Wednesday 30 November 2022

वाहतूकची कोंडी आणि स्मार्ट शहराचे नागरिक !
















वाहतूकची कोंडी आणि स्मार्ट शहराचे नागरिक !

वाहतुकीची कोंडी वाहनांमुळे होते, माणसांमुळे नाही.” …  जेन जेकब्ज

पुन्हा एकदा जेनचे शब्द आणि पुन्हा एकदा विषय आहे आपले प्रिय स्मार्ट शहर, म्हणजेच पुणे आणि त्याची अलिकडील समस्या, वाहतूक! तर, एका परीने पाहायचे तर समाज टिकतो तो (जिवंत राहतो, असे वाचावे) आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळे नाही तर वाईट गोष्टींमुळे, आणि हे कोणा विद्वान व्यक्तीचे अवतरण नाही तर माझा स्वतःचा निष्कर्ष आहे, ज्याच्याशी अनेक जण असहमत असतील आणि मला ते चालणार आहे! कारण विसंगती हाच पुण्याचा सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असल्याने, मग तो पाण्याविषयी असो किंवा कचऱ्याविषयी, किंवा एखाद्या टेकडीमधून जाणारा एखादा रस्ता असो, तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर तुमचे मत मांडले नाही तर तुम्हाला कोणी खऱ्या अर्थाने पुणेकर म्हणणार नाही, तर त्यामुळे ते असू द्या! आता, आपल्या मुद्द्याकडे येताना, मथळ्यावरूनच तो अगदी स्पष्ट आहे, तो म्हणजे  वाहतूक कोंडी आणि शहर, हे एखाद्याला समजू शकेल आणि मान्य असेल पण त्याचा रिअल इस्टेटशी काय संबंध, हा विसंगतीचा मुद्दा असू शकतो. पण मला तुम्हाला सांगायचे आहे की आपला फोकस हा वाहतूक कोंडी आणि त्याचा शहरावर एकंदर परिणाम यावर आहे, त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करू या आणि रिअल इस्टेटच्या मुद्द्याकडे नंतर येऊ, ठीक आहे?


तसे सुरुवातीपासूनच, म्हणजे अगदी जेव्हा या शहराला पेन्शनधारकांचे नंदनवन म्हटले जात होते तेव्हासुद्धा शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीही मजबूत नव्हती, कारण तेव्हा हे सायकलींचे शहर होते,तेव्हा सगळा प्रवास  सायकलींवरूनच  केला जाई. पण तेव्हा अंतरे लहान होती आणि  येण्या जाण्याची ठिकाणे (गंतव्यस्थाने) कमी होती, कारण आजही शुद्ध पुणेकर (पेठांमधील) अभिमानाने म्हणतात की नदीपलिकडचे शहर (डेक्कनसुद्धा) म्हणजे शहराच्या बाहेरचा भाग, त्यामुळे तुम्ही  तेंव्हाच्या विस्ताराचा अंदाज करू शकता. आणि हे ऐंशीच्या दशकापर्यंतचे चित्र होते, पण त्यानंतर शहराचा परीघ आणि क्षितिजे झपाट्याने बदलायला सुरुवात झाली, विशेषतः गेल्या दोन दशकांमध्ये शहराचा अक्षरशः स्फोट झाला आहे. आता हे केवळ पुणे राहिलेले नाही तर तो पुणे महानगर प्रदेश झाला आहे आणि जर शहराच्या आर्थिक वाढीच्या दृष्टीने वरदान असेल तर पायाभूत सुविधांच्या बाबतीत अरिष्ट आहे. कारण पाणी भरपूर होते (सुदैवाने) त्याचे वितरण हीच एकमेव समस्या होती. पण टँकरनेही तुम्हाला पाणी मिळू शकत होते.

सांडपाण्याच्या बाबतीत सांगायचे, तर अजूनतरी भयंकर आपत्ती ओढवलेली नाही, त्यानंतर समस्या आहे ती कचऱ्याची ज्याची झळ फुरसुंगीसारख्या (जिथे सध्या कचरा डेपो आहे) दुर्दैवी उपनगरांना बसते आहे आणि आपल्याला कचऱ्यासोबत जगायची सवय झाल्यामुळे आपण त्याकडे काणाडोळा करतो ही वस्तुस्थिती आहे. शिक्षण सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रामध्ये सुदैवाने खाजगी क्षेत्राचाही सहभाग असल्याने, इतर वाढत्या शहरांच्या तुलनेत बऱ्याच चांगल्या प्रकारे पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. सामाजिक तसेच सांस्कृतिक पायाभूत सुविधा हा नेहमीच पुण्याचा आधारस्तंभ होता विकासासोबतच (तुम्ही त्याला वाढ म्हणू शकता) पैसा रसिकांमुळे या क्षेत्राचीही भरभराट झाली. सगळे काही आलबेल होते मात्र जसे अंतर ठिकाणे अनेक पटींने वाढत गेली तशा प्रवासासाठी सायकली निरुपयोगी ठरल्या, त्यांची जागा आधी दुचाकींनी त्यानंतर चार चाकींनी घेतली. मात्र एकच अडचण होती ती म्हणजे या इंधन खाणाऱ्या (पिणाऱ्या) यंत्रांना जेवढी जागा लागते तेवढी सायकलींना कधीच लागायची नाही आपल्याला याची जाणीव होण्याआधीच वाहतूक कोंडीच्या आपत्तीने आपल्या विळखा घातला होता !

मी नमूद केल्याप्रमाणे (वैयक्तिक निरीक्षण) पुणे (म्हणजेच पुणेकरांना) शहराला, शहरात आसपास प्रवास करण्यासाठी साधन म्हणून कधीच सार्वजनिक वाहतूक आवडली नाही किंवा त्याला प्राधान्य दिले नाही. मला माहिती आहे की पुणेकरांना माझे निरीक्षण किंवा विधान पटणार नाही, मात्र भूतकाळ कसा होता वर्तमानकाळ कसा आहे ते पाहा जास्तीत जास्त नागरिकांशी बोला म्हणजे तुम्हाला समजेल की त्यांना शहरामध्ये कुठेही प्रवास करायचा असेल तर त्यांना त्यांचे खाजगी वाहन वापरण्यातच आनंद वाटतो किंवा तेच आरामदायक वाटते कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गोष्टी त्यांच्या नियंत्रणात असल्यासारखे वाटते. आता यावर बहुतेक पुणेकर म्हणतील की, आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निरुपयोगी असल्यामुळे आम्ही आमच्या दैनंदिन कामांसाठी या वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहू शकत नाही. मला असे वाटते की हे तथ्य आपण नाकारू शकत नाही, मात्र जर आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निरुपयोगी असेल किंवा आपण त्यावर अवलंबून राहू शकत नसू तर आपणही त्यासाठी जबाबदार आहोत ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला स्वीकारावे लागेल. कारण आधी अंडे किंवा आधी कोंबडी या उक्तीप्रमाणे, सार्वजनिक वाहतूक वाईट आहे म्हणून आपण खाजगी वाहने वापरतो आपण खाजगी वाहने वापरत असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक खराबच राहते कारण तिला नफाच मिळत नाही, आता या दृष्टिकोनातूनच आपण विचार करू. रस्त्यावर जेवढी अधिक खाजगी वाहने येतील तेवढी अधिक वाहतुकीची कोंडी होत राहील, एवढे वाहतुकीचे साधे गणित आहे. त्याव्यतिरिक्त कायदा किंवा नियमांविषयीचा आपला दृष्टिकोन हा वाहतुकीच्या कोंडीचा दुसरा पैलू आहे, हे मत मी जाणीवपूर्वक मांडत आहे. कारण कोणत्याही यंत्रणेला (म्हणजे सरकारला) दोष देण्याआधी त्या समस्येविषयीचा आपला स्वतःचा दृष्टिकोन कसा आहे यावर दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत आपण पुणेकरांविषयी जेवढे कमी बोलू तेवढे चांगले.आपण लाल सिग्नल तोडतो, आपण चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहने चालवतो, आपण इंडिकेटर दाखवता आपल्या मूडप्रमाणे वळतो, आपण रस्त्यावर कुठेही थांबतो आपण मजेसाठी हॉर्न वाजवतो. थोडक्यात, आपण वाहतुकीचा प्रत्येक नियम पायदळी तुडवतो आपल्यासाठी वाहने चालवणे म्हणजे केवळ वाहने खरेदी करणे परवाना नावाचा दस्तऐवज मिळवणे एवढेच नव्हे. आपण विसरतो की या दोन गोष्टींसह चालक म्हणूनही आपली जबाबदारी येते, मग ती दुचाकी असो किंवा चार-चाकी त्याचा परिणाम म्हणजे शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्याचशिवाय, आपल्याला जेव्हा गाडी लावायची असते तेव्हा आपण आपल्याला वाटेल त्याप्रमाणे कुठेही रस्त्यावर गाडी लावतो, ज्याप्रमाणे भटके कुत्रे त्याला लघवी करायची असेल तेव्हा कुठेही लघवी करते. म्हणूनच मी असे म्हणतो की आपल्याला सध्या ज्या वाहतुकीच्या कोंडीचा त्रास होतोय, त्याचे एक मुख्य कारण वाहतुकीविषयी आपला स्वतःचा दृष्टिकोन हेदेखील आहे.

आता, तुम्ही जर पुरेसे पुनरावलोकन करून झाले असेल तर आता आपण आपल्या सर्वात आवडत्या भागाकडे येऊ, तो म्हणजे सरकार वाहतुकीच्या प्रश्नासाठी काय करतेय, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारायला अतिशय आवडतो मात्र त्याचे उत्तर मिळवण्यासाठी आपण काहीही करत नाही, बरोबर? आपण जेव्हा वाहतुकीच्या कोंडीसंदर्भात सरकारविषयी बोलतो तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने पुणे महानगरपालिका (स्थानिक सार्वजनिक संस्था), पोलीस (अर्थातच) मायबाप म्हणजेच नागरी विकास विभाग होय आपण म्हणजे लोकांचाही समावेश होतो. शेवटच्या भागाविषयी आपण आधीच चर्चा केली आहे, म्हणूनच पुणे महानगरपालिकेसंदर्भात बोलायचे झाले तर त्यांच्या दोन जबाबदाऱ्या आहेत, एक म्हणजे रस्ताच्या पायाभूत सुविधा देणे दुसरे म्हणजे सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे. दुर्दैवाने, पूर्वी सध्या, पुणे महानगरपालिकेने केवळ पहिल्या भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते, ते म्हणजे रस्त्याच्या पायाभूत सुविधा. इथेसुद्धा, केवळ रस्ते बांधणी केली जाते मात्र बाकी रस्त्यांची देखभाल करण्याच्यादृष्टीने काहीही ठोस केले जात नाही, केवळ त्यांचे रुंदीकरण केले जाते ज्यावरूनही पुन्हा वादच होतात. रस्त्यांचे अधिकाधिक रुंदीकरण करून जर वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटणार आहे असे आपल्याला वाटत असेल तर आपण खरोखरच सर्वात मोठे शहरी मूर्ख आहोत. त्यानंतर, आपण फक्त रस्ते बांधतो, मोठे पदपथ बांधतो आपण ज्याप्रकारे ते बांधले होते ते तसेच राहतील हे पाहायचे विसरून जातो. रस्ते म्हणजे पार्किंगच्या जागा झाल्या आहेत पदपथ म्हणजे बाजार झाला आहे, हेच आपण इतकी वर्षे पाहात आलो आहोत. यासाठी एक पूर्ण वेळ, तटस्थ, सक्षम, अधिकारी पथक प्रत्येक रस्ता पदपथ तपासण्यासाठी नेमणे ते ज्या हेतूने बांधण्यात आले आहेत त्यासाठीच वापरले जात असल्याचे पाहणे अत्यावश्यक आहे. तेच होताना दिसत नाही हेच वाहतुकीच्या कोंडीचे मुख्य कारण आहे. या पथकामध्ये पुणे महानगरपालिका पोलीस असे दोन्ही विभागातील कर्मचारी असावेत, त्यांचा गणवेश वेगळा असावा त्यांना अधिकारही दिले जावेत. ज्यांचा वापर ते लोकांचा छळ करण्यासाठी नव्हे तर त्यांना वाहतुकीच्या यंत्रणेची भीती आदर वाटावा यासाठी करतील. जर आपल्याला वाहतुकीची कोंडी नावाच्या आपत्तीवर मात करायची असेल तर आपल्याला हेच करावे लागेल.

आता पुणे महानगरपालिकेच्या दुसऱ्या जबाबदारीविषयी बोलू, ती म्हणजे सार्वजनिक वाहतूक; तर, एक लक्षात ठेवा अजूनही जवळपास दहा लाख लोक दररोज पीएमपीएमएलची बससेवा वापरतात म्हणजे शहरातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करतात. मात्र पुणे महानगरपालिकेवर जेव्हा आपणच जन्माला घातलेल्या बाळाचे पालनपोषण करायची वेळ येते (म्हणजे सहाय्य करायची) तेव्हा ती त्याच्याकडे काणाडोळा करते. आता आपण आणखी एक अपत्य दत्तक घेतले आहे ते म्हणजे मेट्रो आपल्याला असे वाटते की मेट्रोमुळे आपले वाहतुकीचे सर्व प्रश्न सोडवले जातील, तर असे होणार नाही, त्यासाठी तिला बसच्या सार्वजनिक वाहतूकीचे त्याचसोबत रिक्षाचेही योग्यप्रकारे सहाय्य आवश्यक आहे. पहिले कारण म्हणजे, मेट्रोला पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी दहा वर्षे लागतील तोपर्यंत शहर सध्या असलेल्या भविष्यात येणाऱ्या वाहनांनी भरून जाईल दुसरे म्हणजे मेट्रो प्रत्येक रस्त्यावर किंवा उपनगरामध्ये जणार नाही, मात्र पीएमपीएमलच्या बस मात्र जाऊ शकतील. आपण मार्गांचा तसेच पायाभूत सुविधांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे जे सध्या होताना दिसत नाही कारण आपल्याकडे योग्य ते मार्ग, बस-थांबे, वेळापत्रक निरीक्षण यंत्रणा नाही, त्यामुळेच आपल्याकडे प्रवासी सार्वजनिक वाहतूक यंत्रणाचा वापर करत नाहीत, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे तेच वाहतुकीची कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. त्याचवेळी नागरिकांनीही सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करता थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे कारण ती तुमच्या दाराशी येणार नाही ती तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे चालणार नाही. तुम्हाला तिच्याशी जुळवून घ्यावे लागेल सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वापरताना थोडे शिस्तबद्ध असावे लागेल,जे दीर्घ काळात तुमच्या स्वतःच्या फायद्याचे असेल. पुणे महानगरपालिकेने पीएमपीएमलची जबाबदारी घेतली पाहिजे तिला हरतऱ्हेने मदत केली जाईल याची खात्री केली पाहिजे, मग तो वित्त पुरवठा असेल, जागेसारख्या पायाभूत सुविधा असतीलकिंवा प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेची देखरेख असेल,यामुळे वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. त्याचवेळी पुणे महानगरपालिकेचे मायबाप म्हणजेच नागरी विकास खात्याने पुणे महानगरपालिकेला सार्वजनिक वाहतूकीला पूरक अशी धोरणे तयार करण्यासाठी विशेषतः पार्किंगच्या संदर्भातील मार्गदर्शन केले पाहिजे (जोर दिला पाहिजे). पार्किंगसाठी आणखी जागा म्हणजे आणखी खाजगी वाहने, त्याऐवजी पार्किंगच्या सार्वजनिक जागा खाजगी तसेच सार्वजनिक वाहनांसाठी उपलब्ध करून द्या केवळ प्रत्येक तासासाठी नव्हे तर प्रत्येक मिनिटासाठी पैसे आकारा.

शेवटचा मुद्दा म्हणजे, पोलीस केवळ लाल सिग्नल तोडणाऱ्या प्रवाशांना थांबवतात तेदेखील महिना अखेरीला, हे पुण्याच्या रस्त्यांवरील कटू सत्य आहे. त्याऐवजी पोलीसांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांचा आदर पालन करायला लावले पाहिजे या पैलूवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे सध्या होताना दिसत नाही. एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालविण्याची हिंमत कशी करू शकते किंवा लाल सिग्नल कशी तोडू शकते किंवा त्याचे वाहन रस्त्याच्या मध्यभागी कसे लावू शकते, याचा आपण कधी विचार केला आहे का? याचा कारण म्हणजे आपल्याला माहिती असते की आपण वरील सर्व गैरकृत्य केली तरीही आपल्याला काहीही होणार नाही, हे तसेच रस्त्यावरील अपघात ही वाहतुकीची कोंडी होण्याची मुख्य कारणे आहेत पोलीसांनी यावर कृती केली पाहिजे.

इथेच वाहतुकीच्या कोंडीच्या बाबतीत रिअल इस्टेटचा संबंध येतो, कारण एक चांगले शहर म्हणजे असे ठिकाण जिथे लोकांना स्थायिक व्हावेसे वाटते चांगली सार्वजनिक वाहतूक तसेच प्रवासासाठी लागणारा कमी वेळ हे चांगल्या शहराच्या व्याख्येतील मुख्य घटकांपैकी एक आहेत. अनेक बंगलोरसारख्या शहरातून बाहेर पडत आहेत याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना त्यांच्या घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवासासाठी खर्च करावा लागणारा वेळ पुण्यातील रिअल इस्टेटने या पैलूची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे, रिअल इस्टेट पीएमपीएमएल मेट्रोच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण कल्पना, संकल्पना राबवू शकते. ज्यामुळे अधिकाधिक लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकतात कारण वाहतूकीच्या कोंडीवर हाच तोडगा आहे. शेवटी मी इतकेच म्हणेन की, वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी ही शहराच्या आरोग्याविषयी धोक्याचा इशारा आहे आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर जेन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपल्या शहराच्या मृत्यूसाठी आपणच केवळ जबाबदार असू कारण या इशाऱ्याकडे  आपणच दुर्लक्ष केले होते, हे लक्षात ठेवा पुणेकरांनो!

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -smd156812@gmail.com

You can find our English version @ link below.

https://visonoflife.blogspot.com/2022/11/traffic-jams-city-real-estate.html















 

No comments:

Post a Comment