय आहे तिला बछडे असल्यास ती धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत ती कितीवेळा
मानवी वसाहतींवर हल्ले करेल याचा विचार करा. त्यामुळे माणसांवरही हल्ले होऊ शकतात, व त्यानंतर त्याचा एकच परिणाम होतो, व वाघांसाठी
तो फारसा चांगला नसतो.
सदस्य २
प्रिय सदस्य ३
मूळ लेखावरून, मला असे वाटत होते की ताडोबातील सहजीवन दशकभरापेक्षा अधिक
काळापासून आहे. आता तुम्ही म्हणताय की
दीर्घकाळात हे चांगले नाही. या टिप्पणीने मला आश्चर्य
वाटले. सहजीवन म्हणजे जी माणसे
व्याघ्र अभयारण्याच्या अगदी जवळ राहतात त्यांना या वस्तुस्थितीची पूर्णपणे जाणीव
असते की (किंवा असली पाहिजे) त्यांना काही गुरेढोरे गमवावी लागतील. जर वनविभागाचा या
सहजीवनामध्ये सहभाग असेल, तर त्यांनी गुरेढोरे गमावण्यासाठी शेतकऱ्यांना
नुकसानभरपाई दिली पाहिजे (जे आफ्रिकेमध्ये केले जाते) म्हणजे त्यांना वाघांना
मारावे लागणार नाही. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पर्यटकांकडून पुरेसा महसूल मिळतो. जर हे सहजीवन इतक्या
दिवसांपासून सुरू असेल, तर ते आत्ता इतके अपायकारक कसे असेल?
सदस्य ३
प्रिय सदस्य २ यामुळे जंगलाच्या सीमावर्ती भागात राहणारे वाघ सहजपणे मिळणाऱ्या
शिकारीवर अवलंबून राहू लागतील व ते दीर्घकाळात घातक ठरेल.
संजय देशपांडे
प्रिय सदस्य १ व २, कौतुक करण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार व सदस्य २ तुम्ही
वाघांच्या संवर्धनाचा मुद्दा अतिशय नेमकेपणाने मांडला. वाघांपुढे आता एकच पर्याय
आहे तो म्हणजे माणसांना त्यांच्या आयुष्यात स्थान देणे व माणसांनीही हे समजून
घेतले पाहिजे. सदस्य ३ यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रक्रियेमध्ये दोघांनाही थोडे बदलावे
लागेल परंतु यालाच निसर्ग म्हणतात, जगण्यासाठी बदल आवश्यक असतो, कारण मृत वाघाचा
किंवा नामशेष झालेल्या वाघाचा काय उपयोग, त्यापेक्षा जिवंत वाघाने गुराढोरांची
शिकार करून राहण्यात मला जास्त आनंद आहे.
सदस्य ३
प्रिय संजय देशपांडे वाघांनी कुत्री किंवा गुरेढोरे खाल्ल्यामुळे त्यांना
एखाद्या आजाराचा संसर्ग झाला तर काय, ते झपाट्याने नामशेष होतील. त्यांना असलेला धोका
वास्तव आहे. यामध्ये लूत, रेबीज (जलभीती),
लुळ्या (कॅनाईन डिस्टेंपर) व इतरही अनेक रोगांचा समावेश होतो. हे केवळ एक-दोन वाघांबद्दल
नाही; तर हे सर्व वन्य
प्राण्यांबद्दल आहे. अगदी अलिकडे म्हणजे २०१९
मध्ये, ३४ सिंह लुळ्या रोगाने मरण पावले, व आपण काहीही करू शकलो नाही. गिधाडांची संख्या हळूहळू कमी होत गेली कारण त्यांना गुराढोरांच्या धडावर
जगण्याची सवय होती. जंगले व त्यातील रहिवाशांचे
रक्षण करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे अतिरिक्त वाघ इतर जंगलांमध्ये
स्थलांतरित करणे, नाहीतर त्यामुळे केवळ विनाशच होईल.
