मेंढपाळाचे काम म्हणजे त्यांच्या मेंढरांचा
सांभाळ करणे ! त्यांची चामडी सोलणे नाही... टायबेरियस
जेव्हा हातातले काम आनंददायी असते, तेव्हा आयुष्य सुखमय होऊन जाते! जेव्हा तेच काम म्हणजे कर्तव्य वाटू लागते, तेव्हा आयुष्य काटेदार वाटू लागते... मॅक्झिम गॉर्की
टायबेरियस सिझर ऑगस्टस हा दुसरा रोमन सम्राट होता, ज्याने इसवी सन १४ ते ३७ पर्यंत राज्य केले. तो त्याचे सावत्र वडील ऑगस्टस, यांच्यानंतर गादीवर बसला. टायबेरियस हा रोमच्या सर्वात महान सेनानींपैकी एक होता: त्याने पॅनोनिया, डॅलमटिया, रेटिया व जर्मेनियाचा काही भाग पादाक्रांत करून उत्तर सरहद्द प्रांताचा पाया रचला. ऍलेक्सी मॅक्सिमोविच पेशकोव्ह, जे प्रामुख्याने मॅक्सिम गॉर्की म्हणून ओळखले जात, एक रशियन व सोव्हिएत लेखक होते. ते समाजवादी वास्तववादी साहित्य पद्धतीचे प्रणेते होते व राजकीय कार्यकर्ते होते. त्यांना साहित्याकरता नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकनही मिळाले होते. बहुतेक लोकांना (म्हणजे जे वाचन करतात) गॉर्कीविषयी माहिती आहे मात्र अतिशय कमी लोकांना टायबेरियसविषयी माहिती आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांमुळेच ग्रीकांनी अर्ध्या दुनियेवर सत्ता गाजवली तेदेखील अशा काळामध्ये जेव्हा संवादाची प्रत्यक्ष किंवा पत्ररुपी संवाद एवढीच माध्यमे होती. मी लेखासाठी वरील दोन अवतरणे जाणीवपूर्वक निवडली कारण त्या कर्तव्याच्या दोन बाजू दर्शवतात. एक म्हणजे कर्तव्य बजावणारे महिला व पुरुष, ज्यांना आपण लष्कर किंवा संघ किंवा आघाडीची फळी असे म्हणतो. दुसरी बाजू म्हणजे असे महिला व पुरुष ज्यांनी पहिल्या वर्गवारीतील महिला व पुरुषांवर देखरेख करणे अपेक्षित असते (किंवा त्यांच्यावर त्याची जबाबदारी असते) ज्यांना आपण लष्करामध्ये लष्करी अधिकारी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये व्यवस्थापन किंवा सरकारमध्ये ज्येष्ठ अधिकारी असे म्हणतो. या दोन बाजूंसाठी कर्तव्याचे कारण खरेतर सारखेच असते (म्हणजे असले पाहिजे) व सामान्यपणे इथेच खरा संघर्ष होतो!
मी अलिकडेच झालेल्या एका घटनेविषयी बोलत आहे ज्यामुळे कर्तव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोकांना हादरवून सोडले, वनविभागाच्या एका तरूण वन क्षेत्र अधिकारी महिलेने (मी येथे नाव नमूद करणार नाही कारण तो या लेखाचा हेतू नाही) आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या पत्रात तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विशेषतः विभागीय वन अधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. तिने तिच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावही नमूद केले आहे ज्यांनी तिला पाठिंबा दिला मात्र ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले त्या विभागीय वन अधिकाऱ्याविरुद्ध वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे मी हे आत्महत्येचे पाऊल उचलले आहे,
असे तिने पत्रात नमूद केले होते. हे सगळे बातम्यांमध्ये येऊन गेले आहे, मी त्यात काही नवीन सांगत नाही. मी केवळ या
घटनेविषयी माझे मत व्यक्त करणार आहे हे मी आधीच स्पष्टपणे सांगतो. ही घटना मेळघाटाच्या जंगलात म्हणजे आपल्या राज्याच्या पूर्व-उत्तर भागात झाली. संबंधित वन क्षेत्र अधिकारी महिलेची नियुक्ती हरिसाल विभागात झाली होती. जो जंगलाचा अतिशय दुर्गम भाग आहे. समाज माध्यमे नसती तर ही बातमी एखाद्या वृत्तपत्राच्या आतील पानांवर वाचायला मिळाली असती व आणखी एक आत्महत्येची घटना असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष केले असते. मात्र फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व वॉट्सऍपमुळे ही बातमी वणव्यासारखी पसरली व संपूर्ण देशात वन्यजीवप्रेमींच्या चर्चेचा विषय झाली.
पोलीसांनी वरील कारवाई केली व संबंधित विभागीय वन अधिकाऱ्याला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली व मेळघाटाच्या क्षेत्र संचालकांची आधी बदली करण्यात आली व नंतर अमरावती मतदारसंघातील विद्यमान आमदार व खासदारांनी टाकलेल्या राजकीय दबावामुळे पुढील चौकशीपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. मी या तिघांनाही व राज्यातील अनेक वरिष्ठ व मधल्या फळीतील वन अधिकाऱ्यांना ओळखतो. मी जंगल बेल्सतर्फे वन्य जीवनाला मदत करण्याच्या आमच्या मोहिमेचा भाग म्हणून मेळघाटाच्या जंगलाला नुकतीच भेट देऊन आलो, ही संस्था महिलांमध्ये वन्य जीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे काम करते. लोकांनी आता जंगलाची तसेच वनपालांची म्हणजेच वनविभागाची दुसरी बाजू जाणून घेण्याची वेळ आली आहे. समाज माध्यमांवर तसेच बातम्यांमध्ये नेहमीप्रमाणे एका पक्षाला अतिशय चांगले व एका पक्षाला अतिशय वाईट दाखवले जाते. दोन्ही पक्षांविषयी कोण बोलत आहे यानुसार त्यांना हे रंग दिले जातात. जेव्हा मी म्हणतो वनपालांची दुसरी बाजू म्हणजे काही त्यांच्याविषयी काही चटपटीत बातम्या किंवा त्यांची काळी बाजू किंवा गुपित असा होत नाही तर हा या सेवेचा प्रशासकीय पैलू आहे, तसेच यापैकी बहुतेक वन कर्मचाऱ्यांना (ज्येष्ठ व कनिष्ठ दोन्ही) कशा परिस्थितीत काम करावे लागते हे दर्शवते व त्यानंतर तुम्ही तुमचे मत व्यक्त करू शकता. बरेच जण खाकी गणवेशातील वनविभागातील लोकांना ओळखत नाहीत कारण ते क्वचितच आपल्या शहरी जीवनामध्ये किंवा सोबत काम करतात. तसेच घरी बसून इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा फ्लिकरवर वन्यजीवनाची छायाचित्रे टाकणाऱ्या लोकांना वन क्षेत्र अधिकारी (आरएफओ) व विभागीय वन अधिकारी (डीएफओ) यातील फरकही माहिती नसतो, तरीही त्यांना असे वाटते की त्यांना जंगलाविषयी माहिती आहे.
मित्रांनो, मी नेहमीच असे म्हणतो की जंगल म्हणजे केवळ झाडे, वाघ, पक्षी, कुरणे किंवा मोठे पाणी नाहीत तर त्याचा अर्थ जंगलात व आजूबाजूला असलेले लोक असाही होतो. खाकी गणवेशातील वनविभागाचे कर्मचारी तर जंगलाचा अविभाज्य भाग आहेत म्हणून आपण जेव्हा स्वतःला वन्यजीव प्रेमी असे म्हणवतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयीही माहिती असली पाहिजे. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगावेसे वाटते की, कोणत्याही गणवेशधारी (विशेषतः खाकी) व्यक्तीला निमलष्करी दलाप्रमाणेच कर्तव्य बजावावे लागते व तेथे शिस्त अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही सांगतात तेव्हा तो नेहमी आदेशच असतो व पोलीस विभागाप्रमाणेच (खाकीची आणखी एक आवृत्ती) तुम्हाला तो कुठल्याही परिस्थितीत पाळावाच लागतो हा अलिखित नियम आहे. मात्र वन विभागातील अधिकाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सतत गुन्हेगारांच्या मागे लागावे लागत नाही व आपल्या शक्तिचा वापर (दाखवावी किंवा प्रदर्शित) करावा लागत नाही तरीही खाकीचा बाणा पोलीस विभागाप्रमाणेच असतो. पोलीसांना तसेच लष्कराला शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक प्रशिक्षण दिलेले असते व ती तशीच राबवलीही जाते. याउलट वन विभाग हा प्रशासकीय सेवा व गणवेश यांचे मिश्रण असतो त्यामुळे आदेशाचे डोळे झाकून पालन करणे किंवा त्यांची अंमलबजावणी करणे हे विभागातील अनेकांना अवघड जाते. हे बहुतेकवेळा कार्यक्षेत्रात किंवा संरक्षित वन क्षेत्रात काम करताना होते म्हणजे उदाहरणार्थ व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य किंवा आरक्षित जंगले, जी वन्य जीवनासाठी युद्ध क्षेत्राप्रमाणे असतात.
आता वन विभागाची रचना कशी असते ते पाहू, पोलीस विभागाप्रमाणेच यामध्ये दोन संवर्ग असतात एक म्हणजे तुम्हाला केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे म्हणजेच यूपीएससीद्वारे आयएफएस होता येते म्हणजे भारतीय वन सेवेमध्ये दाखल होता येते व तुमची नियुक्ती देशातील कोणत्याही राज्यात केली जाऊ शकते मात्र तुम्ही संबंधित राज्याच्या वन विभागाशी संलग्न असता. दुसरा संवर्ग म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे म्हणजे एमपीएससीद्वारे प्रवेश करता येतो. येथे तुम्ही वन क्षेत्र अधिकारी (आरएफओ) म्हणून प्रवेश करता त्यानंतर तुम्ही सहाय्यक वन संरक्षक (एसीएफ) मग उप वनसंरक्षक होता व बहुतेक वेळा तुम्ही सेवेच्या अखेरीस मुख्य वनसंरक्षक पदापर्यंत पोहोचता. मात्र तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे भारतीय वन सेवेत प्रवेश केल्यास तुम्ही प्रशिक्षण कालावधीतच तुमच्या करिअरची सुरुवात सहाय्यक वन संरक्षक (एसीएफ) म्हणून करता व वर्षभरात उप वन संरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी पदावर पोहोचता. त्यानंतर तुम्ही मुख्य वन संरक्षक (सीसीएफ), अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (एपीसीसीएफ) होता व प्रधान मुख्य वन संरक्षक (पीसीसीएफ) पदापर्यंत पोहोचू शकता जे संघटनेतील सर्वोच्च पद आहे. याव्यतिरिक्त तुम्ही वन विभागामध्ये वनपाल म्हणून रुजू होऊ शकता जे या संघटनेतील सर्वात कनिष्ठ पद आहे व उप वन क्षेत्र अधिकारी म्हणून निवृत्त होता जे वनपालाच्या केवळ एक किंवा दोन श्रेणी वरचे पद आहे.
आता या रचनेतील गुंतागुंत तुमच्या लक्षात येईल वरील सर्व पदे वेगवेगळ्या पातळ्यांवर सक्रिय असतात ज्यामध्ये आपण ज्याला जंगल म्हणून ओळखतो तो व्याघ्र प्रकल्प, तसेच प्रशासकीय कामे, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक जंगले, संवर्धन, सीएएमपीए (सीएसआरसाठी तसेच अधिग्रहणासाठी व जंगलातील व भोवतालच्या जंगलांचे अधिग्रहण व पुनर्वसनासाठी निधी वापरणे) व अशा इतर कितीतरी गोष्टींचा समावेश होतो. ज्याप्रमाणे पोलीस दलात गुन्हे शाखेला प्राधान्य दिले जाते त्याप्रमाणे वन विभागातील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची व्याघ्र प्रकल्पांमध्ये किंवा अभयारण्यांमध्ये नियुक्ती व्हावी अशी इच्छा असते. याचे एक कारण म्हणजे कोणत्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये सतत काहीतरी घडामोडी होत असतात व दुसरे म्हणजे संपूर्ण वन विभागाचे लक्ष त्याच्यावरच केंद्रित झालेले असते. तुम्ही कुणाही वन्यजीवप्रेमी व्यक्तीला विचारा, त्याला किंवा तिला राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांची (जंगलांची) माहिती असते. मात्र इतरही बरीच जंगले तसेच जंगले आहेत, तसेच वनविभागामध्ये इतरही आघाड्यांवर अतिशय महत्त्वाचे काम सुरू असते. मात्र ते कार्यक्षेत्रातील काम मानले जात नाही त्यामुळे प्रत्येकालाच मोठ्या जंगलांमध्ये काम करायचे असते.
