Tuesday 7 March 2023

सोसायटी म्हणून राहताना !

 
































घराचा संबंध हा जागेपेक्षाही माणसांशी अधिक असतो” …  कॅरा एम. ओब्रायन

कॅरा ओब्रायन या बर्थमार्क्डया त्रिवेणी कथामालिकेच्या लेखिका आहेत. ही कथामालिका वंचित वर्गातील तरुणांच्या जीवनाविषयी आहे. त्यांच्या पुस्तकातील कथानक हवामानातील बदलांमुळे उध्वस्त झालेल्या जगामध्ये घडते. त्यामुळे त्या घर म्हणजे काय हे इतक्या सोप्या शब्दात सांगू शकतात यात काहीच आश्चर्य नाही. जी व्यक्ती हवामानातील बदलाचा जगावर होणाऱ्या परिणामाचा विचार करते तिला नक्कीच मजबूत चांगली घरे बांधण्यासाठी जास्त महत्त्वाचे काय आहे हे माहिती आहे. अनेक दिवसांनी रिअल इस्टेटविषयी माझ्या काही अनुभवण्यात आले रोचक बाब म्हणजे या पैलूविषयी फारसे कुणीही लिहीलेले नाही. रिअल इस्टेटमध्ये सहभागी होण्यातील सर्वोत्तम भाग म्हणजे (ह्या उद्योगाबाबत अजूनही काही चांगल्या गोष्टी आहेत), तुमचा कामाच्या निमित्ताने समाजाच्या व्यापक वर्गाशी संबंध येतो तुम्ही तुमच्या जाणीवा शाबूत ठेवल्या (म्हणजे खुल्या) तर दररोज तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येते सुधारणा करण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे. तुमचा ग्राहक हा एक शिक्षक असू शकतो, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे तरूण जोडपे पण असू शकते, एखादी अनिवासी भारतीय व्यक्ती, यशस्वी व्यावसायिक किंवा उच्च पदस्थ राजनैतिक अधिकारी असू शकतो, या सगळ्यांनाच घर हवे असत हा त्यांच्यातील समान दुवा असतो. यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे हे सगळे एका इमारतीत राहायला येतात ज्यामध्ये त्यांचे घर असते जे तुम्ही बांधलेले असते (म्हणजे तुमच्या चमूने) या सगळ्या कुटुंबांची मिळून एक सोसायटी तयार होते. मला माझी ओळख उघड करता या पूर्ण झालेल्या सोसायट्यांना (मला त्यांना इमारती म्हणायला अजिबात आवडत नाही, तरीही सहजपणे समजण्याच्यादृष्टीने मी इमारती हा शब्द वापरेन) भेट द्यायला रहिवासी ज्या सहजपणे ये-जा करत असतात, आपण ज्या सुविधा त्यांना दिल्या आहेत त्यांचा ते कशाप्रकारे वापर करतात याचे निरीक्षण करायला आपण बांधलेल्या इमारतीविषयी त्यांचे अनुभव ऐकायला अतिशय आवडते.

यामुळे मला आपल्या नियोजनातील अंमलबजावणीतील त्रुटी चांगल्या बाबी समजून घ्यायला मदत होते, तसेच पुढील प्रकल्पामध्ये कुठे सुधारणा करायची हे देखील समजते.

