Wednesday, 15 March 2023

महावितरण ! जोर का झटका धीरेसे लगे !

 


















“ तुम्ही विजेशी खेळ केलाततर शॉक बसेल याची तयारी *ठेवा.” … स्टीव्हन मॅगी*

 

स्टीफन मॅगी यांनी त्यांचे बी. एम.टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमधून  पी.एच.डीमसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजीमधून केले असूनते टॉक्सिक इलेक्ट्रिसिटी  इतरही अनेक पुस्तकांचे लेखक आहेतते किरणोत्सार  मानवी आरोग्य याविषयावरील जागतिक पातळीवरचे आघाडीचे तज्ञ आहेतत्यांनी वास्तुकलेतील “मल्टिपल सन” इफेक्ट सर्वांसमोर आणला  मानवी समाजामध्ये सौर किरणोत्साराची पातळी अनैसर्गिकपणे जास्त असल्याचे त्यांना आढळलेविजेसारख्या विषयावर अतिशय अधिकारवाणीने बोलू शकत असल्यामुळेस्टीव्ह वरील अवतरणामध्ये अतिशय साध्या परंतु अतिशय प्रभावी शब्दांमध्ये विजेशी खेळ  करण्याविषयी इशारा देताततसेच आजकालच्या आयुष्यामध्ये फक्तरोटीकपडा और मकान” म्हणजेच अन्नवस्त्र  निवारा याच केवळ मूलभूत गरजा राहिलेल्या नाहीततर वीजही तितकीच महत्त्वाची आहेकारण विजेशिवाय आपल्या १५० कोटीहून अधिक देशवासीयांसाठी वरील सर्व गोष्टी साध्यच होणार नाहीत (मी फक्त आपल्या देशवासियांबद्दल बोलतोय), त्याचशिवाय आपले सेल फोन चार्ज करायलाह वीज लागते हे विसरू नकाज्याच्याशिवाय आपल्यापैकी बहुतेकांना श्वासही घेता येणार नाहीम्हणूनच अलिकडे जेव्हा एमएसईबीच्या (माफ करा एमएसईडीसीएलमला अजूनही हे नाव आपलेसे वाटत नाहीजवळपास ३५पेक्षाही अधिक वीज दरवाढ करण्याच्या प्रस्तावाविषयी बातम्या येत होत्या (सर्रास नेहमी चुकीच्याच कारणांसाठी चर्चेमध्ये असतेतेव्हा मी विजेविषयी स्टीव्हन यांचे अवतरण वापरण्याचा विचार केलाकारण कुठेतरी आपण (आपण सर्वआपापल्यापरीने विजेशी खेळ करत आहोत  आता आपल्या चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे.

