Tuesday 7 March 2023

भरतपूरमधील पक्षी वैभव व आपली जबाबदारी !

 









































निरव शांतता असलेली चर्च, जंगले, वाचनालये यासारखी स्थळे नष्ट होत चालली आहेत. या शांततेमध्येच आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकता येतो जो आपल्याला खरी शांतता देतो.”
… 
… जेम्स रोझ.
या उत्तम लेखकाविषयी फारशी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही परंतु त्यांच्या कामाविषयी त्यांच्याच शब्दातील खालील प्रस्तावनेमधून बरेच काही समजते, “मी पलायनवादी साहित्य लिहीतो. जे तुम्हाला वास्तवाकडे दुर्लक्ष करायला लावते असे साहित्य नाही, तर जे तुम्हाला आभासी दुनियेतून निरस जगामध्ये बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेतून बाहेर पडायला मदत करते, हे जग भीतीमुळे मर्यादित झाले आहे त्यामध्ये कोणतीही जादू नाही! मला चर्चमधल्या शांततेविषयी फारसे माहिती नाही (अर्थात एक स्थापत्य अभियंता म्हणून मला त्यांच्याविषयी कुतूहल नक्कीच वाटते) परंतु मला वाचनालयातील तसेच जंगलांमधील शांतता माहिती आहे किंबहुना मी ती जगलो आहे. म्हणूनच भरतपूर नावाच्या ठिकाणाविषयी लिहीताना, लेखाची सुरुवात करताना मी जेम्स रोझॉफ यांच्या वरील शब्दांची निवड केलीअनेक लोक (वन्यजीवप्रेमी) भरतपूरला केवलादेव पक्षी अभयारण्य म्हणून ओळखतात जे त्याचे अधिकृत नाव आहे हे नाव त्या जंगलातील ग्रामदेवतेमुळे देण्यात आले आहे. तरीही जेव्हा भरतपूरचा उल्लेख केला जातो तेव्हा सामान्य जनतेच्या डोळ्यासमोर पक्षीनिरीक्षणच येते. ज्याप्रमाणे बाटलीबंद पाणी म्हटले की आपल्याला फक्त बिसलेरीच आठवते, त्याचप्रमाणे पक्षीनिरीक्षण म्हटले की भरतपूरचेच नाव घेतले जातेमी भरतपूरला फक्त पक्ष्यांची छायाचित्रे काढण्यासाठी गेलो नव्हतो (मी काही गंभीर पक्षी निरीक्षक नाही), तर जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. मी या ठिकाणाला दहा वर्षांपेक्षाही अधिक काळापूर्वी भेट दिली होती त्यावेळी हिवाळ्यातली गोठवणारी सकाळ, धुक्यातून केलेली भटकंती, विविध पक्ष्यांचा अखंड किलबिलाट (कर्कश्श आवाजही) शांतता अनुभवली होती, मी घरातून बाहेर पडण्याआधीच या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. दिल्ली ते भरतपूर हा प्रवास ( परतीचा प्रवास) ज्यांना अस्सल ढाब्यावरचे जेवण आवडते त्यांच्यासाठी स्वर्गच आहे, कारण हा मार्ग हरियाणा उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यातून जातो ही दोन्ही राज्ये खाद्यप्रेमींसाठी स्वर्ग आहेत. जर हरियाणातील रस्त्यांवरून प्रवास करताना पराठे, डाळ आणि शेतातील ताज्या भाज्यांचा आस्वाद घेता येतो तर उत्तर प्रदेशातील रस्त्यांवरून जाताना मथुरेचे पेढे, जिलबी-रबडी इतरही मिष्ठान्नांवर ताव मारता येतो. जसा मी निस्सीम पक्षी प्रेमी नाही तसाच मी अस्सल खाद्यप्रेमीही नाही, तरीही तुम्ही भरतपूरमधील पक्ष्यांच्या दर्शनाने शांततेमुळे मंत्रमुग्ध झाला नाहीत अथवा रस्त्याच्या कडेला थाटलेल्या ढाब्यांवरील खाद्यपदार्थांचे कौतुक केले नाहीत, तर एखाद्या गॅरेजमध्ये जाऊन स्वतःला तपासून घ्या. कारण यशस्वी होण्याच्या नादात तुम्ही कदाचित यंत्रवत झाला असाल हे तपासून पाहण्यासाठी तरी तुम्ही अधून-मधून भरतपूरला भेट दिली पाहिजे. दिल्ली विमानतळावर उतरल्यापासून चांगल्या-वाईट अनुभवांची सुरुवात झाली, म्हणजे पहिल्यांदा
 मी विमानतळावर अगदी तपशीलवार सूचना फलक पाहिले उदाहरणार्थ शौचालय / मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर आहे त्यासोबत कोणत्या दिशेला आहे हे बाणाने दाखवण्यात आले होते, यामुळे तातडीच्या वेळी
 
