Tuesday 10 September 2024

कोलकाता, बदलापूर, कॉलीवूड आणि समाज!

 





















कोलकाता, बदलापूर, कॉलीवूड आणि समाज!

एकट्या व्यक्तींमध्ये, सणकीपणा दुर्मिळ आहे, परंतु पक्ष, राष्ट्र व समूहांमध्ये तो जणू नियमच आहे.”
 फ्रेड्रिक नित्शे

फ्रेड्रिक विल्हेम नित्शे हे जर्मन बुद्धिवंत, तत्वज्ञ, व संस्कृती समीक्षक होते, जे पुढे सर्वात प्रभावी आधुनिक विचारवंतांपैकी एक झाले. जेव्हा एकंदरच समाजाशी व त्याच्या वर्तनाशी संबंधित विषय येतो तेव्हा काही नावे, त्यांचे विचार तुम्ही विसरूच शकत नाही (अर्थात तुम्हाला ऐकायचे असेल तर) व नित्शे अशाच व्यक्तींपैकीच एक आहेत. हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण जर्मन नाव आहे, जे आपल्यासारख्या भारतीय लोकांना उच्चारणेही अवघड जाते, परंतु त्यांनी जे काही लिहीले आहे ते सर्वांना लागू होते, यालाच बुद्धिमत्ता म्हणतात, ज्याला कोणत्याही सीमारेषा नाहीत. परंतु विसंगती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या देशातील लोकांनी त्यांचे शब्द हिटलरला व त्याच्या फॅसिस्ट विचारसरणीला पाठिंबा देऊन अतिशय भयंकर पद्धतीने खरे करून दाखवले. मला ज्या विषयांमुळे त्यांचे वरील शब्द आठवले त्यावर वर्तमानपत्रांमध्ये मथळे येत आहेत. मी अशा मथळ्यांवर लिहीण्याचे टाळले आहे, याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे अशा घटनांविषयी काही न होणे किंवा चर्चा करणे व त्यामुळे उठलेला धुरळा आपोआप शांत होऊ देणे हा सर्वोत्तम मार्ग असतो. दुसरे म्हणजे, तुम्ही समर्थक जे काही म्हणता किंवा लिहीता त्यामुळे लगेच तुम्ही कोठल्यातरी पक्षाचे (राजकीय) किंवा धर्माचे किंवा एखाद्या समूहाचे आहात असा शिक्का बसतो, तुम्हाला काय वाटते हे विचारात घेतले जात नाही. मला नेमके हेच होऊ द्यायचे नाही. तरीही, काही वेळा तुम्ही (म्हणजे मी) स्वतःसाठी लिहीता कारण बोलणे सोपे असते, तुम्ही नंतर तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता असे म्हणू शकता किंवा तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असे म्हणू शकता. परंतु तुम्ही जेव्हा लिहीता तेव्हा असे होत नाही व म्हणूनच कुणीही प्रसिद्ध व्यक्ती (कुणाला फिकीर आहे) किंवा आपले नेते कधीच काहीच लिहीत नाहीत, ते ज्या फाईल तपासतात त्यादेखील नाही, अधिकारीच या फायलींवर स्वाक्षरी करतात ज्यामुळे नेते (राजकीय) सुरक्षित राहतात. ट्विटर किंवा इन्स्टाग्राम किंवा फेसबुक (जुन्या विचारणीच्या लोकांसाठी) कुठेही, तुम्हाला जे काही म्हणायचे होते त्याचा परिणाम साध्य झाल्यानंतर तुम्ही तुमची पोस्ट डिलिट करू शकता, परंतु एखादा ब्लॉग लिहीण्यासाठी किंवा काही परिच्छेद लिहीण्यासाठी त्या विषयाची जाण हवी तसेच तुमच्या स्वतःच्या विचारणीचीही जाणीव हवी तरच तुमच्या लेखनामध्ये वैचारिक स्पष्टता असू शकते.

मी माझ्या लेखानाचे समर्थन करत नाही परंतु मी जे काही लिहीले आहे ते माझे स्वतःचे विश्लेषण आहे, माझ्या मनाच्या समाधानासाठी आहे तसेच माझ्या तरूण पिढीसाठी आहे जिला माझ्यापेक्षा बऱ्याच कठीण काळाला सामोरे जावे लागणार आहे. विनोद म्हणजे, बऱ्याच ज्येष्ठांना (ज्यामध्ये आता माझाही समावेश होतो) नेहमी असा विश्वास असतो की त्यांचे आयुष्य सध्याच्या तरूण पिढीपेक्षा बरेच अधिक कठीण होते. मी समाजामध्ये जे घडत आहे त्याविषयी वाचून, ऐकून, पाहून याच्याशी पूर्णपणे असहमत आहे. मला असे वाते माझी पिढी अतिशय सुदैवी होती व माझा लढा माझी मुले व त्यांच्या मुलांना ज्याला तोंड द्यावे लागणार आहे त्याच्या तुलनेत काहीच नव्हता, त्यांना भविष्यात कशाला तोंड द्यावे लागणार आहे हे समजावे यासाठी मी हा लेख लिहीला आहे. मी असे का म्हणत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा कारण अलिकडेच माझ्या शाळेतील मित्रांच्या वॉट्स अॅप ग्रूपवर, राजकीय पक्ष, जात, आरक्षण व पक्षांचे राजकीय कार्यक्रम याविषयी अटीतटीची चर्चा सुरू होती. नेहमीप्रमाणे ही चर्चा वैयक्तिक पातळीवर पोहोचली. पुढे जाऊन ती इतकी वैक्तीक  थराला गेली की एका मित्राने, मी त्याबदल पोलीस तक्रार दाखल करणार आहे, माझ्यासोबत कोण आहे अशी विचारणा केली. त्यावर दुसरा मित्र म्हणाला, तुला काय करायचे ते कर, मी कोणत्याही पोलीस ठाण्यात येण्यासाठी तयार आहे. कशामुळेही हा वाद शांत होणार नाही हे मला माहिती होते, तरीही मी लिहीले, “लोकहो, आपण सगळे या समूहामध्ये कशासाठी आहोत हे विसरलो आहोत का? जेव्हा साधारण चाळीस एक वर्षांपूर्वी आपण आपण एकाच बाकावर (तुटलेल्या) बसायचो तेव्हा आपण एकमेकांना जागा देऊन त्या मोडक्या बाकाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत असू, आपण एकमेकांच्या डब्यातले खात असू, आपल्याशेजारी बसलेल्या मुलाची जात कोणती किंवा धर्म कोणता असे प्रश्न आपण कधीही विचारले नाहीत किंबहुना ते आपल्याला कधी माहिती नसायचे. परंतु तो गरीब किंवा श्रीमंत होता, त्याची कौटुंबिक स्थिती, त्याच्या गरजा आपल्याला माहिती होत्या. आपल्याला ज्या थोड्याफार प्रमाणात शक्य आहे त्यानुसार आपण एकमेकांना मदत करत असू. त्यावेळी जोरदार वादावादी व क्वचित प्रसंगी शारीरिक मारामारीही होत असे, परंतु त्यावेळी कुणीही कधीही एकमेकांना पोलीस ठाण्यात तर सोडाच परंतु शिक्षकांकडे किंवा पालकांकडेही घेऊन जात नसे व दिवसाअखेरीस आपण सर्व पुन्हा मित्र होऊन आपापल्या घरांकडे जात असू. आता पाहा आपण कुठे पोहोचलो आहोत, आज आपण आपल्या मुलांना तुटलेल्या बाकांवर इतर मुलांसोबत बसावे लागू नये म्हणून शाळा किंवा कॉलेजमध्ये सगळे वैयक्तिक बाक खरेदी करू शकतो, परंतु ते त्यांच्या मित्रांना ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारून त्यांच्यासाठीही जागा करून देण्यास व बाकाचा समतोल राखायला विसरून गेले आहेत. याला कारणीभूत आपण मोठी माणसे आहोत. या कारणामुळे आजकालच्या तरुण पिढीचे भविष्य आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी खडतर आहे. आपल्याला कधीही आपल्या जगण्यासाठी आपल्या मित्रांशीच लढावे लागले नाही, तसेच आपल्याला कधीही आपले मित्र त्याचा/तिचा दर्जा किंवा जात किंवा धर्म किंवा लिंगाच्या आधारावर निवडावा लागला नाही. परंतु आजकालच्या मुलांना असे करावे लागते व आपण त्यांना तसे करण्यास भाग पाडत आहोत, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातही अंधार पसरला आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

या लेखास कारणीभूत चार घटना आहेत (खरेतर अनेक) ज्या अलिकडे प्रकाशझोतात होत्या, सर्वात पहिली घटना म्हणजे एका महिला डॉक्टरवर ती रुग्णालयात कामावर असताना झालेला बलात्कार (या समाजात पुरुषावर कधीही बलात्कार होत नाही, हे भोग फक्त एका महिलेच्याच वाट्याला येतात त्यामुळे महिला डॉक्टर असे नमूद करण्याचीही गरज नव्हती, तरीही मी केले) व त्यानंतर तिची निर्घृण हत्या झाली, जी एका वॉर्ड बॉय किंवा रुग्णालयातील सहाय्यकाने केली होती. दुसऱ्या घटनेमध्ये मुलींच्या शाळेमध्ये, दोन मुलींचा शाळेतील मदतनिसाद्वारे विनयभंग करण्यात आला (त्या इतक्या लहान होत्या की बलात्कार हा शब्दही अशक्यप्राय वाटतो). तिसऱ्या घटनेमध्ये चित्रपट उद्योगामध्ये, काही आघाडीच्या अभिनेत्रींनी या क्षेत्रामध्ये काही सुप्रसिद्ध व्यक्तींनी त्यांची लैंगिक पिळवणूक केल्याचा आरोप केला. सर्वात शेवटची घटना म्हणजे, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर केवळ आठ महिन्यातच कोसळाला. आता तुम्ही म्हणाल, की यात काय तर्क आहे किंवा या घटनांचा परस्परांशी काय संबंध आहे. कारण महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहरात झाला, तर मुलींच्या विनयभंगाची घटना महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नावाच्या उपनगरात घडली, चित्रपट अभिनेत्रींच्या पिळवणूकीच्या घटना केरळच्या चित्रपट उद्योगातील होत्या तर शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणातील मालवणच्या किल्ल्यामध्ये कोसळला. असे पाहायला गेले तर प्रत्येक घटना एकमेकांपासून हजारो किलोमीटरवर झाली, तरीही त्यांचा एकमेकींशी काही बाबतीत संबंध आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. या सर्व घटनांमध्ये, लोकांच्या आक्रोशाचा उद्रेक झाला जे कुणालाही अपेक्षित नव्हते, ज्या देशामध्ये कायदा तोडणे मोठ्या अभिमानाने मिरवले जाते, महिलांशी गैरवर्तनाच्या (असभ्यपणे वागण्याच्या) घटना नियमितपणे घडतात व कृपया काळजीपूर्वक वाचा, मी असे वर्तन, त्याचप्रमाणे पुतळा पडणे योग्य आहे असे अजिबात म्हटलेले नाही. बिहार राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास पंधराहून अधिक पूल कोसळले आहेत व तसेच आपल्या राजधानी दिल्लीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भागही कोसळला, तरीही कुणीही ते गंभीरपणे घेतले नाही किंवा त्याविरुद्ध आंदोलन केले नाही, तर मग वर नमूद करण्यात आलेल्या घटनांमध्ये ते का झाले? किंबहुना बदलापूर व कोलकाताच्या प्रकरणामध्ये लोक रस्त्यावर उतरले व त्या शहरांमधील संपूर्ण जीवन थांबले, एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले व या संपूर्ण आंदोलनाला कोणताही चेहरा नव्हता, नंतर नेहमीप्रमाणे राजकीय पक्षांनी त्याचा ताबा घेतला! या सर्व घटनांमधील आणखी एक मुद्दा म्हणजे जमावाने आरोपी लोकांना दोषी ठरवण्याची व त्यांना फाशी देण्याची मागणी लावून धरली होती. पुतळ्याच्या प्रकरणामध्ये दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली नव्हती तर सुनावणी न करता त्यांना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती म्हणजे लोकांनी निवाडा केला होता व शिक्षाही दिली होती.

त्याचशिवाय अलिकडेच झालेल्या एका परिषदेमध्ये माननीय न्यायाधीश श्री. अभय ओक म्हणाले की न्यायदान करणे हे केवळ न्यायव्यवस्थेचे काम आहे, म्हणजेच लोकांनी त्यासंदर्भातील निर्णय घेऊ नयेत व ते म्हणणे योग्य आहे. परंतु आंदोलन व्यवस्थेविरुद्ध व पीडितांचे संरक्षण करण्यातील तिच्या अपयशाविषयी व तसेच वेळच्या वेळी न्यायदान करण्याविषयी होते, म्हणून जमावाची प्रतिक्रिया अशाप्रकारे झाली, हे सगळ्यांनी विचारात घेतले पाहिजे, हा माझ्या लेखाचा विषय आहे. जर या घटनांमधील दोषी लोक जर अशा जमावाच्या हाती सापडले असते तर काय झाले असते विचार करा, आपल्याला त्यांच्या शरीराचे तुकडेच सापडले असते हे नक्की, एवढा लोकांमध्ये प्रचंड संताप होता व ही प्रतिक्रिया चूक किंवा बरोबर याचा निवाडा मी करू शकत नाही, तरीही अशाप्रकारचे वर्तन नियंत्रित करणे आवश्यक आहे, नाहीतर लवकरच संपूर्ण देशभर, अगदी लहानसहान मुद्द्यांवरून अशाप्रकारचा उद्रेक दिसून येईल, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. अतिशय रोचक बाब म्हणजे, या सगळ्या घडामोडींनंतर आपल्या राजधानीमध्ये न्यायिक सुधारणांसाठी एक बैठक सुरू आहे, ज्यामध्ये न्यायव्यवस्थेतील सर्व उच्च अधिकारी व आपले लोकप्रतिनिधी सहभागी आहेत. आपण न्यायदान यंत्रणेकडे गांभिर्याने का लक्ष देत नाही हे मला समजत नाही, ज्याद्वारे गुन्ह्याविरुद्ध कायद्याच्या अंमलबजावणीची खात्री केली जाईल व दुसरे म्हणजे वेळच्या वेळी न्यायदान केले जाईल. सर्व राजकीय पक्ष, तसेच स्वयंसेवी संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते जे अशा घटनांनंतर आरडाओरड करतात व न्यायाची मागणी करतात तसेच अशा घटनांनंतर भ्रष्टाचारमुक्त सरकारची मागणी करतात, ते अशा घटना घडण्यापूर्वी काय करत होते? कोणत्या सत्ताधारी राजकीय पक्षाने किंवा विरोधी पक्षांनी कोणत्याही सरकारी रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या एकट्या-दुकट्या मुलींच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे तपासले किंवा मुलींच्या शाळांना भेट देऊन मुलींच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था आहे हे तपासले आहे किंवा विद्यार्थ्यांशी त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा भीती वाटते याविषयी चर्चा केली किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे उभारण्यात आला आहे तिथे भेट देण्यास, व तिथली परिस्थिती तपासण्यास व ती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूस देण्यास तुम्हाला कुणी मनाई केली आहे का, ज्यामुळे वरीलपैकी किमान एक घटना तरी टाळता आली असती, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

आपण खरेतर संधीसाधू आहोत व आपण प्रत्येक घटनेनंतर इतरांकडे बोट दाखवण्यात आनंद किंवा धन्यता मानतो कारण आपण एकप्रकारे थेट पीडित नसतो, हीच आपल्या समाजाची खरी समस्या आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीचा पुतळा पडणे स्वीकारार्ह नाही, परंतु चिंतेची बाब म्हणजे दैनंदिन जीवनातील ज्या मूल्यांसाठी आपण महाराजांना पूजतो ती आपल्यापैकी बहुतेकांनी (प्रामुख्याने आपले नेते) धाब्यावर बसवली आहेत  कारण व त्याविषयी कुणीही एक चकार शब्द बोलत नाही. शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांनी स्वतःच्या मुलालाही सामान्य माणसाविरुद्ध (कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, असे इतिहासात नमूद करण्यात आले आहे) गैरवर्तन केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा दिली होती व इथे आपले शासनकर्ते (म्हणजे सर्व पक्षांमधील) काय करतात तर त्यांच्या सैनिकांना (म्हणजे कार्यकर्त्यांना) सामान्य जनतेला सगळ्या प्रकारे त्रास होईल अशा प्रकारे वागण्याची परवानगी देतात, मग तो वाहतुकीचा खोळंबा करणारा एखादा मोर्चा असो किंवा कुणाच्याही जयंतीला किंवा पुण्यतिथीला स्पीकरच्या भिंती लावून डीजे वाजवणे असो, किंवा प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्यांनी शासनकर्त्यांच्या चुकीच्या आदेशांचे पालन करण्यास नकार दिल्यामुळे खोट्यानाट्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकवून त्यांची बदली करणे असो, शिवाजी महाराजांनी अशा प्रकारच्या वर्तनाला परवानगी दिली असती का, असा प्रश्न आपल्या नेत्यांना विचारा. लोकहो, पुतळ्याच्या स्थापनेनंतर अवघ्या आठ महिन्यात तो पडणे ही चुकीची गोष्ट आहे, परंतु आपण अशा घटनांसाठी शासनकर्त्यांकडून माफीची मागणी करू शकतो तर आपण बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये काही अभिनेत्रींविरुद्ध गैरवर्तनाच्या प्रकरणामध्ये संबंधित प्रत्येकाकडून व इतरांकडून माफीची मागणी का करत नाही, आणि आपण या सगळ्या चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी काय करत आहोत, हाच प्रश्न शिवाजी महाराजांनी ते आज असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला विचारला असता, हे लक्षात ठेवा; एवढे बोलून निरोप घेतो…!  



संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com 







No comments:

Post a Comment