Thursday, 22 April 2021

मेळघाट नावाची जादू!

 



























 

चमकदार डोळ्यांनी तुमच्याभोवती लक्षपूर्वक पाहा, कारण बऱ्याचदा अशक्यप्राय वाटणाऱ्या जागीच मोठी गुपिते दडलेली असतात. ज्यांचा जादूवर विश्वास नाहीत्यांना ती कधीच सापडणार नाही... रोनाल्ड डाल

 

माझा जादूवर विश्वास आहे म्हणजे मी काही माणसाचा उंदीर होईल (खरेच असे झाले असते तर) किंवा टोपीतून ससा बाहेर येईल अशी अपेक्षा करत नाही. परंतु आपल्या सर्वाभोवती निसर्ग नावाचा जादूगार जादू करत असतो. मी जेव्हा नुकतीच मेळघाटाला भेट दिली तेव्हा माझा हा विश्वास अधिकच बळकच झाला. ज्या बिचाऱ्या निरागस (अनभिज्ञ) जिवांना मेळघाटाबद्दल माहिती नाही त्यांना सांगतो. हा सातपुडा पर्वतरागांमध्ये महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेवर मध्यप्रदेशाला लागून वसलेला प्रदेश आहे. बुलढाणा, अकोला अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये तो पसरलेला आहे. तिथे असंख्य प्रकारची झाडे, बांबूची वने, वेली, झुडुपे, गवत पाहायला मिळतात. इथे हजारो प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक सरपटणारे प्राणी आढळतात. डालचे शब्द मेळघाटाचे अगदी चपखल वर्णन करतात. माणसांच्या दुनियेमध्ये निसर्गाने साकारलेला हा स्वर्ग अजूनही टिकून आहे ही एक जादूच म्हणावी लागेल. मी अतिशय सुदैवी आहे कारण माझा जन्म मेळघाटाच्या पश्चिम सीमेवरील खामगाव नावाच्या गावात झाला. यामुळे माझ्या शालेय दिवसांपासून इथले जादुई सौंदर्य माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहे. ब्रिटीश काळापासून विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखदरा येथे आमच्या शाळेच्या सहली नियमितपणे जात असत. मेळघाट मला माझ्या घराप्रमाणे वाटते वन्यजीवनाशी घनिष्ट संबंध असण्याचे हेदेखील एक मुख्य कारण आहे. हा लेख अर्थातच माझ्याविषयी नाही, तर मेळघाटाविषयी आहे. माझ्या मैत्रिणी आरती वहेमांगी जंगल बेल्स नावाची संस्था चालवतात. शहरातील महिलांना वन्यजीवनाची ओळख करून देण्याचे काम ही संस्था करते. त्यांच्यासोबत जवळपास दशकभराने मेळघाटाला भेट देण्याचा योग आला. विशेष म्हणजे हिवाळ्यात जाता आले जेव्हा मध्य भारतातील जंगलांचे सौंदर्य अधिकच खुलते. 