सदस्य २
प्रिय सदस्य ३, लुळ्या रोगाने अनेक सस्तन प्राणी प्रभावित होतात यामध्ये पाळीव
प्राणी व जंगली कुत्री, कोयोटी, कोल्हे, स्कंक या प्राण्यांचा
समावेश होतो परंतु ते तेवढ्यापुरतेच मर्यादित नसतात. या सस्तन प्राण्यांमध्ये तसेच
वाघांमध्ये माणसे व इतर प्रजातींमध्ये उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये होते
त्याप्रमाणे रोगप्रतिकारक्षमता विकसित होते. वाघांना स्थलांतरित करून त्यांचे संवर्धन करावे या तुमच्या मताबाबत माझे दुमत
नाही. परंतु, हे स्थलांतर सर्वंकष संवर्धनाच्या योजनेचा एक भाग असावा ज्यामध्ये
माणसे व वाघांदरम्यानच्या सहजनीवनाचा समावेश असला पाहिजे.
तुम्ही वर नमूद केलेल्या ३४ सिंहांची घटना अजून सिद्ध झालेली नाही. नव्या
संशोधनातून असे दिसून आले की कुत्री हे टांझानियातील सेरेंगेटी राष्ट्रीय
अभयारण्यातील सिंहांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण नव्हते. नॅशनल अकॅडमी ऑफ
सायन्सच्या मते इतर अज्ञात वाहक त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होते. १९९४ पासून कुत्र्यांचे
लसीकरण सुरू झाल्याने त्यामुळे (जेव्हा सेरंगेटीमध्ये सिंहामध्ये या रोगाचा
पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला) या आजाराचा प्रसार कमी होण्यास व सिंहांची संख्या
वाढण्यास मदत झाली आहे. लुळ्या रोगाच्या विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी पद्धती
आहेत.
सदस्य ३
प्रिय सदस्य २, सध्या आपल्याकडे पुरेशी जंगले आहेत जी त्यांच्या प्रत्यक्ष
हद्दीत किमान १०००० वाघांना सामावून घेऊ शकतील. परंतु दुर्दैवाने, त्यांचे वितरण इतके असमान आहे की ताडोबा, पिलिभीतसारख्या
जंगलांमध्ये अक्षरशः अति गर्दी आहे. स्थलांतराच्या योजनेमुळे वाघांची संख्या वाढेल तसेच ते निरोगीही राहतील. यामुळे प्राणी-माणसांमधील
संघर्ष टाळण्यासही मदत होईल. आशियायी सिंहांना आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे कारण त्यांच्याकडे
जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. मला माहितीय हे अतिशय आव्हानात्मक काम आहे, परंतु सध्या आपल्याला माणसांच्या
व वाघाच्या सहजीवनाची गरज नाही. मला अगदी खात्रीशीरपणे माहितीय की अशी योजना तयार केली जातेय, व मी फक्त अशी
आशा करतो की ती लवकरच प्रत्यक्षात येईल.
सदस्य २
प्रिय सदस्य ३, स्थलांतराचा प्रकल्प सर्वंकष
व्याघ्र संवर्धन प्रयत्नांचा एक भाग असला पाहिजे केवळ एक पद्धत म्हणून नसावा. व्याघ्र प्रकल्पांच्याजवळ
राहणाऱ्या शेतकऱ्यांना परिस्थितिकी व्यवस्थेमध्ये वाघांच्या फायद्यांविषयी प्रशिक्षित
केले पाहिजे व त्यांना गुरे-ढोरे गमवावी लागली तर त्यांना योग्य ती भरपाई दिली
पाहिजे जेणेकरून वाघांना वाचवता येईल. आफ्रिकेतील स्वयंसेवी संस्थांनी सहजीवनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे
टांझानिया व केनियातील सिंहाची संख्या वाढण्यास अतिशय मदत झाली, स्थलांतरासाठी
नाही.
जर भारतामध्ये आणखी १०,००० वाघांसाठी पुरेशी जागा उरलेली असेल तर, आपण
सीमेच्या वादातून व शिकारीमुळे वाघांचे एवढे मृत्यू का पाहात आहोत.
