Friday, 24 March 2023

एक पोटनिवडणूक आणि जिवनाची शिकवण !

 























"विजयाला अनेक मित्र असतात अपयश मात्र मात्र नेहमी एकटेच असते"… जॉन एफ केनडी.

 "तुम्ही जेव्हा जगज्जते असता तेव्हा तुमच्या विजयांपेक्षा तुमच्या पराभवांचीच चर्चा अधिक होते"... व्हिन्स लोंबार्ड

मला खात्री आहे की शीर्षक वरील अवतरणे वाचून, माझा लेख कुठल्या दिशेने जाणार आहे याचा अंदाज तुम्ही बांधला असेल. तुमच्यापैकी बहुतेकांनी याविषयी ( कसबा पेठ निवडणूक ) इतके वाचले असेल की तुम्हाला इथेच थांबावेसे माझ्या लेखाच्या विंडोमधून बाहेर पडावेसे वाटत असेल. तुमचा पहिला अंदाज बरोबर आहे, म्हणजे हा लेख कसबा पेठेतील पोटनिवडणुकीविषयी आहे (म्हणजे तिच्या निकालाविषयी), परंतु तुमचा दुसरा अंदाज म्हणजे या निवडणुकीचे विश्लेषण, म्हणजे एकतर भाजपाचे कसे चुकले किंवा विरोधी पक्षांचे कसे बरोबर होते भाजपाला कसा धडा शिकवण्यात आला वगैरे वगैरेविषयी हा लेख आहे, तर तुमचे म्हणणे चूक आहे. कारण हा लेख मला स्वतःला या निवडणुकीतून कोणता धडा मिळाला याविषयी आहे हा लेख प्रामुख्याने माझ्या छोट्याशा चमूसाठी आहे (ज्यामध्ये माझा मुलगा कुटुंबातील तरुण पिढीचा समावेश होतो), हा आणखी एक राजकीय विश्लेषण करणारा लेख आहे असे वाटून तुम्ही पुढे वाचणे थांबवले तरीही काही हरकत नाही. तुम्हाला रस असेल तर पुढे वाचा कारण मी राजकीय निवडणुकींच्या निकालांचे विश्लेषण करणारा कुणी राजकीय तज्ञ नाही. तसेच अशा विजयांमुळे पराभवांमुळे आपल्या राजकीय नेत्यांवर काही परिणाम होतो असे तुम्हाला अजूनही वाटते का, नाहीतर ते त्यांच्या संबंधित निवडणुका जिंकण्यासाठी (किंवा हरण्यासाठी) दशकानुदशके त्याच-त्याच गोष्टी करत बसले नसते, बरोबर? म्हणूनच आपण अशा पराभवांमधून किंवा विजयांमधून काय शिकतो याविषयीच आपण बोलू, सकृतदर्शनी ही लढाई काही राजकीय पक्षांमधली असली तरीही अभियंता म्हणून (मला अजूनतरी याविषयी अतिशय अभिमान वाटतो) जर (हा जर लक्षात ठेवा) आयुष्याच्या प्रत्येक घटकाला लागू होत असेल तर ही अतिशय उत्तम तुलना होऊ शकते, कारण तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला दररोज एका नवीन लढाईला तोंड द्यावे लागते. ठीक आहे, तर आता तुम्हाला या कसबा पेठेतील पोटनिवणुकीचा विषय मी लेखासाठी का निवडला याचा हेतू समजला असेल. वरवर पाहाता ही केवळ एक राजकीय लढाई असली तरीही ज्याप्रकारे या निवडणुकीला वळण लागले म्हणजे एक पक्ष यामध्ये सहज जिंकेल (तुम्हाला माहितीय कोणता पक्ष) असे वाटत असताना तो पक्ष निवडणूक हरला, हे सगळे अभ्यासण्यासारखे आहे, म्हणजे आपण या प्रक्रियेचे सगळे पैलू विचारात घेतले पाहिजेत.नेमक्या याच गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले, आपल्या दैनंदिन जीवनातही आपणही कितीतरी वेळा गोष्टी फार सहजपणे घेतो त्यानंतर आपल्याला जाणीव होते की वेळ हातातून निघून गेली आहे (इथे आपल्यापैकी बहुतेकांना ससा आणि कासवाची गोष्ट माहिती असेल परंतु त्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही) जशी ससा कासवाच्या शर्यतीच्या गोष्टीमध्ये परभवानंतरचा,  सशाला जाणीव होते त्यानंतर आपण आपल्या पराभवासाठी (म्हणजे अपयशासाठी) कारणे देऊ लागतो, जी कुणीही मान्य करत नाही, श्री. केनडी यांनीही त्यांच्या अवतरणात हेच म्हटले आहे. कसबा पेठ हा मदतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला मानता जात असे या पक्षाचगल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे, म्हणजेच पुणे महानगरपालिका (स्थानिक स्वराज्य संस्था), राज्य सरकार केंद्र सरकार भाजपाचे आहे हा मतदारसंघ गेली २८ वर्षे भाजपाकडे होता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे त्या सांगण्यासाठी वेळ घालवणार नाही. परंतु सामना सुरू होण्याआधीच हा सामना म्हणजे फक्त एक औपचारिकता आहे असे भाजपाने गृहित धरले होते आपण जिंकलेलोच आहोत असा विचार त्यांनी करायला सुरुवात केली होती. आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत मी हे होताना पाहतो कारण आपल्याला असे वाटत असते की सगळीकडेच आपली सत्ता चालते आपण परिणाम गृहित धरतो. म्हणूनच तुमच्या हातात सगळे हुकूमी पत्ते असले तरीही तुम्ही काहीही गृहित धरून चालणार नाही हा एक मोठा धडा मी यातून शिकलो मला माझ्या मुलांना तसेच माझ्या चमूलाही हेच सांगायचे आहे, मी कधीच नशीब किंवा प्रारब्धाला दोष देत नाही तर मी गोष्टी ( लोकांना) गृहित धरण्याच्या वृत्तीला दोष देतो आहे. कोणतीही स्पर्धा कितीही सोपी वाटत असली तरी तुम्ही तुमचे शंभर टक्के प्रयत्न केले पाहिजेत, एखाद्या लहानशा चुकीमुळेही (म्हणजेच निष्काळजीपणा किंवा गर्वामुळे) तुमचे सर्व प्रयत्न वायाजाऊ शकतात, जे आपण या निवडणुकांमध्ये पाहिले. हाच धडा कामाच्या प्रत्येक पैलूच्या संदर्भात महत्त्वाचा आहे, मग ते एखाद्या योजनेला मंजूरी मिळणे असो किंवा बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना; आपण गोष्टी गृहित धरण्याची शक्यता असते.

त्यानंतर मुद्दा येतो योग्य उमेदवाराची निवड करण्याचा, इथे मी राजकीय निर्णयाविषयी बोलत नाहीये तो पूर्णपणे त्या पक्षाचा अधिकार आहे. परंतु तुम्ही काहीही निवडू शकता याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करावेअसा होत नाही, हेच मी या निवडणुकीतून शिकलो. विचारपूर्वक निवड करा म्हणजे नंतर ज्या त्रुटी डोके वर काढतात त्यांचे प्रमाण कमी होईल हे आपण विचारात घेतले पाहिजे उदाहरणार्थ विकासासाठी भूखंड निवडताना, ही किती समर्पक तुलना आहे. आपण जेव्हा गोष्टी गृहित धरतो तेव्हा आपली योग्य निवड करण्याची क्षमता (म्हणजे मनाची) संपते कारण आपल्याला वाटते आपण जी काही निवड करू ती कधीच चुकीची ठरणार नाही होणाऱ्या परिणामाचा आपल्याला फटका बसतो आपल्याला चुकीची निवड करण्याचा भुर्दंड बसतो. आपण आयुष्याच्या कोणत्याही आघाडीवर चुकीची निवड केली तर आपल्याकडे आपण चुकीची निवड केली आहे हे स्वीकारण्याचे धाडस असले पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या चुकीच्या निवडीचे समर्थन करत बसण्याऐवजी आपण परत योग्य मार्गावर जाऊ.  शकतो, हासुद्धा एक मोठा धडा या निवडणुकीने मला शिकवला असे मला वाटते. आपल्या कामाच्या चमू मध्ये योग्य व्यक्तींची निवड करणे. कामासाठी योग्य सहकारी व यंत्रणा निवडणे, सगळ्या ठिकाणी निवड महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा सहकाऱ्यांनो. तुम्ही जेव्हा योग्य व्यक्ती निवडण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला आधी कोणते काम पूर्ण करायचे आहे ते समजून घ्यावे लागते त्यानंतरच हातातील काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती आवश्यक असेल ते समजून घ्यावे लागेल, म्हणूनच तुम्ही सखोल खुल्या मनाने त्याचा विचार करून, कामातील आव्हाने स्वीकारा, बरोबर?

तुम्ही एकदी गोष्ट योग्य प्रकारे स्वीकारल्यानंतर योग्य निवड केल्यानंतर सखोल अभ्यासाने एखादे काम कसे हाताळता यालाच आपण धोरण कृती योजना म्हणतो, केवळ आग लागल्यासारखे सैरावैरा पळवण्याचे काम करू नका.एक सुजाण माणूस (किंवा एक सुजाण पक्ष) त्याला कसे अपयश येऊ शकते याच्या शक्यतांचा सर्व प्रकारे विचार करतो स्वतःला त्यासाठी तयार करतो त्यानंतरही अपयश आल्यास तुम्हाला किमान या गोष्टीचा तरी आनंद असतो की तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केला, ज्याप्रमाणे विरोधी पक्षाला पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतील जागा भाजपाविरुद्ध हरल्यावर वाटत असेल. चुकीच्या निवडीची समस्या म्हणजे तुमच्याकडे अनेक धोरणे असावी लागतात, तसेच जोपर्यंत आपण योग्य धोरण ठरवत नाही तोपर्यंत चुकत-माकत केले जाणारे बदल अतिशय वेगाने स्वीकारावे लागतात त्यासाठी आपल्या हातात वेळ नसतो हेदेखील तुम्ही विचारात घेतले पाहिजे, पराभूत झालेल्या पक्षाची त्यासाठी अर्थातच तयार नव्हती.

ज्याप्रमाणे लढण्यासाठी योग्य धोरण असावे लागते त्याचप्रमाणे युद्ध सुरू होण्याआधी एक नेताही असावा लागतो जे या निवडणुकीच्यावेळी नव्हते, हेदेखील मला आढळले. तुमच्याकडे सैन्यामध्ये अनेक सेनापती असू शकतात मात्र एक युद्ध एक सेनापती असेल तरच युद्ध जिंकता येऊ शकते. एका सैन्यावर एकाचवेळी अनेक सेनापतींचे नियंत्रण असेल तर अतिशय गोंधळ निर्माण होतो, मग सैन्य कितीही मोठे सशक्त असले तरीही ते विजयी होऊ शकत नाही. आपल्या कंपनीतील प्रत्येक विभागाला किंवा बांधकाम स्थळाला हे लागू होते. आपल्याला एखाद्या प्रकल्पातील सदनिका विकायच्या असतील तर त्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर असली पाहिजे तिने पूर्णपणे लक्ष केंद्रित करून धोरण राबवले पाहिजे. अर्थात तुम्ही नेहमी अधिक सक्षम, अनुभवी व्यक्तींची मदत किंवा सहकार्य घेऊ शकता परंतु नियंत्रण एकाच व्यक्तीच्या हातात असले पाहिजे, भाजपाने या निवडणुकीमध्ये हे पाळले नाही, विरोधी पक्षातही हीच त्रुटी होती परंतु त्यांच्या उमेदवारावरच लक्ष केंद्रित करण्यात आले होते त्यामुळे तो आपोआपच विरोधी पक्षाचा सेनापती झाला त्याला परिस्थितीचा फायदा मिळाला.

त्यानंतर पुढील निवडणूक निकालांच्या दिवशी आणखी एक बातमी होती की भाजपाने आपल्या देशातील ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विजय मिळवला जो कधीही त्यांचा बालेकिल्ला नव्हता. एखादा राष्ट्रीय पक्ष ज्या राज्यांमध्ये पूर्वी तो बळकट नव्हता ती तिन्ही राज्ये जिंकतो मात्र आपल्या बालेकिल्ल्यामध्ये कसा हरतो याचे प्रत्येकाला कुतुहल वाटल्याशिवाय राहात नाही, बरोबरभाजपा राष्ट्रीय प्रमुख, श्री. जे. पी. नड्डा यांच्या एका प्रतिक्रियेमध्ये त्याचे उत्तर होते, ते म्हणाले की ईशान्येकडील तिन्ही राज्यांमध्ये योगायोगाने विजय मिळाला नाही तर गेल्या दशकभरामध्ये या राज्यांमध्ये जनसंपर्क तसेच पायाभूत सुविधांचा विकास करून त्यांनी (म्हणजे श्री. मोदी शहांनी) जनाधार निर्माण केल्याचा हा परिणाम आहे. मात्र, नड्डा सर हीच दूरदृष्टी तुमचेच लोक तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये विसरलेले दिसत आहेत, नाहीतर ज्या घटकांमुळे ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये तुमचा विजय झाला त्याच तुमच्या विरोधी पक्षांसाठी सर्वोत्तम हत्यार ठरल्या तुमच्याच पक्षाला त्याचा फटका कसा बसला, बरोबर? तुम्हाला कदाचित हे आवडणार नाही परंतु हेच झालेले आहे आपण सगळ्यांनी आपल्या व्यावसायिक आघाडीवर हेच शिकले पाहिजे, की आपल्या अगदी बालेकिल्ल्याकडेही कधीही दुर्लक्ष करू नका, तो कधीही असुरक्षित ठेवू नका. कोणत्याही विजयाच्या तसेच अपयशाच्याही मूलभूत बाबी सारख्याच असतात, तुम्हाला तुमचा ब्रँड ग्राहकांचा आवडता, आदर केला जाणारा विश्वसनीय व्हावा असे वाटत असेल तर ते एका रात्रीत होणार नाही, यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करणे आवश्यक आहे या प्रक्रियेला कधीही अंत नाही हे तथ्य लक्षात ठेवा. 

तुम्ही तुमच्या ग्राहकांना किंवा विक्रेत्यांना (इथे मतदाता असे वाचावे) जितक्या वेगाने विसरता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता तेदेखील तुम्हाला तितक्याच वेगाने विसरतील, हे कोणत्याही व्यवसायाचे मूलतत्व कधीही विसरू नका, जे भाजपा विसरल्याचे दिसत आहे त्यासाठी त्यांना किंमत चुकवावी लागली आहे. 

एक लक्षात ठेवा केवळ चांगल्याप्रकारे संवाद साधल्यामुळे, लोकांच्या नजरेसमोर राहिल्यामुळे किंवा उपलब्ध राहिल्यामुळे तुम्ही कदाचित काही काळ लोकप्रिय होऊ शकता, परंतु नेहमी निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हाला त्यापेक्षाही अधिक काहीतरी आवश्यक असते ते म्हणजे प्रत्यक्ष काम करून दाखवणे. 

व्यवसायामध्ये (किंवा निवडणुकांमध्ये), तुम्ही कशी जाहिरात करत आहात किंवा कोणत्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहात यामुळे तुम्ही यशस्वी होणार नाही तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना शेवटी प्रत्यक्षात कशाप्रकारचे काम करून देत आहात यावरूनच तुम्ही विजेते व्हाल किंवा अपयशी व्हाल हे ठरत असते.

 त्यासाठी तुम्हाला कुणाला काय द्यायचे आहे हे समजले पाहिजे म्हणजेच सदनिकाधारकाला चांगले घर सदनिका ताब्यात दिल्यानंतरच्या सेवा हव्या असतील.तर तुमच्या कंत्राटदाराला वेळच्या वेळी पैसे हवे असतील, तुमच्या व्यावसायिक सेवा पुरवठादारांना (आर्किटेक्ट सिप ) त्यांच्या सेवांसाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या पैशांव्यतिरिक्त त्यांच्या ज्ञानासाठी थोडासा आदरही हवा असेल तुमच्या चमूला तुम्ही त्यांच्यावर जो विश्वास दाखवता तो हवा असेल सहकाऱ्यांनो तुम्हाला नोकरी देणाऱ्या व्यक्तीला (मालकाला) तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहात केवळ पगार घेण्यासाठी ओढून ताणून कामावर येणार नाही असा भरवसा हवा आहे.या सगळ्या घटकांमुळेच योग्य ग्राहकाला योग्य सेवा नावाचे पॅकेज तयार होते त्यानंतरच तुमच्या ब्रँडबद्दल किंवा नावाबद्दल विश्वास निर्माण होतो.

विरोधकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि एखाद्या लढाईतील विजय संपूर्ण युद्धाचा निकाल ठरवू शकत नाही आपल्यापैकी बहुतेक जण आपण का जिंकलो याचे विश्लेषण करायला विसरतात.कसब्यामध्ये, विरोधी पक्ष केवळ एकत्रच आले नाहीत तर सर्व मतभेद विसरून एका संघाप्रमाणे लढले कोणत्याही सामान्यातून हाच मुख्य धडा घ्यायचा असतो जो आपण थोडेसे यश मिळताच बहुतेकवेळा विसरून जातो. 

आपल्या कामाच्या ठिकाणीही, बाहेरून येणाऱ्या माणसासाठी आपण एकच संघ असले पाहिजे, कायदा विभाग, नियोजन विभाग, विक्री विपणन विभाग असे असता कामा नये. वेगवेगळ्या कार्य क्षेत्रांमुळे असे विभाग बनविण्यात आले आहेत, त्याकाही एखाद्या देशाच्या सीमारेषा नाहीत! 

आपण वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत असलो तरी आपण एका बॅनरखाली (पक्षाच्या संदर्भात झेंडा) ज्या उद्देशाने एकत्र आलो आहोत तो कधीही विसरू नये, तो म्हणजे निवडणुका असतील तर जिंकणे आपल्यासारखी कंपनी असेल तर उत्पादन तयार करून देणे. मला असे वाटते की तुम्ही आत्तापर्यंत संयम ठेवला असेल तर या विश्लेषणामधून मला जे काही सांगायचे होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी लढाई जिंकली आहे. मी या देशाच्या लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचे म्हणजे कसबा पेठ मतदार संघातील मतदारांचा आभारी आहे, कारण भाजपा किंवा विरोधी पक्ष काय शिकतात हा त्यांचा प्रश्न आहे परंतु माझ्यासाठी आयुष्यातील हे उत्तम धडे पुन्हा शिकण्यासारखे आहे (माझे डोळे पुन्हा उघडले) ज्यामुळे माझे पाय जमीनीवर घट्ट रोवून ठेवण्यासाठी मला निश्चितपणे फायदा होईल.

 माझ्या मुलांनो माझ्या सहकाऱ्यांनो, तुम्हीही त्यातून शिकलात तर मला आनंद होईल कारण इतर कोणतेही महाविद्यालय ज्याप्रकारे कसबा पेठेतील पोटनिवडणुकीतून झाले, त्याप्रमाणे तुम्हाला इतर विद्यार्थ्यांच्या अपयशाच्या ( शुल्काच्या) पेंशनवर पदवी देणार नाही, आताही  पदवी घ्यायची किंवा नाही, हे केवळ तुमच्यावर अवलंबून आहे, एवढे बोलून निरोप घेतो!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे मत खालील यूट्यूबलिंकवर पाहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s

                                                                  






No comments:

Post a Comment