Friday 23 September 2022

पाऊस, पूर आणि शहरीकरण !






















पाऊस, पूर आणि शहरीकरण !

कपडे, घर किंवा अन्न यासारख्या जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच आपण स्वस्त किंवा मोफत पाणी मिळणे हे अगदी गृहित धरतो. त्यामुळेच जलसुरक्षा सुधारण्यासाठी गुंतवणूक धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी मोठा दुष्काळ किंवा पुरासारखी आपत्ती यावी लागते” … जोस अँजेल गुर्रिया

जोस अँजेलगुर्रिया ट्रेव्हिनो, ज्यांना अँजेल गुर्रिया असेही म्हणतात ते मेक्सिकोचे अर्थतज्ञ राजनैतिक अधिकारी आहेत. जून २००६ ते ३१ मे २०२१ पर्यंत, ते आर्थिक सहकार्य विकास संघटना, यूएनए चे महासचिव होते. मेक्सिको,आपल्यापासून जगाच्या दुसऱ्या टोकाला असले तरीही, त्याचा आकार हवामान आपल्या देशाशी बरेच मिळते जुळते आहे. अनेक आघाड्यांवर आपली परिस्थिती त्यांच्याहून कित्येक पटीने चांगली आहे तरीही पाण्याच्या आपत्तीच्या बाबतीत, मग तो पूर असेल किंवा दुष्काळ, एक देश म्हणून आपली परिस्थिती सारखीच आहे. आपल्या माध्यमांची स्मृती अगदी गजनीपेक्षाही (म्हणजे काय हे आमीर खानला विचारा) कमी आहे हे सत्य आहे. म्हणूनच भारतातील माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र जेव्हा खऱ्याखुऱ्या पुराच्या पाण्याने वेढले गेले तेव्हा सीटबेल्ट रस्ते सुरक्षा यांच्यावरील बातम्यांचा महापूर लगेच ओसरला. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये उच्चभ्रू वसाहती कमरेइतक्या पाण्यामध्ये बुडालेल्या ज्या व्यक्ती त्यांचे डिझायनर पादत्राणे घालून बीएमडब्ल्यू, पोर्शे किंवा मर्सिडीज यासारख्या गाड्यांव्यतिरिक्त इतर गाड्यांमध्ये पायही ठेवत नाहीत त्यांना ट्रॅक्टरवर बसून जावे लागत होते याची छायाचित्रे छापून आली होती. लाखो लोक (म्हणजेच सामान्य जनता) ती छायाचित्रे पाहून मनातल्या मनात हसत होते आनंदी होत होते कारण निसर्ग खरोखरच सगळ्यांना समान पातळीवर आणून ठेवतो याचे पुराशिवाय दुसरे उत्तम उदाहरण काय असू शकते, जिथे थोड्याशा पाण्यामुळे सर्व समाज सारखाच दिसू लागला होता, बरोबर? मात्र प्रश्न असा आहे की आपल्याला हा मूलभूत निसर्गनियम शिकण्यासाठी काय किंमत मोजावी लागतेय आणखी किती वर्षं आपण हे धडे शिकण्यासाठी ही किंमत मोजत राहणार आहोत, ज्यामुळे आयुष्य नावाच्या शाळेत आपण एकाच वर्गात राहिलो आहोत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे.

माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगलोर शहरातील पुराविषयी मुद्दे लिहीत असताना, रविवारी संध्याकाळी आपल्या स्मार्ट शहरामध्ये (अर्थातच पुणे, दुसरे कोणते असू शकते) पूर आला. त्यानंतर माध्यमांमध्ये आपण एक शहर म्हणून किंवा नागरी संस्था म्हणून किती निरूपयोगी आहोत, शहरीकरणामुळे संपूर्ण शहराचा तसेच निसर्गाचा कशा सत्यानाश झाला आहे वगैरे वगैरे सिद्ध करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. सर्व माध्यमे याच शहरीकरणामुळे मिळणाऱ्या जाहिरातींच्या महसुलावर जगतात ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे पुरासाठी त्यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी विकासाला किंवा नागरीकरणाला दोष देणे किंवा बांधकाम व्यावसायिकांना दोष देणे म्हणजे एखाद्या वाढत्या वयाच्या मुलाला त्याच्या खाण्यावर किती खर्च होतो म्हणून बोल लावण्यासारखे आहे. गोंधळलात, ठीक आहे, जेव्हा आपण पुरासारख्या आपत्तीसाठी शहरीकरणाला दोष देतो तेव्हा खरेतरशहरीकरण ही विकासाची सर्वोत्तम खूण आहे. याचे कारण म्हणजे संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक पुण्यामध्ये ( बेंगलुरूमध्ये) स्थायिक होण्यासाठी येतात हेच लोक शहरामध्ये रोजगार निर्मिती व्यवसाय करतात. यामुळे लक्षवधी लोकांचे आयुष्य थोडे चांगले होते अर्थातच या स्थलांतराशी व्यवसायाशी संबंधित प्रत्येकाला एक घर आवश्यक असते ज्याला आपण शहरीकरण म्हणून दोष देतो.घर (म्हणजेच रिअल इस्टेट) ही समस्या नाही तर ज्याप्रकारे ती विकसित करण्यासाठी परवानगी दिली जाते ती समस्या आहे. ते कुण्या एका बांधकाम व्यावसायिकाचे किंवा बांधकाम व्यावसायिकांच्या समूहाचे काम नाही तर संपूर्ण समाजाचे काम आहे जो सरकार नावाची यंत्रणा तयार करतो, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे.

आता पुन्हा पाऊस, अचानक (खरोखरच असे होते का) येणारा पूर शहरांमध्ये ठिकठिकाणी तुंबलेले पाणी याविषयी बोलू. यासंदर्भात बंगलोर पुण्यामध्ये काय झाले ते पाहू कारण या दोन्ही केंद्रांमध्ये शहरीकरण तसेच अशा घटना निश्चितच वाढणार आहेत. आता त्यांना नैसर्गिक घटना म्हणायचे किंवा त्यांना आपत्ती होऊ द्यायचे, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. भौगोलिकदृष्ट्या बोलायचे झाले तर दोन्ही शहरे दख्खनच्या पठारावर वसलेली आहेत. मात्र बेंगलुरू जवळपास मध्यभागी आहे त्यामुळे हा प्रदेश (म्हणजेच शहर) जवळपास पठारावरच वसलेला आहे. तर पुणे थोडे वरच्या बाजूला आहे कारण ते पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आहे तसेच आजूबाजूला डोंगर आहेत उतार आहेत जे तीन नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेने जातात. तसेच या नद्यांच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला पाच धरणे बांधलेली आहेत. यामुळे पुण्यातील नद्यांच्या प्रवाहाच्या वरच्या दिशेला कितीही जोरदार पाऊस झाला तरी त्या पाण्याचे खात्रीशीरपणे निचरा लवकर होतो, बेंगलुरूला मात्र ही सोय नाही. याचाच अर्थ असा होतो की बेंगलुरूमध्ये अतिशय जोराचा पाऊस झाल्यावर जमीन सपाट असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्हायला किंवा ते पाणी निघून जायला वेळ लागतो. कारण पाणी (म्हणजे पावसाचे पाणी) गुरुत्वाकर्षणामुळे वाहते त्यासाठी तुम्हाला उतार आवश्यक असतो, हा साधा सोपा तर्क आहे. तर संपूर्ण पुणे हे उतारावर आहे त्यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिकपणे निचरा होणे सोपे असते. ज्यांना पानशेतचे धरण फुटल्यामुळे आलेला पूर (किंवा आपत्ती) आठवत असेल त्यांना हे समजेल. कारण संपूर्ण शहर पाण्याखाली होते मात्र पूर जेमतेम दिवसभरातच ओसरला. मात्र दुसरीकडे, जमीनीला उतार असल्यामुळे पुणे प्रदेशामध्ये पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करताना आणखी एक समस्या निर्माण होते, ती म्हणजे या वाहत्या पाण्यामुळे होणारे नुकसान. रस्त्याला असलेला उतार पावसाच्या पाण्याला असलेला वेग यामुळे छोट्या त्सुनामीसारखीच परिस्थिती निर्माण होते यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली भूमिगत गटारे निरुपयोगी ठरतात. बहुतेक ठिकाणी वाहणाऱ्या पाण्याला अतिशय वेग असल्यामुळे ते या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या गटारांमध्ये किंवा टाक्यांमध्ये जमाच होत नाही आपल्याला असे वाटते की आपण पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात अपयशी ठरलो आहोत, मात्र प्रत्यक्षात तसे नसते. 