मेळघाट हे आता संरक्षित जंगल आहे. येथील क्षेत्र संचालक श्री. श्रीनिवासरेड्डी जंगल बेल्सने आयोजित केलेल्या एका वेबिनारचे पाहुणे होते. या वेबिनारमध्ये असे ठरविण्यात आले की जंगल बेल्स मेळघाटाच्या जंगलात काम करणाऱ्या वनरक्षकांना तसेच गाईडना स्वेटरच्या स्वरुपात मदत करेल. याच कारणाने माझे मेळघाटात जाणे झाले. तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा तुम्हाला अतिशय आनंद होतो मेळघाटात जाऊनही मला असेच वाटले. मी अनेक जंगलांना भेट दिली आहे स्वतःला या बाबतीत अतिशय सुदैवी समजतो कारण अनेक लोकांना हे भाग्य मिळत नाही (किंवा इच्छा किंवा संकल्प किंवा गरज नसते, तुम्ही त्याला काहीही नाव द्या). मी माझ्या मैत्रिणींना सांगितले की माझ्या आठवणीतला मेळघाट अविस्मरणीय आहे जो त्यादेखील कधी विसरू शकणार नाहीत. अर्थात प्रत्येक जंगलामध्ये (अभयारण्यामध्ये) पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला वाघ इथे दिसेलच अशी अपेक्षा ठेवू नका असा इशाराही दिला. याची दोन-तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे मेळघाटाचा विस्तार, ते कोणत्याही अभयारण्यापेक्षा किंवा व्याघ्र प्रकल्पापेक्षा व्यापक म्हणजे जवळपास पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. यामध्ये आपल्या राज्यातील तीन तसेच मध्यप्रदेशातील काही भागांचाही समावेश होतो. यामुळे वाघांना भटकंतीसाठी अतिशय मोठी जागा मिळते. दुसरे म्हणजे मेळघाटाची भूरचना किंवा प्राण्यांचे वसतिस्थान; इथली भौगोलिक रचना अशी आहे की तुम्ही एकतर गाडी चालवत वर जात असता किंवा खाली उतरत असता, यामुळे वाघांना लपून बसायला बरीच जागा मिळते. या भागात हजारो जलाशय आहेत ज्यामुळे वाघांची पाण्याची तहान भागते, तसेच उन्हाळ्यामध्ये ताडोबा किंवा कान्हामध्ये जसे स्वतःला थंड ठेवण्यासाठी ते खुल्या जागेत येतात तसे इथे होत नाही. शेवटचे कारण म्हणजे दाट झाडेझुडपे, सदा हरित झाडेव गवतामुळे अगदी मोठा हत्तीही सहजपणे लपून जातो, त्यामुळे वाघ रस्त्यावर किंवा झाडेझुडपे नसलेल्या किंवा अगदी तुरळक असलेल्या पट्ट्यात आल्याशिवाय दिसणे अशक्य असते.मात्र तुम्ही वन्यजीवप्रेमी असल्यास या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही. तुम्ही नसलात तरीही मेळघाटासारख्या भागाला एकदा भेट दिल्यानंतर तुम्ही हमखास वन्यप्रेमी होण्याची शक्यता असते अशी या जागेची जादू आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रदेश आहे कारण मेळघाटाच्या व्याप्तीमुळे वाघांना इतरही अनेक प्राण्यांना मध्य भारतातील एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी मार्ग मिळतो.

अकोट मागे सोडताच (तुम्ही पुण्या किंवा मुंबईकडून येत असाल तर) तुम्हाला भोवताली फक्त हिरवाई दिसते; तिच्या निरनिराळ्या छटा आकार तुम्हाला पाहता येतात. वन्यजीव प्रेमींसाठी जर हे वरदान असेल तर स्थानिकांसाठी तो अभिशापच आहे ज्यातील बहुतेक आदिवासी आहेत. इथल्या घनदाट जंगलामुळे इथे विकासच झालेला नाही त्यामुळे जीवन अतिशय खडतर आहे. तुम्ही मेळघाटाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे साधारण शंभरएक किंवा त्याहूनही अधिक किलोमीटर अंतरामध्ये प्रवास करताना हॉटेल, उद्योगधंदे, दुकाने, इमारती, शाळा किंवा रुग्णालये अशा शहरीकरणाच्या कोणत्याही खुणा नजरेस पडत नाहीत (माय बाप सरकार माफ करा, परंतु हीच वस्तुस्थिती आहे). ज्या काही शाळा किंवा वैद्यकीय सुविधा आहेत त्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही. यावर वन्यजीवप्रेमी म्हणतील की जंगले अशीच सुरक्षित राहतात, जे आपल्याला हवे आहे. आपल्याला वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी रस्ते, रेल्वे लागेलव त्यामुळे इथला समृद्ध निसर्ग नष्ट होईल. म्हणजे मला म्हणायचे आहे की दोन्हींचे संतुलन असले पाहिजे. या प्रदेशातील सर्व लोकांनी (वन विभागांच्या कर्मचाऱ्यांसह) हे जंगल जगावे यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्या मोबदल्यात त्यांना मॉल्स किंवा चित्रपटगृहे नाही पण किमान मूलभूत सोयीसुविधा दिल्याच पाहिजेत, त्यांचा तो हक्क आहे. मात्र त्यांना जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गोष्टीही आपण देत नाही यामुळे ज्या लोकांनी खरेतर जंगलांचे संरक्षण करणे अपेक्षित आहे त्यांचे आयुष्य खडतर झाले आहे. सरकार आपल्यापरीने प्रयत्न करत आहे मात्र नेहमीप्रमाणे मेळघाटातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वेग म्हणवा तसा नाही, यामुळेच त्यांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यामुळेच येथील लोकांमध्ये एकप्रकारची अस्वस्थता आहे वेळोवेळी विविध घटनांमधून ती समोर येत असते. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी नुकतेच आदिवासी स्थानिकांची जंगलाच्या मुख्य भागात येणाऱ्या गावांच्या स्थलांतरावरून निदर्शने झाली. आपल्याला जंगले हवी आहेत मात्र या जंगलांमध्ये अवतीभोवती राहणाऱ्या लोकांमुळेच ती जगतील हे आपण विसरून चालणार नाही. वनविभागही आपल्यापरीने प्रयत्न करत आहे मात्र मेळघाटाच्या जंगलाची व्याप्ती पाहता या महाकाय कामासाठी एक विभाग पुरेसा नाही. आपल्या मुंबई-पुण्यात बसणाऱ्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी जागे व्हायची गरज आहे निधी उपलब्ध करून दिला पाहिजे तसेच विशेष धोरणेही तयार केली पाहिजेत. त्याच शिवाय वनविभागाला दोन आघाड्यांवर मदत करण्यासाठी आणखी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले पाहिजे, एक म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी दुसरे म्हणजे मेळघाटात राहणाऱ्या माणसांना सुरक्षित ठेवण्याकरता गावांचे स्थलांतर करण्यासाठी. 

यात आधी नमूद केलेला भाग सोपा आहे (म्हणजे मला म्हणायचे आहे की तुलनेने) परंतु दुसरा भाग अवघड कठीण आहे. कारण प्राण्यांना हाताळणे सोपे असते परंतु माणसांना हाताळणे कर्मकठीण असते. आपल्या गरजा प्राण्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात या निसर्ग नियमाला मेळघाटातील लोकही अपवाद नाहीत. आपण भोवतालच्या जंगलाचे नुकसान करता या लोकांना जगता यावे यासाठी त्यांना नोकऱ्या तसेच पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठी आपण जंगलाचाच वापर उत्पन्नाचा स्रोत म्हणून केला पाहिजे म्हणजेच बांबूपासून बनलेल्या भांड्यांपासून ते पर्यटनाला चालना देण्यापर्यंत विविध मार्गांनी स्थानिकांना रोजगार मिळू शकेल,यासंदर्भात अनेक गोष्टी करता येतील. मात्र त्यासाठी पायाभूत सुविधा हव्यात कारण सोयीसुविधा असतील तरच पर्यटक इथे येतील ज्यामध्ये निवास मेळघाटापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची चांगली (म्हणजेच वेगवान) सोय आवश्यक आहे. उत्तम जंगल असल्याचा एक तोटा म्हणजे इथे येणे हे ताडोबा, पेंच, बांधवगड किंवा रणथंबोरसारख्या जंगलांपेक्षा अवघड आहे. त्याशिवाय केवळ वाघावर केंद्रित वन्य पर्यटनामध्ये वर नमूद केलेल्या कारणांमुळे मेळघाट मागे पडते. वाघ पाहायला सगळ्यांनाच आवडते परंतु त्या वाघाला आश्रय देणारे जंगल पाहण्याशिवाय दुसरा उत्तम अनुभव काय असू शकतो? वाघाचे घर टिकले तरच तो जगेल याची शहरातील लोकांना जाणीव करून दिली पाहिजे. म्हणूनच आपण जंगलांना भेट दिली पाहिजे, आपण स्वतःला वन्यजीवप्रेमी म्हणत असू तर वन्यजीवनासाठी आपण एवढे करूच शकतो, नाही का?

