Monday 21 November 2022

नंदु तांबेचे जंगल !












नंदु तांबेचे जंगल !

तुमच्या मनात हा विश्वास बाळगा की तुम्ही उत्कट, ध्येयासक्त, अद्भूत आणि चमत्कारांनी भरलेले आयुष्य जगणार आहात.” …

तुम्ही ध्येयासक्त आयुष्य जगत असाल, तर तुम्हाला आपोआपच प्रेरणा मिळेल. तुमची तळमळ तुम्हाला ध्येयापर्यंत  नक्की  पोहोचवेल.” …

… रॉय टी. बेनेट

रॉय लेझलीबेनेट हे झिम्बाब्वेचे राजकारणी ब्रिटीश साउथ आफ्रिका पोलीसचे सदस्य होते. ते झिम्बाब्वेच्या हाउस ऑफ असेंब्लीमध्ये चिमानीमानी या प्रतिनिधी गृहाचे सदस्य होते, जेथे ते प्रेमाने पचेडू म्हणून ओळखले जात. अर्थात रॉय यांनी केवळ ही पदेच भूषवली नाहीत तर ते लाइट इन हार्ट नावाच्या एका अतिशय सुंदर पुस्तकाचे लेखकही आहेत, त्यातूनच मी वरील अवतरण घेतले आहे. कारण हा लेख  एक अतिशय तळमळीने काम करणारा माणूस (म्हणजे वेडाच म्हणा) त्याच्या तळमळी विषयी म्हणजेच जंगलाविषयी आहे. मी माझ्या लेखाचा विषय सांगताना जाणीवपूर्वक माणूस जंगल असे म्हटले कारण इथे त्यांना खरोखरच वेगळे करता येणार नाही. मी नंदू (निशिकांत) तांबे यांच्याविषयी पश्चिम घाटातल्या म्हणजेच महाराष्ट्राच्या, कोकणातल्या चिपळूणमधील जंगलाविषयी बोलतोय. मला नंदूविषयी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी समजले की असा एक माणूस आहे जो कोकणामध्ये कुठेतरी स्वतःचे जंगल तयार करायचा प्रयत्न करतोय. हा विषय माझ्याही जिव्हाळ्याचा असल्यामुळे, मी नंदूविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. मी जशीजशी अधिक माहिती घेत गेलो तशी-तशी माझी त्यांच्याविषयी त्यांच्या कामाविषयी उत्सुकता वाढत गेली. नंदू हा काही समाज माध्यमांवर सक्रिय माणूस नाही, किंबहुना तो अजिबात सगळ्यांमध्ये सहजपणे मिसळणारा (म्हणजे माणसांमध्ये) माणूस नाही. तरीही मला जे काही समजले किंवा मी जी काही माहिती गोळा केली त्यातून मला समजले की, त्यांची जंगलाजवळ काही वडिलोपार्जित जमीन होती भोवतालच्या जंगलांना असलेला  मानवी  धोका किंवा भीती त्यांना जाणवली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आसपासच्या जमीनी वाचवायला त्यांचे संवर्धन करून त्या जंगलांमध्ये रुपांतरित करायला सुरुवात केली!

हे ऐकायला अगदी साधे-सरळ वाटते मी काही प्रोजेक्ट्स मध्ये शहरी जंगल म्हणून असा प्रयत्न करून पाहिला आहे, मात्र तो केवळ काही हजार चौरस फूट जमीनीपुरता काँक्रिटच्या इमारतींमध्ये नियंत्रित वातावरणापुरता मर्यादित होताज्यांनी अस्सल म्हणजे विशेषतः पश्चिम घाटाच्या पायथ्याशी अरबी समुद्राच्या दरम्यान असलेले जंगल पाहिलेले नाही, त्यांना मला सांगावेसे वाटते की हे एखाद्या व्यक्तीने डिनेलँड किंवा लास व्हेगास  शहर किंवा आपला ताज महाल पाहिला नसेल तर त्यांचे वर्णन करण्यापेक्षाही अवघड आहे. मी मानवनिर्मित स्थळांशी तुलना केली कारण त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना ही उदाहरणे जवळची वाटतील. मात्र नंदू यांच्या जमीनीवरील जंगलाचे वर्णन करायचे झाले, तर दख्खनचे पठार राज्याच्या पश्चिमेला असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात संपते. तिथून पश्चिम घाटाच्या रांगा सुरू होतात जवळपास १०० किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये घनदाट हिरवी झाडी (सुदैवाने ती अजूनही आहे),  असंख्य  जलस्रोत आहेत या घनदाट झाडीखाली काय आहे हे केवळ देवालाच माहिती, एवढी या जंगलांमध्ये कीटक, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी रोपांची वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आहे. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी नंदू यांचे जंगल वसलेले आहे संपूर्ण पर्वत रांगांमध्ये ही जंगले वयाने सर्वात जुनी आहेत म्हणूनच हा संपूर्ण अतिशय महत्त्वाचा अधिवास आहे. नंदू यांना हे फार पूर्वीच लक्षात आले होते म्हणूनच आपल्या जंगल मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्याचे एक महत्त्वाचे कारण होतेवाघांची जी समस्या आहे तीच जंगलांचीही समस्या आहे कारण मानवी लोकसंख्या सतत वाढतेच आहे, त्यांना त्यांच्या वापरासाठी जमीन आवश्यक आहे वाघ किमान विरोध किंवा उलट हल्ला करू शकतात. झाडे मात्र कसलाही विरोध करता माणसांनी कुऱ्हाड चालवल्यावर शांतपणे खाली पडतात माघार घेऊन माणसांच्या घरांसाठी जागा करून देतातया प्रक्रियेमध्ये माणसाला त्याच्या घरांसाठी जमीन मिळाली मात्र त्यानंतर हजारो प्राणांच्या प्रजाती बेघर झाल्या (म्हणजे मरण पावल्या) तरी त्याची काळजी कुणाला आहे, बरोबर?

नंदू दररोज त्यांच्या जमीनीभोवतालच्या जंगलांचा ऱ्हास होताना पाहात होते या जंगलांचे जे मूळ निवासी आहेत त्या सगळ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे त्यांना दिसत होते. यामध्ये पक्षी, सरपटणारे प्राणी, अगदी चित्त्यासारखे प्राणी झुडुपांचा समावेश होता, नंदु तांबे ने हे सगळे थांबवायचे ठरवले. मात्र जेव्हा निसर्गाचे संवर्धन करण्यासंबंधी काही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा काहीतरी थांबवायचा निर्णय घेणे ही एक गोष्ट झाली मात्र तुम्ही जे काही ठरवले आहे ते प्रत्यक्ष कृती करून साध्य करून घेणे ही दुसरी गोष्ट झाली. नंदुची जमीन जेमतेम १० एकर होती एखादा माणूस किती जंगल वाचवू शकतो जेव्हा संपूर्ण गाव किंवा शहर जंगलावर अतिक्रमण करत असेल तर तो त्याविरुद्ध काय करू शकतो. मात्र मी तुम्हाला खरोखरच सांगतो की नंदू वेडे आहेत जगाला वेड्या माणसांचीच गरज आहे कारण जेव्हा संपूर्ण जग चुकीच्या दिशेने चाललेले असते तेव्हा केवळ वेडे लोकच संपूर्ण जगाला थांबवण्याचे धाडस दाखवतात. नंदुनी  दोनप्रकारे कृती करण्याचा निर्णय घेतला, एक म्हणजे त्यांच्याकडे जे काही आहे, त्यामध्ये जंगल जसे आहे तसे त्याचे संवर्धन करणे दुसरे म्हणजे जेथे त्याची हानी झाली आहे तेथे ते पुन्हा उगवणे, आपल्या जंगलाच्या जमीनीभोवती तिला लागून जी काही जमीन आहे ती खरेदी करणे, त्यांनी एका सैनिकाच्या लष्कराप्रमाणे सुरुवात केलीअर्थातच आधी त्यांनी पगारी नोकरी करण्याचा पारंपरिक मार्ग पत्करला त्यांचेही बंधूही नोकरीच करत होते. मात्र नंदू यांना लवकरच जाणीव झाली की आपण उपजीविकेसाठी सकाळी १० ते संध्याकाळी पर्यंत नोकरी करू शकणार नाही. नोकरीत मिळणाऱ्या पैशांचा विचार करायचा झाला तर, मी तुम्हाला आधीच सांगितले की नंदू वेडे आहेत, बरोबर आणि वेडी माणसे तुमच्या माझ्यासारखा विचार करत नाहीत. म्हणून, त्यांनी त्यांची नोकरी सोडली त्यांच्या जंगलामध्ये संवर्धनाच्या कामासाठी पूर्ण वेळ द्यायला सुरुवात केली लवकरच त्यांचा भाऊ आईदेखील त्यांच्यासोबत काम करू लागले (कुटुंब एका वेड्या सदस्याला वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही) त्यानंतर एका प्रवासाला सुरुवात झाली ज्याला आपण आज वन संवर्धनाची यशोगाथा असे म्हणतो.

या प्रवासाला सुरुवात करून आता जवळपास वीस वर्षे उलटून गेली आहेत नंदू यांनी लावलेल्या झाडा-झुडुपांनाही तितकीच वर्षे झाली आहेत. आज त्यांच्या जंगलामध्ये तिबोटी खंड्या (ओरिएंटलड्वार्फ किंगफिशर-ओडीकेएफ), जो किंगफिशर कुळातील सर्वात लहान सर्वात रंगीबेरंगी पक्षी मानला जातो, यासारखे अनेक दुर्मिळ पक्षी राहतातत्याशिवाय मासे घुबड, गरूड, तांबट पक्षी, फुलपाखरे, सूर्यपक्षी, तसेच साप (अनेक दिसून येतात), मुंग्या, कोळी, विंचू, अगदी बिबटेही आढळतात या प्रत्येक प्रजातीला सामावून घेणारे घर इथे आहे (म्हणजेच त्यांच्यासाठी अन्न अधिवास आहे) हे सगळे केवळ एका वेड्या माणसामुळे शक्य झाले आहे. नंदू यांनी सर्वप्रथम त्यांच्या प्रदेशातली जंगलांचा सखोल अभ्यास केला कारण त्यांना केवळ नवीन किंवा अनेक झाडे लावायची नव्हती तर आपण जे जंगलांकडून घेतले आहे ते त्यांना परत करायचे होते. सोप्या भाषेत सांगायचे तर, नंदू यांचा प्रयत्न माकडाचे माणूस करायचा नाही, तर माकडाला माकडाप्रमाणेच निरोगी शांतपणे जगू देण्याचा आहे. हे करण्यासाठी त्यांना पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलाचा किंवा तेथे कोणत्या प्रकारचे वन्यजीवन आढळते याचा मुळापासून अभ्यास करावा लागला. येथील जंगल वैशिष्टपूर्ण आहे, ते सदाहरित, भरपूर पाऊस शोषण्याची क्षमता असलेले सावलीतही तग धरणारे आहे, कारण येथील घनदाट झाडीमुळे अनेकदा सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला इथे एक संपूर्ण जीवनचक्र पाहता येते, ज्याची सुरुवात पाण्यापासून होते जे शुद्ध स्वरुपातील जीवन आहे त्याचशिवाय इथे शेवाळे, गवत, लहान रोपे, वेली, मोठे वृक्षही आढळतात. या सगळ्यांमुळे पश्चिम घाट एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जंगल ठरते एकदा असे  घर तयार असल्यावर त्यापाठोपाठ वन्यजीवन आपोआप येतेच.

या कामासाठी पैसे आवश्यक आहेत जे नंदु पर्यटनातून उभारण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जंगलाचा काही भाग तिबोटी खंड्यासारख्या विविध पक्ष्यांची छायाचित्रे काढण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. ते वृक्षारोपणासाठी नाही परंतु संवर्धनासाठी पैसे स्वीकारतात. मात्र मी आधी म्हटल्याप्रमाणे ते व्यावसायिक व्यक्ती नाहीत, नाहीतर त्यांनी आत्तापर्यंत बरेच पैसे कमावले असते, जे त्यांनी खरेतर कमवायला हवे होते कारण तरच त्यांना आणखी जंगल वाचवता येईल, असे मी त्यांना सांगितले. सध्यातरी नंदू जंगलाच्या संवर्धनासाठी पैसे स्वीकारतात ज्याचा उपयोग ते नवीन झाडे लावण्यासाठी जगवण्यासाठी करतात, जे सोपे काम नाही. त्यामध्ये चरण्यापासून संरक्षण तसेच जलसिंचन, नव्याने लावलेल्या रोपांची देखभालजी स्थानिक झाडा-झुडुपांना अनुकूल असतात अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. पक्ष्यांच्या छायाचित्रणाव्यतिरिक्त, तुमचाही वेडेपणावर विश्वास असेल किंवा तुम्हाला ते वेड थोडे वाटून घ्यायचे असेल तर नंदूशी बोलायला थोडा वेळ काढा. त्यांना असा विश्वास वाटतो की ते जे काम करत आहेत तेच त्यांचे विधीलिखित आहे त्यांना असाही विश्वास वाटतो की इथली झाडे, पक्षी, अगदी सापही त्यांच्याशी बोलू शकतात. ते जखमी पक्ष्यांशी बोलून त्यांना बरे करू शकतात, ते घुबडाशी बोलून त्याला त्याचे घरटे बदलण्यास सांगू शकतात नंदू जे काही सांगतात ते घुबड ऐकते; मी या गोष्टी प्रत्यक्षात पाहिलेल्या नाहीत मात्र नंदूनी मला त्या सांगितल्या माझा त्यांच्यावर विश्वास आहे. जोपर्यंत जंगलातील प्रत्येक गोष्टीशी कसे बोलायचे हे तुम्हाला माहिती नसेल, तोपर्यंत त्यांना जगण्यासाठी काय आवश्यक आहे हे तुम्हाला कसे समजेल, आपल्या घरामध्ये कुटुंबासाठी जे तत्वज्ञान लागू होते तेच इथेही होते, बरोबरतुम्ही एखाद्या वास्तुला जेव्हा घर म्हणता तेव्हा त्यामध्ये कुटुंब असले पाहिजे कुटुंबातील सदस्यां दरम्यान संवाद असला पाहिजे.याच तर्काने, नंदूसाठी त्यांचे जंगलच त्यांचे घर आहे या घरातील प्रत्येक प्रजाती त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत म्हणूनच ते त्यांच्याशी बोलू शकतात; नंदूसाठी ही अगदी साधी गोष्ट आहे मात्र अनेकांसाठी तो वेडेपणा आहे, पण तो त्यांचा प्रश्न आहे, नंदूचा नाही. आपल्यासारख्या स्वतःला शहाणे म्हणवणाऱ्या माणसांनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे वन्यजीवनाचे जे नुकसान झाले आहे ते आपल्याला पूर्ववत करायचे असेल तर, एकमेव मार्ग म्हणजे नंदूसारख्या वेड्या माणसांना साथ द्यायची किंवा किमान त्यांना मुक्त हस्त द्यायचा किंवा त्यांना शक्य त्याप्रकारे पाठिंबा तरी द्यायचा!

तुम्ही नंदू यांना +91 99225 87001 या क्रमांकावर संपर्क करू शकता त्यांचे जंगल चिपळूण शहराच्या दक्षिणेला साधारण किलोमीटरवर आहे. तिथे आवर्जून भेट द्या, कारण यामुळेच तुम्ही वनसंवर्धनास हातभार लावण्यास सुरुवात होईल, ज्यावर आपले भवितव्य अवलंबून आहे, एवढेच सांगावेसे वाटते.

नंदु तांबे- +91 99225 87001

Email-ID-nandutambe444@gmail.com

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -smd156812@gmail.com

you can find our English version @link below.

https://visonoflife.blogspot.com/2022/11/story-of-mad-man-named-nandu-tambe-his.html



















 

No comments:

Post a Comment