“आपल्याला जर माहिती असेल की आपण मृत्यूच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय, तर आपल्यापैकी काही जण नक्कीच थोडा वेग कमी करतील.” … मोकोकोमा मोखोनोआना
"अमेरिका श्रीमंत राष्ट्र
असल्यामुळे अमेरिकेतले रस्ते उत्कृष्ट दर्जाचे
नाहीत, तर अमेरिकेतले रस्ते उत्कृष्ट दर्जाचे
असल्यामुळेच अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे..." जॉन एफ केनडी
पहिले अवतरण मोकोकोमा यांचे आहे जे माणसांचा अभ्यास करतात व त्यांची निरीक्षणे ते एकतर लिहून काढतात किंवा रेखाटतात. ते त्यांची निरीक्षणे म्हणी, निबंध, पुस्तके व व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडतात. ते लोकांना विचार करायला उद्युक्त करतात; काहीवेळा, त्यांना हसवतात. त्यांचे कार्य मानवी त्रासाची सांगड आमचा विश्वास, कृती, संस्था, अज्ञान व अहंकार यांच्याशी घालण्याचा प्रयत्न करते. दुसरे अवतरण अमेरिकेच्या इतिहासातल्या सर्वात लोकप्रिय अध्यक्ष श्री. केनडी यांचे आहे. पहिले अवतरण अपघात व मृत्यूविषयी भाष्य करते तर दुसरे अवतरण रस्त्यांविषयी भाष्य करते. अर्थात या तिन्ही गोष्टींचा आपल्या देशामध्ये किती जवळचा संबंध आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? या अवतरणांवरून तुम्ही माझ्या लेखाचा विषय ओळखलाच असेल तरीही मी तुम्हाला सांगतो, “मागील सीटवर बसलेले असताना किंवा गाडी चालवताना कोणत्याही सीटवर बसलेले असताना सीट बेल्ट लावणे किती आवश्यक आहे हा या लेखाचा विषय नाही”. कारण सीट बेल्ट लावण्याविषयी सर्व माध्यमांमधून तुमच्यावर भरपूर मारा झालाच आहे. अगदी अलिकडेच झालेल्या अपघातात सीट बेल्ट न लावल्यामुळे फक्त
सायरस मिस्त्री किंवा विनायक मेटे (राजकीय नेते) यांचाच मृत्यू झाला नाही तर भारतीय रस्त्यांवरील अशा अनेक
अपघातांमध्ये असंख्य
सुप्रसिद्ध व्यक्तींचा ज्यामध्ये डॉ. खुर्जेकर (पाठीच्या कण्याचे शल्यचिकित्सक), भक्ती बर्वे (मराठी अभिनेत्री) यांचा समावेश होतो व आपल्या आजूबाजूला असलेल्या हजारो सामान्य व्यक्तींचा ही अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे मी सीटबेल्टविषयी काहीही लिहीणार नाही, मात्र मोकोकोमा यांनी आपण विशेषतः रस्त्यावर प्रवास करताना, मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे त्याविषयी माझे शेअरिंग आहे.
सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचे (आकडेवारीसाठी माफ करा) म्हणजे या देशामध्ये दरवर्षी जवळपास १,५०,००० लोक रस्त्यावरील अपघातात मरण पावतात व तेवढेच किंवा त्याहून अधिक लोक आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. दरवर्षी ही संख्या वाढतच आहे व त्यापैकी जवळपास ७०% अपघात हे महामार्गावर किंवा शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर होतात. तुम्ही शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहनेच चालवू शकत नाही, नाहीतर हा आकडा दुप्पट झाला असता हे नक्की. सीट बेल्ट वापरावा किंवा नाही हा मुद्दा नाही, अलिकडेच अपघातामध्ये झालेल्या मृत्यूचे उदाहरण घेऊ, राजकीय नेते विनायक मेटे यांच्या एसयूव्हीला (फोर्ड एंडेव्हर होती) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटेच्या वेळी अपघात झाला, ते त्यांच्या घरून रात्री खूप उशीरा निघाले होते. रात्रीच्या वेळी काय झाले असावे हे सांगण्यासाठी काही वेगळ्या समितीची गरज नाही कारण रात्रीच्या (किंवा दिवसाच्या म्हणा
खरेतर) त्या वेळी चालकाच्या डोळ्यावर झापड आली असावी व तुम्ही १४० किमी/तास वेगाने जात असताना, तुमचा अंदाज चुकायला एक क्षणही पुरेसा असतो, जे त्या चालकाचे झाले. “नजर हटी दुर्घटना घटी” म्हणजे तुमची नजर गाडी चालवताना क्षणभरही समोरच्या रस्त्यावरून हटली तर अपघात होऊ शकतो, हे घोषवाक्य महामार्गावर, तसेच ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेले वाचतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करत त्या ट्रकच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, किमान श्री. मेटे व त्यांच्या चालकाने तरी त्याकडे लक्ष दिले नाही हे नक्की!
आता श्री. सायरस यांच्या अपघाताविषयी, त्यांच्याकडे स्वतःचे जेट विमान व हेलिकॉप्टर होते व ते एखादे हेलिकॉप्टर कधीही भाड्याने घेऊ शकत होते, तरीही त्यांनी रस्त्याने प्रवास करायचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे जीएलसी मर्सिडीज होती जी रस्त्याने प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित कार मानली जाते. त्यांचा अपघात दुपारी ३.३० च्या सुमाराला झाला जो कोणत्याही भारतीय रस्त्यावर सर्वात कमी रहदारीचा काळ मानला जातो. परंतु त्याची कार कुणी व्यावसायिक चालक नव्हे तर कौटुंबिक मैत्रीण सौ. अनिता या गाडी चालवत होत्या. त्या पंचावन्न वर्षांच्या असून व्यवसायाने डॉक्टर आहेत. मी त्या महिला असल्यामुळे त्यांच्या गाडी चालविण्याच्या कौशल्याला दोष देत नाही, किंबहुना अनेक महिला पुरुषांपेक्षा अतिशय चांगल्याप्रकारे गाडी चालवतात(माझ्यापेक्षा तर निश्चितच). माझा मुद्दा असा आहे की, श्री मिस्त्री यांची गाडीश्री. मेटे यांची गाडी ज्या वेगाने प्रवास करत होती जवळपास तेवढ्याच वेगाने म्हणजे १३५ किमी/तास वेगाने जात होती असे म्हणतात. गाडीचा वेग एवढा असताना अचानक उद्भवलेल्या प्रसंगामध्ये गाडीवर ताबा ठेवणे हौशी चालकाला शक्य होईलच असे नाही, डॉ. अनिता यादेखील अशाच हौशी चालक होत्या. श्री. मिस्त्री यांची मर्सिडीज रस्त्यावरील दुभाजकावर जेथे धडकली तेथे तीन पदरी रस्ता अरुंद पुलामुळे दुपदरी झालेला आहे व वेग अतिशय जास्त असल्यामुळे डॉ. अनिता यांना त्यांची कार योग्य मार्गिकेमध्ये ठेवता आली नसावी व ती पुलाच्या कठड्यावर आदळली, हेच या प्रकरणी अपघातामागचे तर्कसंगत कारण आहे. “नजर नही हटी फिरभी दुर्घटना घटी’ म्हणजे, चालकाची नजर रस्त्यावर होती तरीही डोळ्यांनी जे पाहिले आहे त्यावर प्रतिक्रिया देताना शरीराला मेंदूच्या सूचनांचे पालन करता आले नाही व अपघात घडला.
म्हणूनच, दोन्ही प्रकरणांमध्ये सीट बेल्टचा मुद्दा नंतर येतो, कारण दोन्ही अपघातांमध्ये वाहन चालविण्याची (किंबहुना प्रवासाची) काही मूलभूत पथ्ये सर्व लोकांनी पाळली असती, यामध्ये सरकारचाही समावेश होतो, तर सीट बेल्टची गरजच पडली नसती हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. याचा अर्थ सीट बेल्ट आवश्यक नाहीत असा होत नाही, परंतु याचा अर्थ असा होतो की सीट बेल्ट हे एक
प्रकारे घरातील सीसीटीव्हीसारखे असतात, ते दरोडा किंवा चोरीचा शोध
चोरी झाल्या नंतर लावण्यासाठी चांगले असतात. मात्र चोरी टाळण्यासाठी काय केले पाहिजेहे अधिक महत्त्वाचे आहे उदा. रखवालदार ठेवणे, घर मोकळे न ठेवणे, कुत्रा ठेवणे, अलार्म बसवून घेणे इत्यादी, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. अर्थात cctv चे महत्व आहेच! आता प्रतिबंधात्मक उपायांविषयी, सरकार तुमच्यासाठी काही करेल अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही अतिशय मूर्ख आहात किंवा चमत्कारांवर अंध-विश्वास ठेवणारे आहात व मी दोन्हीही नाही. नेहमीप्रमाणे या अपघातानंतर, इन्स्टा, फेसबुक, वॉट्सॲप, वर्तमानपत्रांमधून तसेच मीममधूनही सीट बेल्टविषयीच्या पोस्टचा पूर आला होता. या पोस्ट टाकणारे बहुतेक सगळे स्वतः मात्र दुचाकीवर हेल्मेट न घालता वाहन चालवतात किंवा मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावल्यावर हसतात किंवा गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्याने दंड करणाऱ्या वाहतूक पोलीसाशी हुज्जत घालतात, याचा सुद्धा तुम्ही अशा पोस्ट वाचत असताना विचार करा.
ज्या देशामध्ये लोकांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी थुंकू नका म्हणून इशारा द्यावा लागतो किंवा साथीचे रोग अजूनही संपले नसल्यामुळे मास्क न घालण्यासाठी दंड करावा लागतो, जेथे लोक हेल्मेट सक्तीच्या कायद्याविरुद्ध मोर्चे काढतात, तिथे सरकार प्रवाशांसाठी रस्ते सुरक्षित असतील याची खात्री करण्याचे काम बिनचूकपणे करेल अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम, सार्वजनिक वाहतूकीवर अवलंबून राहण्याऐवजी अतिशय श्रीमंत व्यक्तींना देखील
खाजगी वाहनांचा वापर का करावा लागतो, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. याचे कारण म्हणजे लंडन किंवा न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये एखादा अब्जाधीशही मेट्रो किंवा कॅबने प्रवास करेल किंवा बाहेरगावी जाण्यासाठी विमानाने जाईल. मात्र या आघाडीवर आपली सार्वजनिक वाहतूक यंत्रणा तसेच तिची सेवा व देखभाल दयनीय आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी खर्च तर येतोच, तसेच विमानाच्या वेळा विमान कंपन्यांच्या इच्छेनुसार बदलत असतात, यामुळे तुमचे वेळापत्रक कोलमडते. यामुळेच श्रीमंत माणसे बाहेरगावी जाण्यासाठी स्वतःच्या कारने जाणेच पसंत करतात, त्याशिवाय प्रवासाची सोय हादेखील मुद्दा आहे. रेल्वेविषयी बोलायचे झाल्यास, राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्या सोडल्या तर अनेक गाड्या सोयीच्या नाहीत कारण त्यांची तिकीटे कधीही उपलब्ध नसतात. यासंदर्भात सरकार काय करत आहे, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. रस्त्यावरील प्रवासाविषयी जेवढे कमी बोलू तेवढे चांगले कारण या देशामध्ये द्रुतगती मार्गावर ट्रक चुकीच्या मार्गिकेमध्ये येतात, पाळीव जनावरे त्यांच्या मर्जीने द्रुतगती मार्ग ओलांडत असतात, फक्त विमाने काय ती रस्त्यावर उतरत नाहीत ही चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मार्गिकांचे पालन न करणे हे रस्ते अपघातांच्या कारणांच्या यादीत अतिशय खालच्या स्थानी येते.