आमच्या अशाच एका पूर्ण झालेल्या प्रकल्पाला नुकतीच भेट दिली असता तेथे सोसायटीच्या अध्यक्षांना भेटायचा योग आला. इमारतीमध्ये जाण्या-येण्याच्या मार्गावर कडेला (ड्राईव्ह वे) पृष्ठभागांवर साबण पाणी वाहात असल्याची त्यांची तक्रार होती. हा गच्ची धुतल्याचा परिणाम होता. त्यामध्ये साबणाचा फेस होता त्यांना अशी काळजी वाटत होती की यामुळे सोसायटीच्या कूपनलिकेचे पाणी प्रदूषित होईल. मी त्यांना सांगितले की घराला लागून असलेली गच्ची अशाप्रकारे धुण्याची गरज नाही, केवळ फरशी आधी ओल्या कापडाने नंतर कोरड्या कापडाने पुसून घेतली तरी पुरेसे आहे, सोसायटीने हे रहिवाश्याना सांगितले पाहिजे. तसेच एवढ्याशा पाण्यामुळे कूपनलिकेतील पाणी प्रदूषित होत नाही, ते पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये जाईल तेथे ते गाळले जाऊन मग जमीनीत जाईल. यानंतर ते कूपनलिकेच्या पाण्यात जाऊ शकते परंतु ते तिथे नैसर्गिकपणेच गाळले जाईल. या प्रक्रियेदरम्यान ते नैसर्गिकपणे गाळले जाते कारण ते अनेक थरातून गेलेले असते. जर सर्वच सदनिकाधारकांनी असे पाणी मार्गाच्या कडेला वाहू दिले तर मात्र कूपनलिकेचे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठीही आपण पाणी साठवण्याचा भाग वेगळा ठेवला आहे हे मी त्यांना समजून सांगितले. यावर ते म्हणाले की मी रहिवाशांसाठी काय करावे काय करू नये अशा स्वरूपाची एकादी पुस्तिका का तयार करत नाही, ज्यामुळे त्यांना अतिशय मदत होईल. मी ते हसण्यावारी नेले परंतु तो विषय माझ्या मनात घोळत राहिला. कदाचित पुस्तिका फार मोठे होईल पण मी काही मूलभूत बाबी लिहील्या पाहिजेत असे मला वाटले, म्हणून हा लेख लिहीत आहे. आमच्या आणखी एका प्रकल्पातील रहिवाशांच्या वॉट्स ग्रूपमध्ये (आमच्या सर्व पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये या एका चांगल्या सवयीचे आम्ही पालन करतो) एका रहिवाशाने जिन्यावरील पायऱ्यांच्या वाटेत कचरा साचवून ठेवल्याचे छायाचित्र टाकले होते इतर सदस्यांनी परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले होते, ते पाहिल्यानंतर असा लेख लिहीण्याची किती गरज आहे हे अधोरेखित झाले.

यामुळे मला जाणीव झाली की सामूहिकपणे जगताना काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक असते हे लिहीले पाहिजे गंमत म्हणजे आपण सगळे हे नियम जाणतो परंतु आपण ज्याप्रकारे वाहन चालवताना सीट बेल्ट लावण्याकडे किंवा हेल्मेट घालण्याकडे दुर्लक्ष करतो त्याच प्रकारे आपण या नियमांकडेही दुर्लक्ष करतो ज्यामुळे केवळ आपल्याच नाही तर संपूर्ण समाजाला त्रास होतो. भारतीयांच्या देशभक्तीविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावेसे वाटते की, जेव्हा नागरी जाणीवांचा विषय येतो तेव्हा आपली त्या आघाडीवर समाज म्हणून अतिशय वाईट कामगिरी आहे माझ्या निरीक्षणाला दुजोरा देण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत परंतु त्याविषयी नंतर कधीतरी लिहीन. त्याचप्रमाणे, आपण केवळ आपल्या सदनिकेचीच नाही तर आपल्या इमारतींची देखभाल कशाप्रकारे करतो  

यावरून आपण एक  पुढारलेला समाज म्हणून जगतोय किंवा केवळ गरजेपोटी एकत्र आलेल्या प्राण्यांचा कळप म्हणून जगतोय हे ठरत असते, बरोबर?

तर, तुम्ही इमारतीमध्ये राहात असताना साधे काय करावे काय करू नये याविषयी बोलू (तुमच्या बंगल्यामध्ये तुम्हाला हवे ते करा), केवळ एक लक्षात ठेवा तुम्ही एक जागा इतर कुटुंबांसह वापरत आहात केवळ सामूहिक प्रयत्नांमधूनच काही मूलभूत नियमांचे पालन करूनच तुम्ही स्वतःचे आयुष्य थोडे आणखी चांगले करू शकता.हे तथ्य स्वीकारणे हा सोसायटीमध्ये राहताना काय करावे याचा पहिला नियम आहे. तुम्ही एकदा हे समजून घेतल्यानंतर, गोष्टी अधिक सहज सोप्या होतात. त्यानंतर इतर रहिवाशांची शांतता भंग होईल अशा गोष्टींची वर्गवारी करा त्यांचा करू नका या वर्गवारीतसमावेश करा. या गोष्टीही स्पष्टपणे नमूद करता येतील उदाहरणार्थ तुमच्या सदनिकेतील दुरुस्तीचे काम. तुमच्या घरातील दुरुस्तीचे काम कितीही लहान असले तरीही, तुमच्या सोसायटीला तसेच शेजाऱ्यांना कळविल्याशिवाय करू नका. कारण तुमच्या स्वयंपाक घरातील ओट्याच्या किंवा बाथरूमच्या टाईल्स बदलण्यासारख्या लहान कामामुळेही तुमच्या शेजारच्या सदनिकांमध्ये वॉटरप्रूफिंगची किंवा पाणी गळण्याची समस्या होऊ शकते. तसेच इतर सदनिकांसोबत जी सामाईक भिंत आहे तिच्यावर खिळे ठोकताना हातोडीचा वापर केल्यास, त्यामुळे भिंतीच्या दुसऱ्या बाजूला तडे जाऊ शकतात, जी तुमच्या शेजाऱ्यांची बैठकीची खोली असू शकते. त्याऐवजी ड्रिलचा वापर करा तुम्ही ज्यासाठी खिळे ठोकत आहात ती फ्रेम किंवा चित्र लावताना सगळ्यात शेवटी हातोडा वापरा. तुमच्या सदनिकेची फरशी स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा पूर करू नका (म्हणजे ते ओतू नका) कारण एकतर खोल्यांमध्ये वॉटरप्रूफिंग नसते दुसरे म्हणजे टाईलच्या सांध्यातून पाणी झिरपू शकते. सदनिकेच्या कोरड्या भागांमध्ये (खोल्यांमध्ये) फरशीला उतार नसल्याने हे पाणी फरशीखाली साचून राहील कधीतरी तुमच्या खालच्या सदनिकेच्या छतातून झिरपू लागेल. तुमची शौचालये किंवा सांडपाण्याच्या वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी सिडचा वापर करू नका कारण त्यामुळे ते सांधण्यासाठी वापरले साहित्य झिजे पुन्हा पाणी गळायला सुरुवात होईल. तुमच्या विजेच्या मीटरची भार क्षमता किती आहे याचा अभ्यास केल्याशिवाय तसेच वीज वाहिन्या तपासल्याशिवाय कधीही विजेची साधने वापरू नका कारण त्यामुळे अतिरिक्त भार पडून, शॉर्ट सर्किट होऊ शकते.थोडक्यात, तुमच्या सदनिकेमध्ये कोणतेही काम करताना, तुमच्या सदनिकेतील बांधकामाच्या कारागिरीविषयी तपशीलाने माहिती घ्या त्यासाठी तुमच्या बांधकाम व्यावसायिकांची मदत घ्या (मला माहितीय ते अवघड आहे परंतु करता येण्यासारखे आहे). तुमच्या सदनिकेच्या खिडक्या किंवा बाहेरील भिंती कधीही बदलू नका कारण त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुमच्या सदनिकेमध्ये तसेच शेजारच्या सदनिकेमध्येही नक्कीच गळती होईल, तसेच बाहेरील भिंती तोडल्यामुळे त्या भिंतीच्या बाह्य पृष्ठभागावरील प्लास्टरला तडे जातील, कारण ते अगदी तुमच्या त्वचेसारखे असते. तुमच्या रोपांच्या कुंड्या तुमच्या गच्चीपासून किंवा बाल्कनीपासून किंवा खिडकीपासून लांब लटकत ठेवू नका कारण त्यामुळे भिंतींवर पाणी ठिबकेल तसेच या कुंड्या खाली रस्त्यावरील कुणाच्या डोक्यात पडण्याचा धोका नेहमीच असतो.

जर तुमच्या सदनिकेमध्ये काय करू नये यासाठी हे काही मुद्दे असतील तर इमारतीच्या सामाईक भागामध्ये काय करू नये याचीही यादी देत आहे.या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत, कारण आपण सार्वजनिक जागी किती निष्काळजीपणे वागतो हे आपण सगळे जाणतो. थुंकण्यापासून ते आपल्या सदनिकेतील कचरा सामाईक भागामध्ये ढकलण्यापर्यंत, करू नये अशा गोष्टींची यादी लांबलचक आहे. सर्व महत्त्वाच्या बाबी म्हणजे सुरक्षेशी संबंधित कोणत्या गोष्टी करू नयेत कारण त्या थेट तुमच्या घराच्या सुरक्षेशी मौल्यवान गोष्टींशी संबंधित आहेत.दोन गोष्टींच्या बाबतीत कधीही तडजोड करू नका, एक म्हणजे स्वस्त सुरक्षा सेवा दुसरी म्हणजे प्रामुख्याने लिफ्ट, जनरेटर यासारख्या सामाईक सेवांसाठी स्वस्त देखभाल कंत्राट पुरवठादार. एक लक्षात ठेवा सीसीटीव्ही, अंगठ्याच्या ठशाने दार उघडणे या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरीही एक सुरक्षा रक्षकच चोरी किंवा इमारतीमधील अपघात अधिक चांगल्या प्रकारे रोखू शकतो. परंतु बहुतेक सोसायट्या केवळ काही रुपये वाचवण्यासाठी चांगल्या कंपनीचा सुरक्षा रक्षक ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे लिफ्ट, जनरेटर, सौर यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा यासारख्या विशिष्ट सेवांच्या देखभालीचे कंत्राट इतर एखाद्या कंपनीला देण्याऐवजी त्या ब्रँडच्या अधिकृत सेवा कंपनीलाच द्या मग ते खार्चिक असले तरीही (ते सामान्यपणे असतेच). कारण अशा यंत्रणांमध्ये काही मोठा बिघाड झाला सुट्टे भाग बदलायचे असतील तर त्याचा निश्चितच फायदा होतो. एक इंग्रजी म्हण आहे पेनी वाईज पाउंड फुलीश म्हणजेच लहान रक्कम अतिशय काळजीपूर्वक खर्च करणे मोठी रक्कम निष्काळजीपणे खर्च करणे, मी अनेक सोसायट्या पाहिल्या आहेत ज्या अशा सेवांच्या देखभाल कंत्राटावर थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात ही म्हण अगदी सार्थ करतात.करू नका या यादीतील आणखी एक बाब म्हणजे सुरक्षा रक्षकांना कार धुणे किंवा बागकाम यासारखी वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामे सांगू नका.                                                            

कारण इमारतीमध्ये किंवा सदनिकेमध्ये काही चोरी झाली किंवा सुरक्षेत काही त्रुटी आढळली तर ते ही कामे करत असल्याचे कारण देतील (जे खरेही असेल). सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना ( वर्षांहून कमी वयाच्या) लिफ्ट वापरण्याची किंवा आपणहून इमारतीच्या गच्चीवर जाण्याची परवानगी देऊ नका. बाल्कनी किंवा जोडून गच्ची असलेल्या सदनिकेमध्येही या नियमाचे पालन करा. घरात मुले असताना या ठिकाणी कुलूप लावायला कधीही विसरू नका.

या तुलनेत काय करावे याची यादी अतिशय लहान आहे त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय करा काय करू नका यादी तयार करा ती सगळ्या लॉबींमध्ये तसेच सोसायटीच्या सूचनाफलकावर लावा प्रत्येक रहिवासी त्याचे पालन करत असल्याचे पाहा. त्याचप्रमाणे प्रत्येक सेवेच्या देखभालीसाठी एक करार तयार करा वेळच्या वेळी त्याचे नूतनीकरण केले जात असल्याचे पाहा. तसेच नळ जोडण्या वीज वाहिन्यांची वर्षातून किमान एकदा (प्राधान्याने सहा महिन्यातून एकदा) स्वतः तपासणी करा, अशाप्रकारे स्वतः तपासणी केल्यामुळे आगामी काळात बरेच पैसे वाचतात. तुमच्या बांधकाम व्यावसायिकांच्या चमूसोबत एक वॉट्सॲप ग्रूप तयार करा ज्यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी तसेच कोणत्याही कायदेशीर बाबींविषयी चर्चा करता येईल. जर बांधकाम व्यावसायिक अशा गोष्टी करण्यासाठी उत्सुक नसेल तर त्याला किंवा तिला तशी विनंती करा (किंवा करायला लावा) असा ग्रूप तयार केल्यामुळे त्याच्यावरचे ताणही कमी होतील हे त्याला समजावून सांगा. इमारतीशी संबंधित आवश्यक संपर्कांचे तपशील अद्ययावत असावेत, मग ते जवळचे पोलीस ठाणे असो, एमएसईबी असो किंवा पुणे महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालय असो किंवा सेवा पुरवठादार असतो, अशा संपर्क क्रमांकांची यादी सहजपणे दिसेल अशा जागी लावासोसायटीच्या कार्यालयामध्ये सर्व पत्रव्यवहाराच्या व्यवस्थित नोंदी, तसेच इमारतीची ड्रॉईंग, विविध विभागांकडून मिळालेली ना हरकत प्रमाणपत्रे ठेवा, जी सुरू असलेल्या किंवा मंजूरी मिळालेल्या कामांसाठी आहेत, कारण त्यामुळे खरोखरच मदत होते. संबंधित सरकारी विभागाकडून वेळोवेळी मिळालेल्यासर्व परवानग्यांची नोंद ठेवा उदाहरणार्थ लिफ्टचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, किमान तुमच्यावतीने संबंधित विभागाकडे ते मागितल्याची किंवा तुम्ही नियमांचे पालन केल्याची नोंद ठेवा. तसेच इमारतीच्या आवारातून ये-जा करत असताना कान डोळे उघडे ठेवून सजगपणे पाहा ऐका, म्हणजे एखाद्या संशयास्पद व्यक्तीचा वावर तसेच तुमच्या शेजाऱ्यांच्या सदनिकेचा दरवाजा, प्रत्येक लहान-सहान तपशील महत्त्वाचा आहे.

सर्वात शेवटची परंतु महत्त्वाची बाब म्हणजे, अलिकडे सर्व पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील एक महत्त्वाची चिंतेची बाब म्हणजे सोसायटीच्या कामांमध्ये रहिवासी पुढाकार घेत नाहीत; म्हणूनच सोसायटीच्या कामांमध्ये (सातत्याने) माघार घेण्याऐवजी पुढाकार घ्या, कारण तुमचे घर म्हणजे तुमच्या विक्री करारामध्ये जे नमूद करण्यात आले आहे किंवा तुम्ही ज्या चटई क्षेत्रासाठी पैसे दिले आहेत तेवढेच नाही तर इमारतीच्या प्रवेशद्वारापासूनच त्याची सुरुवात होते त्याची उत्तम देखभाल करण्यासाची जबाबदारीही तुमचीच आहे, एवढेच सांगावेसे वाटते.

 

संजय देशपांडे. 

संजीवनी डेव्हलपर्स.

ई-मेल आयडी - smd156812@gmail.com

संपर्क : 098220 37109

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटबद्दलचे माझे शेअरिंग खालील You Tube लिंकवर पहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s

 














No comments:

Post a Comment