Thursday, 23 March 2023

ताडोबा ; जंगलांकडून शिकताना !

 
































जंगलाशी हितगुज करा कारण  जंगल नेहमीच तुमच्याशी बोलायला उत्सुक असते!     .” …  मेहमतमुरातइल्दान

मेहेमत मुरात इल्दान यांचा जन्म १६ मे रोजी तुर्कीच्या पूर्व भागातील इलाझिग येथे झाला. त्यांच्या वडिलांची १९७५ साली तुर्की संसदेवर,सिनेट सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे शिक्षण राजधानी अंकारा येथे सुरू राहिले.मेहमत मध्य-पूर्व-युरोपीय देशातील एका राजकारणी वडिलांचा मुलगा असला तरीही जग त्यांना ओळखते एक नाटककार, कवी, कादंबरीकार विचारवंत म्हणून. अलिकडे माझे जे लेख जंगलांविषयी असतात त्या लेखांकरिता   मेहमत यांच्या शब्दांमुळे मला या लेखांची सुरुवात करताना खूपच मदत होते, विशेषतः जेव्हा मला प्रत्येक भेटीमध्ये जंगलाकडून जे शिकायला मिळते ते सांगायचे असते तेव्हा.माझी अलिकडची ताडोबाची भेटही अशीच होती, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे हे आपण सगळे जाणतो परंतु माझ्यासाठी  हे ठिकाण माणूस प्राण्यांच्या सहजीवनाचे उत्तम उदाहरण आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.त्याचसोबत मला जंगलांमध्ये काही संस्मरणीय अनुभव मिळतात, काही गोष्टी समजतात, ताडोबामध्ये अवती-भोवती राहणाऱ्या व्यक्तींना भेटता येते.यावेळी आणखी एक कारण होते ते म्हणजे स्वेटर वितरण करण्याची मोहीम, जी आम्ही मोहार्ली कोलारा प्रवेशद्वारापाशी जिप्सी (सफारीसाठी वापरली जाणारी वाहने) चालकांसाठी आयोजित केली होती कारण हे  ड्रायव्हर्स गाईड जंगलांदरम्यान अतिशय महत्त्वाचा दुवा आहेत. ज्याप्रमाणे गाईडना अधिकृतपणे वन्यजीवनाविषयी प्रशिक्षण देण्यात आले असते तसे जिप्सी चालकांना नसते. परंतु यापैकी बहुतेक लोक स्थानिक असतात जंगल पाहात किंबहुना जंगलातच राहून लहानाचे मोठे झालेले असतात इतर कोणत्याही वन्यजीव तज्ञाएवढीच त्यांना माहिती असते. किंबहुना जिप्सी चालकांचे काम अतिशय अवघड असते,या व्यक्तीला दररोज पहाटे वाजता उठावे लागते तुमच्या पाठीच्या कण्याची तसेच डोळ्यांची परीक्षा घेणाऱ्याओबडधाबड रस्त्यांवर वाहन चालावावे लागते तसेच वाघांच्या हालचालींवर डोळे कान ठेवावे लागतात तुमच्या गाडीतील , पर्यटक छायाचित्रकार असतील तर तुमचे वाहन अशाप्रकारे लावावे लागते की त्यांना चांगले छायाचित्र मिळेल, हे सारे काम सोपे नसते. आम्हाला असे वाटते की आम्ही त्यांना स्वेटर देण्याच्या लहानशा कृतीमुळेही त्यांचे मनोधैर्य अतिशय वाढू शकते. रेंज वन अधिकाऱ्यांच्या हस्ते आम्ही शंभराहून अधिक जिप्सी चालकांना स्वेटरचे वितरण केले

इथे (नेहमीप्रमाणे) मला वन्यजीवन पर्यटनाविषयी आमच्या दृष्टिकोनाविषयी माझे मत मांडायचे आहे, आपण जंगलात जातो, वन्यजीवनाचा आनंद उपभोगतो, छायाचित्रे काढतो, सफारींवर, हॉटेलांवर, अन्नावर पैसे खर्च करतो ही चांगली गोष्ट आहे कारण हा सगळा पैसा स्थानिकांसाठी वापरला जातो. परंतु जेव्हा थोडे जास्त काही करायची वेळ येते, वन्यजीवन चक्रातील अशा घटकांना काहीतरी देण्यासाठी मदत करायची असते, तेव्हा आपल्यापैकी अतिशय थोडे लोक पुढे येतात , त्यासाठी पैसे खर्च करतात. 