सर्वप्रथम ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोआपली वीज कंपनी आता एमएसईबी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ राहिलेली नाहीतिचे आता तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे ते म्हणजे निर्मितीवितरण  पारेषणम्हणूनच आपल्यासाठी ती एमएसईडीसीएल आहे म्हणजेचमहावितरण जी एमएसईबी जे काम करत असे ते करतेसोप्या शब्दात सांगायचेतर आधी एमएसईबी आपल्याला वीज पुरवठा करत असे (आपल्या घरांना  कार्यालयांना आपल्याला त्याच कामासाठी शुल्क आकारत असेतेच काम आता एमएसईडीसीएलद्वारे केले जातेतुम्हाला कोण वीज पुरवठा करते हे आता तुम्हाला समजले असेलतर बातमी अशी होती की एमएसईडीसीएलने पुरवठा केल्या जाणाऱ्या बहुतेक वर्गवाऱ्यांमध्ये प्रति युनिट ३५वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहेआता वर्गवारी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलतर त्याचा अर्थ कोणत्या हेतूने विजेचा वापर केला जात आहे  वीज तीच असली तरी तिच्या वापरानुसार प्रति युनिट वेगवेगळे दर आकारले जातातम्हणजे जर विजेचा वापरकर्ता घरगुती किंवा निवासी असेल तर  रुपये/युनिट दर असेल परंतु व्यावसायिक वापरासाठी दर रु.१२/युनिट असेल  ही यादी बरीच मोठी आहेसर्वप्रथममलायामागे काय कारण आहे असा नेहमी प्रश्न पडतोकारण पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही असाच विनोद आहेपरंतु जगभरात कुठेही पाणी किंवा वीज यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात नाहीविचार करातुमची कार खाजगी असो किंवा घरगुती वापरासाठी असो किंवा तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या किंवा व्यावसायिक कामासाठी तिचा वापर करत असालतुम्हाला तेच पेट्रोल जास्त दराने खरेदी करावे लागेल  जर तुमची कार तुम्ही स्वतःच्याच एखाद्या उद्योगासाठी वापरत असाल  त्यासाठी प्रति लिटर वेगवेगळे दर असतेतर तुम्हाला कसे वाटेलआता आणखी एक उदाहरण घ्यातुम्ही घरासाठी साधारण ५० रुपये/लिटर दराने दूध घेतले परंतु तुम्ही तेच दूध चहाच्या स्टॉलसाठी वापरत असाल तर तुम्हाला ते ७०/लिटर रुपये दराने खरेदी करावे लागल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेलमला माहितीय वीज क्षेत्रातील तज्ञ माझ्या ह्या लॉजिकवर हसतील परंतु मी स्थापत्य अभियंता आहेइलेक्ट्रिकल अभियंता नाहीमी विजेचा एक सामान्य ग्राहक म्हणूनही हे लिहीत आहेत्याचशिवाय जर तुमच्या शेजाऱ्याला दूध  पेट्रोल प्रति लिटर दराने नव्हे तर एका पॅकेजच्या स्वरूपात मिळत असेल  त्यामुळे येणारी तूट तुमच्या दूध  पेट्रोल बिलामधून भरून काढली जात असेलतर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल हे सुद्धा तुम्ही मला सांगा.

महावितरणमधील माझ्या अतिशय चांगल्या मित्रांविषयी पूर्णपणे आदर राखून असे म्हणावेसे वाटते कीकेवळ विजेचे प्रति युनिट दर वाढविण्याला विरोध करण्याची नव्हे तर त्याची कारणे समजून घेण्याची वेळ आली आहेसर्वप्रथम मला महावितरणचे (पुणे विभागाचेवीज पुरवठ्याच्या बाबतीत इतर शहरांच्या तुलनेत दिलेल्या उत्तम सेवेसाठी (इतर अनेक शहरांच्या तुलनेत,

 कारण मला अनेकांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या दिसत आहेतआभार मानावेसे वाटतात कारण यामध्ये बरीच आव्हाने आहेतसर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभागांपैकी एक असूनहीपुण्यामध्ये पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठीचा निधी तसेच पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारा निधी नेहमी जेवढ्या विद्युत भाराची मागणी असते त्या तुलनेत कमी पडतोतरीही पुणे विभाग ग्राहकांच्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करतोमी महावितरणमधील स्थानिक लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतोय असे ज्यांना वाटत असेल त्यांनी कृपया इतर नागरी केंद्रांमध्ये जावे  वीज पुरवठ्याची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करावापरंतु याचा अर्थ सगळे काही आलबेल आहे असा होत नाहीपुणे शहर विजेची देयके वेळच्या वेळी भरून पुणे विभागाला सर्वाधिक महसूल मिळवून देत असला तरीही पुण्याला दरवाढीला तोंड द्यावे लागत आहे हा मुद्दा मी या लेखातून मांडत आहेहा संपूर्ण वीज यंत्रणेचाच दोष आहे कारण केवळ पुण्यामध्येच (विभागाचीमहावितरणची १४,००० कोटी रुपयांची कृषी वीज पुरवठ्याची थकबाकी वसूल करायची आहे.हे मी म्हणत नाहीहे महावितरणच्याच सूत्रांद्वारे वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेविचार करा केवळ पुणे विभागाचीच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण राज्यातील थकबाकीचे काय  यामध्ये केवळ कृषी पंपांच्या थकबाकीचाच समावेश नाही तर थकबाकीदारांच्या यादीमध्ये अनेक शासकीय संस्थापाणी पुरवठा योजनासहकारी साखर ( संबंधितउद्योगमहानगरपालिकांचाही समावेश होतोत्याचशिवाय सर्व राजकीय पक्षांमधील बडे नेतेही थकबाकीदार आहेतपरंतु महावितरण या वसुलीसाठी वर्षानुवर्षे काहीच करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.महावितरण ही सरकारी (राज्य सरकारचीसंस्था असल्यामुळे “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” सहन करावा लागतोमाफ करा मराठीमध्ये काही वाक्प्रचारांना पर्याय नाही  हा देखील असाच वाक्प्रचार आहे कारण वर नमूद केलेल्या वर्गवाऱ्यांकडून थकबाकी वसूल करण्याच्या बाबतीत महावितरण हतबल आहे (म्हणजेच निष्प्रभावीआहेम्हणूनच जे वेळेवर देयकाचे पैसे भरतात त्या ग्राहकांसाठी वीज दरवाढ करायची (म्हणजेच ज्यांची थकबाकी माफ करण्यासाठी कुणीही मायबाप नाही).

ज्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिक त्यांच्या सदनिकांचे दर त्यांच्या इच्छेनुसार वाढवू शकतातसुदैवाने महावितरण त्यांच्या इच्छेप्रमाणे  मर्जीप्रमाणे विजेची दरवाढ करू शकत नाहीतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग नावाची आणखी एक संस्था आहेही संस्था सर्व वीज कंपन्यांना नियंत्रित करते किंवा मार्गदर्शक तत्वे घालून देते (ज्याप्रमाणे ट्राय दूरसंचार क्षेत्राची नियामक आहे वीज दरवाढ का आवश्यक आहे हे महावितरणला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पटवून द्यावे लागतेत्यानंतरच ती दर बदलू शकतेअर्थात यातही एक मेख आहेमहाराष्ट्र वीज नियामक आयोग हादेखील राज्य सरकारद्वारे स्थापित करण्यात आलेला आयोग आहेत्यामुळे तो सर्वप्रथम कुणाचे हित पाहील यात काहीच शंका नाहीदुर्दैवाची बाब म्हणजेजेव्हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगापुढे महावितरणने नुकत्याच प्रस्तावित केलेल्या दरवाढीविषयी सुनावणी झाली तेव्हा अनेक ग्राहक संघटनांनी या दरवाढीविरुद्ध त्यांची बाजू मांडली परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने एक चकार शब्दही काढला नाही हाच आपल्या उद्योगातील म्हणा किंवा समाजातील म्हणा विरोधाभास आहेजे नेते लहान-सहान मुद्द्यांविषयी त्यांचे मत मांडायला उत्सुक असतात त्यांनी महावितरणच्या दरवाढीच्या प्रस्तावासंदर्भात तपशीलवार अहवाल सादर करणे सोडाच (मीकुणाला मूर्ख बनवतो आहे), याविषयावर पूर्णपणे मौन धारण केलेयाचे कारण एक म्हणजे त्यांना सामान्य माणसाला  व्यावसायिकांना विजेसाठी किती पैसे भरावे लागतात याच्याशी काहीही घेणेदेणे नसते  दुसरे म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांचे मतदार गमवायचे नसतात जे प्रामाणिकपणे वीज देयकाचे पैसे भरणाऱ्या नागरिकांच्या जिवावर मोफत वीज उपभोगत असतातमला माफ करा,आम्हाला वीज दर निश्चित करताना शेतकऱ्यांविषयी किंवा खरोखरच जे गरीब आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत नाही असे नाहीपरंतु आपण यासंदर्भात किमान सारासार विचार करून खरोखरच कोण गरजू आहेत  तोट्या साठी जबाबदार असलेल्या अशा धोरणांचा गैरफायदा कोण करून घेत आहे हे तपासले पाहिजेअसेही इतर अनेक राज्यांच्या वीज पुरवठा दराच्या तुलनेत आपले प्रति युनिट वीज दर आधीच खूप जास्त आहेतया पार्श्वभूमीवर नवीन दरांमुळे अनेक मध्यवर्गीय कुटुंबे तसेच लघुउद्योगांचा आर्थिक ताळेबंद बिघडणार आहेत्याचशिवाय आपल्याकडे बांधकाम स्थळी लावले जाणारे बांधकामासाठीचे मीटर यासारख्या वर्गवाऱ्या आहेतज्यासाठी प्रति युनिट १२ रुपयांपेक्षा अधिक दर द्यावा लागतोहा पूर्णपणे अन्याय आहे आणि म्हणूनच पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की

महावितरण पुणे  ठाण्यासारख्या त्यांच्या दुभत्या गायींच्या क्षेत्रामध्ये विजेच्या पर्यायी स्रोतांना चालना देत नाहीजसे किसोलर किंवा वायू निर्मिती वीज आणि त्यालाच चालना देणाऱ्या योजना वा नियम करत नाही !जसे कीजर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खर्चाने पर्यायी वीज निर्मितीचा संच बसविला म्हणजे सोलर किंवा वायुपासून वीज निर्मितीतर  नेट मीटरिंग पद्धतीने जेवढे युनिट वीज निर्मिती यातून वाचवायची तेवढे युनिट तुमच्या वीज वापरातून कमी होतात पण हे  रायला जी मंजुरीची पद्धत आहे ती खूपच वेळ खाऊ आहेकारण जी वीज वाचते ती फुकट दयावी लागते इतर घटकांना   णि म्हणूनच आख्ख जग अपारंपरिक ऊर्जा सोत्रांचा वापर वाढवत असताना आपण त्यात खूपच मागे आहोत,  आपले वीज मंडळाचे अधिकारी सुद्धा खाजगीत हे मान्य करतात . सरकार यात लक्ष घालणार का ? आणि कधी ?

जर वीज दराचा मुद्दा असेल तर वीज वितरणाचा भार उचलू शकेल अशा पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारीही उद्योगक्षेत्राच्या डोक्यावरच टाकली जातेमला अशी काही उदाहरणे माहिती आहेत जेथे काही प्रकल्पांना त्यांच्या गरजे प्रमाणे वीज पुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले आहेत कारण महावितरणकडे या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुरेसा पैसा नाहीकुणीही त्याविषयी काहीच बोलत नाहीत्यानंतर शहरातील वीज वाहिन्यांच्या  रोहित्रांच्या जाळ्याची नियमित देखभाल करण्याचा मुद्दा यामुळे ग्राहकांना वारंवार भार नियमनाला तोंड द्यावे लागते (म्हणजे वीज पुरवठा खंडित होतो).मला असे वाटतेशहरातील रहिवाशांच्या तसेच व्यवसायांच्या या अतिशय महत्त्वाच्या मुद्याकडे “मायबाप” सरकारने लक्ष द्यायची वेळ आली आहेकारण रास्त दराने  वेगाने वीज पुरवठा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहेनाहीतर जिओसारखी एखादी कंपनी या क्षेत्रात प्रवेश करेल  त्यानंतर आपल्या वीज कंपन्यांचे काय होईलमग त्या सरकारी का असेनात ! हे आपण सगळे जाणतो एवढेच लक्षात ठेवा !


संजय देशपांडे. 

संजीवनी डेव्हलपर्स.

ई-मेल आयडी smd156812@gmail.com

संपर्क : 098220 37109

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटबद्दलचे माझे शेअरिंग खालील You Tube लिंकवर पहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s

 

 

 

 

                                                                                     

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  





No comments:

Post a Comment