Saturday, 28 September 2024

ताडोबाच्या सुपर मॉम्स , भाग -१



































ताडोबाच्या सुपर मॉम्स, भाग – १

इस दुनिया में भगवान से भी बढ़कर एक ही ताकद है और वो है माँ के दुवाओं की ताकद” … केजीएफमध्ये रॉकी भाई.

पाश्चिमात्य जगातील इंग्रजीमध्ये विषद करण्यात आलेल्या तत्वज्ञानाविषयी पूर्णपणे आदर राखत असे म्हणावेसे वाटते की, जेव्हा भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा आपल्या प्रादेशिक भाषांची सर कशालाही येऊ शकत नाही. विशेषतः विषय जेव्हा आईचा असतो तेव्हा तर तुम्हाला अशी अनेक उदाहरणे देता येतील, दीवार (७० च्या दशकातील तरूण पिढीसाठीचा सुप्रसिद्ध चित्रपट) चित्रपटातील मेरे पास माँ है हा संवाद कोण विसरू शकतो. अर्थात मी जेव्हा ताडोबातील सुपर मॉम्सविषयी लिहीण्याचा विचार केला तेव्हा अगदी अलिकडच्या व प्रभावी चित्रपटातील अवतरण निवडले, ते म्हणजे आजच्या पिढीचा सुप्रिद्ध चित्रपट असलेल्या केजीएफमधील. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर प्रत्येक शब्दामध्ये भावना ठासून भरलेल्या असतात, ज्यांना हिंदी समजत नाही (पुण्यात असे अनेक जण आहेत), त्यांच्यासाठी या अवतरणाचा अर्थ असा  होतो की आईच्या तिच्या अपत्यासाठीच्या शुभेच्छांमध्ये देवापेक्षाही जास्त ताकद असते. आणि जेव्हा ही आई एक वाघीण असते तेव्हा तर ही ताकद दुप्पट होत असावी अशी मला खात्री आहे. खरेतर मी बऱ्याच काळापासून वाघ या विषयी लिहीत आलो आहे. या वेळच्या ताडोबाच्या सफारीमध्ये मला अनेकदा वाघिणी दिसल्या, त्यांच्यापैकी बहुतेक त्यांच्या बछड्यांसोबत होत्या व हे बछडे वयात येईपर्यंत त्यांना वाढवताना या वाघिणींना किती अडचणींचा सामना करावा लागतो हे मी अनुभवत  होतो. मला असे वाटले की त्यांच्यापैकी काहींविषयी लिहीणे हा त्या वाघीणींना गौरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेअसे पाहिले, तर प्रत्येक आई (मग ती माणूस असो किंवा वाघ किंवा हरिण किंवा चिमणी) ही तिच्यापरीने विशेषच सुपर मॉम्सच असते व जेव्हा तुम्ही एक वाघीण असता तेव्हा तुम्ही जंगलाची राणी पण असता, अर्थात या राणीपदासाठी अतिशय मोठी किंमत चुकवावी लागते व म्हणूनच सुपर मॉम्स वाघिणी अतिविशेष असतात.

ताडोबामध्ये अशा अनेक अद्भूत माता आहेत म्हणजेच वाघिणी आहेत. तेथील सर्व झोन्समध्ये अशा वाघिणी आहेत, ज्यांच्यामुळे या अभयारण्यामध्ये दरवर्षी नव्या बछड्यांची भर पडते. वाघाच्या बछड्यांना वाढवणे हे काही सोपे काम नाही, मग तुमचे घर ताडोबा व्याघ्र प्रकल्पासारखे अभयारण्य असते. या  बछड्यांना त्यांच्या वडिलांशिवाय इतर नर वाघांकडून धोका असतो, तसेच जंगलातील इतर संकटांनाही त्यांना तोंड द्यावे लागते. कोल्ह्यासारखे लहान शिकारी प्राणी, बिबटे, लांडगे तसेच इतर वाघिणींचाही या लहानग्या बछड्यांना धोका असतो. त्याचप्रमाणे वाघाची बछडी खोडकर असतात व खेळताना स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतात म्हणजे एखाद्या जलाशयात बुडू शकतात किंवा त्यांची विषारी सापाशी गाठ पडू शकते. जंगल हे पावलोपावली धोक्यांनी भरलेले असते, त्यामुळे या बछड्याच्या आईला शिकारीला जाताना त्यांना एकटे सोडून जाणे हे अतिशय अवघड असते. या बछड्यांचे भरणपोषण करतानाच स्वतःचेही पोट भरणे वाघीणीसाठी आवश्यक असते, त्यामुळे वाघीण सतत जंगलात सुरक्षित जागेच्या शोधात असते. त्याचप्रमाणे, वाघिणीसाठीही सातत्याने लोकांच्या नजरेत राहणे सोपे नसते. तरीही ताडोबामध्ये  वाघीण व माणूस या दोघांनीही त्यांचे आयुष्य स्वीकारले आहे व आनंदाने जगत आहेत, सहजीवनाचे हे उत्तम उदाहरण आहे. एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आपल्याला ज्याप्रमाणे वाघांची भीती वाटत असते, त्याचप्रमाणे वाघालाही माणसांची जास्त भीती वाटत असते. जंगलामध्ये वाघांचे निरीक्षण करून आपल्याला या वर्तनाविषयी जाणून घेता येते. विशेषतः जेव्हा बछडी आसपास असतात, तेव्हा वाघीण अतिशय काळजी सावध असते  व तिच्यावर किती ताण असेल याचा विचार करा. म्हणूनच पर्यटक म्हणून आपण शक्य तितकी शांतता राखली पाहिजे व आपला उत्तेजना नियंत्रणात ठेवून शांतपणे वन्यजीवनाचे निरीक्षण करत राहिले पाहिजे व वाघिणीला तिच्या बछड्यांसोबत शांतपणे वेळ घालवता आला पाहिजे. मी अनेक पर्यटकांना वाघ पाहिल्यानंतर अति उत्तेजित झालेले पाहिले आहे व ते स्वाभाविक आहे. परंतु आरडाओरडा करण्याऐवजी व इतरांना वाघाविषयी सांगण्याऐवजी, तुम्ही खाणाखुणांचा वापर करू शकता किंवा फक्त शांत राहू शकता व तुमच्यासमोर असलेल्या वाघाचे सौंदर्य टिपू शकता, बरोबर

