राज्य विधानसभा निकाल आणि टीम इंडिया(क्रिकेट)!
“जेव्हा पराभव होतो, तेव्हा तूमची तयारी चोख नव्हती हा निर्णय स्वीकारा, परत तयार व्हा, तुमच्या इच्छित उद्दिष्टाच्या दिशेने पुन्हा एकदा प्रवास सुरू करा.”
― नेपोलियन हिल.
“आयुष्य जगायचे असते, नियंत्रित करायचे नसते; तसेच एखादा पराभव झाल्यानंतर खेळणे सुरू ठेवून खेळ जिंकायचा असतो.”
― राल्फ एलिसन.
नेपोलियन हिल व राल्फ एलिसन, हे दोघेही सुप्रसिद्ध अमेरिकी लेखक आहेत व ते दोघेही वेगळ्या कालखंडातील आहेत व त्यांच्यात जवळपास सहा दशकांचे अंतर असले तरीही त्यांनी आयुष्याविषयी तसेच पराभवाविषयी जे काही लिहीले आहे ते माझ्या लेखासाठी इतके चपखल आहे की मला त्यातले कुठले अवतरण वापरावे हे ठरवणे अवघड होते, त्यामुळे मी दोन्ही अवतरणे वापरली. शीर्षकामध्ये सुचविण्यात आल्याप्रमाणे, मतांच्या त्सुनामीनंतर (हे माझे नव्हे राजकीय नेत्यांचे शब्द आहेत) राज्यामध्ये (महाराष्ट्र, दुसरे कुठले) आज सकाळी, म्हणजे मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक लोक अजूनही निकालांच्या परिणामांच्या धक्क्यातून सावरायचे आहेत. महायुतीचे लोक आश्चर्याच्या गोड धक्क्यातून व महाविकास आघाडीचे लोक आश्चर्याच्या कटू धक्क्यातून सावरायचे आहेत व सामान्य माणूस मतांच्या शक्तीची जाणीव होऊन स्मित हास्य करत असला पाहिजे. हे तुम्ही समजू शकता कारण विधानसभा निवडणुका या काही दररोज होत नाही परंतु त्याचा भारतीय संघाशी (म्हणजे क्रिक्रेट संघाशी) काय संबंध आहे असा अनेक लोक विचार करत असतील, परंतु त्याआधी काही गोष्टी स्पष्ट करतो. महायुती म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांची युती ज्याचे नेते किंवा कप्तान श्री. देवेंद्र फडणवीस होते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश होतो. राज्यात नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध सत्तेसाठी लढत होते. त्याचवेळी भारतीय संघाने त्यांच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात जसप्रित बुमराच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना खेळायला सुरुवात केली व हे दोन्ही संघ म्हणजेच महायुती व भारतीय संघ (आत्तापर्यंत) विजेते ठरले आहेत, तसेच त्यांच्यामध्ये बऱ्याच समान गोष्टीही आहेत ज्यातून आपल्यासाठी शिकण्यासारखे बरेच काही आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
ही समानता फक्त कप्तानाच्या म्हणजेच देवेंद्र व जसप्रित यांच्या भूमिकेपुरतीच किंवा त्यांच्या सदय परिस्थितीपुरतीच मर्यादित नाही तर या दोन्ही संघांची सामना सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती, तसेच मनस्थितीमध्येही साम्य होते, जे अभ्यासण्यासारखे (व अंगिकारण्यासारखे) आहे हा माझ्या लेखाचा विषय आहे. सर्वप्रथम भारतीय संघाविषयी, आपण सगळे जण जाणतो की नुकताच झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंड सारख्या त्याच्याहून कमकुवत संघाने मायदेशातच सपशेल पराभव केला, जो अतिशय जिव्हारी लागणारा होता. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासारख्या अधिक सशक्त, व्यावसायिक व कठीण प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळण्यासाठी त्यांच्या देशात चालला होता. ज्येष्ठ खेळाडूंच्या संघातील स्थानाविषयी शंका घेतली जात होती, अगदी कप्तानाचा फॉर्मही खराब होता व अचानक तुमच्यावर उप कप्तानपदावरून कप्तानपदाची जबाबदारी येते व संपूर्ण संघ तुमच्याकडे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नेतृत्व म्हणून आशेने पाहात असतो. मालिकेच्या पहिल्या डावामध्ये तुमचा संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी अतिशय कमी धावसंख्येवर पूर्णपणे गारद होतो व ज्याप्रमाणे गिधाडे युद्धभूमीवर थकलेल्या योद्ध्याच्या डोक्यावर घिरट्या घालू लागतात त्याप्रमाणे टिकाकारही गालतल्या गालात हसत असतात. परंतु कप्तान म्हणून तुम्ही जबाबदारी घेता व संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघाला गारद करता ज्यामध्ये तुमचे पाच विकेटचे योगदान असते. अशाप्रकारे तुम्ही संघाचे नेतृत्व केल्यानंतर, संघही प्रतिसाद देतो व अचानक ऑस्ट्रेलियाचा संघ पिछाडीवर जातो व त्यांचा खेळ बचावात्मक होतो, जे अलिकडच्या काळामध्ये भेट देणारा कोणताही संघ त्यांच्या बाबतीत करू शकला नव्हता. सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन दिवस असले तरीही जसप्रित व त्याच्या संघाने मालिकेच्या पहिल्या तीन दिवसाच जी कामगिरी केली ती त्यांच्या धाडसासाठी व आधीच्या पराभवांवर मात करण्यासाठी लक्षात ठेवली जाईल. दुपारच्या जेवणाच्या मध्यंतराच्या वेळी फलंदाज चेतेश्वर पुजारा भारतीय संघाच्या कामगिरीविषयी त्याचे मत व्यक्त करत होता, की तुम्ही आहे तो क्षण भरभरून जगलात व तुमच्या भूतकाळाला तुमच्यावर वरचढ होऊ दिले नाहीत (म्हणजेच निराश झाला नाहीत) तसेच तसेच भविष्यकाळासोबत वाहावत गेला नाहीत, म्हणजेच आहेत त्या क्षणात राहिलात तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकता. मला असे वाटते की पुजाराने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या यशाचे त्याच्या शब्दात अतिशय योग्य वर्णन केले व देवेंद्र व त्यांच्या महायुतीच्या संघाने राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्येही नेमके हेच केले. (हा लेख तुम्ही वाचेपर्यंत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सर्वात मोठा विजय मिळविला आहे, पहिल्याच टेस्टमध्ये.)
क्रिकेटपासून राजकारणापर्यंत, एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो की मी काही कुणी राजकीय विश्लेषक नाही, तसेच मला ते समजतही नाही अथवा मी कधीही तसा प्रयत्नही केलेला नाही. परंतु आपल्या देशामध्ये कुणीही तीन गोष्टींविषयी अतिशय अधिकाराने बोलू शकते (म्हणजे बोलतातच) ते म्हणजे चित्रपट, क्रिकेट व राजकारण, त्यामुळेच माझी कोणतीही टिप्पणी मूर्खपणाची वाटली तर मला माफ करा. दुसरी गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती म्हणजे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा चाहता नाही/त्यास पाठिंबा देत नाही (अगदी स्वतला “सर्वात वेगळ्या म्हणून घेण्याचा पक्षालाही” नाही) परंतु मी या निवडणुकीतील घडामोडींचा मागोवा घेतला व त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला. अनेक जण म्हणतात की राजकारणाचा खेळ अतिशय वाईट आहे व त्यातून काय चांगले निष्पन्न होईल, माझे त्यावरील उत्तर असे आहे की, हे आपल्या पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या समुद्र मंथनासारखे (कृपया गूगल करा) आहे, ज्यातून विष बाहेर पडले तसेच अमतृही (जे प्राशन केल्यामुळे तुम्ही अमर होता), आता काय प्राशन करायचे हे आपल्यावर अवलंबून आहे, बरोबर? भारतीय संघाप्रमाणेच, महायुतीचा संघही राज्यातील विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना जखमी होता/अपमानित होता, महाविकास आघाडीमुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकित पराभवाचा मोठा फटका बसलेला होता, तसेच समाजातील सर्वच आघाड्यांवर त्यांची अशीच परिस्थिती होती. तरीही जनतेने महायुतीला भरभरून मते दिली जी आत्तापर्यंतची सर्वाधिक मते होती. परंतु हे सगळे पाच महिन्यांचा कालावधीमध्ये कसे शक्य झाले, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो की आपला पराभव होतो व तो इतका जिव्हारी लागणारा असतो की आपल्याला सगळे काही सोडून द्यावेसे वाटते. आपल्याला लक्ष्य केले जाते, आपली कोंडी केली जाते, आपल्याला अतिशय एकटे वाटते व तरीही आपल्या पुढील लढाई लढायची असते, एखाद्या व्यक्तीने अशा वेळी काय केले पाहिजे? तर त्यासाठी भारतीय संघाकडे व महायुतीच्या संघाकडे पाहा. जसप्रित व देवेंद्र यांनी काय केले ते पाहा, कोण जाणे तुम्हीही प्रवाहाची दिशा वळवू शकाल; माझा लेख या दोन्ही घटनांच्या याच पैलू संदर्भात आहे.
मला माहिती आहे या देशामध्ये तुम्ही कितीही खडतर प्रयत्न केले तरी दोन गोष्टी नेहमी तुमच्या विरुद्ध जातात व मला त्याविरुद्ध काहीही तक्रार नाही कारण आपली सामाजिक परिस्थिती; एक म्हणजे तथाकथित उच्च जातीत जन्माला येणे, मी काहींना दुखावले असल्यास मला माफ करा. जसे की जन्माने कोणी ब्राह्मण असणे व त्यात त्याची काही चूकही नाही किंवा त्याला त्याचा गर्वही नाही ती जात जन्माने त्या व्यक्तीला मिळाली आहे, तीचा त्यात काहीही हात किंवा कर्तुत्व नाही, आणि जाती माणसांनी तयार केल्यात आणि माणसेच एखादी जात वाईट का चांगली स्वताच्या सोयीनुसार ठरवितात! दुसरे म्हणजे, इतरांच्या तुलनेत श्रीमंत असणे, तुम्ही तो पैसे कितीही वैध प्रकारे कमवला असला तरीही तुमच्याशी काहीतरी भेदभाव केला जाईल किंवा तुटकपणे वागले जाईल कारण आपल्या समाजामध्ये पैसा कमवणे हे निषिद्ध मानले गेले आहे. यातील सधन असण्याचा भाग बाजूला ठेवू परंतु देवेंद्र यांना उच्च जातीय असल्यामुळे सुद्धा लक्ष्य करण्यात आले त्याचवेळी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनण्याच्या उतावीळपणामुळे (मी पुन्हा येईन) त्यांच्यावर तो शिक्का बसला. अशा शिक्का पुसणे व उत्तम कामगिरी करून दाखवणे प्रचंड अवघड असते, तरीही देवेंद्र यांनी ते करून दाखवले. त्यासाठी त्यांनी जो मार्ग अवलंबला त्यातूनही बरेच शिकण्यासारखे आहे, ते शांत राहिले, मूलभूत गोष्टींवर भर दिला, प्रसिद्धीचा झोत टाळला, त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर होणाऱ्या विविध हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कधीही वाद घातले नाहीत, परंतु त्यांनी कधीही आपल्या विचारांचा लढा सोडले नाही किंवा स्वतः निश्चित केलेल्या उद्दिष्टावरून म्हणजे व्यक्ती म्हणून नव्हे तर पक्ष (संघ) म्हणून पुन्हा सत्तेत येण्यावरून आपली नजर हटू दिली नाही. काहीवेळा त्यांच्यातही हरण्याची किंवा वैतागल्याची लक्षणे दिसून आली, परंतु ते देखील एक माणूस असल्याच लक्षण आहे. लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर त्याच्या कारणांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे व्यवस्थापन केले, विरोधकांना लक्ष्य केले नाही. एक लक्षात ठेवा, क्रिकेटचा खेळ असो किंवा निवडणूक तुम्ही विरोधकांच्या चुकांवर लक्ष केंद्रित करून जिंकू शकत नाही तर तुम्ही तुमच्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करून जिंकू शकता व देवेंद्र व महायुतीने व बुमराच्या संघाने तेच केले व याची निष्पत्ती म्हणजे विजय. काही घटक असे असतील ज्यामुळे नशीबाची साथ मिळाली उदा. लाडकी बहीण योजना (कृपया गूगल करा), परंतु तुम्हाला असे वाटते का की यामुळे दहा कोटींहून अधिक लोक केवळ सहा महिन्यांचा कालावधीमध्ये त्यांचे मत एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलतील, तर त्याचे उत्तर नाही असे असेल. याचे खरे उत्तर आहे, महायुती वास्तवात जगायला व आधीच्या पराभवाची पाळेमुळे शोधण्यास शिकली व त्यामुळे ते जनतेच्या समस्या जाणतात व त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतील हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले, त्यांनी केवळ विरोधक कुचकामी असल्याबद्दल टिकेची झोड उठवली नाही.
कोणताही खेळ खेळणाऱ्या प्रत्येक संघाला अनुकूल परिस्थितीचा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेता आला पाहिजे. केंद्रातील सरकार महायुतीच्या बाजूने आहे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती, आता राज्यात तुमचीच सत्ता आल्यामुळेही ती महत्त्वाची बाब ठरणार आहे व हे समजण्याइतपत लोक हुशार आहेत. तुम्ही वाघाची कातडी पांघरू शकता व तुम्ही वाघ आहात असा विश्वास लोकांना करून देऊ शकता परंतु तुम्हाला किमान एकदा डरकाळीही फोडावी लागेल व त्यावेळी तुम्ही त्यांना मूर्ख बनवू शकणार नाही. मी कुठल्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या अनुषंगाने हे उदाहरण दिलेले नाही, तर लोकांना समजावे म्हणून दिले आहे. आपल्याला जेवढा वाटतो तेवढा सामान्य माणूस मूर्ख नसतो. जर राज्य सरकारने सूर्य व चंद्रावर स्वारी करण्याची खात्री दिली तर तेथे अवकाशयान पोहोचण्यासाठी इंधनाची गरज लागेल व ते इंधन केंद्र सरकार देऊ शकते, हे लोकांना समजते व लोकांना हे समजवण्यात देवेंद्र यशस्वी ठरले, हा देखील या यशाचा एक महत्त्वाचा पैलू आहे व त्यासाठी लक्ष केंद्रित करणे तसेच संयम आवश्यक आहे. महाविकास आघाडीने निवडणुकांमध्ये काही मतदान यंत्रे किंवा पैशांच्या घटकाला दोष देण्याऐवजी हे शिकण्यासारखे आहे कारण दोन्ही बाजूंचे अनुभवी, ज्येष्ठ व शक्तिशाली (सर्वार्थाने) उमेदवार पराभूत झाले आहेत, जे निवडणुकीच्या असल्या खेळामध्ये निष्णात होते, या तथ्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. साधे तथ्य असे आहे की आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल तर आपण ते का शिकणार आहोत आधी हे आपण विचारले पाहिजे, आपण त्या खेळानुसार स्वतः अनुकूल केले पाहिजे व त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे केवळ त्यानंतरच त्याला शिकणे असे म्हणता येईल, नाहीतर ती केवळ घोकंपट्टी ठरेल. देवेंद्र यांनी पराभवाचा अभ्यास केला व त्यातून धडा घेतला, हा माझ्या लेखाचा विषय आहे. थोडक्यात, महायुतीचा संघ भूतकाळ विसरून, वर्तमानकाळात जगला व नजर भविष्यकाळावर ठेवली, तर महाविकास आघाडी आधीच्या यशावर विसंबून, भविष्याची स्वप्ने पाहात राहिली!
थोडक्यात सांगायचे तर कोणतीही निवडणूक किंवा खेळ हा शेवटचा नसतो परंतु आपल्याला जर जास्त वेळ टिकून राहायचे असेल तर आपण प्रत्येक खेळातून, काही वेळा पराभवातून शिकले पाहिजे. एवढे दणदणीत यश, पराभूत होणाऱ्यापेक्षाही विजेत्यासाठी अतिशय धोकादायक असते कारण त्यामुळे तुम्हाला कदाचित तुम्ही पराभूतच होऊ शकत नाही असे तुम्हाला वाटू शकते व नेमकी हीच तुमच्या पराभवाची पहिली पायरी असते. त्याचवेळी विसरू नका की मोठ्या विजयासोबत मोठ्या अपेक्षाही येतात (स्टॅन ली माफ कर) व मला खात्री आहे की देवेंद्र तसेच बुमरा यांच्या संघांना याची नक्कीच जाणीव आहे व त्याविषयी विचार करण्यास तसेच माझ्या तरुण पिढीपर्यंत तसेच कर्मचारी संघापर्यंत पोहोचवण्यास भाग पाडल्याबद्दल या दोघांचेही आभार. जर देवेंद्र किंवा इतर कुणीही नेता हे वाचत असेल (मला शंका आहे), निवडून आलेल्यापैकी एकाही उमेदवाराने त्याच्या/तिच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण दिवसभर डीजे/डॉल्बी/ध्वनीक्षेपक लावू नका व तुमच्या मतदारांचे आयुष्य आणखी त्रासदायक करू नका असे आवाहन करण्याचा किंवा इशारा देण्याचा विचार केला नाही किंवा संवेदनशीलता दाखवली नाही. यश साजरे करण्याचे इतरही अनेक चांगले मार्ग आहेत, त्यांचा वापर करून पाहा व पुढील वेळी त्यामुळे काही अधिक मते मिळतील, एवढे सांगून व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निरोप घेतो. असो, जाताजाता, भल्या पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा प्रयोग देवेंद्र यांच्या अंगलट आला होता ती तारीखही २३/११ च होती, त्यानंतर काही वर्षातच याच तारखेला त्यांनी विरोधकांना पराभूत करताना सर्व विक्रम मोडले हा केवळ योगायोग म्हणावा किंवा नियती, हे येणारा काळच ठरवेल!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in
No comments:
Post a Comment