यामुळे खरे तर वन्यजीवनाला मोठी मदत होऊ शकते तसेच पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की तुमच्या कंपनीच्या ग्राहकांच्या नजरेसमोर तुमच्या ब्रँडची चांगली प्रसिद्धीही होऊ शकते. प्रसिद्धी अशाप्रकारे वापर करण्यात काहीच गैर नाही कारण जगताना मदत आवश्यक आहे. तुम्ही त्या मदतीचा वापर कशाप्रकारे करताय, हा तुमचा निर्णय आहे. शेवटी हे सगळे केवळ वन्यजीवन संवर्धनासाठीच आहे जे शाश्वत व्ह्ययला पाहिजे होते. अतिशय कमी भारतीय व्यवसाय समूह ( व्यावसायिक) अशाप्रकारे विचार करतात, परिणाम वन्यजीवन संवर्धनासाठी तर कोणत्याही स्वरूपात निधीची कमतरताच असते. मी वैयक्तिक पातळीवर त्यासाठी प्रयत्न करतो तसेच आमची संस्था जंगल बेल्सतर्फे (हेमांगी आरती यांच्याद्वारेसंचलित) आम्ही थोडे प्रयत्न करतो हे स्वेटर दान करण्याची मोहीम अशा प्रयत्नांचाच एक भाग होती.

तसेच मला उन्हाळ्याच्या सुरुवातीला ताडोबामध्ये जायला अतिशय आवडते कारण अजूनही उन्हाचा तडाखा पूर्णत्वाने जाणवत नसतो, सकाळी दहा वाजेपर्यंत आल्हाददायक वातावरण असते, रात्री थंड आभाळ निरभ्र चांदण्यांनी भरलेले असते. ते बघत रात्रभर जागे राहावे असा मोह तुम्हाला होत असतो परंतु सकाळच्या सफारीसाठी लवकर उठायचा ताण असल्याने तुम्ही झोपी जाता तुम्ही अभयारण्यापासून जवळ असलेल्या एखाद्या रिसॉर्टमध्येराहातअसल्यास (प्रत्यक्ष संरक्षित जंगल) तुम्हाला रात्री प्राण्यांचे चित्कार वाघांच्या डरकाळ्याही ऐकू येत असतात, या सगळ्या गोष्टींमुळे ताडोबाची प्रत्येक सफारी अधिकच संस्मरणीय होते हो आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांना भेटणे त्यांच्या गोष्टी जाणून घेणे. खरेतर लोकांना भेटल्यामुळे जंगलामध्ये राहतानाच्या त्यांच्या गोष्टी जाणून घेतल्यामुळे आपल्याला

 जंगलांविषयी अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यास मदत होते जे आपल्यापैकी बहुतेक लोक काळ्या पिळव्या पट्ट्यांवर आपले लक्ष केंद्रित करताना विसरून जातात. दोन गोष्टी होतात, जंगलातील लोक तुम्हाला जंगल ज्या गोष्टी सांगते त्या ऐकायला मदत करतात                                   

 

(किंवा त्या कशा ऐकायच्या हे तुम्हाला शिकवतात) दुसरी गोष्ट म्हणजे वन्यजीवनाची उत्तम छायाचित्रे काढणे म्हणजे तुम्हाला जंगल समजले आहे असा अर्थ होत नाही,वन्यजीवनाविषयीचा प्रत्येक पैलू समजून घेतल्याने तुम्हाला जंगल समजून घेता येते खरी गंमत त्यातच आहे. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या जंगलाच्या भेटींदरम्यान तुम्हाला शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांना भेटणे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे हा आहे त्यानंतर तुम्हाला ताडोबा यासारख्या ठिकाणांचे हृदय (किंवा आत्मा) काय आहे हे समजेल.

यावेळी मी बंटी दहुले या स्थानिक मुलाला भेटलो, त्याने २० वर्षांपूर्वी ताडोबामध्ये गार्डन म्हणून   त्याच्या कामाची सुरुवात केली. त्याच्याकडे कोलाराच्या बाजूला जमीनीचा एक तुकडा होता ज्यावर त्याने नागपूरमधील मित्रांच्या मदतीने तारुवनं नावाचे रिसॉर्ट सुरू केले. या रिसॉर्टमध्ये आज केवळ जेवणाची उत्तम सोयच नाही तर जवळपास तीस स्थानिक तरुणांना त्याने रोजगारही दिला आहे.रिसॉर्टव्यतिरिक्त बंटी नागपूर किंवा जवळपासच्या ठिकाणांहून पर्यटकांना आणण्याची पोहोचवण्याची सेवाही देतो. त्याने हा टॅक्सी सेवेचा व्यवसायही वाढवला असून त्याच्याकडे जवळपास पाच कारचा ताफा आहे. लोकहो बंटीच्या उलाढालीच्या आकडेवारीवर जाऊ नका कारण आपल्या पुण्या-मुंबईतल्या व्यवसायांच्या तुलनेत ती अत्यल्प वाटत असेल परंतु हे व्यवसाय वन्यजीवन संवर्धनासाठी ज्याप्रकारे मदत करत आहेत ती पाहाकारण एकीकडे मध्य भारतातील तरूण पिढी (जिचा ताडोबा हा देखील एक भाग आहे) नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी किंवा अधिक चांगल्या जीवनासाठी (या पैलूवर टिप्पणी करणार नाही) पुण्या-मुंबईला स्थलांतरित होत आहेत, दुसरीकडे हा स्थानिक मुलगा आहे ज्याने केवळ स्वतः ताडोबामध्येच राहण्याचा निर्णय घेतला नाही तर इतर अनेक तरुणांनाही त्याच्यामुळे असा निर्णय घेणे शक्य झाले आपल्या जंगलांना हेच हवे आहे, स्थानिक स्वतः तग धरून राहिले पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण यंत्रणाच टिकून राहील! 

अनेक जणांना असे वाटेल की मी बंटीसारख्या लोकांची (म्हणजे रिसॉर्ट किंवा व्यवसायांची) व्यावसायिक कारणासाठी जाहिरात करतोय; होय, मी करतोय, कारण तेच आपल्या जंगलांची आशा भविष्य आहेत आपण त्यांना प्रसिद्धी दिली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.

बंटीसारख्या लोकांशी आम्हाला जंगलाच्या प्रवेश द्वारांपर्यंत सोडणाऱ्या त्याच्या टॅक्सी चालकांशी बोलून आम्हाला केवळ जंगलांबद्दलच नव्हे तर ताडोबासारख्या ठिकाणाचे सामुदायिक किंवा सामाजिक जीवन समजले. या रिसॉर्टपासून ते बऱ्याचबफर क्षेत्रातील प्रवेशद्वारापर्यंतचा मार्ग लहान गावांमधून जातो तेथील गावकरी त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी पर्यटकांच्या वाहनांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात असे मला काही जिप्सी चालकांनी सांगितले.रिसॉर्ट गावकऱ्यांमधील संघर्षाचा त्रास पर्यटकांना भोगावा लागण्याऐवजी वन तसेच स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी जंगलातील रस्त्यांना बाह्य वळण मार्ग का तयार करत नाहीत, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो.त्याचवेळी या बहुतेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालये आहेत परंतु त्यांचे दरवाजे चोरीला गेले आहेत येथे पाणी पुरवठा होत नाही तसेच या शौचालयांची सांडपाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही हीदेखील समस्या आहे. यामुळे पर्यटकांना सकाळच्या सफारीसाठी जाताना गावकऱ्यांच्या नजरा चोरून (बहुतेक वेळा महिलांच्या) जे रस्त्याच्या कडेने नैसर्गिक विधींसाठी जात असला, जगताना जावेच लागते पर्यटकांसाठी तसेच गावातील बिचाऱ्या महिलांसाठी ही अतिशय लाजीरवाणी परिस्थिती असते.वनविभाग, आपला पर्यटन विभाग किंवा कॉर्पोरेट कंपन्या या मूलभूत स्वच्छतेच्या समस्येकडे लक्ष देतील का जी मनुष्य-प्राण्यांच्या संघर्षामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. वन्यजीवन पाहण्याच्या बाबतीत,ताडोबाने कधीही मला निराश केले नाही किंबहुना मला जंगलांकडून माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाले आहे ही सफारीही त्याला अपवाद नव्हती किंबहुना यावेळी जे पाहायला मिळाले त्यामुळे ती अपवादात्मक झाली.

ताडोबातील अस्वलाची मादी २० वर्षांची प्रतीक्षा!

मी तीस वर्षांहून अधिक काळापासून जंगलांना भेट देत आहे, ज्यापैकी गेली वीस वर्षे मी हातात कॅमेरा घेऊन जातोय. आपल्या सगळ्यांच्या छोट्या-छोट्या इच्छांची यादी असते, विशेषतः जंगलांमध्ये. अशी इच्छांची यादी असणे म्हणजे कदाचित वेडेपणा असेल परंतु आयुष्यात ( निसर्गात) जर वेडेपणा नसेल काय अर्थ आहे. या अनेक वर्षात या यादीतील अनेक इच्छा पूर्ण झाला आहेत परंतु एक इच्छा मात्र शिल्लक होती ती म्हणजे अस्वलाची मादी तिच्या पिल्लांना पाठीवर घेऊन जात असताना पाहणे (त्याची छायाचित्रे नव्हेत). मला माहितीयमाझ्या इतर अनेक इच्छांच्या यादीपेक्षा ही जरा हटके होती कारण अस्वलांचा स्वभाव विक्षिप्त असतो.                                                                

त्यातच पिल्ले सोबत असतील तर आईचा पवित्रा अधिकच संरक्षक असतो मला मादी अस्वल तिची पिल्ले दिसली तरीही वेळ, परिस्थिती, भौगोलिक स्थिती, ठिकाण त्यातही कॅमेरा हाताळण्याचे माझे कौशल्य (हाहाहा) सर्व काही जुळून आले पाहिजे. मी गेली वीस वर्षे याची वाट पाहात होतो, परंतु मला माहिती होते की तुम्ही एखाद्या ष्टीची मनापासून इच्छा केली तर जंगल तुमचे म्हणणे ऐकते. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ताडोबाशिवाय दुसरी अधिक चांगली जागा कोणती असू शकते, कारण आम्ही पाणवठ्यापाशी वाघाच्या बछड्यांची वाट पाहात होतो आम्ही त्यांना रस्ता ओलांडताना पाहिलेले असल्यामुळे ते कधीना-कधी येतील याची मला खात्री होती म्हणूनच आम्ही इतर वाहनांची वाट पाहात होतो. एक नवीन जिप्सी आली जिप्सी चालकांशी गाईडशी त्यांच्या फेरफेटक्याविषयी अनौपचारिक गप्पा सुरू असताना (जंगलामध्ये याचा अतिशय उपयोग होतो), चालक सहजपणे म्हणाला की पाणवठ्याच्या दिशेने येताना त्याने एक मादी अस्वल तिची पिल्लेपाहिली, परंतु त्यांना वाघ (दुसरे काय) पाहायचा असल्याने ते थांबले नाहीत. बछड्यांचा उल्लेख होताच माझे कान टवकारले आमच्या गाईडला ही जागा कुठे आहे असे विचारले. आमच्या गाईडने चौकशी केल्यावर इथून पाच मिनिटांवर आहे असे सांगितले तेव्हा मी म्हणालो वाघ राहू द्या, आपण अस्वल पाहायचा प्रयत्न करू. हा धोका होता कारण बछडे वाघीण कोणत्याही क्षणी पाणवठ्यावर आले असते अस्वलाच्या शोधात जाणे म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखे होते अस्वल कुठे जाईल याचा काही नेम नसतो. तरीही पिल्ले सोबत असल्यामुळे अस्वलाच्या मादीकडे वेळ कमी असेल उष्मा वाढत असल्यामुळे तीदेखील पाण्याच्या शोधात असेल असा अंदाज मी बांधला आम्ही अस्वलाच्या शोधात निघालो. सुदैवाने, या विभागातील बहुतेक जिप्सी पाणवठ्यापाशी वाट पाहात होत्या त्यामुळे रस्ता शांत होता एका वळणावर आम्हाला एक मादी अस्वल दोन काळ्या लोकरीच्या गोळ्यांसारखी तिची पिल्ले दिसली. अस्वलाच्या मादीला तिच्या पिल्लांसोबत बघण्याचे पहिले उद्दिष्ट साध्य झाले होते आता ती त्यांना पाठीवर घेते चालत जाते हे पाहायचे होते ( तिची छायाचित्रे काढायची होती). त्याच वेळी आम्हाला लांबून आणखी एक जिप्सी आमच्या दिशेने येत असल्याने इंजिनाच्या धडधडण्याचा आवाज आला. मी निराश झालो कारण अस्वल हा अतिशय लाजाळू प्राणी आहे आम्ही वळणावर असल्यामुळे ते आम्हाला पाहू शकत नव्हते परंतु या येणाऱ्याजिप्सीमुळेते नक्कीच पाठीमागील झुडुपांमध्ये पळ काढतील असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही येणाऱ्याजिप्सीला आमचे वरचे डिपरलाईट दाखवले सुदैवाने त्यांना ते समजले ते काही अंतरावर थांबले, यामुळे ती अस्वलाची मादी तिची पिल्ले त्यांच्या अन्नाचा शोध घेत राहिली. त्यानंतर अचानक ती मादी वळली तेव्हा पिल्ले तिच्या पाठीवर उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. ते दृश्य बघून माझ्या छातीचे ठोके वाढले, तो क्षण आला किमान एक पिल्लू मादी अस्वलाच्या पाठीवर चढले होते दुसरे चढण्याचा प्रयत्न करत होते. मी हे दृश्य पाहू शकलो त्याची छायाचित्रेही काढू शकलो. एकेवेळी आमच्या चालकाने जिप्सी चुकीच्या जागी थांबवली त्यामुळे मला हवे तसे छायाचित्र घेता येत नव्हते, मला जेव्हा त्यावेळी राग आला तेव्हा मला जाणीव झाली की मी इतकी वर्षे ज्याची वाट पाहात होतो ती गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर घडते आहे मला फक्त एक चांगले छायाचित्र मिळाले नाही म्हणून वाईट वाटत आहे, मला काय फक्त  छायाचित्रच हवे होते का, मी या इतक्या सुंदर दृश्याचा आस्वाद घेणे अपेक्षित नाही का ! या जाणीवेमुळे मी किती मूर्खासारखा विचार करतोय हे उमगले त्या क्षणापासून मी फक्त त्या मादी अस्वलाकडे पाहात राहिलो मला जी काही छायाचित्रे घेता येतील ती घेतली. मादी अस्वल तिची पिल्ले पाहिल्यामुळे माझी अनेक वर्षांपासूनची इच्छांची यादी त्यात एक इच्छा पूर्ण झाली परंतु मला जाणीव झाली की तुम्हाला जे काही मिळाले आहे त्यामुळे आयुष्य खरोखरच अतिशय सुंदर झाले आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही मिळालेले नाही त्यासाठी कुढत बसू नका. ही ताडोबाची शिकवणच होती एक प्रकारची.

 आणखी एक गोष्ट, मी संपूर्ण दिवसाची सफारी घेतली होती मला तुम्हाला सांगावेसे वाटते की उन्हाळ्यामध्ये (म्हणजे अजून उन्हाळ्याची सुरुवात असनाही) ही काही फारशी चांगली कल्पना नाही कारण तुम्ही संपूर्ण दिवसासाठी बरेच पैसे खर्च करता उष्मा तीव्र असतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर (विशेषतः दुपारी) उन्हामध्ये घालवून तुम्हाला विशेष काहीच साध्य होत नाही. तसेच पाण्यामध्ये विसावलेला एखादा वाघ पाहायला मिळाला तर त्याचा अपवाद वगळता, कुणाही प्राणी किंवा पक्ष्यांची काहीही हालचाल नसते. त्यामुळे खरेतर काहीच उपयोग होत नाही, परंतु तुम्हाला केवळ जंगलच पाहायचे असेल तर हरकत नाही असा माझा सल्ला आहे.मी पुन्हा एकदा जंगलामध्ये संयमाचे महत्त्व शिकलो. एका वाघासाठी आम्ही पाणवठ्यापाशी तब्बल आठ तास थांबलो होतो एवढी वाट पाहिल्यानंतर तो पंधरा मिनिटांसाठी आला, यामुळे जंगलामध्ये तुम्ही केवळ दर्शक आहात प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या इच्छेप्रमाणे चालते याची मला जाणीव झाली (पुन्हा एकदा).

 हा संयमच, शारीरिक व्यायामाप्रमाणे, मला माझ्या शहरी जीवनातील निराशा ( विलंबही) हाताळण्यास मदत करतो, जे या जंगलांच्या सफारीचे फलित आहे.

 जीवनाविषयी अशा अनेक गोष्टी शिकून काही अद्भूत दृश्ये पाहून जड अंतःकरणाने (नेहमीप्रमाणे) मी ताडोबाचा निरोप घेतला परंतु त्याने मला जे काही दिले आहे त्याविषयी मनामध्ये कृतज्ञता होती मी जंगलांना काहीतरी परतफेड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे आश्वासनही मनोमन दिले!

 संजय देशपांडे. 

संजीवनी डेव्हलपर्स.

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे मत खालील यूट्यूबलिंकवर पाहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s

 















No comments:

Post a Comment