सदस्य ३
प्रिय सदस्य २, याचे कारण आहे असमान वितरण. याचे साधे उदाहरण म्हणजे
ताडोबामध्ये बफर क्षेत्रासह जवळपास १७५० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात १०० वाघ
आहेत. म्हणजे दर १७ चौरस किलोमीटरला एक वाघ आहे. नवेगाव नागझिरामध्ये १९०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात ११
वाघ आहेत, म्हणजे जर १९० चौरस
किलोमीटर क्षेत्रात एक वाघ आहे. इतरही घटक असतील, परंतु जर दोन्ही जंगलातील
वाघांची संख्या समान असेल तर वाघाला जंगलातून बाहेर का पडावेसे वाटेल. मेळघाटात २५०० चौरस
किलोमीटरच्या क्षेत्रात ५७ वाघ आहेत. हे वितरण पूर्णपणे असमान आहे, याचे मुख्य कारण
म्हणजे जंगलांदरम्यानच्या मार्गिका माणसाने गिळंकृत करून टाकल्या आहेत. भारतामध्ये
५५ वेगवेगळ्या उद्यानामध्ये ७२००० चौरस किलोमीटर क्षेत्र वाघांसाठी संरक्षित
क्षेत्र म्हणून राखून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ३००० हून अधिक वाघ आहेत. यापैकी जवळपास १५ उद्यानांमध्ये १ किंवा ०
वाघ आहेत. स्थलांतर ही अतिशय मोठी व अवघड प्रक्रिया आहे. परंतु नागझिरा, ताडोबा,
मेळघाट यासारख्या जवळपासच्या अभयारण्यांमध्ये स्थलांतराचा विचार करता येईल. मला अशी आशा वाटते की हा
प्रकल्प लवकरच साकार होईल.
सदस्य २
प्रिय सदस्य ३, विविध राष्ट्रीय अभयारण्यांमध्ये
वाघांचे वितरण असमान असल्याची मला जाणीव आहे. कर्नाटकातील म्हैसूर जवळच्या बांदिपूर राष्ट्रीय अभयारण्यामध्ये साधारण १०००
चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये १७५ ते १८० वाघ आहेत म्हणजे प्रत्येक ६ चौरस किलोमीटर
क्षेत्रामध्ये १ वाघ आहे. सहजीवन व अभयारण्यापासून
अगदी जवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित केल्यामुळे येथील वाघांची संख्या
वाढण्यास हातभार लागला आहे. मला असे वाटते बांदिपूर
अभयारण्याची क्षमता संपली आहे. मला अशी आशा वाटते की वाघांचे स्थलांतर करण्यासोबतच प्रशिक्षण दिल्यामुळे
संपूर्ण भारतात वाघांची संख्या वाढेल. १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये १,००,००० वाघ होते. ते
अजंठा गुफांच्या भोवती असलेल्या दऱ्यांमध्ये राहात होते, त्यानंतर तेथून जावे
लागले.
सदस्य ३
हा धोकादायक कल आहे!!
त्याचे दस्तऐवजीकरण
केल्याबद्दल कौतुक, अतिशय सुंदर छायाचित्रे आहेत
दीर्घकाळीत, वाघीणीसाठी हे धोकादायक असेल, त्यामुळे तिच्या वर्तनात बदल होईल,
या किंवा इतर कोणत्याही वाघीणीने हल्ला केल्याची एखादीही घटना घडली, मग त्याचे
कारण काहीही असले तरीही त्याचा फटका कुणाला बसेल हे आपण सगळे जाणतो. ते आधीच झपाट्याने नष्ट होत
चाललेल्या नाजूक परिस्थितीक व्यवस्थेमध्ये राहात आहेत. जर अशा घटना सातत्याने होत
असतील, तर वन विभागाने ज्या जंगलांमध्ये वाघांची घनता कमी आहे परंतु पुरेशी सावज उपलब्ध
असेल तेथे या वाघांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे हे रुबाबदार
प्राणी नेहमी आपल्यासोबत राहतील!
संजय देशपांडे (या चर्चेतील शेवटची पोस्ट)
लोकहो अगदी सकारात्मकपणे चर्चा केल्याबद्दल मनःपूर्वक आभार व या छायाचित्रातून
साध्य झालेला हा सर्वोत्तम परिणाम आहे असे मला वाटते. कारण हा ग्रूप केवळ वाघांची
उत्तम छायाचित्रे प्रकाशित करण्यासाठी नसावा, तर या विषयावर जागरुकता निर्माण
करण्यासाठी असावा असे मला वाटते! मनःपूर्वक आभार!
...
ग्रूपवर अजूनही बरीच चर्चा
सुरू आहे, परंतु मला तुम्हाला ज्या मुद्द्यांविषयी जागरुक करायचे होते ते वर
दिलेल्या चर्चेतील भागामध्येच आले आहे. तुम्ही संयमाने वरील सर्व मजकूर वाचला
असेल, तर सर्वप्रथम, हे समाज माध्यमांवरील सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, वन्यजीवन
म्हणजे तेवळ उत्तम छायाचित्रे काढणे, ती समाज माध्यमांवर प्रकाशित करणे व ती लाईक
करणे नव्हे, तो वन्यजीवनाचा केवळ एक
पैलू झाला. सदस्य २ यांनी अतिशय अभिमानाने सांगितले की या ग्रूपचे जवळपास दोन लाख
सदस्य आहेत, परंतु क्वचितच वन्यजीवनाच्या संवर्धनाच्या पैलूविषयी त्यावर चर्चा
केली जाते व ते अतिशय महत्त्वाचे आहे, जे यावेळी झाले आहे! त्याचवेळी, वन्यजीवनाविषयी
जी मिथके आहेत ती दूर करणे आवश्यक आहे त्यातले एक म्हणजे पर्यटनावर निर्बंध घालणे
व अतिरिक्त पर्यटनामुळे वन्यजीवन नष्ट होते किंवा त्यांचे वर्तन बदलते. वाढत्या पर्यटनामुळे नव्हे तर माणसाच्या
वाढत्या लोकसंख्येमुळे वन्य प्राण्यांना जगण्यासाठी त्यांच्या सवयी बदलाव्या लागतात.
हे सगळे आपण केवळ वन्यजीवन पर्यटनामुळे बघू शकतो व त्याचा अभ्यास करू शकतो, हे आपण
समजून घेतले पाहिजे व स्वीकारले पाहिजे. जर वाघ गुरा-ढोरांची शिकार करत असेल किंवा
पाळीव कुत्र्यासारखा वागत असेल असे जरी आपल्याला वाटले व माणसांमुळे विचलित होत
नसेल तरीही तो वाघच आहे हे लक्षात ठेवा कारण याच प्रकारे वाघ जगू शकतील ! आपण जोपर्यंत वाघाला त्रास देत नाही तोपर्यंत तो पर्यटकांवरच काय गावकाऱ्यावर सुद्धा हल्ला करत नाही व इथेच
नियंत्रित पर्यटनाचा पैलू विचारात घ्यावा लागतो, ज्यासंदर्भात ताडोबालाही बरीच
सुधारणा करायला वाव आहे !
शेवटी वाघ त्याच्या नैसर्गिक
आधिवासात जगणे हे महत्वाचे आहे आणि त्या अधिवासात माणूस असणारच आहे !
मे महिन्यात भर दुपारी, उन्हाचा पारा जवळपास ४५ अंशांवर तळपत होता, त्याचवेळी आम्हाला ही सुंदरा पुलाचे काम सुरू होते तिथे एका पाईपवर आरामात पहुडललेली दिसली. ताडोबा नेहमी मला आश्चर्यचकित करते, कोलसा रेंजच्या मध्यवर्ती भागात हे दृश्य दिसले, ती ज्या पाईपवर विश्रांती घेत होती ज्याच्या आजूबाजूला माणसांची वर्दळ होती व यातून हे वन्य प्राणी सहजीवनाच्या प्रक्रियेशी स्वतःला कसे जुळवून घेतात हे दिसून येते. या भागामध्ये दोन वाघीणींची हालचाल दिसून आल्याने कदाचित ही मादी बिबट्या इथे असावी, कारण तिला खुल्या जंगलापेक्षा या पाईपवर विश्रांती घेणे अधिक सुरक्षित वाटले असावे, कारण इथे वाघाने प्रवेश करणे अवघड असते, हाहाहा!
…मला असे वाटते (किंबहुना मी
आवाहन करतो) की माननीय पंतप्रधानांसारख्या अधिकारी व्यक्ती व सर्वोच्च न्यायालयाने
वन्यजीवनाच्या या पैलूकडे लक्ष द्यावे व अधिकाधिक जंगले सामान्य माणसासाठी खुली
करावीत, तरच आपल्याला वन्यजीवनाविषयी समजून घेता येईल व त्यास आपल्या जीवनाचा भाग
बनवता येईल व यालाच सहजीवन असे म्हणतात, यातच आपल्या अद्भूत वन्यजीवनासाठी आशा आहे, एवढे सांगून निरोप घेतो!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment