“शाश्वतता ही व्यवसायाची पद्धत होण्याआधी ती एक जीवनशैलीही व्हायला हवी” … आनंद महिंद्रा
आनंद गोपाळ महिंद्रा हे एकअब्जाधीश भारतीय औद्योगिक व्यावसायिक आहेत व महिंद्रा समूह या मुंबईमध्ये स्थित व्यावसायिक समूहाचे अध्यक्ष आहेत. ‘अ’च्या बाराखडीतील काही नावे वगळता म्हणजेच अंबानी व अदानी वगळता फार कमी लोकांनी भारतीय उद्योग क्षेत्रावर अधिराज्य गाजवले आहे. त्यातही केवळ संपत्ती किंवा जनदर याबाबतीतच नाही तर आपल्या व्यावसायिक विचारसरणीची छाप पाडणाऱ्या व्यक्ती अगदी कमी आहेत व आनंद महिंद्रा निश्चितच त्यापैकी एक आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिंद्रा उद्योग समूह रिअल इस्टेट, वाहन क्षेत्रात व आतिथ्य क्षेत्रातही आहे, म्हणूनच मला जेव्हा शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे गृहनिर्मिती क्षेत्रामध्ये शाश्वत बांधकामाविषयी माझे विचार मांडण्यास सांगण्यात आले, तेव्हा श्री. आनंद महिंद्रा यांचे वरील शब्द, माझ्या व्याख्यानाची सुरुवात करण्यासाठी मला अगदी चपखल वाटले. अलिकडे शाश्वत व शाश्वतता या शब्दांचा बराच वापर होताना दिसतो. जागतिक पर्यावरण मंचाची वातावरणातील बदलांविषयी बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये (जे नेहमी विकसनशीलच राहतात, विकसित कधीच होत नाहीत) या संज्ञा केवळ पर्यावरणासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी लागू होतात. कोणताही विकास हा अर्थातच शाश्वत असला पाहिजे, मात्र त्याचा नेमका अर्थ काय होतो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात येत असेल, मात्र कधीही विचारायचे धाडस किंवा शोधायचा प्रयत्न केला नसेल. तर “शाश्वतता” या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो याविषयी सत्य किंवा अचूक उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला एक लोककथा आठवली, ती खाली देत आहे…
कोणे एके काळी (मला आपल्या जातक कथांची अशी सुरुवात अतिशय
आवडते) एक राजा होता जो त्याच्या विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध
होता (राजे अर्थातच हेच करतात), अर्थात तो स्वभावाने चांगला होता. त्याच्या
दरबारामध्ये विविध क्षेत्रातील रथी- महारथी होते व त्याच्या विक्षिप्तपणाला खतपाणी घालणाऱ्या मनोरंजक पुरुषांना
(व महिलांना) तो भरभरून बक्षिसेही देत असे. एक दिवस एक माणूस त्याच्याकडे आला व त्याने दावा केला
की त्याच्याकडे असे एक औषधी द्रव्य आहे जे पिल्यानंतरराजा अदृश्य होऊ शकेल. राजाची उत्सुकता वाढली व
त्याने लगेच त्या माणसाला त्याच्यावर त्या औषध द्रव्याचा वापर करायला सांगितला. तो
माणूस चतुर होता (राजाशी व्यवहार करताना असावेच लागते) व म्हणाला
त्यासाठी तीन अटी आहेत ज्या राजाने लगेच मान्य केल्या. पहिली म्हणजे राजा वर्षातून एकदाच या औषधी द्रव्याचा
वापर करू शकेल. दुसरी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात राजाबद्दल वाईट
विचार असतील तर त्या व्यक्तीच्या दृष्टीवर या औषधी द्रव्याचा
काहीच परिणाम होणार नाहीव तिसरी म्हणजे राजा त्या माणसाकडून खरेदी केलेल्या औषधी
द्रव्यांच्या बाटल्यांच्या मोबदल्यात तेवढेच सोने त्याला देईल. राजाने तिन्ही
अटींवर स्वाक्षरी केली व माणसाला मोबदला म्हणून सोने देण्यात आले. मात्र जोपर्यंत
राजाला प्रात्यक्षिक दिले जात नाही तोपर्यंत त्याला शहर सोडून जाण्यास परवानगी
नाकारण्यात आली, जे त्या माणसाने थोड्या नाखुशीनेच मान्य केले. मात्र त्याने औषधी
द्रव्य वापरण्याविषयी दुसरी अट राजाला जनतेमध्ये जाहीर करायला
सांगितली की “राजाने औषधी द्रव्य घेतल्यानंतरही ज्या व्यक्तीच्या मनात राजाविषयी वाईट विचार असतील ती व्यक्ती राजाला पाहू शकेल”.
राजाने नगरामध्ये याची घोषणा केली व त्याच्या विक्षिप्त स्वभावानुसार, दुसऱ्या दिवशी
औषधी द्रव्याचे सेवन केले व सकाळच्या फेरफटक्यासाठी कपडे न घालताच गेला, आपण कुणालाच
दिसत नाही असे त्याला वाटत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती, की संपूर्ण शहर
राजाला वस्त्रहीन अवस्थेत चालताना पाहात होते मात्र प्रत्येकाने दुसरी
अट आठवून त्याविषयी मौन बाळगले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले. कारण जर तुम्हाला
राजा दिसत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही त्याच्याविषयी वाईट विचार करता व तुम्हाला
काय शिक्षा होईल हे तुम्हाला
माहिती आहे ! आपण अदृश्य झालो असल्याचे वाटून राजा अतिशय आनंदी
झाला, मात्र रस्त्यावरील गर्दीमध्ये आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून जाणाऱ्या
एका लहान मुलाने राजाला वस्त्रहीन चालताना पाहिले व आपल्या वडिलांना प्रश्न विचारला, की
हा माणूस नागवा का चालतो आहे? यावर त्याच्या वडिलांनी घाईघाईने उत्तर दिल की, “बाळा, आम्ही तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ कारण तुझे डोळे बिघडले आहेत”! राजाने ते औषधी
द्रव्य देणाऱ्या माणसाला बक्षिस म्हणून सोने दिले व तो माणूस आनंदाने शहर सोडून
निघून गेलाते पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. कारण राजा पुढच्यावर्षी पुन्हा ते
औषधी द्रव्य घेईल तोपर्यंत तो राजाच्या तावडीत न येण्याइतका लांब निघून गेला असेल.
लोकही
आपापल्या व्यवसायामध्ये तसेच एकूणच आयुष्यामध्ये “शाश्वतता”या शब्दाकडे अशाच प्रकारे पाहतात, कारण कुणालाही
त्याचा नेमका अर्थ काय होतो हे माहिती नसते तरीही कुणीही त्यांना हे माहिती
नसल्याचे सत्य स्वीकारत नाही. त्यामुळेच तुम्हाला जे समजलेलेच नाही त्याचे तुम्ही
पालन किंवा स्वीकार कसा करू शकाल, बरोबर? म्हणूनच, सर्वसाधारण शब्दांमध्ये शाश्वत म्हणजे,
“नैसर्गिक साधनसंपत्ती आणि शक्तीचा पर्यावरणास बाधा न आणता केलेला वापर; जो नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवतो”!
आता, यामुळे “वातावरणाची” आणखी एक व्याख्या तयार होते. आता इथे बरेच जण
उपहासाने किंवा कुत्सितपणे हसतील, मात्र लक्षात ठेवा पर्यावरण म्हणजे केवळ नद्या,
पर्वत, झाडे, किंवा आकाश नव्हे. तुम्हाला असे वाटत असेल की मी वेडा आहे तर आपण
सगळेजण सामान्यपणे पर्यावरण हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे वापरतो
ते पाहा ज्यामध्ये निसर्गाचा समावेश नसतो. “यार, मला अजिबात काम करावेसे वाटत नाही, ऑफिसमधले पर्यावरण अतिशय वाईट आहे” किंवा “राज्यातील राजकीय पर्यावरण अतिशय बिघडले आहे” किंवा हे पाहा, “घरातल्या
वातावरणाचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो” व अशा बऱ्याच
गोष्टी आहेत ज्यामध्ये पर्यावरण हा शब्द एखाद्या ठिकाणचे आयुष्य किंवा परिस्थितीची
व्याख्या करण्यासाठी सर्रास वापरला जातो, मग तो एखादा कारखाना असेल किंवा सामाजिक
संघटना असेल. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा आपण शाश्वतता हा घटक
एखाद्या उद्योगाला लागू करतो जो आपल्या संदर्भात रिअल इस्टेट आहे किंवा गृहबांधणी
आहे तेव्हा तो या उद्योगाच्या सर्व घटकांना लागू केला पाहिजे केवळ बांधकाम या एकाच
घटकाला नव्हे, बरोबर?
आता जे वाचक अतिशय संयमाने इथपर्यंत वाचत आले
आहेत, त्यांना मला सांगावेसे वाटते की रिअल इस्टेटमध्ये शाश्वतता नावाच्या
त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहेत. पहिला शिरोबिंदू म्हणजे अर्थातच निसर्ग, जो थेट
नियोजन तसेच इमारतीच्या किंवा घरांच्या बांधकाम प्रक्रियेशी संबंधित असतो. इथे बऱ्याच संशोधन
व विकासाची गरज आहे तसेच जमीनीवरील वास्तव वतथ्ये विचारात घेणे आवश्यक आहे. आपण
सध्याच्या कामाच्या प्रक्रियांद्वारे काहीही निसर्गपूरक बांधू शकत नाही हे कटू
सत्य आहे. पायासाठी जमीन खणण्यापासून ते अनेक प्रजातींचा अधिवास
(घरे) उध्वस्त करण्यापर्यंत, ज्यामध्ये गांडुळांपासून ते मुंग्यांपर्यंत अनेक
प्रजातींचा समावेश होतो, त्याशिवाय झाडे तोडणे, तसेच वाळू, धातू व पोलादापासून
काँक्रिट तयार करणे, हे सगळे पृथ्वीला अपाय करूनच तयार केले जाते, त्यामुळे
बांधकामामुळे निसर्गाची हानी होतेच. आपण केवळ ज्याचे नुकसान केले आहे व आपण परत काय देऊ
शकतो यामध्ये समतोल साधू शकतो. एक लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला मारले तर एक जीवन
संपुष्टात येते त्याचप्रमाणे एखादे झाड तोडले तर ते कायमचे नष्ट होते. दुसऱ्या एका
माणसाला जन्म दिल्यामुळे ज्या माणसाला मारण्यात आले त्याचे आयुष्य परत मिळणार नाही, त्याचप्रमाणे नवीन
झाड लावल्यामुळे, कापलेले झाड परत उगवणार नाही, ही वस्तुस्थिती आधी स्वीकारणे व
त्यानंतर शाश्वततेविषयी धोरणे ठरवणे, ही काळाची गरज आहे. याचा अर्थ असा होत
नाही की आपण आपल्या घरांचे बांधकाम थांबवले पाहिजे, याचा अर्थ असा होतो की आधी सध्याच्या बांधकाम
साहित्यासाठी पर्याय शोधले पाहिजेत. तोपर्यंत आपण आपली घरे बांधत असताना आपण
निसर्गाचे जे नुकसान करणार आहोत ते होऊ न देण्याचा किंवा ते कमी करण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. नागरी धोरणे अशाप्रकारची बनवा की लोक आनंदाने व
स्वेच्छेने निसर्गाचे रक्षण करतील, सक्तीने नव्हे कारण त्याचा काहीही उपयोग होणार
नाही. पुण्यातल्या पार्किंगच्या धोरणाचे एक साधे उदाहरण
घ्या (माफ करा, मी पुण्यामध्ये काम करतो त्यामुळे उदाहरणादाखल हे
वापरले आहे), कार पार्किंगासाठी किंवा दुचाकींच्या पार्किंगसाठी
तुम्ही इमारतीमध्ये कायद्याने जेवढी जास्त जागा मागाल, तेवढी जास्त झाडे तोडली
जातील कारण कार व झाडे दोघांनाही जागेची गरज आहे. त्यामुळेच जर कायद्याने कार
आवश्यक असतील तर याचा अर्थ झाडांना जावेच लागेल.त्याचप्रमाणे कार पार्किंगसाठी
जागा देणे तुम्ही कायद्याने बंधनकारक केले नाही, परंतु त्याचवेळी नागरिकांना
प्रवासासाठी चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही, तर ते कार
खरेदी करतील व या कार लावण्यासाठी झाडे तोडतील.त्याचप्रमाणे तुम्हाला शहाराचे नियोजन अशाप्रकारे
करावे लागेल की लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी कमीत कमी प्रवास करावा लागेल
व वाहनांचा वापरच कमी होईल. कारण पारंपरिक इंधनांचा वापर करून सार्वजनिक वाहतूक
म्हणजे प्रदूषण व सार्वजनिक वाहने लावण्यासाठीही जागा लागते. शेवटचा मुद्दा
म्हणजे तुम्ही जी काही सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून द्याल, ती कमी प्रदूषण करणारी
असेल हे पाहा व हरित उर्जेचा वापर करा, कोळशावर आधारित उर्जेचा नाही. हा धोरणे तयार
करण्याचा व त्यांची अंमलबजावणी करण्याचा शाश्वत मार्ग आहे व आपल्याला शाश्वत घरे
बांधायची असतील तर आपण रिअल इस्टेटकडे अशाप्रकारे पाहिले पाहिजे. याची सुरुवात नियोजनापासून होते, जास्तीत जास्त
नैसर्गिक प्रकाशाचा वापर करण्यापासून ते पाणी वाचवणारे नळ लावण्यापर्यंत तसेच
काचेची तावदाने कमी वापरण्यापर्यंत नियोजनाच्या व गवंडीकामाच्या प्रत्येक
घटकामध्ये हा शाश्वततेचा पैलू घराच्या बांधकामाचा भाग असला पाहिजे. हेच तत्व
बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्यासाठी लागू होते.
तसेच, शाश्वत घरे त्यातील रहिवाशांसाठीही परिणामकारक असली
पाहिजेत, केवळ बांधकामाच्या पद्धतींमुळे नाही, नाहीतर उच्च उत्पादन खर्च तसेच
देखभाल खर्चामुळे त्यातील रहिवाशांसाठी ते अ-शाश्वत होईल व त्यांच्यासाठी आर्थिक
समस्या निर्माण होतील. इथे, शाश्वततेच्या त्रिकोणाचा दुसरा शिरोबिंदू समोर येतो,
तो म्हणजे उत्पादनाचा वापरकर्ता, जो आमच्या बाबतीत आम्ही बांधलेल्या शाश्वत घरातील रहिवासी आहेत. इथे पुन्हा धोरणे
तसेच जागरुकतेचा घटक समोर येतो कारण तुम्ही कितीही उत्तम शाश्वत घरे बांधली तरीही
रहिवाशांनी कोणत्याही कारणासाठी त्याचा वापर केला नाही तर ती वाया जातील. हे अनेक आघाड्यांवर
होत आहे, माझ्या स्वतःच्या प्रकल्पांमध्ये आम्ही गांडुळ खतासाठी खड्डे
दिली आहे आहे जेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल मात्र तिथे सगळ्या प्रकारचा कचरा
टाकून दिला जातो, कारण स्थानिक नागरी संस्था ओला कचराही उचलते. बहुतेक
प्रकरणांमध्ये रहिवासी ओला व कोरडा कचरा वेगळा करण्याची तसदी घेत नाहीत ही
वस्तुस्थिती आहे. पावसाच्या पाण्याचे संधारण किंवा सांडपाण्यावर फेरप्रक्रिया
प्रकल्पांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. एमएसईबीचे (विजेचे) दर इतके जास्त
आहेत की सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प चालवणे अव्यवहार्य होऊन जाते. एकतर रहिवाशांनी
सांडपाण्यावर फेर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा खर्च उचलला पाहिजे किंवा विजेचे
दर कमी केले पाहिजेत मात्र आपण दोन्हीही करत नाही व परिणामी पुन्हा एकदा शाश्वत
विकासाची धोरणे अपयशी ठरतात. सातत्याने जागरुकता कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे तसेच
विकासकानेही घरे बांधताना प्रयत्न केले पाहिजेत, कारण सरकार सगळे काही करेल अशी
अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. आमच्या प्रकल्पांमध्ये आम्ही प्रकल्पामध्ये व भोवती
त्या प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या हातून झाडे लावून घेतो व त्यांना ती
झाडे दत्तक घ्यायला लावतो म्हणजे ते त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतील. एक लक्षात ठेवा
शाश्वत विकासामध्ये लोकांना तो आपला वाटणे आवश्यक असते तरच ते धोरण शाश्वत होऊ
शकते. निवासी प्रकल्पांमधीलरहिवाशांनाही हे समजले पाहिजे की
त्यांचे भवितव्यही धोक्यात आहे व शाश्वत विकासातील त्यांची भूमिका सर्वात
महत्त्वाची आहे.
आता शेवटचा मुद्दा, शाश्वत विकासाच्या
त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू म्हणजे खुद्द बांधकाम व्यावसायिक. यासंदर्भात आनंद
महिंद्रा काय म्हणाले हे लक्षात ठेवू, की व्यवसायही शाश्वत असला पाहिजे नाहीतर घरे
असतील, ग्राहकही असतील परंतु नुकसानामुळे बांधकाम व्यावसायिक तग धरू शकणार नाहीत, हा सुद्धा
अ-शाश्वत विकासच असेल. बांधकाम व्यावसायिकांचे नुकसान म्हणजे केवळ आर्थिकच
नव्हे तर, तर नुकसान म्हणजे ज्या उद्देशाने ते उत्पादन बांधण्यात आले आहे तोच
अपयशी होणे, आपल्या लेखाच्या संदर्भात हे उत्पादन म्हणजे शाश्वत
घर ! यासाठी सरकारने (म्हणजेच धोरणकर्त्यांनी) बांधकाम
व्यावसायिकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. याचे कारण म्हणजे
सरकारद्वारे तयार करण्यात आलेली धोरणे शाश्वत घरांचे भवितव्य ठरवतील नाहीतर ते
केवळ एक मृगजळच राहील. बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादनाच्या शाश्वततेची
नेमकी व्याख्या समजून घेतली पाहिजे व त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू लक्षात ठेवून हे
साध्य करण्यासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी, प्रिय सहकारी बांधकाम व्यावसायिकांनो, तुम्हाला काहीवेळा शाश्वतता
साध्य करण्यासाठी तुमच्या उत्पन्नातील काही रुपये जास्त खर्च करावे लागतील.
मात्र तुम्ही त्यातून काय कमावणार आहात ते पाहा कारण तुम्ही संपूर्ण समाजाचे
भविष्य कमावणार आहात, तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. एक लक्षात ठेवा, आपले माय-बाप सरकार शाश्वततेचा हा पैलू विसरले तरीही तुम्ही शाश्वत घरे बांधत राहिले पाहिजे!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
you can find our English version @link below.
https://visonoflife.blogspot.com/2022/11/sustainable-homes-not-mirage-but-reality.html
No comments:
Post a Comment