तर आता समस्या काय आहे हे आपण ओळखले आहे, आता पुढे काय? ही अनेक वर्षांपासून निर्माण होत आलेली समस्या आहे आपल्याला एका रात्रीत त्यावर तोडगा मिळणार नाही हे आधी स्वीकार, त्यासाठी नियोजनबद्ध ( समर्पित) दृष्टिकोन अत्यावश्यक आहे

१.       सुरुवातीला पावसाळ्यामध्ये जेथे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते त्या भागाचे व्हिडिओ चित्रण करून ठेवा. आपल्याला हवेतून द्रोणने चित्रण करता आले तर अधिक चांगले कारण ते कायमस्वरुपी चित्रण असेल आपल्याला या सगळ्या ठिकाणी पावसाचे पाणी कुठून येत आहे याचा मागोवा घेता येईल. त्यामुळे आपल्याला नंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी किंवा त्याचा निचरा करण्यासाठी सोय करता येईल. सिंगापूर आणि क्वालालंपूरयासारख्या विषुवृत्तीय शहरांमध्ये हे अतिशय परिणामकारकपणे करण्यात आले आहे जेथे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले आहे दररोज पाऊस पडतो. त्याचप्रमाणे लॉस एंजेलिस (यूएसए) व्हॅलेन्सिया (स्पेन) यासारख्या शहरांमध्ये अचानक येणाऱ्या पुराची समस्या वारंवार निर्माण होत असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा मागोवा घेणारी सर्वेक्षणे करण्यात आलेली आहेत.

 

. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटारांच्या पारंपरिक कल्पनेऐवजी, हे वेगाने येणारे पाणी वाहून नेण्यासाठी खुली गटारे/प्रवाह तयार करण्याचा विचार करा. मला माहितीय अनेक तज्ञ (आपल्याकडे पुण्यामध्ये अनेक आहेत) माझ्या सूचनेवर नाक मुरडतील. मात्र आपल्याकडे पावसाळ्याचा इतिहास पाहा ही पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेली गटारे शहरासाठी नेहमीच कुचकामी ठरली आहेत. आपल्यासारख्या उष्णकटीबंधीय देशामध्ये त्यामुळे कधीही समस्या सुटणार नाही. वर्षातले साधारण ३० दिवस चांगला पाऊस पडतो तर उरलेले ३३० दिवस कोरडे असतात आपल्याकडे नागरी जाणीवांचा अभाव तसेच आपल्या लोकसंख्येमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारांमध्ये सर्व प्रकारचा कचरा अचकून बसलेला असतो, ज्यावर अगदी परमेश्वरही नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा स्वच्छ करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आपण माध्यमांना लोकांना सांगितली पाहिजेआपल्याला पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारांमध्ये पावसाचे पाणी सोडून बाकी सगळे काही म्हणजे अगदी पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांपासून ते प्लॅस्टिकच्या बाटल्यांपर्यंत सर्व काही दिसते. पुणे महानगरपालिका तर सोडाच पण आपल्या नागरी संवेदनांबाबत (असंवेदनशीलता असे मला म्हणायचे आहे) साक्षात देवही काही करू शकत नाही हे वस्तुस्थिती आहे. नाही तर तोपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे तुंबू नयेत यासाठी ईटीपी/एसटीपी या सांडपाण्याचे शुद्धिकरण करणाऱ्या प्रकल्पातले शुद्धिकरण केलेले पाणी आपण वापरू शकतो, म्हणजे ही गटारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी मोकळी राहतील ही एक सूचना आहे. तसेच पावसाच्या पाण्यासाठी वेगळा विभाग तयार करा ज्याची वेगळी व्यवस्था असेल, जो सध्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या गटारांची देखभाल करेल तसेच गटारांचे नवीन जाळे तयार करेल. (पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असलेल्या माझ्या एका मित्रानेच हे सुचवले होते).

 

३.      अचानक येणारे पूर किंवा पाण्याचा लोंढा जवळपासचे ओढे नाले नद्यांमध्ये (सध्या त्यांना गटारांचे स्वरूप आले आहे) वाहून जाण्यासाठी जमीनीवर गटारे/प्रवाह तयार करण्यासाठी काम करा, ज्यांची पुण्यामध्ये कमतरता नाही. त्याचप्रमाणे या नैसर्गिक गटारांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यास सुरुवात करा. त्यांचे काठ/सुरक्षा भिंती पुणे महानगरपालिकेच्या खर्चाने व्यवस्थित बांधून घ्या कारण बहुतेक सोसायट्या एवढा खर्च करणार नाहीत किंवा तो करण्याची क्षमता त्यांच्याकडे असणार नाही. खुल्या गटारांचा फायदा म्हणजे ती सहजपणे स्वच्छ करता येतात किंवा स्वच्छ ठेवता येतात (आपण त्यांना कोणतीही अतिक्रमणे किंवा इतर वापरांपासून मुक्त ठेवू शकलो तर). बंदिस्त गटारांच्या उलट खुल्या गटारांमुळे कितीही मुसळधार पाऊस झाला तरी ती जास्तीचे पाणी वाहून नेऊ शकतात. बंदिस्त गटारांमुळे मात्र ते पाणी माघारी जाऊन अधिक गोंधळ निर्माण होतो, हे आपण वारंवार पाहिले आहे.

४.      सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पाणी जमीनीत शोषले जावे यासाठी जमीन  मोकळी ठेवण्यासाठी धोरण तयार करा ( त्याची अंमलबजावणी करा), पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या चेम्बर्स मध्ये कूप नलिका खोदून त्यांचा वापर भरण क्षेत्र म्हणून करा (गेरा डेव्हलपर यांनी असे केले आहे). यामुळे पावसाचे वाहून जाणारे (जमीनीवर आकाशातून पावसाच्या रूपाने जे पाणी पडते त्यापैकी प्रत्यक्ष जे वाहते किंवा संकलित केले जाते ते पावसाचे पाणी) पाणी कमी होण्यास मदत होईल. प्रत्येक सोसायटीच्या आवारामध्ये असे भरण क्षेत्र तयार करण्यात आले पाहिजे तसेच या संबंधित आवारातील सर्व पाणी या भरण क्षेत्रांमध्ये संकलित केले जाईल अशी सोय केली पाहिजे म्हणजे उर्वरित पाणी रस्त्यांवर वाहून जाईल. तसेच ते वाहात असल्याची देखरेख करणारी एक यंत्रणा असली पाहिजे.

५ .  पुणे शहर हे टेकड्यांवर त्यांच्या अवतीभोवती वसलेले शहर आहे. त्यामुळे या टेकड्यांवरून येणारे पावसाचे पाणी सर्व दिशांनी वाहते. यावर नियंत्रण ठेवले पाहिजे विशेषतः जेव्हा हे वाहणारे पाणी रस्त्यावर येते तेव्हा. या टेकड्यांवर ठिकठिकाणी बंधारे घालून तसेच पायथ्याशी जलाशय तयार करून हे करता येईल. यातील मुख्य अडचण जागा परवानग्यांची आहे, तुम्हाला आता शहर वाचवायचे आहे किंवा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळायचा आहे? किमान सरकारी जमीनींवरील तरी अशा जागा शोधा पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपल्याला जितकी जास्त तळी बांधता येतील तितकी बांधा ते पाणी जमीनीमध्ये झिरपू द्या. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यामध्ये हे करण्यात आले आहे.

६.     जे रस्ते नियमितपणे पावसाच्या पाण्याने तुंबतात तेथे दुतर्फा अनेक कूप नलिका किंवा भूजल भरण कूप नलिका बांधा. यामुळे अशा जागी साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

 

शेवटचा मुद्दा म्हणजे, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याशी संबंधित वरील सर्व घटकांची अंमलबजावणी,देखरेख सुधारणा करण्यासाठी एक समर्पित यंत्रणा असली पाहिजे जी सध्या अस्तित्वात नाही. शेवटी मी फक्त इतकेच म्हणेन की आपण माहिती तंत्रज्ञानाची राजधानी असू किंवा सर्वात स्मार्ट शहर असू, आपण आकाशातून जमीनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकत नाही (सुदैवाने), मात्र आपण हा पाऊस हाताळण्याचा मार्ग निश्चितच शोधू शकतो त्यावरूनच आपण एक शहर म्हणून हुशार आहोत की बिनडोक आहोत हे ठरणार आहे!

 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

you can read our English version @link below. 

https://visonoflife.blogspot.com/2022/09/smart-city-tech-city-rain-god.html


















 

No comments:

Post a Comment