याच सगळ्या गोष्टींमुळे या वाघिणी ताडोबाच्या सुपर मॉम्स ठरतात, म्हणूनच मी अशाच काही सुपर मॉम्सचा उल्लेख करायचा ठरवले (किंबहुना त्यांना गौरवण्याचे ठरवले). त्यांच्यामुळे माझी जंगलातील सफारी अविस्मरणीय ठरली कारण मला त्यांना व त्यांच्या जीवनाला अभ्यासण्याची संधी मिळाली, ज्यामुळे एकूणच मला जंगलांविषयी अनेक उत्तम गोष्टी शिकायला मिळाल्या. मी वाघिणींचा उल्लेख त्यांच्या स्थानिक टोपण नावांनी करत आहे. ही नावे त्या कुणासारख्या तरी दिसतात म्हणून किंवा त्या ज्या ठिकाणच्या आहेत त्यावरून किंवा त्यांच्या आईच्या टोपणनावावरून किंवा एखाद्या जन्मखुणेवरून देण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या मते हे बरोबर नाही कारण वन विभाग तीन वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक वाघाला एखाद्या क्रमांकाने ओळखतो व आपण ज्याप्रकारे एखाद्या माणसाचे किंवा पाळीव प्राण्याचे नाव ठेवतो त्याप्रमाणे नाव ठेवण्याची परवानगी देत नाही. परंतु खरे सांगायचे तर त्यामुळे आपल्याला संबंधित वाघिणीची मानसिक नाते जोडता येत नाही, म्हणूनच मी त्यांना  दिलेली नावे लिहीत आहे. त्याचप्रमाणे वन विभागाला असलेल्या काळजीविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगायवेसे वाटते की ज्याप्रमाणे माणसांचा आधार क्रमांक असतो, त्याचप्रमाणे वाघालाही एक क्रमांक देण्यास काही हरकत नाही. परंतु आपण माणसे एकमेकांना क्रमांकाने हाक मारत नाही, त्याचप्रमाणे मला असे वाटते एखाद्या वाघाला नावाने हाक मारायला काही हरकत नाही. यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो कारण स्थानिक प्रत्येक वेळी तो वाघ जेव्हा स्थलांतर करतो तेव्हा त्या वाघाची वेगवेगळी टोपणनावे ठेवू शकतात, पण असो. मी नमूद केल्याप्रमाणे यापैकी अनेक वाघिणींची छायाचित्रे वन्यजीवप्रेमींनी काढली आहेत व लाखो पर्यटकांना त्यामुळे वाघ पाहायला मिळाल्यामुळे आनंद मिळाला, कारण प्रत्येकजण वाघ पाहण्यासाठीच जंगलाला भेट देतो व तसे करण्यासाठी मी त्यांना दोष देत नाही. या वाघिणींनी पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही तर ज्याप्रमाणे एखादा लोकप्रिय चित्रपट पाहण्यासाठी ज्याप्रमाणे प्रेक्षक पुन्हा पुन्हा येतात व त्यामुळे संपूर्ण चित्रपट उद्योगच तारला जातो, त्याचप्रमाणे इथे एक वाघीण केवळ बछड्याला जन्म देत नाही व त्याला वाढवत नाही तर या प्रक्रियेमध्ये ती शेकडो कुटुंबाना वाढण्यासाठी व जगण्यासाठी मदतही करत असते, पर्यटनातून मिळाणाऱ्या पैशांमधून हे होत असते. ताडोबामधील सुपर मॉम्स वाघिणींचा गौरव करण्यासाठी हे आणखी एक कारण आहे. त्याचवेळी, मला कबूल करावेसे वाटते, की मी या विषयावरील कुणी तज्ज्ञ नाही, त्यामुळे या वाघिणींचे जन्म स्थान किंवा वंशाविषयीचे संदर्भ अचूक नसतील तर कृपया मला माफ करा. किंबहुना त्यात जी काही दुरुस्ती अपेक्षित असेल ती मला लिहून कळवा. माझ्या या लेखाचा उद्देश सामान्य माणसांना या वाघिणींचे महत्त्व व आपली त्यांच्याविषयीची जबाबदारी समजून सांगणे हे आहे. म्हणजे आपण आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपल्या वन्यजीवनाचे संवर्धन करू शकू...


सुपर मॉम्स, कुआनी

ही वाघीण कोळसा झोनमध्ये जवळपास आठ वर्षांपासून राज्य गाजवत आहे; गंमत  म्हणजे तिला तिच्या बछड्यांचे रक्षण करण्यासाठी हिरडीनाला नावाच्या दुसऱ्या मादीविरुद्ध अजूनही लढावे लागत आहे व वाघीण होण्यामागचा हाच विरोधाभास आहे. कोळसा झोनमधील जंगल अतिशय सुंदर आहे परंतु त्याविषयी इतर झोनमधील कमी माहिती आहे कारण त्याचे प्रवेशद्वार इतर झोनमधील थोडेसे निर्जन भागात म्हणजे मूल रस्त्यावर आहे. कुआनीसारख्या वाघिणीमुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. ती ज्या बिनधास्त पणे तिच्या बछड्यांसह रस्त्यावरून चालत जाते ते पाहणे वन्यजीव प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे. ती अतिशय शूर वाघीण आहे कारण कोळसा व पळसगाव ही गावे कोअर क्षेत्रातून स्थलांतरित झाली आहेत व कुआनीला भोवताली अनेक माणसे असताना जगण्याची सवय आहे, त्यामुळे ती त्यांना घाबरत नाही. तिने जवळपास आठ ते दहा बछड्यांना जन्म दिला आहे व त्यापैकी बहुतेक मोठे झालेत. कारण कोळसाच्या पुढे फारसा शहरी विकास झालेला नाही व जंगलही घनदाट आहे, ते अभयरण्य नसले तरीही नवीन वाघांसाठी उपलब्ध आहे. बछड्यांना वाढवण्याच्या बाबतीत तिच्या योगदानामुळे तसेच कोळसा रेंजला वन्यजीवनाच्या नकाशावर आणण्यासाठी ती ताडोबातील सुपर मॉम्स ठरली आहे.

सुपर मॉम्स, शर्मिली

सुमारे दहा वर्षांपूर्वी जेव्हा बफर क्षेत्रे वन्यजीवप्रेमींच्या (म्हणजे वाघ पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांच्या) प्राधान्य यादीमध्ये नव्हते. त्याचवेळी कोअर क्षेत्रातील मोहार्ली प्रवेशद्वारापाशी जुनोना प्रवेशद्वार सुरू झाले व त्यानंतर दोन नवीन प्रवेशद्वारे सुरू करण्यात आली, ज्याला स्थानिकांचा तीव्र विरोध होता. प्रवेशद्वाराच्या यंत्रणेमुळे त्यांच्या जंगलातील येण्या-जाण्यावर निर्बंध येतील अशी भीती त्यांना वाटत होती. पर्यटकही इथे भेट देण्यास तयार नव्हते, याचे कारण म्हणजे, अगरझरी, जुनोना, देवडा ही क्षेत्रे कोअर पेक्षा थोडी वेगळी आहेत, रस्ते अरुंद आहेत, झाडे व झुडुपे घनदाट आहे, गवत आहे व पाणी मुबलक  आहे, त्यामुळे वाघ किंवा कोणताही प्राणी जोपर्यंत रस्त्यावर येत नाही तोपर्यंत तो दिसणे अवघड होते. अशा काळात एक वाघीण बेधडकपणे अनेक मैल रस्त्यावर चालत जात असे. हे दृश्य पाहणे पर्यटकांसाठी पर्वणी असे, या वाघिणीने हाच बिनधास्त तिच्या बछड्यांनाही शिकवला, ज्यामुळे परिणामी पर्यटनाला मदत झाली व पैसा येऊ लागला. यामुळेच स्थानिकांना वाघांसोबत सहजीवनासाठी सरावण्यास मदत झाली. बछड्यांना वाढवणे तसेच बफर क्षेत्रात जगणे सोपे नव्हते कारण तेथे अन्न सहजपणे उपलब्ध नसते. ते कोअर क्षेत्रात उपलब्ध असते (हरिण व इतर प्राणी) व प्राण्यांना माणसांपासून सुरक्षित अंतर राखावे लागते, तरीही बराच काळ जगली व तिने ताडोबाला अनेक वाघही दिले. तिचा सर्पदंशात दुर्दैवी मृत्यू झाला असे स्थानिक सांगतात. मात्र  ती खऱ्या अर्थाने ताडोबाची सुपर मॉम्स ठरली. कारण बफर्सना तिने ओळख दिली.

