Tuesday, 11 January 2022

वाघाला समजून घेताना ( अंतिम भाग )

 



























 

वाघाचा शोध घेत संपूर्ण जंगलात भटकंती करताना तो वाघ आधीच कदाचित तुमच्यावर नजर रोखून असेल हे समजण्याएवढे थरारक काहीही नाही” …. अश्लान गॉर्स कॉस्टो.

 

 

अश्लान गॉर्स कॉस्टो ही अमेरिकी मनोरंजन पत्रकार आहे. ती ! न्यूज, डिस्कव्हरी चॅनल ट्रॅव्हल चॅनलमधील कामासाठी ओळखली जाते. श्रीमती अश्लान जेव्हा जंगलामध्ये वाघाला पाहण्याचा थरार कसा असतो याचे वर्णन करतात तेव्हा त्यांची उत्सुकता मला अतिशय चांगल्याप्रकारे समजू शकते. मला तिच्या भावनांविषयी पूर्णपणे आदर आहे, मात्र वाहनामध्ये इतर लोकांसोबत आरामात सुरक्षितपणे बसून हे बोलणे, तसेच वाघांचा शोध घेऊन त्यांची छायाचित्रे घेणे, त्याविषयी चित्रपट किंवा माहितीपट बनवणे सोपे असते (मीसुद्धा ते करतो यात काहीच गैर नाही). मात्र जंगलाच्या आसपास मातीच्या कुडांच्या भिंतींनी बांधलेल्या झोपडीत राहताना, मिट्ट काळोखात उघड्यावर शौचासाठी जावे लागते तेव्हा किंवा वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांचे माणसांपासून संरक्षण करण्यासाठी घनदाट जंगलामध्ये पायी गस्त घालावी लागते तेव्हा, तसेच जेव्हा तुम्ही त्याचे रक्षक आहात किंवा शिकारी आहात यात वाघ फरक करू शकत नाही, तेव्हा अशा वेळी तुम्ही नक्कीच वाघ पाहायला फारसे उत्सुक असणार नाही. किंबहुना अशावेळेस तुम्ही आपली एखाद्या वाघाशी गाठ पडू नये अशीच इच्छा व्यक्त कराल, नाही का?.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये एका वाघिणीने एका महिला वनरक्षकाला मारल्याच्या घटनेचे शवविच्छेदन (म्हणजे विश्लेषण) करण्यासाठी मी लिहीलेल्या लेखाचा हा दुसरा भाग आहे. या लेखासाठी मला हे अवतरण अतिशय समर्पक वाटले कारण त्यातून वाघ त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे याविषयी वेगळा दृष्टिकोन किंवा वेगळी जाणीव दिसून येते. कोणत्याही व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणत्याही पर्यटकाला, गाईडला किंवा जिप्सी चालकाला विचारा (जिथे पर्यटनाला परवानगी आहे), तुम्हाला फक्त एकच प्रश्न ऐकू येईल तो म्हणजे, दिसला का किंवा सध्या कुठे दिसतोय?” म्हणजे तुम्ही वाघ पाहिला का किंवा जंगलात सध्या कुठेही वाघ दिसतोय का.

मी त्यांना दोष देत नाही, कारण आपले वन्यजीवन पर्यटन केवळ वाघाभोवती केंद्रित आहे. त्यात चूक काहीच नाही कारण खुल्या जंगलामध्ये वाघ तुमच्या दिशेने चालत येताना पाहण्यापेक्षा अधिक चांगले काहीच असू शकत नाही. बहुतेकांसाठी तो आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो प्रत्येक वेळी हा अनुभव पहिलाच असल्याप्रमाणे तो उत्कंठावर्धक असतो, हे मी माझ्या अनुभवावरून खात्रीशीरपणे सांगू शकतो. वाहनांमध्ये असलेल्या पर्यटकांवर वाघाने कधीही हल्ला केलेला नाही (सुदैवाने) कारण ते त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर असतात. मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या जंगलामध्ये जेव्हा एक वनरक्षक किंवा वनमजूर (जंगलातील मजूर) असता किंवा तुम्ही एखाद्या व्याघ्रप्रकल्पाच्या आसपासच्या गावामध्ये राहात असता तेव्हा तुम्हाला जंगलात पायी गस्त घालावी लागते किंवा तुमच्या शेताकडे चालतच जावे लागते. अशा सर्व परिस्थितींमध्ये तुम्हाला ये-जा करण्यासाठी सगळीकडे आपल्या दोन पायावरच फिरावे लागते तुम्हाला माहिती आहे की तुमची एखाद्या वाघाशी कधीही गाठ पडू शकते. असा परिस्थितीत तुम्हाला वाघ पाहायला आवडेल का याचे मला खरे उत्तर द्या.  माझे उत्तर स्पष्टपणे नाही असेच असेल. मी जंगलात पायी जावे लागेल अशा अनेक गटांमध्ये सहभागी झालो आहे वाघ मला कुठूनही पाहात असेल मात्र मी त्याला पाहू शकत नाही या केवळ विचारानेच मी अतिशय अस्वस्थ झालो, जसा एम- च्या परीक्षेला (अभियांत्रिकीच्या २ऱ्या वर्षातील गणिताची परीक्षा) बसायच्या नुसत्या विचारानेच  मात्र अजूनही घाम फुटतो! याचे कारण अगदी सोपे आहे, वाघाला मी वनरक्षक आहे माझे काम त्याचे रक्षण करण्याचे आहे हे माहिती नसते तसेच मी शेजारच्याच गावात राहणारा शेतकरी आहे याचीही फिकीर नसते. वाघासाठी मी एक माणूस आहे, एक घुसघोर आहे, तो कदाचित मला खाणार नाही पण माझ्यापासून त्याला धोका आहे असा विचार तो करत असेल, कारण तो मला ओळखत नाही किंवा समजून घेऊ शकत नाही. म्हणून, जेव्हा आपण म्हणतो की वाघ पाहणे हा अतिशय रोमांचक अनुभव असतो तेव्हा एक लक्षात ठेवा की वाघाशी संबंधित सगळ्यांसाठीच हे सत्य किंवा वस्तुस्थिती नसते. तुम्ही कोणत्या भूमिकेतून परिस्थितीमध्ये वाघ पाहता, यामुळे तुमच्या दृष्टिकोनात फरक पडतो.

