Saturday 7 August 2021

गुन्हे,लॉकडाउन,सुरक्षा व घर!

 


































































 

"गुन्हेगारीचा संबंध बराचसा अर्थकारणाशी असतो- जर लोकांना पुरेसे काम असेल, त्यांच्याकडे स्वतःचे घर

असेल घर चालवायला योग्य आर्थिक पाठबळ असेल, तर मला असे वाटते की तुम्ही समाजातील

 गुन्हेगारी प्रवृत्तीचा दर नक्कीच कमी करू शकता"... विन्सेट फ्रँक

"आयुष्याची जगण्याची, उद्दिष्टे सरळ आहेत: मनःशांती सुरक्षितता"... जुडी रेल

मी या लेखाची सुरुवात करण्यासाठी दोन अवतरणे निवडली कारण या विषयामध्ये दोन किंवा तीन मुद्यांचा समावेश होतो माझ्या शेजारी अलिकडेच (खरेतर पुन्हा एकदा) घडलेली घटना त्याला कारणीभूत होती. माझे कार्यालय ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये घुसून पहिल्या मजल्यावरील घर फोडण्याचा प्रयत्न झाला, या इमारतीमध्ये वरील सर्व मजल्यांवर रहिवासी सदनिका आहेत. गेल्या वर्षभरातील ही अशाप्रकारची दुसरी घटना आहे, दुर्दैवाने मागील प्रयत्नामध्ये इमारतीमधील  एका रहिवाशाला चोरीमुळे मोठा आर्थिक फटका बसला होता, यावेळी मात्र चोरांना इमारतीच्या प्रवेश लॉबीतूनच पळून जावे लागले (सुदैवाने). तुम्ही कदाचित म्हणाल की या शहरात रोजच कुठले ना कुठले अपार्टमेंट, कार्यालय किंवा दुकान फोडले जाते लोकांना आपल्या मौल्यवान वस्तू गमवाव्या लागतात, या घटनेत काय एवढे मोठेसे, तर मी तुम्हाला दोष देणार नाहीआपण केवळ एखाद्या घरफोडीच्या बाबतीतच नाही तर आपल्याभोवती होत असलेल्या प्रत्येक वाईट/दुःखद घटनेचे आपल्या काहीच वाटेनासे होऊ लागले आहे, आपण त्यांना सरावले आहोत (किंवा खरेतर निर्लज्ज झालो आहोत) किंवा निष्काळजी झालो आहोत, कारण अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतरही त्या विसरून आपले आयुष्य नेहमीसारखेच सुरू राहते. यावरून मला जंगलात राहणाऱ्या हरिणांच्या एका कळपाची गोष्ट आठवते. जेथे वाघ किंवा बिबट्या किंवा रानटी कुत्री यासारखे शिकारी प्राणी हरिणाच्या कळपातील एकेका हरिणाची रोज शिकार करत असतात. मात्र मृत हरिणाला मागे टाकून काही वेळाने हा कळप निघून पुढे जातो हा नित्यक्रम सुरूच राहतोमात्र हे निसर्गात घडते वाघाच्या शारीरिक क्षमतेशी तुलना करता हरिण हतबल असते ते वाघांचे नैसर्गिक खाद्य आहे. आपण मात्र माणसे आहोत इतर माणसे जे गुन्हे करतात ते खपवून घेतो, त्याविरुद्ध काहीही पावले उचलत नाही म्हणूनच चोरीची आणखी एक घटना म्हणून ह्याकडे  दुर्लक्ष करून चालणार नाही.

वर्तमान काळात या गुन्ह्यांना आणखी एक पैलू आहे आपल्याला मनःशांती सुरक्षितपणाच्या (जुडी यांनी म्हटल्याप्रमाणे) भावनेने शांतपणे जगायचे असेल तर आपण हा पैलू समजून घेतला पाहिजे, तरच आपण त्यावर अधिक योग्यप्रकारे कारवाई करू शकू किंवा गुन्ह्यांना अधिक चांगल्याप्रकारे तोंड देऊ शकू. हा पैलू म्हणजे लॉकडाउन, वर्षाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या या लॉकडाउनने (चूक किंवा बरोबर, का कशासाठी असा निवाडा मी करत नाहीये) माणसाला जगण्यासाठी टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले आहे जगण्यासाठी निवडलेला एक मार्ग म्हणजे गुन्हेगारी. परत हे योग्य किंवा अयोग्य, हे सांगण्याचा मला अधिकार नाही, मात्र देशभरात सगळीकडे गुन्हेगारी दर वाढला आहे. तुम्ही महानगराच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या शहरामध्ये राहात असता ज्याची लोकसंख्या पन्नास लाखांहून अधिक आहे, तेव्हा तुम्हाला सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना तोंड द्यायला लागण्याची शक्यता असते हा साधा तर्क आहे.

तर आमच्या सोसायटीतील घटनेविषयी सांगतो, पहिल्या वेळी एका सदनिकेमध्ये रात्री साधारण - च्या सुमाराला घरफोडी झाली. एकुलता एक वॉचमन गायब होता (झोपलेला होता) प्रवेशाचा पोलादी (एमएस) सुरक्षा दरवाजा उघडा होता, प्रवेश लॉबीतील सीसी टीव्ही मॉनिटर चोरांनीच मोडला होता, कॅमेरा सुरू नव्हता कारण त्याची बॅटरी संपलेली होती त्याच्या देखभालीसाठी कोणतेही कंत्राट दिलेले नव्हते, त्यामुळे ह्या सर्वांची दृश्ये उपलब्ध नव्हती. यावेळी चोरीचा प्रयत्न पहाटे वाजता झाला, ही खरोखरच धाडसी कृती होती कारण दिवसाची सुरुवात जवळपास झालेली असते, अशावेळी, दूधवाला, वर्तमानपत्र विक्रेते किंवा कचरा गोळा करणारे हिंडत असतात, यावरून चोरांच्या धाडसाची किंवा ते किती हातघाईला आले असावेत याची कल्पना येते. इमारतीच्या प्रवेश लॉबीचा लोखंडी सुरक्षा दरवाजा बाहेरून लावलेला होता, यावेळी दोन वॉचमन होते मात्र ते तिथे नव्हते (म्हणजे झोपलेले होते) अर्थात एक इमारतीच्या मुख्य दरवाजापाशी पाहारा देत होता दुसरा बाथरूमला गेला होता असा ते दावा करतात (ढळढळीत खोटे असणारा). प्रवेश लॉबीतील तसेच इमारतीच्या भोवतालच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या घटनेची दृश्ये चित्रित केली आहेत, अर्थात चोरांनी त्यांचे चेहरे मास्कने झाकलेले होते (मास्क आता अधिकृतपणे वापरता येतात). सुरक्षा दरवाजाच्या कुलुपाची पट्टी एका चोराने धातूच्या करवतीने काही मिनिटातच कापून काढली होती, मी स्वतः पाहिले नाही परंतु त्यासाठी ऍसिड पण वापरण्यात आले असावे असा माझा कयास आहे. दोन चोर प्रवेश कक्षात येताना दिसत होते, सुदैवाने तेव्हाच कचरा घेऊन जाणारा माणूस टेंपो घेऊन आला बाहेरील कॅमेऱ्यात चार चेहरा झाकलेली माणसे पळून जात असल्याचे चित्रित झाले इमारतीच्या एका कोपऱ्यातून उडी मारून ते बाहेर पडले ज्याच्या बाजूलाच नाला होता. हा संपूर्ण घटनाक्रम दहा मिनिटांपेक्षा जास्त नसेल परंतु ही दृश्ये पाहून रहिवासी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. मी त्यांना दोष देत नाही कारण भर वस्तीत चार लोक भल्या पहाटे चोरीच्या हेतूने थेट तुमच्या इमारतीत घुसतात पळून सुद्धा जातात तुम्ही त्याबाबत काहीच करू शकत नाही, या विचाराने अगदी कणखर मनाची व्यक्तीही अस्वस्थ होऊ शकते.

इथेच हरिण माणसांमधील फरक संपतो (संपला पाहिजे) कारण हरिण त्यांच्यापैकी एकाची वाघ शिकार करता असताना असहाय्यपणे पाहात राहिले, मात्र आपण माणसे आहोत आपण प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा आपण मूर्ख आहोत कारण हरिणे किमान सावध तरी राहतात. या घटनेचे विश्लेषण करताना एक गोष्ट जाणवते आहे की चोरीच्या मागील घटनेच्या तुलनेत यावेळी परिस्थितीत सुधारणा होती, काही गोष्टी नक्कीच सुधारलेल्या होत्या उदाहरणार्थ प्रवेश लॉबीला कुलूप होते, सीसी टीव्ही सुरू होता एकाऐवजी दोन वॉचमन होते

मात्र त्रुटी होत्याच, कुलूप सुरक्षा दरवाज्याच्या आतील बाजूने लावायला हवे होते, एक वॉचमन प्रवेश लॉबीच्या आतमध्ये असायला हवा होता, त्याला पाहून त्या चार माणसांनी कुलूप तोडायचा विचारही केला नसता. वॉचमन नक्कीच कुठेतरी झोपले होते कारण या दृश्यांमध्ये कुठेही ते दिसत नाहीत, म्हणजेच सोसायटीतल लोकांनी वॉचमन नेमका काय करतोय हे तपासले नव्हते.

मित्रांनो, अशाप्रकारे चोरीचा प्रयत्न कुठेही अगदी तुमच्या सोसायटीमध्येही होऊ शकतो कारण या चोरांच्या टोळ्या व्यावसायिक असतात (बहुतेकवेळा) अशाप्रकारे कोणताही प्रयत्न करण्यापूर्वी ते व्यवस्थित अभ्यास करून घेतात. टेहळणीनंतर त्यांच्या असे लक्षात आले की सोसायटीमध्ये चोख सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर ते अशाप्रकारे सोसायटीत घुसण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. कारण ते जगण्यासाठी चोरी करताहेत त्यांची पडकले जाण्याची इच्छा नक्कीच नसेल. लॉकडाउनच्या परिणामामुळे बहुतेक वर्गांचे विशेषतः कष्टकरी वर्गाचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले आहे. त्यामुळे यापुढेही असे घरफोडीचे प्रयत्न झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, त्यासाठी आपण सज्ज असणे हाच एकमेव मार्ग आहे!

म्हणूनच मी प्रत्येक सोसायटीने सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी काही मुद्दे काढले आहेत, तुम्ही तुमच्या इमारतीची परिस्थिती किंवा गरजांनुसार त्यामध्ये समावेश करू शकता...

*संकुलाची सुरक्षा सुरक्षिततेसाठी एक समिती तयार करा. समितीला सध्याच्या सुरक्षा उपाययोजना, त्रुटी आवश्यक सुधारणा याविषयी एक तपशीलवार टिपण तयार करायला सांगा.

* घाबरून जाऊ नका चोरीसारख्या या घटना अपघाताने होत नाहीत, शांतपणे विचार करा, सावध राहा, निष्काळजीपणा करू नका.

*तुमच्या सोसायटीमधील सुरक्षा उपाययोजनांसाठी बांधकाम व्यावसायिकाला दोष देऊ नका कारण त्याने तुम्हाला घर बांधून दिले आहे, तुरूंग नाही. तसेच बांधकाम व्यावसायिक एकदाच इमारत बांधून ताबा देतो पण, गुन्हेगार मात्र विविध शकला लढवत असतात. म्हणूनच अजून काय करता येईल याचा विचार करा कारण शेवटी चोरी तुमच्या घरात होऊ शकते, तुमच्या बांधकाम व्यावसायिकाच्या नाही!

*ही सोसायटीची बाब आहे म्हणजेच सामाईक भाग आहे असा विचार करून तुमच्या इमारतीच्या सुरक्षिततेशी कधीही तडजोड करू नका. तुम्ही कोणतीही कार कितीही चकचकीत असली तरीही सुरक्षा एअर बॅगशिवाय ती खरेदी कराल का, नाही ना, तर मग सोसायटीच्या सुरक्षा उपययोजनांवर खर्च करताना एवढा विचार का करता?

*केवळ तंत्रज्ञान नव्हे तर तर्क वापरा उदाहरणार्थ सीसी टीव्ही आवश्यकच आहे मात्र त्याचा उपयोग वाईट घटना होऊन गेल्यावर होतो त्यालाही मर्यादा आहेत उदाहरणार्थ चोरांनी मास्क घातले असतील किंवा कॅमेऱ्यांची मोडतोड केली असेल तर कॅमेरा फुटेजचा उपयोग नाही. कॅमेरे व्यवस्थित लपवले पाहिजेत म्हणजे चोर त्यांची दिशा बदलू शकत नाहीत किंवा त्यांची मोडतोड करू शकत नाहीत.

*चांगल्या दर्जाचे, इन्फ्रारेड सीसीटीव्ही कॅमेरे वापरा ज्यामुळे चेहरा, चेहऱ्यावरील खुणा किंवा व्यक्तीची चालण्याची शैली तसेच वाहनांच्या नंबर प्लेट यासारखे तपशील दिसू शकतील. यामुळे गुन्हा घडून गेल्यानंतर फुटेजवरून गुन्हेगारांचा पोलीसांना शोध लावणे अधिक सोपे जाते. त्याचप्रमाणे दररोज काही फुटेज तपासा म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्याची दिशा चुकीची असेल किंवा रेकॉर्डिंगमध्ये काही चूक होत असेल तर ती समजेल.

*व्यवस्थित बोल्टिंग कुलुप यंत्रणा असलेला लोखंडी सुरक्षा दरवाजा अत्यावश्यक आहे कारण त्यामुळे चोरीचे बहुतेक प्रयत्न फसतात. मी राहतो त्या अपार्टमेंटमध्ये आम्ही साधारण पंधरा वर्षांपूर्वी लोखंडी ग्रील्ड प्रवेश दरवाजा बसवला त्याला आतून कुलूप लावायची व्यवस्था असून रात्री प्रवेशद्वारापाशी वॉचमन असतो. गेल्या पंधरा वर्षांमध्ये घरफोडीचा एकही प्रयत्न झालेला नाही. बिल्डींगच्या मुख्य प्रवेश लॉबीला कुलूप लावण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळा.

*एका किंवा अनेक इमारतींची अपार्टमेंट असली तरीही, संकुलामध्ये तसेच प्रत्येक इमारतीमध्ये येण्याचा जाण्याचा मार्ग एकच असावा यामुळे इमारतीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हालचालींवर नियंत्रण राहते. बांधकाम व्यावसायिकांनी वास्तुविशारदांनीही इमारतीचे नियोजन करताना हा मुद्दा लक्षात ठेवावा. जर बांधकाम व्यावसायिकाने असा विचार केला नसेल, तर मी सोसायट्यांना सल्ला देईन की त्यांनी इतर सर्व प्रवेश बंद करून प्रवेशासाठी बाहेर जाण्यासाठी केवळ एकच मार्ग ठेवावा.

*सुरक्षा सेवेच्या बाबतीत पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू नका, मध्यम वयाचे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त कुटुंब असलेले वॉचमन ठेवा कारण अशा व्यक्ती स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाचीही काळजी करतात. त्यांना पुरेसा पगार द्या म्हणजे ते रात्री झोपणार नाहीत किंवा चार-पाच चोर घुसण्याचा प्रयत्न करत असल्यास लपून बसणार नाहीत. बहुतेक सोसायट्यांचे सदस्य उंची गाड्या खरेदी करतात, त्यांच्या सदनिकेची महागडी अंतर्गत सजावट करतात मात्र सर्वसाधारण बैठकीत सोसायटीच्या वॉचमनच्या पगारांवरून किंवा बोनसवरून वाद घालतात.

*वॉचमनला एखाद्याच्या घरात किराणा सामान पोहोचवणे किंवा सोसायटीच्या अध्यक्ष किंवा सचिवांच्या कार धुणे अशा कामांसाठी त्याच्या जागेवरून हलू देऊ नका.

*प्रवेश कक्षात तसेच चहू बाजूंनी इमारतीच्या मुख्यद्वाराशी सुद्धा सीसी टीव्ही कॅमेरे बसवा, बांधकाम व्यावसायिकाने असे केले नसेल तर त्यासाठी सोसायटीच्या खात्यातून खर्च करा.

* घरात सुद्धा  केवळ लोखंडी चौकटीत बसवलेला मजबूत  स्टीलचा सुरक्षा दरवाजाच बसवा (एखादे शोभेचे दार नाही), त्याला चांगल्या दर्जाचे लॅचचे कुलूप लावा. तुमच्या इंजिनिअर डिझायनरने लावून दिलेला शोभेचा सुरक्षा दरवाजा चोरांकडे असलेल्या साधनांपुढे टिकणार नाही.

*तुम्ही अगदी काही तासांसाठीही बाहेर जाणार असलात तरीही तुमच्या सदनिकेच्या सुरक्षा दरवाजाच्या कडी कोंड्याला कुलूप लावू नका, ते आतील मुख्य दरवाजाला लावा म्हणजे चोरांना कोणती सदनिका रिकामी आहे किंवा आत कुणीतरी आहे याचा अंदाज येणार नाही. अगदी काही दिवसांसाठीही बाहेर जाताना सदनिकेच्या दिवाणखोलीतील रस्त्याच्या कडेला असलेल्या बेडरूमचे काही दिवे सुरू ठेवा, वीज बिलाची काळजी करू नका.

*तुम्ही बाहेरगावी जाताना कधीही दूध किंवा वर्तमानपत्रावरील खर्च वाचवायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही संबंधित विक्रेत्याला या वस्तू देऊ नका म्हणून सांगितले तर ही एखाद्यासाठी अतिशय मोलाची माहिती ठरू शकते. त्यांना या वस्तू देऊ द्या तुमच्या शेजाऱ्यांना त्या ठेवून घेण्याची विनंती करा, त्यासाठी तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा.

*इंटरकॉम यंत्रणा हे एक प्रभावी साधन आहे, म्हणूनच प्रत्येक सदनिकेमध्ये, प्रवेश कक्षामध्ये तसेच सुरक्षा केबिनमध्ये इंटरकॉम असलाच पाहिजे. संबंधित सदनिकाधारकाने खात्री केल्याशिवाय कुणाही व्यक्तीला आत येण्याची परवानगी देऊ नका, एखाद्या देशामध्ये प्रवेश करताना ज्याप्रमाणे प्रवेशपत्राचे कडक निर्बंध असतात त्याप्रमाणे हे असले पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वहीमध्ये नोंद हवी त्यावर पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्वाक्षरी करावी.

*प्रवेश कक्ष, पार्किंग किंवा इमारतीच्या भोवतालचे दिवे बंद करून वीज बिलात बचत करण्याचा प्रयत्न करू नका, बांधकाम व्यावसायिक म्हणून सामाईक भागात भरपूर दिवे देऊनही अनेक सोसायट्यांमध्ये ताबा दिल्यानंतर असे प्रकार झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी इमारतीभोवती असलेल्या अशा अंधाऱ्या भागातच चोरांना सहजपणे लपता येते.

*सुरक्षा केबिनमध्ये इमारतीच्या प्रवेश कक्षात एक अलार्म बेल बसवा. तुम्ही शेजारच्या सोसायटीच्या सुरक्षा केबिनला ही अलार्म बेल जोडण्याचा विचार करू शकता, कारण एक वॉचमन तीन-चार लोकांना तोंड देऊ शकतो मात्र थोडा गोंगाट होऊन बाहेरून मदत मिळाल्यास अशावेळी नक्की मदत होऊ शकते. त्यासाठी शेजारच्या सोसायट्यांशीही सौहार्दाचे संबंध ठेवा.

*एखाद्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून किंवा तत्सम संस्थेकडून दरवर्षी सोसायटीचे सुरक्षा लेखापरीक्षण करून घ्या. सोसायटीच्या खर्चामध्ये सुरक्षेसाठी/सुरक्षाविषयक खर्चासाठी तरतूद करा.

*सर्व चालकांना, घरकाम करणाऱ्या बायकांना, तसेच सोसायटीमध्ये कामासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र द्या. सोसायटीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रहिवाशांच्या वाहनांना स्टिकर द्या. अशा सर्व व्यक्तींची ओळख दर्शविणारे कार्ड, छायाचित्र पुरावा कायमस्वरुपी पत्ता यासह द्या.

*स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी अनौपचारिकपणे संपर्कात राहा संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रत्येक मजल्यावरील लॉबीमध्ये दिसेल असे लावा तसेच तुमच्या सेल फोनमध्येही ठेवा.

*तुमच्याकडे विशेषतः रात्री आलेल्या माणसाची खात्री पटल्याशिवाय सदनिकेचा दरवाजा उघडू नका.

शेवटचा मुद्दा म्हणजे, कोणतीही सुरक्षा व्यवस्था अभेद्य नसते किंवा तुम्हाला कोणतीही चोरी होता जगता येईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. मात्र चोरीचा प्रयत्न झाल्यास तुमची सोसायटी त्यासाठी सज्ज आहे असा संदेश तरी चोरांच्या टोळीला दिला जाईल, जी कायम पाळत ठेवून असेल मात्र तुम्हीसुद्धा सावध असाल!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/08/crime-lockdown-security-home.html  

 

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 


No comments:

Post a Comment