आम्ही अनेक आनंदी चेहऱ्यांनास्वेटरचे वाटप करून मेळघाटातून परतल्यानंतर योगायोग म्हणजे त्याच दिवशी रात्री केबीसीमध्ये (आता याचा अर्थ काय होतो असे मला विचारू नका, कौन बनेगा करोडपती) बिग बीं च्या समोर हॉट सीटवर साक्षात डॉ. रविंद्र कोल्हे स्मिता कोल्हे होत्या. या दांपत्याने (आता त्यांचा मुलगाही) मेळघाटातील लोकांचे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी त्यांचे करिअर समर्पित केले. ते मेळघाटातील एका लहानशा गावी आजही आपली सेवा देत आहेत. त्यांनी खेळात किती पैसे जिंकले हे महत्त्वाचे नाही, कारण आपल्याला माहिती असलेल्या अनेक करोडपतींपेक्षा ते आधीच कितीतरी पटींनी श्रीमंत आहेत. तुम्ही किती पैसे कमावले यावरून तुमची श्रीमंती ठरत नाही तर तुम्ही किती लोकांना जगायला मदत केली यावरून ठरते. त्याबाबतीत कोल्हे दांपत्य अति श्रीमंत आहे. त्याशिवाय निरुपमा देशपांडे मेळघाटातील एका गावामध्ये बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र चालवतात. मात्र अशी नावे अतिशय कमी किंबहुना गेल्या चार दशकांमध्ये केवळ दोनच आहेतमेळघाटामध्ये रस्ते किंवा उद्योगांची गरज नाही तर मदतीचे हात हवे आहेत. सरकार (जर त्यांची इच्छा असेल तर) डॉक्टर, शिक्षक, कौशल्य प्रशिक्षक यांना मेळघाटातील लोकांना सेवा देण्यासाठी बोलवू शकते. त्यासाठी अशा व्यावसायिकांना शहरात जेवढे पैसे मिळतात त्याच्या चौपट पैसे देऊ करा कारण सगळे जण काही कोल्हे किंवा देशपांडेंप्रमाणे आपले ज्ञान दान करत नाहीत! मेळघाटातील अधिकारी विविध संघटना तसेच पुण्यातील टर्फक्लब, पीवायसी किंवा डेक्कनक्लब तसेच रोटरीक्लब लायन्स या सारख्या संघटनांचे सहकार्य घेऊ शकतात. मेळघाटामध्ये नेमके काय कसे हवे आहे हे समजले तर यासारख्या उपक्रमांमधून अनेक इच्छुक हात आपले योगदान देऊ शकतात.

आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे मेळघाटामध्ये वनाधिकाऱ्यांच्या ज्या तरुण पथकाला भेटलो ज्यामध्ये श्री. श्री निवास रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली नवकिशोर रेड्डी, डीसीएफ, विनोद शिवसागर, डीसीएफ, त्याशिवाय रेंजर्स श्री. भैलूमे, श्री. सुनिलवाकोडे, दिनेश वाळके, तसेच मयूर सानप यांच्यासारखे वनसंरक्षक, जंगल, पर्यटक याविषयी अतिशय उत्साही होते. मेळघाट त्यातील लोकांचे संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तळमळ त्यांच्यात होती; या सगळ्यांकडे पाहून मला मोठी आशा वाटली! इथे काम करणे अवघड आहे, कारण मेळघाटांतर्गत चार वेगवेगळी अभयारण्ये, त्यातील लोक, प्राणी जंगले या सगळ्यांचे व्यवस्थापन करावे लागते. सगळ्यात शेवटी, वाघांशिवाय, मेळघाटामध्ये आपल्या देशातील सर्वोत्तम जैव विविधता अनुभवायला मिळते. तुम्हाला इथे बिबट्यापासून अस्वलापर्यंत, कोब्रापासून ते साळिंदर तसेच तरसापर्यंत विविध प्राणी पाहायला मिळतात. त्याशिवाय इथे अतिशय दुर्मिळ मध्ययुगीन काळासारखी वैशिष्ट्ये असलेल्या वनस्पती आढळतात, तसेच इथे काही जंगली-फुले उगवतात जी केवळ मेळघाटातच दिसतात, अशी ही यादी लांबलचक आहे. मी म्हटल्याप्रमाणे जादूच्या खेळांमध्ये जादुगार टोपीखालून काय काढणार आहे हे तुम्हाला कधीच माहिती नसते त्यामुळे तो अतिशय रोचक असतो, नाही का? तर लोकहो वाटकशाची पाहताय, वर्षाचे ३६५ दिवस चालणारा निसर्गाचा हा जादूचा खेळ पाहायला आवर्जून जा, तुम्ही या जादूच्या खेळाचा आनंद घेत असतानाच, तुम्ही या मेळघाट नावाच्या जादूचे एकप्रकारे संरक्षणही करू शकता

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com


No comments:

Post a Comment