मला इथे माझा रस्त्यावरील प्रवासाचा एक वैयक्तिक अनुभव सांगावासा वाटतो (खरेतर अनेक आहेत). मी भाड्याने घेतलेल्या इनोव्हाने दिल्ली-आग्रा द्रुतगती मार्गावर प्रवास करत होतो व कारचा वेग १२० किमी/तास होता. मी चालकाला ९० किमी/तास पेक्षा अधिक वेगाने गाडी चालवू नकोस असा इशारा दिला कारण मला कुठलेही विमान पकडायचे नाही, म्हणजेच आम्हाला कसलीही घाई नाही, असे केले नाहीस तर मी तुला खाली उतरवेन व मी गाडी चालवेन! चालकाने अतिशय तुसडेपणाने माझ्याकडे पाहिले परंतु माझे म्हणणे ऐकले व वेग ८० किमी/तास पर्यंत कमी केला (मी सांगितले होते त्याच्यापेक्षाही कमी), कारण शेवटी पैसे मी देणार होतो. आणि केवळ काही मीटर अंतरावर माकडांची एक टोळी दुसरी मार्गिका ओलांडून आली व त्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी आमच्या इनोव्हासमोरूनच उड्या मारल्या. त्याचवेळी ड्रायव्हर उद्गारला, “ओह तेरी”, माकडांशी टक्कर अगदी थोडक्यात वाचली तसेच वेग ८० किमी/तास असल्याने गाडीही रस्त्यावरून सरकली नाही. त्याने समोरच्या आरशातून ओशाळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिजे, मी फक्त त्याला नजरेनेच प्रत्युत्तर दिले, त्याला समज मिळाली असावी, अशी मला आशा वाटते.या घटनेच्यावेळी आम्ही सुदैवी होतो की दुसरा कुणी मायकल शुमेकर
आमच्यामागे गाडी चालवत नव्हता नाहीतर तो मागून येऊन आमच्यावर आदळला असता व इथे मागच्या सीटवर सुरक्षा बेल्ट वापरण्याचा मुद्दा विचारात घ्याला लागला असता, जो मी लावला होता. मी ड्रायव्हरला सतत वेगाने गाडी न चालवण्याच्या सूचना देतो, सतत सीट बेल्ट लावण्याबाबत अतिशय काटेकोरपणा दाखवतो, तसेच भल्या पहाटे किंवा रात्री उशीरा रस्त्यावर प्रवास न करण्यासाठी मी भांडतो म्हणून माझे
सहप्रवासी मला हसतात. पण लोक सध्या एखाद्या मास्क लावणाऱ्या व्यक्तीलाही हसतात, असू दे, तो तुमचा प्रश्न आहे! एवढी सगळी खबरदारी घेतल्यानंतरही अपघात होऊ शकतो व तुमचा मृत्यू होऊ शकतो. परंतु मग तो खरचअपघात असेल, मोकोकोमा यांनी त्यांच्या अवतरणात म्हटल्याप्रमाणे तुमच्या मृत्यूच्या दिशेने वेगाने वाटचाल करू नका.
शेवटचा मुद्दा म्हणजे, श्री. जॉन केनडी जिवंत असते तर मी त्यांना सांगितले असते, सर अमेरिकेने केवळ उत्कृष्ट रस्तेच बांधले नाहीत तर आपल्या नागरिकांना वाहन चालविण्याच्या चांगल्या सवयीही लावल्या आहेत. म्हणूनच अमेरिका हा श्रीमंत देश आहे, कारण अमेरिकेमध्ये एखादी व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतर ती सुखरूप प्रवासही करू
शकते!
-
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
you can read our english version @ link below.
https://visonoflife.blogspot.com/2022/09/cyrus-mete-still-counting.html
No comments:
Post a Comment