सुपर मॉम्स, छोटी मधू

मोहार्ली हे अभयाऱण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे व ताडोबाला चंद्रपूरशी जोडणारा रस्ता सुमारे ३० किलोमीटर लांबीचा आहे. मोहार्लीजवळच्या मुख्य रस्त्याच्या भागावर बिनधास्त वाघिणी हा रस्ता दिवसातून किमान एकदा तरी ओलांडतानाचे सुंदर दृश्य दिसून येते. ती वाघीण इतक्या सहज किंवा आरामात असते  हे बाहेरील कुणालाही हा वाघ (बहुतेक लोकांना नर वाघ आहे किंवा वाघीण आहे हे ओळखता येत नाही किंवा त्याची फिकीरही नसते) पाळीव प्राणी (माणसाळलेला आहे ) असे वाटते. कारण छोटी मधू ही वाघीण माणसे असो किंवा त्यांची वाहने कशालाही बिचकत नाही, ती ताडोबाच्या अगरझरी व जुनोना बफर क्षेत्राची निःसंशयपणे राणी आहे. तिचे नाव छोटी मधू असले तरीही ती इतर वाघिणींच्या तुलनेत आकाराने बरीच मोठी आहे. तिच्या आईवरून, मधूवरून तिचे हे नाव ठेवण्यात आले आहे. छोट्या मधूची सर्वोत्तम बाब म्हणजे, तिने ज्याप्रकारे स्वतःला माणसांसोबत जुळवून घेतले आहे. ज्या प्रदेशावर तिचे राज्य आहे तिथे गावे, शेती, अगदी हॉटेलसुद्धा  आहेत जी माणसांद्वारे दिवसाच्या सर्व वेळी सतत वापरली जातात. तरीही माणसांसोबत कोणताही संघर्ष टाळण्यात ती यशस्वी ठरली आहे व त्यांच्यासाठीही ही आनंददायक बाब आहे. तिच्यामुळे पर्यटक येतात व हे स्थानिकांच्या उपजीविकेसाठी चांगले आहे. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात तर तिने तिच्या दोन बछड्यांसह जवळच्या एका रिकाम्या रिसॉर्टमध्ये आसरा घेतला होता, इतकी ती त्या परिसराशी एकरूप झालेली आहे. मी सुदैवी आहे कारण मला छोटी मधूचे निरीक्षण करता आले व तिच्या माणसांसोबत तसे इतर वाघांसोबत जगण्याच्या तंत्रांचे मला नेहमीच कौतुक वाटते. छोटी मधूची समस्या म्हणजे नर वाघांचे कोअर क्षेत्रातून बफर क्षेत्रामध्ये सतत स्थलांतर होत असते, त्यामुळे तिचे समागमाचे चक्र बिघडते. तसेच तिच्या बछड्यांना सतत धोका असतो कारण तिने बछड्यांना जन्म दिल्यानंतर त्यांचे वडील स्थलांतर करतात. अशा वेळी इतर नर वाघ त्यांना ठार करतात, ही निसर्गाची क्रूर बाजू आहे. या कारणामुळे तिची अनेक बछडी जगू शकली नाहीत, परंतु या सुपर मॉम्सने हार मानली नाही. सध्या ती तिच्या दोन बछड्यांचे पालनपोषण करण्यात व्यग्र आहे. माणसांमध्ये राहूनही जगण्याचे तिचे धाडस व त्यांचे आयुष्य अधिक चांगले बनवल्यामुळे ती ताडोबाची सुपर मॉम्स आहे.

सुपर मॉम्सची जोडी, छोटी तारा व माया

छोटी मधूप्रमाणे, छोटी तारा हे नावही तिला तिची आई तारा हिच्याकडून मिळाले. परंतु ती तिच्या आईपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे, तिचे ताडाबासाठीचे योगदानही मोलाचे आहे. सध्या दोन माता ताडोबाच्या कोअर क्षेत्रातील मध्यवर्ती भागावर राज्य करत आहेत, त्या दोन्ही छोटी ताराच्याच बछड्या आहेत, हा सीटीच्या (टोपणनाव) योगदानाचा पुरावा आहे व सध्या अनेक नर वाघ आहेत ती सुद्धा तिचीच अपत्ये आहेत. व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये ताडोबा नावारूपाला येण्याच्या प्रवासाविषयी जेव्हा लिहीले जाईल तेव्हा कुणीही दोन सुपर मॉम्सची नावे विसरू शकत नाही. एक म्हणजे छोटी तारा  व दुसरे म्हणजे माया द ग्रेट ! हे म्हणजे ८० च्या दशकात बॉलिवुडमध्ये चित्रपट उद्योगावर वर श्रीदेवी व जयाप्रदाचे राज्य होते. यामध्ये श्रीदेवीवर जास्त प्रकाशझोत असला तरीही जयाप्रदाचे सौदर्य व पडद्यावरील वावर तितकाच महत्त्वाचा होता व चाहत्यांना आवडत होता. इथेही तसेच आहे, माया नेहमी प्रकाशझोतात राहात असे, तरीही वाघांच्या जागतिक नकाशावर ताडोबाचे नाव घेऊन जाण्यासाठी  छोटी ताराचे  योगदान व तिचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे होते. या दोन्ही उदाहरणातील दुर्दैवी साम्य म्हणजे मी वर नमूद केलेल्या दोन अभिनेत्रींपैकी श्रीदेवी या जगातून अतिशय अनपेक्षितपणे व अचानक निघून गेली. त्याचप्रमाणे ताडोबाच्या कोअर क्षेत्रातून माया २०२३ मध्ये अचानक नाहीशी झाली, ज्यामुळे छोटी तारा एकटीच कोअर क्षेत्राचा किल्ला लढवण्यासाठी मागे राहिली व ती अतिशय उत्तमप्रकारे आपली जबाबदारी पार पाडत आहे. माया नाहीशी होण्यापूर्वी (देव तिचे भले करो) जवळपास दोन वर्षांसाठी सीटीने तिचे क्षेत्र तिच्या दोन बछड्यांसाठी सोडून दिली होती ज्या ताडोबाच्या कोअर क्षेत्राच्या पुढील सुपर मॉम्स  होतील. ती जेव्हा बफर क्षेत्रात स्थिरावत होती तेव्हाच नेमकी माया नाहीशी झाली. हळूहळू व संयमाने छोट्या ताराने  मायाच्या नाहीशा होण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली व तिच्या क्षेत्रावर राज्य गाजवायला सुरुवात केली. चांगली बातमी म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी छोटी तारा गरोदर राहिली व आता तिच्या दोन बछड्यांची काळजी घेतेय. दुर्दैवाने, माया ही केवळ सुपर मॉमच नव्हे तर ताडोबाची महाराणी होती, परंतु तिच्या बछड्यांच्या बाबतीत मात्र कमनशिबी ठरली. तिच्या क्षेत्रात अनेक नर वाघ असल्यामुळे तिचे बहुतेक बछडे इतर नर वाघांकडून मारले गेले. माया व छोटी ताराने अलिकडच्या वर्षात जंगलासाठी दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल इतक्या त्या प्रसिद्ध होत्या. म्हणूनच ताडोबाच्या सुपर मॉम्सच्या यादीमध्ये त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.


