Monday, 27 March 2023

"द एलिफंट व्हिस्परर्सची " तुतारी !

























मी हत्तींचे निरीक्षण करत तासन् तास घालवले आहेत, ते अतिशय भावनिक प्राणी आहेत हे मला समजले आहे...ही केवळ एक नामशेष होत चाललेली प्रजाती नसून, त्यांना वैयक्तिक पातळीवर देखील माणसांचा अतिशय त्रास सहन करावा लागतोय.” … माईक बाँड

हत्ती लक्ष वेधून घेतात. मात्र फक्त  त्यांच्या आकारामुळे आपल्या काळजाचा ठोका चुकतो असे नाही. डौलदार चालीचा, खांद्यावर जगाचे ओझे घेऊन चालणारा हा प्राणी अतिशय संवेदनशील प्रामाणिक असतो, त्यांचे हृदय वेगाने धडधडत असते त्यांच्या सुपाएवढ्या करड्या, उघड्या कानाप्रमाणे ते खुल्या दिलाचे असतात. मोफो म्हणत असत की हत्ती कधीही विसरत नाहीत या क्षणापर्यंतही त्याचा नेमका अर्थ काय होतो हे मला समजलेले नाही” … किरा जेन बक्स्टन

किरा जेन बक्स्टन यांच्या पहिल्या कादंबरीला हॉलो किंगडमला अमेरिकी विनोदी लेखनासाठीचा थर्बर पुरस्कार, ऑडी पुरस्कार मिळाला ती वॉशिंग्टन स्टेट बुक अवॉर्ड्ससाठीच्या अंतिम यादीमध्ये होती तिला एनपीआर, बुक रायटद्वारे २०१९ चे सर्वोत्तम पुस्तक म्हणून घोषित करण्यात आले होते. माईक बाँड हे अमेरिकी कादंबरीकार, पर्यावरणवादी, युद्ध मानवी हक्कांचे वार्तांकन करणारे पत्रकार कवी आहेत. बाँड यांचा उल्लेख जगण्याच्या थरारपटातील लढवय्येअसा केला जातो वॉशिंग्ट टाइम्सने त्यांना २१ व्या शतकातील एक सर्वात उत्कंठावर्धक लेखक असा त्यांचा गौरव केला आहे. या दोघांच्याही लेखनातील सामायिक घटक म्हणजे हत्ती, विशेषतः वरील दोन अवतरणे हा लेख हत्तींविषयी आहे हे तुम्ही बरोबर ओळखले असेल अर्थात एका चित्रपटाच्या स्वरूपात, (माहितीपटाच्या, अगदी तांत्रिक शब्दात बोलायचे झाले तर) जो देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे एलिफंट व्हिस्परर्स त्याची तरुण दिग्दर्शिका मिस कार्तिकी गोन्साल्विस. आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी या माहितीपटाच्या दिग्दर्शिकेच्या निर्मातीच्या प्रवासाविषयी नेहमीप्रमाणे बरेच काही वाचले असेल, हा माहितीपट गेल्या सहा महिन्यांपासून ओटीटीवर (नेटफ्लिक्स) उपलब्ध आहे. परंतु त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळताच त्याचे दर्शक कित्येक पटींनी वाढले. त्याला ऑस्कर पुरस्कार मिळताच अचानक त्याचा समावेश सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत झाला आहे, माणसाची मानसिकता कशी असते यात काही आश्चर्य नाही. आपण यशाच्या मागे धावतो शेवटी यशस्वी व्यक्तीला (किंवा चित्रपटाला) अधिक यशस्वी बनवतो, असो.

मी हा माहितीपट टप्प्या-टप्प्याने पाहिला होता, कारण तो ऑस्करला गेला आहे हे मला माहिती होतो म्हणून नव्हे तर मी निसर्गाशी (वन्यजीवनाशी) संबंधित सगळे काही नेटफ्लिक्सवर पाहातो कारण मला कोणत्याही स्वरूपातील जंगल पाहायला आवडतेटीईडब्ल्यू ( एलिफंट व्हिस्परर्सचे मी तयार केलेले संक्षिप्त नाव), हा अगदी शुद्ध वन्यजीवन चित्रपट म्हणता येणार नाही परंतु विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे कारण त्यामध्ये वन्यजीवन मानवातील नातेसंबंध दाखवण्यात आला आहे. या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत, अगदी लाईफ ऑफ पाय ते टू ब्रदर्ससारख्या (दोन्ही वाघांवर आधारित होते) लोकप्रिय चित्रपटांपासून ते डिस्नेच्या काही महान लोकप्रिय चित्रपटांमध्ये मनुष्य प्राण्यांमधील संबंध दाखविण्यात आले आहेत. या विषयावर काही हिंदी चित्रपटही आहेत ज्यामध्ये हत्ती हेच मध्यवर्ती पात्र आहे (आपण सुपर स्टार राजेश खन्ना यांच्या बहराच्या काळातील हाथी मेरे साथी कसा विसरू शकतो). परंतु एलिफंट व्हिस्परर्स हा एखादा चित्रपट नाही किंवा त्याची पटकथा तयार केलेली किंवा लेखकांच्या कल्पनेतून तयार झालेली नाही, ही तामिळनाडू राज्यातील बोम्मन बेल्ली नावाच्या जोड्याची  खरी गोष्ट आहे. मदुमलाईच्या हत्तींच्या छावणीमध्ये काम करणाऱ्या या जोडप्याविषयी हा माहितीपट आहे. ही अशाप्रकारची एकमेव छावणी असावी ज्यामध्ये जखमी हत्तींवर उपचार केले जातात हत्तींच्या अनाथ पिल्लांची काळजी घेतली जाते जेव्हा वन विभागाला अशी खात्री वाटते की ही पिल्ले आता स्वतःची काळजी घेऊ शकतील तेव्हा त्यांना पुन्हा जंगलात सोडले जाते. रघू अम्मू हे दोन असेच हत्ती आहेत जे या माहितीपटाच्या केंद्रस्थानी आहे बोम्मन-बेल्ली हत्तीच्या या दोन पिल्लांची कशी काळजी घेतात यावरच पटकथा आधारित आहे, बस्स. यासोबत हा माहितीपट आपल्याला निलगिरीच्या टेकड्यांमध्ये जंगलाची सफर घडवतो ज्यामध्ये बोम्मन आणि बेल्ली राहतात, ते जंगलामध्येच लहानाचे मोठे झाले आहेतअनेक जण म्हणतील त्यात काय मोठेसे, जंगलामध्ये अशा शेकडो गोष्टी घडत असतात मी हे अमान्य करत नाही. अशावेळी एलिफंट व्हिस्परर्समध्ये काय विशेष आहे, त्यामध्ये वन्यजीवनाचे उत्तम छायाचित्रण किंवा अभिनय किंवा जंगली हत्तीची दृश्ये नाहीत, किंबहुना त्यामध्ये काहीच विशेष नाही हेच या माहितीपटाचे बलस्थान आहे. हा चित्रपट तुम्हाला इतक्या सोप्या खऱ्या स्वरूपात गोष्ट सांगतो की तुम्हीही नकळत या गोष्टीचाच एक भाग होऊन जाता, हेच एलिफंट व्हिस्परर्सचे खरे यश आहे.माहितीपटाच्या चाळीस मिनिटांच्या कालावधीत काहीच नाट्यमय घडत नाही केवळ रघू अम्मू कशाप्रकारे बोम्मन बेल्लीच्या आयुष्यात येतात त्यांचा सहा ते सात वर्षांचा एकत्र प्रवास एवढेच घडते. परंतु निलगिरी पर्वतांच्या, जैव विविधता असलेल्या जंगलांच्या पार्श्वभूमीवरील हा प्रवास, हत्तीची पिल्ले माणसाच्या जोडप्यामध्ये हळूहळू निर्माण होत जाणारा बंध या प्रवासाचे बोम्मनच्या प्रामाणिक आवाजातील (सबटायटलसह) वर्णन तुमच्या मनाचा ठाव घेते, हेच एलिफंट व्हिस्परर्सचे यश आहे.           

 

                                   

 हत्ती आपल्या देशातील अनेक भागांमध्ये अगदी सहजपणे दृष्टीस पडत असले तरीही शेकडो हत्ती प्राणी मनुष्याच्या संघर्षामध्ये मृत्यूमुखी पडतात तसेच बरीच माणसेही मारली जातात. महाकाय आकारामुळे ( त्याला जगवायला आवश्यक खाण्यामुळे) हत्तींना जगण्यासाठी बरीच जागा (अन्न पाणीही) हवी असते माणसांच्या सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे ( हव्यासामुळे) हत्तींसाठी हे अवघड होत चालले आहे. माणसांनी हत्तींना त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग म्हणून सहभागी करून घेतले नाही तर ही प्रजाती नामशेष होईल, हा संदेश अतिशय सोप्या भाषेत देण्यात आला आहे, हेच एलिफंट व्हिस्परर्सचे बलस्थान आहे. हा संदेश हत्तींसाठी असला कारण ते या माहितीपटाच्या केंद्रस्थानी आहेत, तरी प्रत्येक वन्य प्राणी किंवा संपूर्ण परिसंस्थेलाच तो लागू होतो तो माणसाचे डोळे उघडतो, एलिफंट व्हिस्परर्सला ऑस्कर मिळण्यामागे हा अतिशय महत्त्वाचा घटक होता, तसेच तो सर्वार्थाने या पुरस्कारासाठी योग्यही होता. ऑस्कर मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच बोम्मन बेल्ली यांना बोलावून घेतले त्यांच्या सेवेसाठी त्यांना रोख बक्षिस दिले. मदुमलाईतील हत्तींची छावणी सात वर्षांच्या रघू अम्मूची (माहितीपटात दाखविण्त आलेली हत्तीची पिल्ले) छायाचित्रे काढण्यासाठी अचानक पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्व अडीअडचणींवर मात करत, वन विभागाच्या विरोधालाही तोंड देत, बोम्मन बेल्ली अनेक दशकांपासून आपली कौटुंबिक परंपरा पुढे नेत करत असलेल्या या कामाचे महत्त्व आपल्या देशाला जाणवण्यासाठी ऑस्कर मिळावा लागला. सरकारने आता या हत्तींच्या छावणीला निधी दिल्याची बातमीही आली, खरोखरच एक समाज म्हणून आपण अतिशय ढोंगी आहोत, नाही का ?

बोम्मन बेल्ली हत्तींना वाढविण्याचे किंवा त्यांचे काळजीवाहक म्हणून करत असलेले काम किती अवघड आहे हे समजून सांगायचे झाले तर, निधीची नेहमीच चणचण असते हे काम करताना त्यांना कोणतीही शारीरिक इजा झाल्यास कोणत्याही प्रकारचा विमा किंवा तत्सम काहीही तरतूद नसतेएक लक्षात ठेवा की हत्ती हा भावना प्रधान प्राणी आहे माणसांच्या तुलनेत त्याचा आकार शक्ती दहापट जास्त असते, त्यामुळे एखादे चिडलेले हत्तीचे पिल्लूही काळजीवाहक किंवा त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांच्या जिवासाठी धोकादायक असू शकते. पाळीव हत्तींमुळे मरण पावलेल्या माणसांच्या बाबतीत एक रोचक तथ्य म्हणजे, यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या माहुताचा समावेश आहे, कारण हत्तींच्या मनस्थितीतील बदल किंवा रागाच्या भक्ष्यस्थानी सर्वप्रथम त्यांचे काळजीवाहक किंवा माहुतच पडतात. विरोधाभास म्हणजे बरोबर पाच वर्षांपूर्वी ऑस्कर पुरस्कारांच्याच महिन्यात म्हणजे १८ मार्च रोजी आपण हत्तींच्या रागाची घटना पाहिली या रागाला नागरहोळे व्याघ्र अभयारण्याचे (जे एलिफंट व्हिस्परर्सच्याच क्षेत्रात आहे) क्षेत्र संचालक एस. माणिकनंदा, हे भारतीय वन सेवेतील अधिकारी बळी पडले. ते त्यांच्या चमूसह जंगलामध्ये लागलेला एक वणवा तपासण्यासाठी गेले होते जेथे हत्तींचा एक कळप राहात होता, त्यावेळी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात ते मारले गेले. आता तुम्ही कल्पना करू शकता की एका प्रशिक्षित उच्च पदस्थ वनाधिकाऱ्याला सर्व प्रकारचे संरक्षण असून तोसुद्धा हत्तींच्या हल्ल्यात मारला गेला. येथे बोम्मन बेल्ली तर केवळ कनिष्ट श्रेणीतील वनमजूर आहेत, जे हत्तींची काळजी घेण्यासाठी त्यांचे आयुष्य धोक्यात घालत आहेत. ते काळजी घेत असलेले हत्ती कोणत्या ना कोणत्या आघाताचे बळी आहेत उदाहरणार्थ आईचा मृत्यू तसेच त्यांना मानवाच्या हस्तक्षेपामुळे इजाही झालेल्या आहेत. हत्तींची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते, ते त्यांना झालेल्या त्रासाचे कारण सहजासहजी विसरत नाहीत हे लक्षात ठेवा. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे बोम्मन बेल्ली यांनी हत्तींसोबतचे हे खडतर (कठीण) आयुष्य अतिशय सहजपणे आपुलकीने स्वीकारले आहे की काही वेळा हत्तींच्या पिल्लांची काळजी घेताना त्यांचे स्वतः मुलांकडेही दुर्लक्ष होते ही बाबही ते अतिशय मनमोकळेपणाने सांगतात.

या माहितीपटाची दिग्दर्शिका कुमारी कार्तिकी गोन्साल्विसला पूर्णपणे श्रेय दिले पाहिजे, जी केवळ काही दृश्यांमधून किंवा फ्रेममधूनच आपल्याला बोम्मन बेल्ली हत्तींमधील नाते उलगडून दाखवते किंवा आपल्याला हे जोडपे ज्या समर्पणाने हत्तींचे काळजीवाहक म्हणून काम करत आहेत त्याची जाणीव करून देते. एका दृश्यामध्ये बोम्मन आपल्याला तुम्ही हत्तीच्या पिल्लाला कसे हाताळले पाहिजे किंवा अनुभवले पाहिजे हे सांगतो कारण ते खरोखरच तुमचे मूल वाढविण्यासारखे असते, त्यांना स्पर्श करा”, बोम्मन सांगतो कारण हत्तींना तुमचा स्पर्श जाणवतो ते स्पर्शाला प्रतिसाद देतात त्यांना भरपूर वेळ द्या. दुसऱ्या एका दृश्यामध्ये बेल्ली माती झावळ्यांपासून बनवलेल्या खोपट्यामध्ये तिच्या मुलांना रात्री गोष्ट सांगत असते, त्याचवेळी रघू हे हत्तीचे पिल्लू खोपटाभोवती फेऱ्या मारत असते, त्याला बोम्मन बेल्ली यांच्या मुलांबद्दल एखाद्या भावंडाविषयी वाटावी तशी असूया वाटत असते हे या दृश्यामध्ये अगदी नेमकेपणाने चित्रित झाले आहे. हा भाग अतिशय सुंदर नैसर्गिक आहे असेच बारिकसारिक तपशील क्षणांमुळेच एलिफंट व्हिस्परर्सला ऑस्कर मिळाला असावा असे माझे मत आहे. आणखी एक पैलू म्हणजे बोम्मन बेल्ली यांनी ज्या सहजपणे त्यांच्या खडतर आयुष्याचा किंवा त्यांच्या आयुष्याच्या वास्तवाचा स्वीकार केला आहे. कोणतीही खंत मनात बाळगता, तक्रारी करता, तसेच कोणतीही जाहिरात करता ते आपले काम करत आहेत. हा माहितीपट जगाला (केवळ प्रेक्षकांनाच नव्हे) हाच सर्वोत्तम संदेश देतो. ज्या जगामध्ये स्वतःच्या पालकांची किंवा रक्ताच्या नात्यांचीही लोक पर्वा करत नाहीत अशावेळी हे जोडपे त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडून, हत्तींच्या काही अनाथ पिल्लांची काळजी घेते तसेच त्यांना जीव लावते, माणूस असण्याचा हाच खरा अर्थ आहे, हेच आपल्या समाजाला सांगणे आवश्यक आहे एलिफंट व्हिस्परर्स हा संदेश अतिशय शांत तरीही अतिशय ताकदीने  देतो!

 चित्रपटाच्या समारोपाच्या दृश्यामध्ये काही लहान मुले हत्तीच्या पिल्लाला अंघोळ घालत असतात पाठीमागून बोम्मनचा आवाज येत असतो, माझ्या वडिलांनीही वर्षानुवर्षे हेच केले आता मी बेल्लीही हेच करत म्हातारे झालो आमच्या मुलांनीही हेच करावे असे आम्हाला वाटते, हत्तींवर प्रेम करावे त्यांच्यासोबत मोठे व्हावे, येथेच हा माहितीपट संपतो. एलिफंट व्हिस्परर्स हा काही हत्तीच्या काही सुदैवी पिल्लांविषयी आहे ज्यांना योग्य मदत मिळाली मात्र हे आपल्याभोवती असलेल्या संपूर्ण वन्यजीवनालाही लागू होते ज्यासाठी असे बोम्मन बेल्ली आवश्यक आहेत तीच खऱ्या अर्थाने या माहितीपटाला मिळालेल्या ऑस्करसाठी तसेच एलिफंट व्हिस्परर्सच्या संपूर्ण चमूच्या प्रयत्नांसाठी खरी सलामी असेल. 

ऑस्करच्या मंचावर, कार्तिकी गोन्साल्विस पारितोषिक स्वीकारताना म्हणाली ते शब्द प्रत्येक माणसाच्या मनावर कोरले जातील (म्हणजे गेले पाहिजेत), ती म्हणाली, “मी आज येथे निसर्ग आणि माणसातील पवित्र नात्याबद्दल बोलायला उभी आहे. मी मानवतेचा या पृथ्वीवर ज्या-ज्या प्रजातींसोबत आपण सहजीवन जगतो त्या सर्वांचा गौरव करण्यासाठी उभी आहे”! 

कार्तिकी, खरोखरच, जोपर्यंत बोम्मन बेल्लीसारखी माणसे आहेत तुझ्यासारख्या त्यांच्या गोष्टी संपूर्ण जगापर्यंत पोहोचविणाऱ्या व्यक्ती आहेत, तोपर्यंत वन्य जीवनासाठी आशा जिवंत आहे एवढेच मला वाटते त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे.

--

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे मत खालील यूट्यूबलिंकवर पाहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s


No comments:

Post a Comment