तुम्हाला जर आता जंगलाची रचना समजली असेल तर आपण आत्महत्येच्या घटनेविषयी बोलू ज्याचा उल्लेख वर केला आहे व जी एका मुख्य जंगलात म्हणजे राज्यातील एका सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पात म्हणजे मेळघाटात झाली. जेव्हा आपण प्रकाशझोत असतो तेव्हा प्रकाशाचे त्याचे चटकेही बसतात हे बहुतेक लोक विसरतात, त्यांना बाहेरून व्याघ्र प्रकल्पावरील प्रकाशझोत दिसतो, त्याला मिळणारी प्रसिद्धी, तसेच मेळघाटासारख्या जागी काम करायला मिळणे हे दिसते मात्र ते देखील प्रकाशझोताच्या चटक्यांच्या नियमाला अपवाद नाहीत !मी पुन्हा एकदा सांगतो, मी काही कुणी न्यायाधीश नाही, मात्र जंगलामध्ये वन संरक्षक म्हणून काम करणे ते देखील मेळघाटासारख्या विस्तीर्ण जंगलामध्ये हे काही साधेसुधे काम नाही. विशेषतः वन क्षेत्र अधिकारी (आरएफओ) हा वन विभागातील कनिष्ठ पातळीवरील व उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांमधील महत्त्वाचा (किंवा मुख्य) दुवा असतो. कार्यक्षेत्रात (जंगलात) तुम्हाला केवळ वन्य प्राण्यांचे संरक्षणच करायचे नसते तर तुम्हाला सर्वात वाईट प्राण्यापासून म्हणजे माणसांपासून त्यांचे संरक्षण करायचे असते ही खरी समस्या आहे. म्हणजे माणूसच माणसाचा शत्रू होतो, कारण वनाधिकारी म्हणून तुम्ही प्राणी, झाडांचे प्रतिनिधित्व करून माणसांविरुद्धच लढत असता ज्यांचे प्रतिनिधित्व अधिक शक्तिशाली माणसे म्हणजेच आमदार व खासदार (लोकप्रतिनिधी) करत असतात. हरिसालसारख्या क्षेत्राचा संपर्क नागरी जीवनापासून पूर्णपणे तुटलेला असतो, केवळ एखादी पत्नी किंवा एखाद्या लहान मुलाच्या आईसाठीच नाही तर बहुतेक तरूण अधिकाऱ्यांचा अशा ठिकाणी निभाव लागणे अवघड असते. मला असे वाटते वन विभागाची समस्या अशी आहे की, कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जीवनाच्या मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी त्यांच्याकडे नेहमीच निधीची कमतरता असते. जेव्हा सुशिक्षित तरूण अधिकारी वन क्षेत्र अधिकाऱ्यासारख्या (आरएफओ) मधल्या फळीमध्ये रुजू होतात, तेव्हा त्यांना आधीपासून तेथील काम किती खडतर असणार आहे याची कल्पना नसते, तसेच त्यासाठी त्यांच्या मनाची पुरेशी तयारीही करून घेतली जात नाही. मला माफ करा, मात्र मला असे वाटते की जेव्हा कुणी लष्करामध्ये रुजू होते तेव्हा त्याला किंवा तिला कर्तव्य बजावताना आपल्याला मृत्यूशी सामना करायचा आहे हे माहिती असते, अगदी पोलीसांचे जीवनही असेच असते. आपल्यापैकी बहुतेकांनी हे पाहिले आहे मात्र वन विभागाची ही बाजू फारशी कुणाला माहिती नसते व इथेच वन विभागाला सुधारणेला वाव आहे. त्यानंतर संघनात्मक समस्या असतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वाघाच्या मृत्यूसारख्या घटनांचा माध्यमांकडून येणाऱ्या दबावाचा अतिशय ताण असतो व हा ताण कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांवर विशेषतः वन क्षेत्र अधिकाऱ्यांवर टाकला जातो ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच व्यवस्थेने (म्हणजे सरकारने) एका तरुण महिला अधिकाऱ्याची (किंवा अगदी पुरुषाचीही) हरिसालसारख्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी व मानसिक आधार देण्यासाठी कुणी वरिष्ठ अधिकारी नसताना नियुक्ती का केली असा प्रश्न मला विचारावासा वाटतो.
त्याचबरोबर संबंधित वन क्षेत्र अधिकारी (व कायद्याविषयी) पूर्णपणे सहानुभूती राखून मला असे विचारावेसे वाटते की ज्येष्ठ अधिकाऱ्यांना (अगदी क्षेत्र संचालक पातळीवरच्या) आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या एका पत्राच्या आधारे अटक किंवा निलंबित करण्यासाठी ते कुणी गुन्हेगार किंवा खुनी आहेत का, अशा कारवायांमुळे सर्व खाकी गणवेशधारी लोकांचे खच्चीकरण होणार नाही का? कोण बरोबर आहे किंवा कोण चूक आहे हे मी सांगत नाही, मात्र आपल्याला जंगलांसोबतच वनपालांनाही वाचवायचे असेल तर व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे, तोपर्यंत “वनपाल वाचवा, जंगल वाचवा” असेच घोषवाक्य ठेवावे लागेल!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment