“काही
जण
म्हणतील
की
जिंकणे
म्हणजेच
सर्वस्व
नाही!” मात्र मला माहिती
आहे
की
तेच
सर्वस्व
आहे. दिवसाअखेर कुणीही पराभूत
झालेल्याकडे कुणीही पाहात
नाही. म्हणूनच
मी फक्त जिंकण्यासाठी खेळतो.”... व्हिव्हियन रिचर्ड्स
“तुम्ही प्रेक्षकांसाठी खेळत
नाही, तुम्ही
देशासाठी खेळता.”... महेंद्रसिंह धोनी
तुम्ही हा
लेख
क्रिकेटप्रेमी म्हणून वाचत
असाल
तर
तुम्हाला या नावांची
ओळख
करून
द्यायची
गरज
नाही.
मात्र
या
देशात
अमिताभ
बच्चनलाही न ओळखणारी
व क्रिकेटचे नियम माहिती
नसलेली
मंडळी
आहे,
अशा
लोकांसाठी (ते अगदी
कमी
असले
तरी)
म्हणून
सांगतो
की
व्हिव्ह
रिचर्ड्स किंवा सर
व्हिव्ह
रिचर्ड्स हे वेस्ट
इंडिजचे
महान
फलंदाज,
क्षेत्ररक्षक व अर्धवेळ
फिरकी
गोलंदाज
आहेत.
त्यांच्या संघाने जवळपास
दशकभर
जागतिक
क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. त्याचशिवाय ते अतिशय उमदा व्यक्ती व एक महान खेळाडूपण आहेत, म्हणूनच मी माझ्या लेखाची सुरुवात त्यांच्या अवतरणाने केली. आणखी
एक
गोष्ट
म्हणजे; ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील गॅब्बा स्टेडियमवर ऑसी (म्हणजेच ऑस्ट्रेलिया) संघाला हरविणाऱ्या शेवटच्या संघाचे कप्तान होते व्हिव्ह रिचर्ड्स. त्या घटनेला आता ३३ वर्षे झाली. तेव्हापासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या इतर कोणत्याही संघाने गॅब्बा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाला हरवलेले नाही. सर
व्हिव्ह
यांच्यानंतर मी महेंद्र
सिंह
धोनी
याचे
अतरण
दिले
आहे, तुम्हाला हे नावही
माहिती
नसेल
तरी
काही
हरकत
नाही, फक्त
वाचत
राहा,
एवढेच
मी
म्हणेन.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि वॉट्सॲपच्या कृपेने टीम इंडियाच्या टेस्ट सिरीसमधील विजयाविषयी इतके काही
लिहीण्यात आले की
सामान्य
लोकच
काय
पण
अगदी
क्रिकेटप्रेमीही अशा फॉरवर्ड
मेसेजना
केवळ
एक
थम्स
अप
किंवा
स्माईली
पाठवून
उत्तर
देतात.
मात्र
मी
हा
लेख
क्रिकेटप्रेमी अथवा क्रिकेट
चाहत्यांसाठी लिहीत नाही.
मी
तो
माझ्यासाठी व ज्यांना
क्रिकेट
किंवा
कोणत्याही खेळाचा आपल्या
जीवनावरील प्रभाव किंवा
या
दोन्ही
गोष्टींमध्ये काय नाते
आहे
हे
माहिती
नाही
त्यांच्यासाठी लिहीतोय.
सुरुवात करण्यापूर्वी, मी
माझ्या
संघासाठी (संजीवनीच्या कार्यालयातील संघ) लिहीलेला वॉट्सॲप संदेश
इथे
देतोय....
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या द्रुतगति गोलंदाजाच्या धडाकेबाज माऱ्याला सामोरे
जात
व अव्व्ल क्रमांकाच्या ऑफ स्पिनर गोलंदाजाला तोंड
देत,
ऑस्ट्रेलियामध्ये गॅब्बाच्या मैदानावर कसोटी
सामन्याच्या पाचव्या दिवशी
३००हून
अधिक
धावा
आत्तापर्यंत कुठल्याही संघाने
कधीच
केल्या
नव्हत्या. या मालिकेपूर्वी सद्य संघातील रहाणे
व पुजारा
वगळता
कोणत्याही भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियाचा दौरा
केला
नव्हता…मात्र त्यांनी
जे
केले
ते
कोणत्याही भारतीय संघाला
कधीच जमले नव्हते...यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता तो म्हणजे दृष्टीकोन, जो
त्यांनी
मजबूत
ठेवला...वयाच्या ५२व्या वर्षी
मला
जीवनाचे
हे
मूलभूत
तत्व
पुन्हा
शिकविल्याबद्दल भारतीय संघाला
सलाम..त्यातही घडलेली आणखी एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे भारतीय संघाने एक टी शर्टवर स्वाक्षऱ्या करून ऑस्ट्रेलियन खेळाडू नेथन लियॉनला त्याच्या १००व्या कसोटी सामन्यासाठी भेट म्हणून दिला, हे पाहून माझे डोळे भरून आले. आपण भारतीय आहोत व आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या कामगिरीचेही कौतुक करतो. माझ्या ५२ पैकी क्रिकेट ची समज आलेल्या गेल्या ४५ वर्षामधील हा खेळातील कदाचित सर्वोत्तम क्षण असावा. मी सगळ्याप्रकारचे खेळ पाहात
आलोय...क्रिकेट त्यातही कसोटी
सामने
मला
सर्वाधिक आवडतात..मला
हे
क्षण
अनुभवता
आले
यासाठी
देवा
तुझे
मनःपूर्वक आभार... संजय
देशपांडे
मी वरील संदेश माझ्या मित्रांनाही पाठवला आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात गेले....विदर्भातल्या खामगाव नावाच्या एका लहानशा गावात, आम्ही अर्धी चड्डी आणि रबरी स्लिपर घालून, मैदानावर चेंडू पकडण्यासाठी झेप घेत होतो, संघातील खेळाडूंच्या नावे आरोळ्या ठोकत होतो, वाळलेल्या शेत जमीनीवर टेनिसच्या चेंडूने क्रिकेट खेळत होतो, आकाशात सूर्य तळपत होता आणि पारा ४५ अंशांपर्यंत चढलेला होता!
नेहमीप्रमाणे हे
वाचून
अनेकांच्या कपाळाला आठ्या
पडतील.
जो
खेळ
जगातील
एकशे
ऐंशी
देशांपैकी जेमतेम दहा
देशांमध्ये स्पर्धात्मक पातळीवर
खेळला
जातो
त्याचे
विनाकारण उदात्तीकरण केले
जात
असल्याचे त्यांना वाटेल. त्याचशिवाय असेही अनेक
जण
असतील
ज्यांना
हा
पाच
दिवसांचा खेळ (कसोटी
सामने)
म्हणजे
वेळेचा
अपव्यय
आहे
असे
वाटेल,
काही
जण
असेही
म्हणतील
की
आता
ट्वेंटीट्वेंटीच्या (आयपीएल) जमान्यामध्ये आपल्याला खरोखरच
त्याची
गरज
आहे
का? मला
असे
वाटते
हा
ज्याच्या त्याच्या निवडीचा
प्रश्न
आहे
जर
पाच
दिवसांचा कसोटी सामना
वेळेचा
अपव्यय
असेल,
तर
मग
टूर
दी
फ्रान्ससुद्धा (सायकलिंगची स्पर्धा) वेळेचा
अपव्यय
म्हणावी
लागेल
किंवा
सर
एमंड
हिलरी
यांनी
माउंट
एव्हरेस्ट सर केले
ते
गिर्यारोहणही वेळेचा अपव्यय
आहे
किंवा
अगदी
ऑलिम्पिक जे जवळपास
साठ
दिवस
चालते
तोही
वेळेचा
अपव्ययच
होईल.
इतरही
वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या बाबतीत तेच म्हणता येईल उदाहरणार्थ गोल्फ, ज्यांना त्यामध्ये रस आहे (व त्यात खेळणे ज्यांना परवडू शकते) त्यांचा अपवाद वगळता या स्पर्धा कोण पाहते. याचे उत्तर
असे
आहे
की
कोणत्याही प्रकारचा खेळ
जर
तुम्हाला वेळेचा अपव्यय
वाटत
असेल
तर
खरोखर
जाऊन
तुमचा
बुद्ध्यांक तसेच दृष्टिकोन तपासा असा
सल्ला
मी
देईन
कारण
खेळ
म्हणजे
केवळ
वेळ
घालवणे
नाही
तर
तुमची
शारीरिक
व मानसिक
चिकाटी
तपासण्यासाठी तुम्हाला मिळालेली एक संधी
असते.
म्हणूनच
क्रिकेटमध्ये अगदी कसोटी
सामन्यालाही वेळेचा अपव्यय
मानता
येणार
नाही.
किंबहुना कसोटी
सामान्यामध्ये तुमची खऱ्या
अर्थाने
कसोटी
असते
कारण
पाच
दिवस
तुम्ही
मैदानावर धावत असता,
गोलंदाजी करत असता,
फलंदाजी
करत
असता,
झेल
घेत
असता
किंवा
क्षेत्ररक्षण करत असता,
हे
करताना
तुम्ही
तुमचा
सर्वोत्तम खेळ पणाला
लावता. हे
सगळे
करताना
तुम्हाला अतिशय तीव्र
हवामानाला सामोरे जावे
लागते,
प्रेक्षकांची टीका तसेच
प्रतिस्पर्ध्यांची शिवीगाळ (प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंकडून टोमणे) सहन
करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम असले
पाहिजे.
प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला बाद करण्यासाठी किंवा तुमच्या
गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यासाठी कोणते डावपेच
आखतो
आहे,
कसे
व्यवस्थापन करतो आहे
हे
समजून
घेण्यासाठी तुम्हाला मनाने
अतिशय
सतर्क
असावे
लागते. हवामान
कसेही
असले
तरीही
तुम्ही
त्यात
तग
धरू
शकाल
यासाठी
तुम्ही
शारीरिकदृष्ट्या अतिशय सक्षम
असले
पाहिजे.
तुम्ही
जर
मुंबईतले असाल तर
तुम्हाला दमट व उबदार
हवामानाची सवय असते.
मात्र
तुम्हाला ऑस्ट्रेलिया किंवा
इंग्लंडमध्ये खेळावे लागले
तर
तिथे
सकाळी
गोठवणारी थंडी असते.
तुमच्या
बोटाला
लहानशीही इजा झाली
तर
ती
बंदुकीची गोळी लागल्याप्रमाणे झोंबू शकते. तुम्हाला अशा प्रतिकूल हवामानात तग
धरून
राहण्यासाठी स्वतःच्या शरीराला
तयार
करावे
लागते
व अतिशय
तंदुरुस्त राहावे लागते
तरच
तुम्ही
तुमचा
सर्वोत्तम खेळ करू
शकता.
या
सगळ्यामुळे तुम्हाला तुमच्या
आंतरिक
क्षमतेची जाणीव होते, म्हणूनच
कसोटी
क्रिकेट
वेळेचा
अपव्यय
आहे
असे
मला
अजिबात
वाटत
नाही.
आपल्या देशातील
या
खेळाच्या लोकप्रियतेविषयी, प्रत्येक लहान
मूल
त्याच्या किंवा तिच्या
परसदारी
ज्या
काही
सुविधा
उपलब्ध
असतील
(आर्थिक
किंवा
सामाजिक)
त्यातही
हा
खेळ
खेळू
शकते.
म्हणूनच
ब्राझीलमध्ये ज्याप्रमाणे फुटबॉल
लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये हा खेळ
लोकप्रिय आहे. तसेच
धोनी,
सचिन,
द्रविड
आणि
आता
सिराज,
पंत,
गिल,
सुंदर,
नटराजन,
शार्दुल
व इतरही
अशा
अनेक
खेळाडूंनी हे दाखवून
दिले
आहे
की
तुम्हाला या खेळात
आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी
होण्यासाठी श्रीमंत वडील
किंवा
कुटुंबाची गरज नाही.
तुमच्या
देशासाठी जर ते
खेळू
शकत
असतील
तर
तुम्हीही हे करू
शकता.
म्हणूनच
हा
खेळ
लोकप्रिय आहे व यासाठी
ऑस्ट्रेलियाचा हा दौरा
विशेष
आहे
व भारतीय
संघाच्या विजयाला विशेष
महत्त्व
आहे.
आत्तापर्यंत कसोटी मालिकेतील विजयाविषयी व त्यातील
तरुणांच्या योगदानाविषयी व त्यांनी
सगळ्या
संकटांवर मात करत
कसा
खेळ
केला
याविषयी
आधीच
बरेच
लिहून
आले
आहे.
मी
तुम्हाला त्यांचे तपशील
पुन्हा
सांगणार
नाही.
त्याचप्रमाणे पूर्वी यापेक्षाही मोठे विजय
झालेले
आहेत
तसेच
त्यांचे
विजयोत्सवही साजरे करण्यात
आले
आहेत.
माझी
पिढी
(४०-५०
वर्षांची) कधीही ८३
च्या
विश्वचषकातील विजय तसेच
टी-२०
विश्वचषक व एक
दशकभरापूर्वी जिंकलेला विश्वचषक कसा विसरू
शकेल.
हे
सगळे
अर्थातच
क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण
होते
तरीही
हा
क्षण
विशेष
आहे
व वेगळा
आहे
कारण
केवळ
कसोटी
मालिका
जिंकून
बॉर्डर-गावस्कर
नावाचा
चषक
राखणे
एवढेच
या
मालिकेचे फलित नाही.
माझ्या
मते
या
कसोटी
मालिकेतील विजयाचे सर्वात
मोठे
फलित
म्हणजे
त्यातून
आशा,
आत्मविश्वास, दृष्टिकोन मिळाला
व समर्पणाची भावना वाढली.
जर
एखाद्या
व्यक्तीकडे हे चारही
घटक
असतील
तर
काहीच
अशक्य
नाही, हाच
संदेश
भारतीय
संघाच्या विजयातून मिळाला
आहे.
या विजयामुळे अनेक तरुण,
अज्ञात चेहरे काही दिवसांत सुपर हिरो ठरले, जसे सलीम जावेदच्या यांनी लिहीलेल्या ८०च्या दशकातील बिग बी यांच्या चित्रपटांमध्येनायकाचे नैराश्य, चीड, त्याला जीवनाच्या सर्व सुखांपासून वंचित ठेवणाऱ्या “जुलमी जगाविरुद्धचा” लढा
तरुणपिढीला आपलासा वाटायचा. या
मालिकेच्या विजयाचे शिल्पकार व त्यांच्या पार्श्वभूमीवर थोडी
नजर
टाकू; मग
तो
हैदराबादमधील एका रिक्षावाल्याचा मुलगा सिराज
असेल
किंवा
मुंबईच्या उपनगरात एका
निम्न
मध्यमवर्गीय कुटुंबातील शार्दुल
ठाकूर, ते
आता
देशासाठी आदर्श झाले
आहेत. त्याशिवाय ऋषभ पंत
व शुभम
गिल
यासारख्या खेळाडूंनीही त्यांचा
प्रतिस्पर्धी किती शक्तिशाली आहे याचा
विचार
न करता
निर्भयपणे खेळ केला
व त्यांना
नियंत्रणात ठेवले. एका
एकवीस
वर्षाच्या मुलाने खेळपट्टीवर आपली करामत दाखवत, अगदी गल्लीत क्रिकेट खेळत असावे इतक्या सहजपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फिरकी गोलंदाजाची गच्छंती केली. एवढेच नाही तर बॅक फूटवर खेळून जगातील पहिल्या क्रमांकाच्या द्रुतगती गोलंदाजाविरुद्ध, त्याला सणसणीत चपराक द्यावी अशा थाटात षटकार ठोकला हे कोण विसरू शकेल. यामुळेच
हा
विजय
विशेष
आहे
कारण
यातला
संदेश
स्पष्ट
आहे,
ही
पिढी
कुणाही
प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढायला घाबरत
नाही. आपल्या देशामध्ये आजही
राम
मंदिर
विरुद्ध
मशिद
स्वरुपाचे संदेश पाठविणारे अनेक जण
आहेत.
मात्र
सिराज
(तो
मुस्लिम
आहे)
आज
देशासाठी खेळत असताना
त्याला
त्याचा
धर्म
विचारायला कुणी येत
नाही.
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू
असताना
भारतात
त्याच्या प्रिय वडिलांचा मृत्यू झाला, तरीही
त्याने
ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याचा निर्णय
घेतला,
कारण
त्याच्या देशाला त्याची
गरज
आहे
याची
त्याला
शारिरीक जाणीव
होती.
सर्व
नियमित
गोलंदाजांना दुखापत झालेली
होती,
अशावेळी
तो
स्वतःचे
दुःख
सारून
खंबीरपणे उभा राहिला. वॉशिंग्टन सुंदर किंवा
शार्दुल
ठाकूरचेच उदाहरण घ्या,
योग्य
संधी
मिळताच
संघात
स्थान
मिळविण्यासाठी त्यांना जात
किंवा
जन्म
किंवा
उत्पन्न
गटाच्या
प्रमाणपत्राची गरज नाही,
आपले
कौशल्य,
प्रयत्न
व सर्वोत्तम कामगिरीसाठी झोकून
देणे
यातून
त्यांनी
संघात
स्थान
मिळवले
हे
सिद्ध
केले. याच कारणांनी ऑस्ट्रेलियातील हा विजय
अतिशय
विशेष
आहे, कारण
त्यामुळे लाखो तरुणांना आशा व आत्मविश्वास मिळाला जे
त्यांची
स्वप्ने
पूर्ण
न होण्यासाठी व्यवस्थेला दोष
देतात.
हा
काही
गली
बॉयसारखा चित्रपट नव्हता
ज्यात
झोपडपट्टीत राहणारा एक
मुलगा
सुपर
हिरो
होतो.
ही
गल्लीबोळात राहणाऱ्या मुलांची
खऱ्या
आयुष्यातली गोष्ट आहे,
ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या अंगभूत गुणांनी
त्यांच्याकडे जे आहे
ते
साध्य
केले
आहे.
आपल्यापैकी सर्वांकडे काहीतरी गुण
असतात,
त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण, सभोवती
व्यवस्था कशीही असली
तरी
आपल्याला जे हवे
आहे
ते
कधीतरी
साध्य
करू
शकतो, हा संदेश विशेष आहे या विजयातला !
या गली
बॉईजनी
जे
केले
ते
काही
जगावेगळे नव्हते, त्यांच्यापैकी प्रत्येकजण मुख्य
संघात
जागा
मिळावी
म्हणून
धडपडत
होता.
ज्येष्ठ
खेळाडूंना इजा झाल्यामुळे त्यांना संधी
मिळाली,
जिचा
त्यांनी
पुरेपूर
वापर
करून
घेतला. याचप्रकारे आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी कोणत्यातरी स्वरूपात संधी
मिळते,
केवळ
आपण
ती
संधी
घेण्यासाठी व खंबीरपणे टिकून राहण्यासाठी तयार नसतो.
त्यानंतर मग आपली
कामगिरी
चमकदार
झाली
नाही
म्हणून
आपण
नशीबाला,
व्यवस्थेला किंवा इतर
कुणालाही दोष देतो.
या
मुलांनी
केवळ
आपल्या
कृतीतून
संपूर्ण
देशाला
नेमके
हेच
शिकवले
व म्हणूनच
ऑस्ट्रेलियातील हा विजय
विशेष
ठरतो.
अर्थात
ज्येष्ठ
खेळाडूंचे योगदान व त्यांनी
दाखवलेले धाडसही तितकेच
महत्त्वाचे आहे. पुजाराचेच उदाहरण घ्या,
मला
तो
शत्रू
आगीचे
फुत्कार
सोडत
असताना
सीमेवर
ठामपणे
उभ्या
असलेल्या एखाद्या सैनिकाप्रमाणेच भासला. त्याने
खिंड
लढवून,
दारुगोळा संपेपर्यंत शत्रूला
नामोहरम
करून
सोडले.
बॉर्डर
चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे सनी
देओल
सर्व
आघाड्यांवर तोंड देत
आपल्या
जखमी
अननुभवी
सैन्याचे मनोधैर्य कायम
राखतो,
त्याचप्रमाणे कप्तानपदाची जबाबदारी तात्पुरती संभाळणाऱ्या रहाणेनेही सगळ्या
आघाड्या
संभाळल्या, यासाठीही ऑस्ट्रेलियातील विजय
विशेष
ठरतो.
चौथा व निर्णायक कसोटी सामना अंतिम टप्प्यात होता, साधारण वीस षटके उरली होती, भारताचे
पाच
गडी
बाद
झाले
होते.
त्यावेळी या कसोटीचा
निकाल
काय
लागेल
अशी
चर्चा
आमच्या
कॉलेजच्या ग्रूपमध्ये सुरू
होती.
मी
त्यात
लिहीले
होते
की
मित्रांनो, भारतीय संघच
जिंकणार
कारण
ते
सामना
बरोबरीत
सोडवण्यासाठी नाही तर
जिंकण्यासाठी खेळत आहेत.
भारताने
सामना
बरोबरीत
सोडवला
असता
तरीही
चषक
आपल्याकडेच राहिला असता.
मात्र
विजेते
जिंकण्यासाठीच खेळतात व या
गली
बॉईजनी
नेमके
हेच
केले. माझ्या
पिढीने
काही
उत्तम
खेळाडू
पाहिले
आहेत
व ते
खरोखरच
अतिशय
महान
होते
व आहेत.
मात्र
ते
जर
गॅब्बावर खेळत असते
तर
जिंकण्याच्या बाबतीत त्यांच्या मनातही शंका
असली
असती
व त्यांनी
सामना
बरोबरीत
सोडवला
असता
जो
नैतिक
विजय
मानला
गेला
असता.
मात्र
या
भारतीय
संघाला
ते
मंजूर
नव्हते,
त्यांचा
केवळ
एकाच
गोष्टीवर विश्वास होतो
तो
म्हणजे
जिंकणे,
हे
करताना
मात्र
ते
खिलाडूवृत्ती विसरले नाहीत. त्यांनी खेळाचा केवळ एक साधा नियम पाळला, तो म्हणजे तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ खेळा, लक्ष केंद्रित ठेवा, सकारात्मक राहा व खेळाचा आनंद घ्या. जिंकण्यासाठी खेळा, तुम्ही हरलात तर काही हरकत नाही, हा काही आयुष्यातला शेवटचा सामना नाही व पुढच्या सामन्यात परत जिंकण्यासाठी
प्रयत्न करत राहा.ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मालिकेचा हा निष्कर्ष आहे, तो केवळ क्रिकेट किंवा क्रीडाप्रेमींनाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला, अगदी मोठ्या व तथाकथित यशस्वी लोकांनाही लागू होतो व म्हणूनच हा विजय अतिशय विशेष आहे. जीवनात
अजूनही
बरेच
काही
शिकण्यासारखे आहेयाची मला
जाणीव
करून
दिल्याबद्दल भारतीय संघाचे
आभार,
खेळत
राहा
व त्याचा
आनंद
घेत
राहा,
त्यानंतर विजय होतोच,
एवढे
मला
आत्ता नक्कीच समजले आहे.
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment