“तुम्ही जेव्हा विनोदाला वास्तव मानत नाही व त्यांना
एखाद्या स्वप्नासारखे पाहता तेव्हाच
तुम्हाला हसवतात, नाहीतर ते वेदनादायक होतात. म्हणूनच मी नेहमी काल्पनिक जगात राहतो.”... साकेत ॲसर्टीव्ह.
आता हा साकेत नामक माणूस कोण आहे हे मी ओळखत नाही. मात्र हे अवतरण माझ्या वाचण्यात आले होते व मला ते अतिशय मजेशीर वाटले कारण विनोदाची एवढी भन्नाट व्याख्या मी तरी आत्तापर्यंत पाहिली नव्हती. आता विनोद म्हटला की आपण आपल्या प्रिय पुणे शहराला लांब कसे ठेवू शकू कारण पुणेकरांना सतत इतर शहरांविषयी, ठिकाणांविषयी किंवा लोकांविषयी विनोद करायला आवडते (समाज माध्यमांवर पाहा). तुमचा विश्वास बसत नसेल, तर त्याची काही उत्तम उदाहरणे देतो. आपल्या सगळ्यांना जगातली सात आश्चर्ये माहिती आहेत, त्यामध्ये आपल्या ताज महालाचाही समावेश होतो ज्याविषयी आपल्याला अभिमान वाटतो. मात्र जेव्हा विनोदाचीच आश्चर्ये होतात अशा वेळी काय होते, गोंधळलात? मी तुम्हाला दोष देत नाही, मात्र आपल्या प्रिय पुणे शहरामध्येही काही आश्चर्ये आहेत ज्यांचा अक्षरशः विनोद झाला आहे व मला असे का वाटते हे आता मी सांगणार आहे (या लेखाची ही प्रस्तावना वाचताना काही चिडलेले चेहरे मला दिसताहेत). आता मी जे म्हणालो की आश्चर्यांचे विनोद झाले आहेत तेव्हा त्याचा अर्थ काय हे सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. मला कुणाच्याही जखमेवर मीठ चोळायचे नाही, विशेषतः सरकारच्या कारण त्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या स्वरुपात या विनोदामध्ये समावेश होतो, तरीही ही आश्चर्ये विनोदाची बाब झाली आहेत हे कटु सत्य नाकारता येत नाही. ज्या हेतूने ही बांधकामे करण्यात आली (काही तर कधीच उभारण्यात आली नाहीत) व त्यापैकी काही आपणच बांधल्यानंतर पाडून टाकली, म्हणूनच ती आश्चर्यकारक विनोद ठरली (आश्चर्य व विनोद), मला माहितीय हा अतिशय वाईट विनोद आहे, पण हा माझा लेख असल्याने आपण आता पुढे जाऊ! (भाड्याने सायकली देणे, नागरिक मदत केंद्र, पीएमटी हे सुद्धा आणखी काही विनोद आहेत)
मी शहरातील सात आश्चर्यांची यादी देतोय जी विनोदाचा विषय झाली आहेत (इतरही अनेक आहेत मात्र मी केवळ सातच निवडली), ही आहेत एचसीएमटीआर (हाय कपॅसिटी मास ट्रान्सिट रूट), झेड-ब्रिज, सायकल ट्रॅक, बीआरटी, नदी काठाचा विकास, देशांतर्गत विमानतळ व रिंग रोड! आता या सात गोष्टींबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल तर तुम्हाला पुणेकर म्हणता येणार नाही, अर्थात मग तर तुम्ही हा लेख वाचून नक्कीच खदखदून हसू शकता ! ही सर्व पुणे शहरातील बांधकामांची, विकास कामांची किंवा पुणे शहराशी संबंधित धोरणांची नावे आहेत (कारण काही केवळ कागदावरील धोरणे बनूनच राहिली). मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की, केवळ यंत्रणेला दोष देणे हा या लेखाचा उद्देश नाही. पुण्याला खरोखर नागरिकांसाठी काही चांगल्या गोष्टींचे वरदान लाभले आहे, म्हणूनच संपूर्ण देशात हे शहर स्थायिक होण्याच्यादृष्टीने अतिशय लोकप्रिय आहे व जी यंत्रणा हे शहर चालवते तिचे या कामगिरीसाठी निश्चितच कौतुक केले पाहिजे. मात्र सर्वोत्तम कामगिरीसाठी तुम्ही केलेल्या अफलातून विनोदांचे (म्हणजेच अपयशांचे) विश्लेषण केले पाहिजे, केवळ चांगल्या गोष्टींचे विश्लेषण करून चालणार नाही, नाही का? म्हणूनच या शहराच्या विकासामध्ये झालेल्या काही अफलातून विनोदांचा विषय निवडला, चला तर मग त्याविषयी अधिक तपशीलाने जाणून घेऊ...
एचसीएमटीआर
म्हणजेच
हाय
कपॅसिटी
मास
ट्रान्सपोर्ट
रूट
साधारण
३०
वर्षांपूर्वी
शहराच्या
मध्यवर्ती
भागात
वाढत
चाललेल्या
वाहतुकीचा
विचार
करून
विकास
योजनांमध्ये
एका
संकल्पनेचा
समावेश
करण्यात
आला
की
शहरातील
रस्त्यांवर
या
वाहतुकीचा
भार
पडू
न
देता
ती
शहराच्या बाहेरून वळवायची. म्हणूनच
उन्नत
मार्ग
किंवा
ओव्हर ब्रिज किंवा सामान्य भाषेत सांगायचे तर उड्डाण पूलांचे नियोजन करण्यात आले जे शहराच्या एका टोकापासून सुरू होतील व शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत नेतील (त्यावेळी टोक म्हणजे पुणे महानगरपालिकेची त्यावेळेसची सीमा असा अर्थ होता). ज्या वाहनांना
शहरामध्ये
प्रवेश
करायची
गरज
नाही
ती
या
मार्गाचा
वापर
करतील
व
शहरातील
वाहतुकीमध्ये
अडथळा
न
आणता
या
जागेवरून
निघून
जातील,
भन्नाट
कल्पना
आहे
ना? (माफ
करा,
फार
उपहासात्मक
बोलतोय)
म्हणूनच
शहराच्या
विकास
योजनेमध्ये
३०
हून
अधिक
किलोमीटरच्या
उड्डाणपूलाचा
समावेश
करण्यात
आला.
मात्र
याला
तीस
वर्षे
होऊन
गेली
तरीही
त्यातील
एकही
मीटर
रस्ता
बांधला
गेलेला
नाही. यासाठी
अर्थसंकल्पातील
तरतूद,
तांत्रिक
व्यवहार्यता
व
इतरही
बरीच
कारणे
आहेत, म्हणूनच
मी
सात
अफलातून
विनोदांच्या
यादीमध्ये
एचसीएमटीआरचाही
समावेश
केला
कारण
अगदी
आजही
त्यासाठीचे
आरक्षण
कायम
आहे
व
ही
कल्पना
कागदावर
मांडण्यात
आल्यापासून
जेवढी
वर्षे
झाली
त्यापेक्षा
कितीतरी
अधिक
वेळा
तिचा
मूळ
नियोजित
मार्ग
किंवा
रस्ता
बदलण्यात
आला
आहे,
परिणामी
शहरातील
व
त्या
भोवतालच्या
सर्व
रस्त्यांची
कोंडी
हि
नित्याचीच बाब झालीये !
झेड-ब्रिज
हा
तर
जगावेगळाच
विनोद
आहे
जो
प्रत्यक्ष
साकार
झाला,
तो
पाडून
टाकण्याचे
प्रयत्नही
व्यर्थ
गेले
(म्हणजे
आत्तापर्यंतचे). हा
जुन्या
व
नवीन
पुणे
शहराला
जोडणारा
(केवळ)
दुचाकी
वाहनांसाठी
असलेला
पूल
आहे.
आता
याला
झेड
ब्रिज
का
म्हणतात
तर
बऱ्याच
मोठ्या
अंतरापर्यंत
तो
मुठा
नदीला
(ती
अजूनही
नदी
आहे
का
हा
एक
प्रश्नच
आहे)
ओलांडण्याऐवजी
तिच्या
समांतर
आहे.
याचा
नेमका
अर्थ
काय
होतो
हे
तुम्हाला
समजले
नसेल
तर
तुम्ही
स्वतः
भेट
देऊन
पाहा,
म्हणजे
तुम्हाला
समजेल.
तो
वाहनांना
ये-जा
करण्यापेक्षाही
प्रेमी
युगुलांना
बसून
गुजगोष्टी
करण्यासाठीच
अधिक
प्रसिद्ध
आहे. जुन्या
शहराचा
विकास
करण्याच्या
योजना
करण्यात
नेहमीच
समस्या
असतात
हे
पूर्णपणे
मान्य
केले
तरीही
कालांतराने
निरुपयोगी
ठरतील
अशा
बांधकामावर
पैसे
घालविण्यापेक्षा
दुसरा
काही
पर्याय
असू
शकत
नाही
का
असा
प्रश्न
आपण
विचारला
पाहिजे
असे
मला
वाटते.
सायकल
ट्रॅक
पुणे
हे
एकेकाळी
सायकलस्वारांचे
शहर
म्हणून
ओळखले
जात
असे
कारण
दैनंदिन
कामांसाठी
शहरात
सगळीकडे
जाण्यासाठी
बहुतेक
लोक
प्रवासाचे
साधन
म्हणून
सायकलीच
वापरत
असत.
मात्र
त्यासाठी
सायकल
ट्रॅक
नावाचा
एक
विनोद
तयार
करून
ठेवण्यात
आला
आहे
हे
खरोखरच
अतिशय
दुर्दैव
आहे. साधारण
पंधरा
वर्षांपूर्वी
सर्व
पदपथांच्या
कडेने
(म्हणजेच
पदपथावर)
सायकलींसाठी
मार्ग
राखून
ठेवणे
आवश्यक
आहे
असे
कुण्या
चांगल्या
नियोजनकर्त्याला
वाटले.
आपल्या
पुणे महानगरपालिकेतील
सन्माननीयांनी
म्हणजेच
नगरसेवकांनी
अगदी
हसत
त्या
नियोजनकर्त्याची
योजना
स्वीकारली. त्यानंतर
जे
काही
झाले
तो
एक
अफलातून
विनोद
होता.
कारण
सर्वप्रथम
सायकलींची
जागा
दुचाकींनी
घेतली
होती
(जवळपास
३०
लाख)
ज्याचे
श्रेय
आपल्या
निकृष्ट
सार्वजनिक
वाहतूक
व्यवस्थेला
द्यावे
लागेल.
तेव्हा
आपल्याकडे
सायकलींसाठी
मार्ग
होते
मात्र
ते
वापरण्यासाठी
सायकली
किंवा
सायकलस्वारच
उरले
नव्हते. सायकलींसाठी
राखून
ठेवण्यात
आलेल्या
बहुतेक
मार्गांवर गॉगल विक्रेत्यांपासून
ते
पावभाजी
विक्रेत्यांपर्यंत
सगळ्यांनी
आपले
बस्तान
बांधले,
मग
आता
काय? या सायकल
मार्गावर
सगळीकडे
सायकल
मार्ग असे बोर्ड पण लावण्यात आले होते, मात्र
ते
खरोखरच
सायकलस्वारांसाठी
वापरले
जात
आहेत
का
हे
पाहण्यासाठी
काहीही
तरतूद
नव्हती.
अनेक
ठिकाणी
सायकलींसाठी
राखून
ठेवलेले
हे
मार्ग
अचानक
रहदारीच्या
मार्गावर
येत
असत
त्यामुळे
सायकलस्वाराला
सुरक्षितपणे
व
आरामात
सायकल
चालवणे
अशक्य
होत
असे.
या
सगळ्या
गोष्टींमुळे
त्याचा
मूळ
उद्देशच
फोल
ठरला
व
ही
संकल्पना
निव्वळ
एक
विनोद
होऊन
बसली.
बीआरटी
म्हणजेच
बस
रॅपिड
ट्रान्सिट
बस
रॅपिड
ट्रान्सिट
हा
शहरातील
सार्वजनिक
वाहतूक
यंत्रणा
बळकट
करण्याचा
अतिशय
उत्तम
प्रयत्न
होता.
त्यामध्ये
सार्वजनिक
वाहतुकीच्या
बससाठी
(पीएमटी,
आणखी
एक
विनोद)
रस्तावरील
विशिष्ट
जागा
राखून
ठेवण्याचा
समावेश
होता,
जो
सपशेल
अपयशी
ठरला. हा
विनोद
साधारण
दशकभर
चालला.
त्याच्याशी
संबंधित
प्रत्येक
संस्थेने
प्रयत्न,
प्रयोग,
अंमलबजावणी,
नियोजन,
गाजावाजा
व
इतरही
बऱ्याच
गोष्टी
करून
पाहिल्या.
मात्र
बीआरटीला
एक
विनोद
बनविण्यामध्ये
आपल्या
सगळ्यांसह
सामान्य
नागरिकांचाही
तितकाच
हात
आहे.
यंत्रणेने
तिची
अंमलबजावणी
चुकीच्या
प्रकारे
केली
असली
तरीही
आपणही
सामान्य
नागरिक
म्हणून
पीएमटीसाठी
म्हणजेच
सार्वजनिक
वाहनांसाठी
असलेल्या
मार्गिकेमध्ये
आपल्या
खाजगी
गाड्या
दामटवून
आगीत
तेल
ओतण्याचे
काम
केले,
यामुळे
त्याचा
मूळ
उद्देशच
फोल
ठरला. बससाठी
राखून
ठेवलेल्या
या
मार्गिका
तयार
करण्यासाठी
कोट्यवधी
रुपये
खर्च
करण्यात
आले,
त्यासाठी
आधीच
अरुंद
असलेल्या
मार्गिका
आणखी
अरुंद
करण्यात
आल्या.
आता
या
सगळ्या
प्रकरणातील
सर्वात
मोठा
विनोद
म्हणजे
आपण
या
बीआरटीच्या
थडग्यांवरच
मेट्रोसाठी
खांब
उभारणार
आहोत.
कारण
आपल्या
“माय-बाप” सरकारला जाणीव झाली की बीआरटीच्या मार्गिका मेट्रोच्या खांबांसाठी अडथळा आहेत (हासुद्धा एक नवीन विनोद आहे). बीआरटीच्या
बहुतेक
भागाला
अक्षरशः
केराची
टोपली
दाखवण्यात
आली
आहे,
काही
ठिकाणी
बीआरटी
स्थानकेही
पाडून
टाकण्यात
आली. बीआरटीच्या
मार्गांवर
अनेक
ठिकाणी
असंख्य
अपघात
झाले,
ज्यासाठी
नागरिकांचा
निष्काळजी
दृष्टिकोनही तितकाच
जबाबदार
आहे.
नदीच्या
काठाचा
विकास
तुम्ही
पुणेकर
नसाल
तर
मला
तुम्हाला
सांगावेसे
वाटते
की
या
शहराच्या
संपूर्ण
भागातून
दोन
नद्या
वाहतात
व
इथे
येणाऱ्या
पाहुण्यांना
आम्हाला
सांगावे
लागते
की
या
नद्या
आहेत,
इतकी
या
मुळा
व
मुठा
या
दोन्ही
नद्यांची
दयनीय
अवस्था
आहे.
पुन्हा
कुणी
एक
व्यक्ती
वा संस्था नाही तर
संपूर्ण
शहर
आपल्या
नद्यांची
परिस्थिती
खालावण्यासाठी
जबाबदार
आहे
कारण
आपण
या
नद्यांना कधी आपले
मानलेच
नाही.
कारण
आपण
त्यांना
आपले
मानले
असते
तर
आपण
त्यांना
प्रदूषित
केले
नसते,
त्यांच्यावर
अतिक्रमण
केले
नसते,
त्यांचा
मार्ग
अडवला
नसता
जे
आपण
सध्या
केले
आहे. वेळोवेळी
अनेक
सरकारी
संस्थांनी
तसेच
केंद्रीय
मंत्र्यांनी
या
नद्यांच्या
काठाचा
परिसर
विकसित
करण्यासाठी
निधी
देण्याची
घोषणा
केली
व
त्यासाठी
अनेक
योजनाही
तयार
करण्यात
आल्या.
मात्र
एचसीएमटीआरची
जी
गत
झाली
तेच
इथेही
झाले,
आजतागायत
नदी
काठचा
एक
किलोमीटर
भागही
सुशोभित
करण्यात
आला
नाही
हे
कटु
वास्तव
आहे.
मात्र
प्रत्येकाला,
अगदी
स्वयंसेवी
संस्थांनाही
या
समस्यांविषयी
चर्चा
करण्यास
व
आपल्या
नद्या
किती
सुंदर
होऊ
शकतात
याची
केवळ
कागदोपत्री
सादरीकरणे
देण्यातच
अतिशय
आनंद
होतो,
म्हणूनच
शहरासाठी
हा
केवळ
निव्वळ
विनोदाचा
विषय
ठरला
आहे.
पुण्यासाठी
देशांतर्गत
विमानतळ
हा विनोद शेवटच्या रिंग रोडच्या विनोदाशी १ल्या क्रमांसाठी स्पर्धा करतो. मात्र त्याच्या विकासासाठी व कागदोपत्री काही जागा किंवा जमीन आरक्षित ठेवणे किंवा जाहीर करणे अपेक्षित असल्याने त्याचा क्रमांक २रा आहे असेच म्हणावे लागेल. आपल्याकडे एक विमानतळ असताना आणखी एका विमानतळाची काय गरज आहे, ते आपण नवीन विमानतळ कुठे बांधावे, ते सरकारने नवीन विमानतळ बांधण्यासाठी एक संस्था स्थापन केल्याची घोषणा करेपर्यंत सगळे काही करून झाले आहे. तरीही हे विमानतळ कधी प्रत्यक्ष साकार होईल व ते नेमके कुठे असेल याची खात्री कुणालाही नाही.
परिणामी
पुणे
हे
औद्योगिक,
शैक्षणिक
व
माहिती
तंत्रज्ञानाच्या
आघाडीवर
एवढे
विकसित
असूनही
देशातील
किंवा
जगातील
त्याच्यासारख्या
इतर
शहरांच्या
तुलनेत
ते
एक
अगदी
गाव
राहिले
आहे, कारण एकच जगभरातील लोकांना पुण्यात येण्यासाठी व पुणेकरांना इतर शहरात जाण्यासाठी एकही चांगले विमानतळ नाही.
रिंग
रोड
आता शेवटचा म्हणजे ७वा अफलातून विनोद. माझ्या माहितीप्रमाणे दोन रिंग रोड आहेत व त्यातील एक रद्द करण्यात आला असेल (म्हणजे त्याला केराची टोपली दाखवण्यात आली असेल) तर कोणता रद्द करण्यात आला आहे व कोणता अजूनही होण्याची शक्यता आहे हे मला माहिती नाही. म्हणूनच या विकास कामाने पुण्यातील १ल्या क्रमांकाचा अफलातून विनोद होण्याचे बिरूद पटकावले आहे.
एचसीएमटीआरप्रमाणेच,
रिंग
रोडमागचा
विचार
पश्चिमेकडून
म्हणजे
मुंबईकडून
येणाऱ्या
वाहनांमुळे
पुण्यातील
वाहतुकीला
अडथळा
न
होता
ती
दक्षिणेला,
उत्तरेला
किंवा
पूर्वेला
जाऊ
शकतील.
या
कल्पनेने
आपले
शासनकर्ते
इतके
भारावून
गेले
की
एकाऐवजी
दोन
रिंग
रोड
जाहीर
करण्यात
आले
व
तेथूनच
विनोदाला
सुरुवात
झाली! त्यानंतर
अनेक
वर्षे
गेली, रिंग
रोडची
दिशा
अनेकदा
बदलण्यात
आली,
तसेच
या
रस्त्यांची
अंमलबजावणी
करणाऱ्या
सरकारी
संस्थाही
बदलल्या,
तसेच
रिंग
रोडची
रुंदीही
बदलली.
आज
परिस्थिती
अशी
आहे
की
कोणता
रिंग
रोड
निश्चित
करण्यात
आला
आहे,
तो
कुठपर्यंत
जाणार
आहे
व
नेमका
कुठे
संपेल
व
सुरू
होईल
(कागदावर),
त्याची
रुंदी
किती
असेल,
या
रस्त्याच्या
आजूबाजूला
विकासासाठी
कोणते
नियम
लागू
होतील
व
हा
रिंग
रोड
बांधण्याची
जबाबदारी
कुणावर
असेल
हे
आत्तापर्यंत कुणालाच
माहिती
नाही. असे
असले
तरीही
हा
रिंग
रोड
नेहमी
बातम्यांमध्ये
किंवा
प्रकाशझोतात
असतो.
म्हणूनच
पुणे
शहरातील
अफलातून
विनोदांमध्ये
याचा
१ला
क्रमांक
लागतो.
मित्रांनो
मी
जे
लिहीले
आहे
ते
आगाऊपणा किंवा पक्षपाती
किंवा
टीका
करणारे
वाटत
असेल
तर
मला
खरंच
माफ
करा,
पण
मला
तुम्हाला
सांगावेसे
वाटते
की
आपल्या
शहरामध्ये
असे
अनेक
विनोद
आहेत,
आपल्या
देशामध्ये
एखाद्या
सार्वजनिक
संस्थेमध्ये
काम
करणे
ही
सोपी
गोष्ट
नाही. सरकार (किंवा यंत्रणा) कसे कुचकामी आहे हे दाखविण्याचा या लेखाचा उद्देश नाही, तर आपण केलेल्या चुकांविषयी जागरुक होणे व स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे. मी “आपण” असा उल्लेख केला आहे व त्यामध्ये माझाही समावेश होतो, शेवटी सरकार म्हणजे तरी काय तर आपल्यापैकी प्रत्येक जण. जोपर्यंत अशा सर्व विकासकामांमध्ये आपण सकारात्मकपणे योगदान देत नाही, तोपर्यंत असे विनोद होत राहतील हे कृपया लक्षात ठेवा!
You can
read in English version:
http://visonoflife.blogspot.com/2021/07/punes-wonderful-jokes.html
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment