Saturday 18 May 2024

वन पर्यटन समजावून घेताना ! (भाग पहिला)

 





















































वन पर्यटन समजावून घेताना ! (भाग पहिला)

                                                                       

जंगल नावाच्या शाळेमध्ये अनेक वर्ग असतात, पण त्या सगळ्यांमध्ये एकच सामाईक अभ्यासक्रम असतो, तो म्हणजे सहजीवन शिकणे” … मी.

मी स्वतःचेच विचार (म्हणजे अवतरण, कारण अवतरणे फक्त थोर व्यक्तींची असतात) लेखाच्या सुरुवातीला वापरले असल्यामुळे, तुम्हाला कल्पना आली असेल की हा लेख एखाद्या विवादास्पद विषयासंदर्भात नाही तर अनेकांना जो

विषय आवडेल कुतूहल आहे. परंतु ज्याविषयी अतिशय कमी लोक बोलतात (नाही, तुम्हाला जो विचार करताय ते नाही) त्यासंदर्भात आहे, मी वन्यजीवन पर्यटनाविषयी बोलतोय. कोव्हिडनंतर जंगलांना भेट देण्यात वाढ झाली आहे व प्रत्येकाला वाघ पाहायचाअसतो ज्याला दुर्दैवाने आपल्या देशामध्ये वन्यजीवन पर्यटन असे समजतात जे एकाअर्थी वरदानही आहे व शापही. हेमांगी व आरती या माझ्या मैत्रिणी शहरी महिलांना वन्यजीवनाची ओळख करून देण्यासाठी जंगल बेल्स नावाची संस्था चालवतात. या उपक्रमातून या महिलांना तसेच त्यांच्या मुलांना (कुटुंबियांना)

 प्रत्यक्ष वन्यजीवन व पर्यटनाविषयी माहिती नसलेल्या अनेक गोष्टींविषयी माहिती मिळते व त्यांच्यासोबत मलाही नवीन माहिती मिळते. त्यामुळे, आम्ही वन्यजीवन पर्यटनाविषयी आमचे अनुभव सांगण्यासाठी एक  चित्र संवाद मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला, ज्यांना वन्यजीवनाचा आनंद उपभोगायचा आहे त्यांना त्याची मदत व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. ही पॉडकास्ट मालिका सामान्य माणसाला वन्यजीवन पर्यटन समजून घेता यावे यासाठी तयार करण्यात आली आहे कारण याविषयासंदर्भात अनेक मिथके, चुकीच्या कल्पना असल्याचे आम्हाला जंगल बेल्सच्या गेल्या पाच वर्षांच्या प्रवासामध्ये विशेषतः कोव्हिडनंतरच्या काळामध्ये जाणवले आहे. एकीकडे, लोकांना वन्यजीवनाची नवनवीन ठिकाणे पाहायची आहेत, परंतु तरीही या सगळ्यांमधील समान धागा म्हणजे वन्यजीवन म्हटल्यावर प्रत्येकाला फक्त वाघ पाहायचा असतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु इतर प्रकारच्या पर्यटनाविरुद्ध, मग मौजमजेसाठीचे असतो, वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळे असोत किंवा निसर्गातील भ्रमंती (पदभ्रमण) असो, यासगळ्यांपेक्षा वन्यजीवन पर्यटन वेगळे असते कारण येथे पैसे देऊनही काहीच तुमच्या इच्छेनुसार होतात, हीच त्यातली खरी गंमत असते. जंगल तेच असले तरीही ज्या घटना घडतात त्या एकाच स्वरूपाच्या कधीच नसतात, उदाहरणार्थ तुम्ही डिस्नेलँडला भेट दिल्यावर, संध्याकाळच्या संचलनामध्ये सर्व पात्रे एकत्र येतात व पर्यटकांना भेटतात, जे दररोज संध्याकाळी, एकाच वेळी व एकाच मार्गावर घडते. परंतु जंगलामध्ये एखादा वाघ किंवा बिबट्या किंवा हरिणांचा कळप कधीही एकाच वेळी एकच मार्ग घेत नाहीत. काही वेळा ते असे करत असल्यासारखे वाटत असले तरीही तो निव्वळ योगायोग असतो ज्याला आपण नशीब म्हणतो व हेच अनेक पर्यटकांना समजत नाही!

जंगलामध्ये कुठे जायचे आहे ते स्थान निवडण्यापासून ते सफारीच्या आरक्षणावरील मर्यादेपर्यंत अनेक नियमांचे पालन करावे लागते, तसेच खर्च होतो, जेव्हा वन्यजीव पर्यटन या विषय असतो तेव्हा अनेक पैलू वेगळे असतात. हे सर्व घटक सांगता व समजवता येऊ शकतात असे आम्हाला वाटले. हे केवळ लेखी स्वरूपातच नव्हे तर संवादाच्या म्हणजे ध्वनी-चित्र माध्यमातून मांडावे, जेणेकरून लोक जागरुक होतील असा आमचा विचार होता, म्हणून आम्ही विषय तीन भागांमध्ये मांडायचे ठरवले, ते म्हणजे "वन्यजीवन पर्यटनाच्या मूलभूत गोष्टी ", "वन्यजीवन पर्यटनाविषयी गैरसमजूत" "वन्यजीवन पर्यटनामध्ये काय करावे व काय करू नये”! मी थोडा भाग्यवान असल्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मला आपल्या देशातील अनेक जंगलांमध्ये भेट देता आली. म्हणूनच पहिल्यांदाच माझ्या मनात ज्या लोकांनी अजून जंगल पाहिलेले नाही परंतु ज्यांना जाण्याची इच्छा आहे तसेच ज्यांनी काही जंगले पाहिली आहेत व त्यामध्ये काही अडचणींना तोंड द्यावे लागले आहे किंवा वन्यजीवन पर्यटनाविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांना काही सूचना द्याव्यात (म्हणजे माझे अनुभव सांगावेत) असा विचार आला. मी स्वतः अगदी सहजपणे लिहू शकतो म्हणूनच पॉडकास्टसाठी मी माझे विचार लिहीण्याचे ठरवले. बऱ्याच लोकांना प्रश्नोत्तरासारख्या स्वरूपातील ध्वनीचित्रफित समजण्यास अधिक सोपी वाटू शकते हे मान्य असले तरीही ज्यांना वाचायला आवडते (अजूनही असे काही लोक आहेत) ते हा लेख वाचू शकतात. तर वन्यजीवन पर्यटन समजून घेण्यासाठी तुम्ही आधी वन्यजीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, यावर बरेचजण म्हणतील त्यात काय मोठेसे, जेथे वाघ आहेत त्याला वन्यजीवन म्हणतात व व्याघ्र प्रकल्प पाहणे म्हणजे वन्यजीवन पर्यटन. मी याला अज्ञान म्हणणार नाही, कारण आपल्या मनावर नेहमी हेच बिंबवले जाते की वन्यजीवन म्हणजे वाघ पाहणे आणि नेमके हेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. माझ्या मते, (वन्यजीवनातील सर्व जाणत्या व्यक्तींविषयी आदर राखून) असे कोणतेही ठिकाण जेथे नैसर्गिक स्वरूपात जैवविविधता दिसून येते ज्यामध्ये झाडे—झुडुपे, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी (अगदी जलचरही) यांचा समावेश होतो व अशा कोणत्याही ठिकाणांना दिलेली भेट ही वन्यजीवन पर्यटनच मानता येईल. सुदैवाने, आपल्या देशाला अतिशय वैविध्यपूर्ण वन्यजीवनाचे वरदान लाभलेले आहे, ज्यामध्ये हिमालयातील जंगलांपासून ते राजस्थानातील वाळवंटांपर्यंत, कान्हातील सदाहरित साल वृक्षांच्या जंगलांपासून ते पूर्वेकडील पावसाळी जंगलांपर्यंत, मध्य भारतातील कोरड्या जंगलांपासून ते पश्चिम घाटापर्यंत, दख्खनच्या पठारावरील रखरखीत भागातील कुरणांपासून ते सागरी भागातील जंगलांपर्यंत तसेच हिंदी महासागर व अरबी समुद्रातील जीवनापर्यंत, आपल्याकडे अक्षरशः सर्व प्रकारचे वन्यजीवन उपलब्ध आहे. आपल्या देशातील छत्तीस केंद्रशासित राज्यांपैकी साधारणतः बारा राज्यांमध्ये वाघ आहेत, बिबट्या जवळपास सर्व राज्यांमध्ये आढळतो तर सिंह गुजरातेत व चित्ता मध्य भारतात दिसून येतो जर आपण मार्जार कुळाचा विचार केला. या सर्वांव्यतिरिक्त, प्रत्येक राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्यांची वैशिष्ट्यपूर्ण झाडे-झुडुपे व प्राणी दिसून येतात. अगदी पंजाब व हरियाणासारख्या शहरी/शेतीप्रधान सध्या  राज्यांमध्ये वन्यजीवन आहे व मुंबईसारख्या अगदी गजबजलेल्या शहरामध्ये पश्चिम उपनगरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे व ही सर्व ठिकाणे वन्यजीवनाचेच स्वरूप आहेत.

एकदा तुम्हाला वन्यजीवन म्हणजे काय हे समजल्यानंतर तुम्ही त्यानुसार कुठे जायचे ते ठरवू शकता व यासाठी सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न असतो जंगलात जाण्यासाठी किंवा वन्यजीवन पर्यटनासाठी सर्वात चांगला हंगाम कोणता व कोणत्या ठिकाणी जावे (म्हणजे थोडक्यात, मला वाघ हमखास कुठे दिसू शकेल)? यावर माझे उत्तर असते वन्यजीवन पर्यटनासाठी प्रत्येक हंगाम हा चांगलाच असतो, तेच वन्यजीवनाचे सौंदर्य आहे. जंगल केवळ प्रत्येक हंगामातच नव्हे तर दररोज, सकाळी व संध्याकाळी वेगळे दिसते. परंतु मला माहिती आहे, लोकांना असे श्री सद्गुरू स्वरूपाचे उत्तर नको असते. म्हणूनच मी तुम्हाला मनमोकळेपणाने सांगतो की तुम्हाला वाघ पाहायचा असेल तर उन्हाळा हा सर्वोत्तम हंगाम आहे व त्यासाठी मध्य भारतातील जंगलांमध्ये जावे. आता खरे उत्तर द्यायचे झाले तर तुम्हाला वन्यजीवन पर्यटनामध्ये काय पाहायचे आहे हे तुम्ही ठरवले पाहिजे, व त्यानंतर हंगामाचा निर्णय घेता येईल तसेच. तुम्ही तुम्ही कुठल्या हवामानाला तोंड देऊ शकता हे तुम्ही समजून घेतले पाहिजे कारण तुम्हाला बर्फातील बिबट्या पाहायचा असेल तर तुम्हाला लेह-लडाखला जावे लागेल व तिथे अगदी उबदार तापमानही शून्य अंशांच्या जवळपास असते. वन्यजीवन पर्यटनात तुम्हाला प्रत्येक हंगामात काहीतरी वेगळे पाहायला मिळते उदाहरणार्थ कान्हा जंगलातील बारसिंघा (स्वँप डिअर) प्रत्येक हंगामात आपला रंग व केसाळ कातडी बदलतो. उन्हाळ्यामध्ये तो करड्या रंगाचा असतो व कातडीवरचे केस कमी करतो तर हिवाळ्यामध्ये त्याची केसाळ कातडी कॅडबरीसारख्या गडद तपकिरी रंगाची होते व उन्हाळ्याच्या सुरुवातीला ती सोनेरी पिवळ्या रंगाची असते. मी केवळ एका प्रजातीविषयी बोलतोय, कारण प्रत्येक प्रजाती, मग अगदी झाडेही (भुताटकीच म्हणत/रबराची झाडे) जसा हंगाम बदलतो तसे त्यांचे स्वरूप बदलते. तुम्ही सर्व हंगामांमध्ये जंगलात गेल्याशिवाय तुम्हाला सर्वाधिक काय आवडते हे तुम्हाला समजणार नाही व त्यानंतर परत जायचे का हे तुम्ही ठरवू शकता. तरीही, थोडाफार अभ्यास करून, योग्य व्यक्तींना प्रश्न विचारून, तुम्ही कुठे जायचे हे ठरवू शकता. हंगामाचा विचार करता, वैयक्तिकपणे बोलायचे झाले तर मला थंडी सहन होत नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये मध्य भारतातील जंगलांमध्ये जाणे मी टाळतो कारण तिथे पहाटेची थंडी गोठवणारी असू शकते. अशा हंगामांमध्ये तुम्ही किनारपट्टीच्या भागातील किंवा पश्चिम घाटातील जंगलांमध्ये जाऊ शकता जिथे फारशी थंडी नसते. जैसलमेरच्या वाळवंटामध्ये हिवाळ्यात पहाटे अतिशय थंडी असते, परंतु तुम्ही सकाळी बाहेर पडणे टाळून थोडे उशीरा म्हणजे सकाळी १०च्या सुमाराला सफारी सुरू करू शकता जेव्हा सूर्य वर आलेला असतो. तुम्हाला हवामान कितपत सहन होते याचा विचार करून तुम्ही असे बदल करू शकता. हासुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे, कारण वन्यजीव पर्यटनामध्ये वन्यजीवन पाहण्यासाठीच्या वेळा ठरवताना त्यावर तुमचे नियंत्रण नसते, निसर्गच ते करतो. वन्यजीवन आढळणाऱ्या बहुतेक ठिकाणांना भेट देण्याच्या वेळा स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात व सामान्यपणे त्या राज्यातील वन विभागाद्वारे ठरवल्या जातात. तुम्ही त्या ठिकाणी भेट देण्यापूर्वी त्याविषयी माहिती घेतली पाहिजे.
जेथे वाघ आहेत अशा बहुतेक जंगलांना एनटीसीएच्या (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण) मार्गदर्शक तत्वांनुसार संचालनाची परवानगी दिली जाते, तर इतर ठिकाणी वेळा हंगामानुसार व सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळांप्रमाणे बदलतात कारण जंगलातील जीवन हे सूर्याभोवती फिरते. अनेक ठिकाणी आता नियंत्रितपणे रात्रीच्या सफारींनाही परवानगी दिली जाते.
अनेक लोक वन्य पर्यटनाच्या ठिकाणी निवासाची सोय व जेवणाच्या व्यवस्थेविषयी व सफारीदरम्यानच्या सुरक्षिततेविषयी विचारतात. आपण एक गोष्ट समजून घेतले पाहिजे, काही ठिकाणांचा अपवाद वगळता (रणथंबोरसारख्या) बहुतेक जंगले ही शहरी वसाहतींपासून (शहरे व गावे) लांब असतात व अगदी उत्तम सेवा देणे, प्रशिक्षित मनुष्यबळ, तसेच मोबाईलसाठी नेटवर्क, अशा सर्व गोष्टी मिळणे अतिशय अवघड असते व आपण या गोष्टींचा आदर करणे आवश्यक आहे. कारण अशा परिस्थितीतही येथील लोक सर्व अडचणींवर मात करून पर्यटकांना जास्तीत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला एक उदाहरणच द्यायचे झाले तर, तुम्हाला सकाळी च्या सफारीला जायचे असते तेव्हा तुम्हाला अंघोळीसाठी गरम पाणी देण्यापासून ते तुमच्या नाश्त्याचे पाकीट तयार करेपर्यंत सगळ्या गोष्टी करण्यासाठी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना पहाटे वाजता उठावे लागते व उन्हाळ्यातील तीव्र उष्णता असो कडाक्याची थंडी असो किंवा पाऊस त्यांना ते करावेच लागते. तुमच्यापैकी काही जण जेवणाच्या खोलीत रात्री उशीरापर्यंत पीत बसलेले असतात कारण सकाळच्या सफारीला न जाण्याचा पर्याय असतो परंतु कर्मचाऱ्यांना अशी चैन करता येत नाही. त्याचप्रमाणे बिझनेस स्कूलमधील सर्व वर्गवाऱ्यांमधील सुप्रशिक्षित कर्मचारी इथे येण्यासाठी व राहण्यासाठी तयार नसतात कारण अशा ठिकाणी ३६५ दिवस राहणे हे शहरी पांढरपेशा कर्मचाऱ्यांसाठी सोपे नसते. त्यामुळे बहुतेक हॉटेल अथवा रिसॉर्टना स्थानिक मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागते, त्यांना कसे बोलायचे, कशी वेशभूषा असावी हे सगळे शिकवणे हे एक मोठे काम असते. पण एक लक्षात ठेवा त्यातूनच स्थानिक लोकांना रोजगार मिळतो व तेच वन्यजीवन वाचवू शकतात. अनेक हॉटेलमध्ये खोलीत इंटरकॉम यंत्रणा नसते, यामुळे पर्यटन लहान-सहान, अजिबात महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांना कॉल करत नाहीत. त्याचप्रमाणे वाय-फाय सेवाही सगळ्या खोल्यांमध्ये उपलब्ध नसते तर जेवणाच्या जागेसारख्या काही मध्यवर्ती ठिकाणीच उपलब्ध असते. याचे कारण म्हणजे आपण निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवण्यासाठी जंगलात जातो आपल्या आभासी जगात गुंगून राहण्यासाठी नव्हे, जे आपल्या काँक्रीटच्या जंगलात आपण बहुतेक वेळ असतोच, बरोबर?
त्याऐवजी वन्यजीवनाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही जिथे राहात आहात त्याच्या आसपास भटकंती करण्यासाठी, स्थानिकांशी बोलण्यासाठी हा वेळ वापरा व तुम्हाला समजेल की जंगले किती अद्भूत असतात व त्याच्या विस्तीर्ण अवकाशात कितीतरी गोष्टी दडलेल्या असतात. सुरक्षिततेविषयी बोलायचे झाले, तर वन्यजीवनामध्ये तुम्ही त्यांच्या नियमांचे पालन केले व व्यवस्थित अंतर राखले तर तुम्ही आपल्या काँक्रीटच्या जंगलांपेक्षाही शेकडोपट सुरक्षित असता व हा माझा वैयक्तिक अनुभ आहे त्यासाठी व्यावसायिकांशी संपर्क आला पाहिजे. वन्यजीवन पर्यटनामध्ये सहभागी असलेले बहुतेक लोक स्थानिक आहेत, हळूहळू त्यांनाही समजू लागले आहे की पर्यटकांनी खर्च केलेल्या पैशातूनच स्थानिकांची जीवनशैली सुधारेल जे वन्यजीवन संवर्धनाचे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळेच ते पर्यटकांना सर्वतोपरी मदत करतात व पर्यटकांची काळजी घेतात.

शेवटचा मुद्दा म्हणजे, मित्रहो तुम्ही जेव्हा एखाद्या जंगलात जाता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःचा वेळ मजेत घालवत नसता तर अनेक अप्रत्यक्षरित्या परिवारांना मदतही करत असता, विशेषतः जंगलाच्या अवती-भोवती राहणाऱ्या व्यक्तींना. निसर्गाचे ऋण फेडण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, कारण हा निसर्ग म्हणजे देवाने माणसाला दिलेली एक भेटच आहे व माझ्यामते वन्यजीवन पर्यटनाचा हा सर्वोत्तम पैलू आहे. तुम्ही इथपर्यंत वाचले असेल तर संयमासाठी तुमचे आभार. तुम्ही एवढा संयम ठेवून जंगलाला भेट देण्यास गेलात तर नक्कीच तुम्हाला त्याविषयी अधिक चांगल्याप्रकारे शिकता येईल व त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही जंगलांना प्रत्येक हंगामात भेटत राहाल, एवढे सांगून निरोप घेतो

तुम्ही आमचे पॉडकास्ट यूट्यूबच्या खालील दुव्यावर पाहू शकता व तरांनाही आवजूशेअर करा

 

You can watch our sharing on You Tube link below in detail & plz do share …

 

 https://youtu.be/0m9b7UnF5m0?si=RoZQXQYp2oXGDRRc

 

 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com












No comments:

Post a Comment