खरोखरच मदत होते (हाहाहा). परंतु दुसरीकडे विमानतळाबाहेर वाहतूक व्यवस्थापनाच्या नावाखाली पूर्णपणे सावळा गोंधळ होता. मला भरतपूरसाठीच्या माझ्या कॅबपर्यंत पोहोचायला तब्बल ४० मिनिटे लागली!
एकदा कॅबमध्ये बसल्यानंतर, नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे आम्ही लवकरच दिल्लीबाहेर पोहोचलो (सुखद धक्का) रस्त्याला लागल्यावर मी आमच्या चालक मित्राला, सुरिंदरला जेवणासाठी पहिल्या ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली
(सरपंच ढाबा, हाहाहा), भरतपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. मी बाहेर जे पाहात होतो, म्हणजे या मार्गामध्ये ज्या वेगाने शहरीकरणामुळे शेती तसेच वन्यजीवन (अर्थात हरियाणामध्ये त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे) गिळंकृत होत आहे ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले, म्हणजे उत्तर प्रदेशातील अतिशय दुर्गम भागातही हीच परिस्थिती होती. कोणत्याही खेड्यामध्ये, गावामध्ये किंवा शहरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्यांचे ढीग साठले होते.  रस्त्याच्या कडेने पसरलेला कचरा हे दृश्य आता भारतात सगळीकडे दिसते (माननीय मोदीजी, योगीजी, देवेंद्रजी अमित शहाजी, जर कधी हा लेख तुमच्या वाचण्यात आला तर यातील कचऱ्याच्या मुद्द्याकडे आवर्जून द्या अर्थात तसे होण्याची शक्यता कमी आहे) वन्यजीवनासाठी तो सर्वात मोठा धोका झाला आहे कारण त्यामुळे प्राण्यांचे पक्ष्यांचे नैसर्गिक अन्न तसेच अधिवास प्रदूषित होत आहेत.  भरतपूरमध्ये आल्यानंतर मी बर्डर्स इन, या एका लहान कोठीसारखी रचना असलेल्या हॉटेलमध्ये राहायला गेलो. ते राहण्यासाठी अतिशयआरामशीर आहे अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून अगदी पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर आहे इथले जेवण अतिशय उत्तम आहे. हिवाळ्यातील एका कुडकुडत्या सकाळी मी पायीच अभयारण्याच्या दिशेने निघालो कॅमेरा घेऊन एक सायकल रिक्षा माझ्या मागे येत होती, जे या जागेचे आणखी एक आकर्षण आहे. कारण तुम्ही जेव्हा छायाचित्रे काढत अशता किंवा पक्षी निरीक्षण करत असता तेव्हा तुम्ही जिप्सीमध्ये किंवा कोणत्याही स्वयंचलित वाहनामध्ये आरामात फिरू शकत नाही. याची दोन कारणे असतात, अचानक झालेल्या हालचालींनी पक्ष्यांना त्रास होतो इंजिनाच्याआवाजामुळे अडथळा येतो, परंतु सायकल रिक्षा म्हणजे वरदान आहेअनेक पर्यटकांना असे वाटते एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये रिक्षावाल्यांना पायडल मारायला लावणे म्हणजे क्रूरपणा आहे, परंतु ती अभयारण्याची गरज आहे त्यावर त्यांचा उदरनिर्वाहही चालतो, अशा ठिकाणच्या वन्यजीवनाचे संवर्धन करण्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे हे विसरू नका. मला सर्वप्रथम जाणवलेली गोष्ट म्हणजे, भरतपूर शहर आकाराने वाढले आहे गेल्या दशकभरात विकास अभयारण्याच्या सीमारेषांपर्यंत पोहोचला आहे, हे धोकादायक आहे कारण या अभयारण्याला तीन बाजूंनी कोणतेही बफर क्षेत्र नाही पक्ष्यांसाठी भविष्यात हे त्रासदायक होणार आहे (आधीच झालेले आहे).अभयारण्याच्या भिंतीला लागून असलेल्या खुल्या मैदानांवर शहरातील कचरा टाकला जातो कुजलेले मांस खाणाऱ्याघार शहरातील कावळ्यांसारख्या पक्ष्यांमुळे अभयारण्यातील पक्ष्यांना त्रास होतो, कारण मी पहिल्यांदाच अभयारण्याच्या मुख्य भागावर घारींना घिरट्या घालताना गरुडावरही हल्ला करताना पाहिले. होय आणखी एका गोष्टीमुळे अतिशय निराशा झाली ती म्हणजे अभयारण्याच्या मध्यवर्ती भागातील (उपाहारगृहातील) सार्वजनिक शौचालयांमधील अस्वच्छता.
तेथून येणारा दुर्गंध इतका भयंकर होता की त्याला लागूनच असलेल्या खुल्या जागेमध्ये एक अजगर ऊन खात पडलेला होता, परंतु दुर्गंधीमुळे कुणीही त्याच्या जवळ जाऊन तो पाहण्याची तसदी घेतली नाही. सगळीकडून पाणी बाहेर येत होते गळतहोते. लोकहो हे जागतिक वारसा स्थळ आहे येथे येणारे पन्नास टक्के लोक विदेशी आहेत. केवलादेव अभयारण्यासारख्या ठिकाणांहून ते कोणत्या प्रकारच्या आठवणी घेऊन जातील याचा कृपया विचार करा. येथे कॉर्पोरेट कंपन्यांनीही आपले योगदान दिले पाहिजे. प्रिय अदानी अंबानी ( हे आवाहन इतरांसाठीही आहे), हा लेख जर तुम्ही वाचत असाल (अर्थात ही शक्यताही जवळपास नाही) तर केवळ केवलादेव अभयारण्यातीलच नाही तर या देशातील प्रत्येक जंगलातील सार्वजनिक शौचालय दत्तक घ्या मी खरोखरच सांगतो वन्यजीवनासाठी ते फार मोठे योगदान असेल.
माफ करा लोकहो, तुम्ही माझ्या लेखातून फक्त भरतपूरचे सौंदर्य पक्षीनिरीक्षणाच्या अनुभवाची अपेक्षा करत असाल तुमची निराशा झाली असेल किंवा लेखामुळे आत्तापर्यंत कंटाळला असाल, तर मला तुम्हाला सांगावेसे वाटते की ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी अतिशय उत्तम पक्षी पाहता येतात मात्र त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मला तो धोका दिसत असत असल्यामुळे राहावत नाही म्हणूनच मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण त्यामुळे या धोकादायक परिस्थितीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. यावर्षी झालेला मुसळधार पाऊस हा आणखी एक धोका आहे कारण केवलादेव ही उथळ जमीन आहे अनेक वर्षांपासून कालव्याचे पाणी इकडे वळवले जाते जमीन भरली जाते ज्यामुळे येथे कालांतराने पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला. परंतु यावर्षी पाण्याचा ओघ अतिशय जास्त होतो संबंधित अधिकाऱ्यांनीही हा पावसाचा घटक विचारात घेतला नाही असे दिसते. फेब्रुवारीमध्येही अनेक ठिकाणी बरेच खोलवर पाणी असल्यामुळे बगळा पाणकोळ्यासारखे पक्षी अन्नासाठी अंडी घालण्यासाठी अभयारण्याच्या बाहेर शेतांमध्ये गेले. तरीही तेथे करकोचा, पाणबुडा, पाणकावळा बदके यासारखे निवासी पक्षी होते परंतु स्थलांतर फारसे झाले नव्हते, असेही गाईडने सांगितले.त्याचप्रमाणे हरिण कोल्हा, तरस यासारखे शिकारी सस्तन प्राणीही दुसरीकडे गेले आहेत, तसेच अभयारण्यामध्ये पाणवठ्यापर्यंत रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू असलेलेही मला दिसले यामुळे या सस्तन प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला (हे मला गाईडनी सांगितले) आहे, यामुळे इथे तरस आता क्वचितच दिसतात. मला अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत समजत नाही (म्हणजे वन विभाग किंवा सरकार) विशेषतः भरतपूरसारख्या ठिकाणी, जेथे एखाद्या लहानशा चुकीमुळेही सर्व प्रजातींच्या संपूर्ण जीवनचक्राचा समतोल बदलू शकतो. याचे कारण म्हणजे हे अभयारण्य जेमतेम २५ चौरस किमीच्या परिसरात आहे काहीही नुकसान झाले तर ते वेगाने पसरते.म्हणूनच ते या व्यवस्थेचा दैनंदिन भाग असलेल्या लोकांना विश्वासात का घेत नाहीत त्यांनी दिलेल्या माहितीमुळे सकारात्मक बदल होऊ शकतात. सरकारमधील लोकांमध्ये नेहमीच रस्सीखेच चाललेली असते, त्यांना असे वाटते की केवळ तेच एकमेव यंत्रणा आहेत, परंतु वन्यजीवनाच्या यंत्रणेचा विचार केल्यास वन्यजीवनाच्या अधिवासाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंधित प्रत्येक घटकाचा त्यामध्ये समावेश होतो. अगदी रिक्षावाल्यालाही अशा पायाभूत सुविधांच्या कामांमुळे किंवा
 
पाण्याचे व्यवस्थापन अयोग्यप्रकारे केल्यामुळे अधिवासाला कसा मूलभूत धोका निर्माण होतो हे समजले आहे, त्यामुळेच त्यांची किमान मते जाणून घेण्यात काहीच गैर नाही, जे वनविभाग कधीच करत नाही. आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला तो म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या गोल्फ कार्ट, ज्यांना माणसांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिक्षा फारच संथपणे चालतात असे वाटतात त्यांच्यासाठी या आहेत. परंतु मला असे वाटते अभयारण्यामध्ये चालत भटकंती करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे म्हणजे तुम्ही हिवाळ्यामध्ये केवलादेवच्या धुक्याने भरलेल्या रस्त्यांशी(दुर्दैवाने त्यातील आता बरेचसे नाहीसे झाले आहेत.) एकरूप होऊ शकाल. तुम्हीरस्त्यांवरून चालत असताना, लांबवर एखादी हरिणाची आकृती तुमच्याकडे पाहात असल्याचे तुम्हाला दिसते. हे दृश्य तुमच्या आठवणींमध्ये कायमचे कोरले जाते, त्याच्याच सोबत बदकांचा एक थवा भरारी घेतानाचा आवाज तुम्हाला ऐकू येत असतो. या अशा काही गोष्टी आहेत ज्या भरतपूरमध्ये हरवून गेलेल्या नाहीत, त्यामुळे यंत्रणेसंदर्भात नकारात्मक घटक किंवा अभयारण्याला असलेले धोके या गोष्टी मी विसरलो, अर्था आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अभयारण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये मुख्य पाणवठ्यापाशी फ्रूट बॅटने (वटवाघुळांची एक प्रजाती) त्यांची वसाहत तयार केली आहे त्यांची छायाचित्रे काढणे किंवा दिवसा त्यांचे अखंडपणे सुरू असलेले काम पाहाणे हा अतिशय अद्भूत अनुभव होताया सफारीचा सर्वोत्तम भाग होता तो म्हणजे पाणबुड्या पक्षांना मासेमारी करताना पाहाणे, म्हणजे तुम्हाला एका लहान तळ्याच्या काठावर बसून, हे पाणबुडे पाण्यात बुडी मारताना पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर एक मासा घेऊन येताना पाहात बसायचे असते. हा पाणबुडा, मासा हवेत उडवून तो गिळंकृत करतानाचा क्षण तुम्हाला अचूकपणे टिपावा लागतो. मी खरोखरच सांगतो, हे शब्दात लिहीणे अतिशय सोपे वाटत असले तरीही, तुम्हाला अचूक छायाचित्र मिळण्यासाठी एक दिवसही लागू शकतो, एवढ्या या सगळ्या गोष्टी झटपट अनपेक्षितपणे होत असतात. सर्वप्रथम, पाच ते सहा पाणबुडे एकाचवेळी पाण्यामध्ये पोहत असतात; दुसरी गोष्ट म्हणजे,पाणबुडे एका जागी बुडी मारतात जेथे बुडी मारली तेथून २० ते ३० फूट लांब कुठेही पाण्याच्या पृष्ठभागावर येतात तिसरे म्हणजे, या पक्ष्याची निमुळती मान पाण्याच्या वर असते पाण्याच्या निळ्या-करड्या रंगाच्या पार्श्वभूमीवर क्षणार्धात लक्ष केंद्रित करणे अजिबात सोपे नाही. परंतु मजा म्हणजे तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इतके गुंगून जाता की लोकांची हेच करण्यात अख्खा दिवस घालण्यासही काही हरकत नसते.
या सफारीमध्ये नशीबाने सारस क्रौंच पक्षांची जोडी पाहाता आली, विचार करा २५ किलोमीटरच्या परिसरामध्ये केवळ एकच जोडी होती. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जाऊ शकतात, तर तुम्हाला सायकल रिक्षाने जायचे असते. सारस क्रौंच पक्षांचे आवाज अतिशय फसवे असतात, त्यांची कर्कश्श किंकाळी अगदी लांबवरूनही ऐकू येऊ शकते मात्र तो आवाज अगदी जवळून येतोय असे वाटते. एके दिवशी संध्याकाळी आम्हाला चितळांचे इशारा देणारे चित्कार ऐकू आले (हरिणाला एखादा धोका दिसल्यानंतर काढले जाणारे विशिष्ट आवाज) मला कुतूहल वाटले की या ठिकाणी त्यांना एवढी कशाची भीती वाटत असावी. मागे प्रवेशद्वारापाशी एक सूचना लावलेली दिसली की अभयारण्यामध्ये चित्तेही दिसतात    
                                                                                                                                 
वन्यजीवन प्रेमींसाठी ही अतिशय चांगली बाब आहे परंतु पर्यटकांच्या हालचालींसाठी अभयारण्याच्या सुरक्षिततेसाठी ती अतिशय वाईट गोष्ट आहे. चित्ता हा अतिशय लाजाळू प्राणी आहे त्याला माणसांची भीती वाटते तरीही पक्षी निरीक्षण करताना तसेच कोल्हे तरसासारख्या लहान शिकारी प्राण्यांसाठी ते त्रासदायक ठरू शकतात, ज्यांना असाही शहरीकरणामुळे धोका निर्माण झाला आहे.भऱतपूरसारख्या ठिकाणी तुम्हाला एका दिवसात कंटाळा येऊ शकतो (असे असेल तर मग स्वतःला तपासा) किंवा तुम्ही काहीही करता अभयारण्याच्या परिसराशी एकरूप होऊन सगळे दिवस घालवू शकता. मी दुसरा पर्याय निवडला तेथील परिस्थितीसंदर्भातील नकारात्मक बाबी विसरून गेलो, तिथले धुके, थंडी, पक्षी रस्त्यांमध्ये आणि हो हॉटेलमधील राजस्थानी जेवणामध्ये हरवून गेलो. तुम्ही भरतपूरसारख्या ठिकाणाला भेट देता तेव्हा पक्ष्यांविषयी, ते कसे जगतात याविषयी जास्तीत जास्त प्रश्न विचारा, जे सस्तन प्राण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते तुम्हाला जे वैविध्य पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही थक्क होता. तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला दोन पक्ष्यांमधला फरक समजणार नाही इथे असे काय विशेष आहे सगळे पक्षीच तर आहे असा विचार करून लवकरच तुम्हाला कंटाळा येईल. खरेतर, पक्षी पाहाणे त्यांचे निरीक्षण करणे हे वाघ दिसण्यापेक्षाही अधिक अवघड आहे रोचकही आहे; केवळ ही संपूर्ण प्रक्रिया किती सुंदर आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे ते करताना संयम ठेवला पाहिजे.

परतीच्या मार्गावर मला अभयारण्यातील ती भिंत आठवली जिच्यावर १९३२ सालापासून बदकांच्या शिकारीची आकडेवारी दरवर्षी कोरली जात असे कारण ती स्थानिक महाराजांची खेळाची (शिकारीची) जागा होती हे आकडे हजारोंमध्ये आहेत. सुदैवाने, आज केवळ बदकांचीच नव्हे तर कोणत्याही प्राण्याची किंवा पक्ष्यांची शिकार हा गुन्हा आहे तरीही अशा जागांच्या योग्य त्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने आपण ते शिकारी जेवढ्या बदकांची शिकार करत असत त्याहीपेक्षा अधिक बदकांना मारू. कारण ते फक्त पक्ष्यांची शिकार करत असत आपण तर त्यांचे घरच नष्ट करत आहोत, हाच विचार मनात घेऊन मी भरतपूरमधून बाहेर पडलो, परंतु त्याचसोबत लवकरच पुन्हा येण्याचे लोकांना निसर्गाच्या या सुंदर ठेव्याविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचेआश्वासनही दिले!

-

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

संपर्क : 098220 37109

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

 

 

 

 









No comments:

Post a Comment