सुपर मॉम्स के-मार्क

ताडोबाच्या सुपर मॉम्स वर्गात प्रवेश झालेली ही सर्वात तरूण वाघीण आहे. मी नमूद केल्याप्रमाणे काही वाघिणींचे नाव त्यांच्या जन्मखुणेसारख्या एखाद्या खुणेमुळे पडलेले आहे. या वाघिणीचे असे ठेवण्यात आले आहे कारण तिच्या कपाळावर इंग्रजी के अक्षरासारखी खूण आहे. ही तरूण पहिल्यांदाच आई झालेली वाघीण ताडोबाच्या मुळ  गावच्या बाजूला असलेल्या बफर क्षेत्रावर राज्य करते. ती देखील छोट्या मधूप्रमाणेच माणसांसोबत राहायला शिकत आहे कारण तिच्या क्षेत्रातही भोवताली अनेक गावे आहेत व काही अतिशय रहदारीचे रस्ते आहेत. मला अलिकडेच तिला अगदी जवळून बघण्याची संधी मिळाली व तिची तीन बछडी आहेत. ती पहिल्यांदाच आई झालेली असल्यामुळे अवतीभोवती फिरताना अतिशय सावध असते कारण मोठे होत असताना तिने माणसांना अतिशय जवळून पाहिले आहे. तिच्यासोबत बछडी असताना तिला धोका पत्करायचा नसतो. मूलकडे जाणारा रस्ता अतिशय रहदारीचा आहे जो कोलसा रेंजमधील बफर क्षेत्रातात येतो. या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांसाठी के-मार्क दिसणे नित्याचेच झाले आहे. ती या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर गुरगुरते, डरकाळी फोडते, लुटुपुटीचे हल्ले करते जेणेकरून ते तिच्या बछड्यांवर हल्ला करणार नाहीत याची ती खात्री करू शकेल. परंतु तिने आत्तापर्यंत एकाही माणसाला प्रत्यक्षात इजा केलेली नाही, यातून तिचा अतिशय हुशार दृष्टिकोन दिसून येतो कारण माणसांना मारणे म्हणजे त्यांच्याविरुद्ध युद्ध सुरू करण्यासारखे आहे हे ती जाणते, ज्यामुळे तिचे व पर्यायाने तिच्या बछड्यांचे भले होणार नाही.

मित्रहो, ज्याप्रमाणे केजीएफ किंवा पुष्पासारख्या (याविषयी माहितीसाठी कृपया गूगल करा) चित्रपटांचे पुढील भाग येतात, त्याप्रमाणे ताडोबातील सुपर मॉम्सविषयी हे पहिले प्रकरण आहे, कारण ताडोबाला अनेक सुपर मॉम्सचे वरदान लाभलेले आहे व त्यापैकी प्रत्येक आपापल्या जागी विशेष आहे. मी आगामी काळात त्यासर्वांचा लेखामध्ये समावेश करेन अशी आशा करतो, कारण या अद्भूत मातांचा (वाघिणींचा) हा सर्वोत्तम गौरव ठरेल. आपण या सुपर मॉम्सविषयी समजून घेतले पाहिजे व त्याचा आदर केला पाहिजे की त्यांना त्यांच्या बछड्यांविषयीची, जंगलाविषयीची व स्वतःबद्दलची जबाबदारी पार पाडतांना आपण माणसे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण करत आहोत. कोअर क्षेत्राचे काहीशे किलोमीटर क्षेत्र वगळता जिथे माणसांनी ये-जा करण्यावर निर्बंध आहेत, यापैकी बहुतेक वाघिणी क्षेत्रासाठी लढत आङेत ज्यावर माणसांनी अतिक्रमण केले आहे. या सर्व मातांना थोडा एकांत हवा आहे व त्यांच्या बछड्यांसाठी सुरक्षिततेची भावना हवी आहे. त्यांच्या बछड्यांना जगवण्यासाठी त्या ढळढळीत उजेडीसुद्धा शिकार करण्याचे धाडस करत आहेत व काहीशे लोक त्यांच्या घराच्या परसदारातून हे दृश्य पाहू शकतात. तसेच साधारण हाकेच्या  अंतरावर शेतकरी काम करत असतात व जनावरे चरत असतात, गावातल्या महिला कामासाठी चाललेल्या असतात जेथून ही आई असलेली वाघिणी चालत जाते व एवढे असूनही ती केवळ तिच्या बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ गुरगुरते किंवा लुटुपुटीचा हल्ला करते. जेव्हा ती एकटी असते, तेव्हा मी ताडोबाच्या बफर क्षेत्रात अनेकदा पाहिले आहे की वाघिणीला माणसाची हालचाल दिसून आल्यास ती शांतपणे तिचा मार्ग बदलते किंवा काही काळ झुडपात थांबते व माणसे गेल्यानंतर बाहेर येते, हे सगळे जाणून घेण्यासाठी व अनुभण्यासाठी किती छान आहे! तरीही अपघात (संघर्ष) होतात परंतु ते आपल्या शहरांमध्ये रस्त्यांवरही होतात त्यामुळे आपण रस्त्यावर कार किंवा ट्रक चालवण्यास मनाई करत नाही, बरोबरआपण वन्यजीवनासोबत जगण्याच्या काही साध्या नियमांचे पालन केले, तर आपण हे अपघात (संघर्ष) कमी करू शकू. केवळ ताडोबातीलच नव्हे तर आपल्या देशातील अशा सर्व जंगलातील सुपर मॉम्सना (वाघिणींना) आपण दिलेली ही सर्वोत्तम भेट असू शकते, एवढी विनंती करूनच निरोप घेतो !

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com




















Friday, 27 September 2024

पाणी पुरवठा, नक्की कोणाची जबाबदारी ?

 








































पाणी पुरवठा, नक्की कोणाची जबाबदारी ?

डोळ्यातील अश्रू व सुनामी दोन्ही पाण्यापासून तयार होतात, म्हणुनच पाणी हे पृथ्वीवरील सर्वात निर्मितीक्षम व सर्वात विनाशक उर्जेचा स्रोत आहे.” फिओना पॉल

फिओना पॉल या मेडिटेरिअन समुद्राजवळ राहतात परंतु जगभर प्रवास करतात कारण त्या समुद्रापासून फार काळ लांब राहून श्वास घेऊ शकत नाहीत. त्या लेखिका आहेतच, परंतु त्याचशिवाय त्यांनी उपहारगृहात स्वयंपाकी म्हणून, किरकोळ विक्री व्यवस्थापक म्हणून, पशुवैद्यक सहाय्यक, वैद्यकीय नियोक्ता, इंग्रजी शिक्षक, व एक नोंदणीकृत परिचारिका अशी विविध कामे केले आहे. त्यांचे करिअर अतिशय रोचक आहे व त्यामुळे त्या पाण्याविषयी इतक्या सुंदर पद्धतीने लिहू शकतात यात आश्चर्य नाही, त्या पाण्यासोबतच राहतात (म्हणजे समुद्राजवळ) व वन्यजीवनानंतर त्यांच्या लेखनाचा दुसरा सर्वात आवडता विषय म्हणजे पाणी. वन्यजीवनाप्रमाणेच पाणीही आपल्याकडून सर्वात दुर्लक्षित विषय आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसांना गोष्टी (निसर्गासारख्या) गृहित धरण्याचा शाप आहे. आपण ज्याप्रकारे वन्यजीवनाविषयी विचार करतो (वने व इतर प्रजाती) किंबहुना अजिबात विचार करत नाही असे म्हणणेच योग्य ठरेल. परंतु मी तो वापरत आहे कारण वन्यजीवन आपोआप वाचेल हे आपण गृहित धरले आहे व आपण केवळ माणसांसाठीच नियोजन करत राहतो, त्याचप्रमाणे आपण पाण्यालाही गृहित धरतो म्हणजेच आपल्याला असे वाटते की आपण घरे, कारखाने, महामार्ग, शाळा, मॉल व इतरही अनेक गोष्टी बांधत राहू व आपल्याला हवे तेव्हा व आपल्या गरजेएवढे (आपल्या हव्यासाएवढे) पाणी उपलब्ध होईल असे आपल्याला वाटते. याचे समर्थन करण्यासाठी आपण म्हणतो की पृथ्वीचा जवळपास ७१% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे व केवळ २९% जमीनीचा भाग आहे. त्यामुळेच आपले बरोबर आहे, परंतु हे पाणी आपल्यासाठी उपयोगी आहे का, याचा आपण कधीही विचार करत नाही. त्याचप्रमाणे जवळपास २२० कोटी लोकांना वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे, ही आकडेवारी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे. आपला देश ज्या वेगाने वाढतो आहे (म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत) देशातील बहुतेक नागरिकांचा या एक चतुर्थांश नागरिकांमध्ये लवकरच समावेश होईल हे नक्की, जो माझ्या लेखाचा विषय आहे.

विनोद म्हणजे, दरवर्षी आपल्या येथे पाऊस तेवढाच पडतो जो आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी मुख्य स्रोत आहे परंतु आपली लोकसंख्या फास्ट वाढतेय, आपला पाण्याचा वापर वाढतोय व पाणी वापरण्यासाठीचे (पाण्याच्या संवर्धनासाठीचे) आपले नियोजन झपाट्याने ढासळत चालले आहे हे आपण विसरत आहोत, हा माझ्या लेखाचा विषय आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या नियोजनासाठी योग्य त्या गोष्टी करण्यासाठी आपण फक्त मामाचे पत्र (या खेळाविषयी तपशीलाने जाणून घेण्यासाठी गूगल करा. मी एवढेच सांगेन की आमच्या बालपणीचा हा अतिशय साधा खेळ होता, ज्यामध्ये प्रत्येकजण एका काल्पनिक पत्राची जबाबदारी इतरांवर ढकलतो) या खेळाप्रमाणे एकमेकांकडे बोट दाखवतोय. परंतु इथे पाणी काल्पनिक नाही, तर अगदी खरे आहे व त्याचा वापर व संवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारीही तितकीच खरी आहे.

मजेशीर गोष्ट, (म्हणजे ज्यामुळे तुम्ही वैतागाल) मी अलिकडच्या काळात अनेक बातम्या पाहिल्या ज्यामध्ये पुण्यामध्ये व पुण्याच्या अवतीभोवती प्रकल्पांना (बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांना दुसरे काय) पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नागरी/सार्वजनिक/नियोजन प्राधिकरणांनी (नाव काहीही असो, त्याने फारसा फरक पडत नाही) झटकली आहे. म्हणजे, पुणे महानगर विकास प्राधिकरणाने सांगितले की प्रकल्प पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असेल तर नवीन प्रकल्पांना मंजूरी देताना हमी मागणार नाही. परंतु या हद्दींबाहेर असलेल्या प्रकल्पांना त्यांच्या रहिवाशांसाठी पाणी पुरवठ्याची स्वतःची सोय आहे याची खात्री द्यावी लागेल. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत केवळ ज्या ठिकाणी (प्रकल्पांमध्ये) पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांचे जाळे घालण्याचे काम सुरू आहे तेथे पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, ते सुद्धा कामाच्या प्रगतीवर अवलंबून असेल व पुणे महानगरपालिकेचा आता भाग असलेल्या ३४ गावांपैकी केवळ चार गावेच अशी आहेत. जेथे पाणी योजना चालू आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, पुणे महानगरपालिका प्रकल्प अगदी जुन्या शहराच्या हद्दीत असला तरीही विकासकांकडून पाणी पुरवठ्याविषयी आश्वासन घेते. हीच बाब पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रकल्पांना मंजूरी देते तेव्हाही लागू होते. एक पाऊल पुढे जात, दोन्ही महानगरपालिका रस्ते किंवा सांडपाण्याची जबाबदारीही घेत नाहीत किंवा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) असेल तर प्रक्रिया केलेल्या अतिरिक्त पाण्याचे काय करायचे याचे नियोजन नसते. पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाविषयी बोलायचे झाले, तर त्यांनी त्यांचा विकास योजना (डीपी) तयार केली आहे, जी वैधतेसाठी उच्च न्यायालयामध्ये आहे. परंतु जो भाग निवासी असल्याचे दाखवण्यात आले आहे तिथेही जोपर्यंत विकासक अशा प्रकल्पांमध्ये रहिवाशांना पाणी पुरवठ्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत तेदेखील अशा इमारतींसाठी मंजूरी देत नाही. मी हे सगळे एवढे वैतागून का सांगत आहे कारण, मी आजच वर्तमानपत्रांमध्ये एक पूर्ण पानाची जाहिरात पाहिली, ज्यावर आपले महाराष्ट्र राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे असे म्हटले होते व या जाहिरातीमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे हसरे चेहरे होते. परंतु पुण्यासारख्या स्मार्ट व विकसित शहरामध्ये कुठलीही सरकारी संस्था पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधेची जबाबदारी घेत नाही ही जमिनीवरची वस्तुस्थिती आहे.

त्याचशिवाय, अलिकडेच काही पुणे शहरातील काही सुविद्य नेते तसेच बुद्धिवंतांनी (असे बरेच आहेत) राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना असे आवाहन केले की सध्याच्या सुधारित विकास नियंत्रण नियमांतर्गत नवीन प्रकल्पांना परवानगी देऊ नये, कारण त्यामुळे शहराच्या अपुऱ्या पायभूत सुविधांवर ताण पडतो. हा ही परिस्थिती अडचणीची आहे कारण तुम्ही या बुद्धिवंतांचे विकास योजनेतील नियमांमुळे पाण्यासारख्या पायाभूत सुविधेवर ताण येत असल्याचे आवाहन फेटाळून लावले तर स्थानिक स्वराज्य संस्था (पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका/पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरण) बांधकाम व्यावसायिकांकडून पाणी पुरवठ्यासाठी आश्वासन का मागत आहेत. तुम्ही नवीन विकासासाठी पाणी पुरवठा करू शकत नाही हे स्वीकारत असाल तर मग तुम्ही डेव्हलपमेंटच्या नियमांनुसार अतिरिक चटईक्षेत्र निर्देशांकासह (एफएसआय) नवीन विकासाला मंजूरी का देत आहात, बरोबरसर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकार (म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री) नवीन तसेच सध्याच्या प्रकल्पांमध्ये रहिवाशांना पाणी पुरवठा करणे ही कुणाची जबाबदारी आहे हा प्रश्न का टाळत आहेत? व्यावसायिक म्हणून (म्हणजे बांधकाम व्यावसायिक म्हणून) मी कुठल्याही जमीनीची व्यवहार्यता तिची कायदेशीर स्थिती, विभाग, प्रस्तावित वाढीची क्षमता, परवानगी असलेला एफएसआय वापरण्याची शक्यता यावरून तपासतो. माझी अशी अपेक्षा असते की मी जर स्थानिक स्वराज्य संस्थेला विकास शुल्क देत आहे तर मला रस्ते, पाणी, सांडपाणी, वीज यासारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित नागरी/प्रशासकीय संस्थेचीच आहे. या सेवा मला (म्हणजे रहिवाशांना) मोफत दिल्या जात नाहीत तर सरकार पाण्याचा व विजेच्या वापरानुसार त्यासाठी शुल्क आकारते, तसेच मला रस्ते व सांडपाणी यासारख्या सेवांसाठी मालमत्ता करही भरायला लावते, जो लोक भरतात. परंतु जेव्हा मी जमीन खरेदी केल्यानंतर माझ्या प्रकल्पाच्या योजनेसाठी मंजूरी घेण्यासाठी जातो, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था मला सांगतात की कोणत्याही पायाभूत सुविधा देण्यासाठी त्या जबाबदार नसतील, तर मी विकसक म्हणून त्याची सोय करेन असे आश्वासन देण्यास त्या मला भाग पाडतात. माझा असा प्रश्न आहे की ही कशाप्रकारची व्यावसायिक धोरणे आहेत व त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे माझ्या ग्राहकांचीही माझ्याकडून तशीच अपेक्षा असते, कारण सरकारच (म्हणजे पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका) तसे म्हणते.

लोकहो, विजेचे उदाहरण घ्या, सर्व सदनिकाधारक जी वीज वापरतात त्यासाठी पैसे देतात. जेव्हा वीज नसते तेव्हा जनरेटर/इन्व्हर्टर वापरावा लागतो, अशावेळी जनरेटरसाठीचे डिझेल किंवा इन्व्हर्टरसाठीच्या बॅटरीचे पैसे ते बांधकाम व्यावसायिकाला द्यायला सांगतात का, मला माहितीय याचे उत्तर नाही असे आहे. असे असताना रहिवासी जे पाणी वापरतात त्याचे पैसे शुल्क भरण्याची जबाबदारी विकासकाची कशी असू शकते, असा माझा प्रश्न आहे? तसेच, जेथे स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे पाणी पुरवठा केला जातो तेथेही विकासकालाच पैसे द्यावे लागतात कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारतींच्या रहिवाशांना पाणी पुरवठा करू शकत नाही जी त्यांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे, अशावेळी बांधकाम व्यावसायिकाने ही जबाबदारी का घ्यावी, असा माझा प्रश्न आहे व लेखाचा हेतू आहे. ही कुणाची जबाबदारी आहे हा मुद्दा जरासा बाजूला ठेवू, परंतु जेव्हा कोणतीही सार्वजनिक संस्था एखाद्या परिसराची विकास योजना तयार करते, तेव्हा ते पाण्यासारख्या अगदी मूलभूत गोष्टीचा विचार न करता त्याला निवासी किंवा व्यावसायिक म्हणून घोषित कसे करू शकतात, हा प्रश्न केवळ बांधकाम व्यावसायिकांनीच नव्हे तर सर्व नागरिकांनी सरकारला विचारण्याची वेळ आता आली आहे. विशेष म्हणजे, आपले शासनकर्ते जेव्हा इतर मोठ्या उद्योगांना इथे व्यवसाय सुरू करण्यासाठी आमंत्रण देतात तेव्हा मर्सिडीज किंवा टोयोटासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ते या प्रकल्पांना  पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देण्यास भाग पडतात का, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. आपण सगळे याचे उत्तर जाणतो की सरकार या उद्योगांना पाणी, सांडपाणी, रस्ते व वीज यासारख्या पायाभूत सुविधा सवलतीच्या दराने देण्याचे आश्वासन देते, तर हाच नियम रिअल इस्टेटलाच का लागू होत नाही, आम्ही काही इथे अवैध दारू बनवतोय का, असा प्रश्न मला सरकारला विचारावासा वाटतो.

मला असे वाटते की सरकारने आता नवीन पाणी स्त्रोत व पुरवठ्याची केंद्रे तयार करण्यावर सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे व त्यासाठी जलस्रोत शोधले पाहिजे व त्यानंतर पाणी वितरित करण्यासाठी जाळे तयार केले पाहिजे व त्यानंतर पुणे प्रदेशासाठी क्षेत्रनिहाय प्रकल्प योजना करून त्याची मुदत निश्चित केली पाहिजे व ती प्रकाशित केली पाहिजे. त्यानंतर जल संवर्धनाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, पुरवठा केलेल्या पाण्याच्या संवर्धनामध्ये विकासकाची भूमिका महत्त्वाची आहे हे मी मान्य करतो. प्रिय मायबाप सरकार, ही घरे व व्यावसायिक जागा तसेच त्यासोबत चांगल्या पायाभूत सुविधा या तुम्ही ज्या इतर सर्व उद्योगांना पायघड्या घालून आमंत्रण देत आहात त्यांच्यासाठीच आहेत, कारण तुम्ही कार बनविण्यासाठी पाणी द्याल परंतु ती कार बनविणारे हातच तहानलेले असतील तर काय. त्यानंतर उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये जात असल्याचे व त्यामागे राजकीय खेळी असल्याचे रडगाणे गाता, परंतु आपण पाण्यासाठी काय करत आहोत यावरून या राज्याचे भवितव्य ठरेल, केवळ एकमेकांकडे बोट दाखवून नव्हे, एवढेच मी म्हणेन; हा इशारा देऊनच निरोप घेतो!


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com