आता पुन्हा माया वाघिणीने महिला वनरक्षकाला मारल्याच्या घटनेविषयी बोलू. अलिकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये २०२१ या वर्षात १४० हून अधिक वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यापैकी जवळपास ५०% मृत्यू नैसर्गिक होते किंवा सीमेवरून झालेल्या वादातून झाले होते असे आपण गृहित धरले तरी जवळपास ७० वाघ माणसांमुळे मारले गेले. दोन्ही प्रजातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणाची तुलना करून (म्हणजे मानवी लोकसंख्या वाघांची संख्या) जर उलटा हिशेब केला तर वाघांमुळे मरण पावलेल्या माणसांच्या मृत्यूंची संख्या काही लाखोंमध्ये गृहित धरावी लागेल. अर्थात प्रत्यक्षात मात्र माणसांच्या मृत्यूंची संख्या जवळपास वाघांच्या मृत्यूंएवढीच आहे. आता कोणापासून कोणाला नक्की धोका आहे हे मी आणखी समजून सांगण्याची गरज आहे का? महिला वनरक्षकाच्या मृत्यूचे समर्थन कऱण्यासाठी मी हा मुद्दा मांडत नाही, मात्र आपण वाघ तसेच संपूर्ण वन्यजीवनाला समजून घेण्याची त्यांचा आदर करण्याची वेळ आली आहे, तरच आपण एकमेकांना थोडी जागा देत सुरक्षितपणे आनंदाने जगू शकू.

हेच नेमके सार आहे, कारण वाघ कधीच आपल्याला किंवा आपला उद्देश समजू घेऊ शकणार नाहीत तर माणसांनाच वाघांच्या गरजा समजून घ्याव्या लागतील किंवा वाघाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, जर आपल्याला वाघांसोबत जगायचं असेल, बरोबर? मानवी परस्परसंबंधांमध्येही ही समज आवश्यक असते इथे तर आपण दोन वेगवेगळ्या प्रजातींविषयी बोलतोय. त्यातील एका प्रजातीकडे सगळ्या प्रजातींमध्ये सर्वाधिक प्रगल्भ मेंदू आहे. म्हणूनच या नात्यामध्ये आपली जबाबदारी निश्चितपणे जास्त आहे, असे मला सांगावेसे वाटते. अलिकडेच मला ताडोबाच्या क्षेत्र संचालकांसोबत वाघांच्या संवर्धनाबाबत चर्चा करायची संधी मिळाली, त्यांचीही तीच काळजी होती. आपण वाघांना कसे सामावून घेणार आहोत यावरच वाघांचे भवितव्य ठरणार आहे, याच्या उलट विचार करून चालणार नाही.  

वाघिणीच्या हल्ल्याविषयी मी नुकत्याच लिहीलेल्या लेखासोबत जोडलेल्या एका छायाचित्रावर एक टिप्पणी करण्यात आली होती. या छायाचित्रामध्ये ताडोबामध्ये एक वाघ वनमजुरांच्या गावकऱ्यांच्या अगदी जवळून चालत जातोय कुणीतरी लिहीले होते की ते बनावट छायाचित्र होते. ते छायाचित्र माझ्या मित्राने काढलेले होते ते फेसबुकवर आहे. खरेतर अशी बनावट छायाचित्रे तयार करण्याची काहीच गरज नाही कारण ताडोबामध्ये अशी दृश्ये अगदी नियमितपणे दिसतात. मी त्यावर उत्तर लिहीले, नुकतेच  मी जेव्हा ताडोबाच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या दुकानापाशी उभा होतो तेव्हा मला त्या रस्त्यावरून वाघीण चालत जाताना दिसली मी तिचे छायाचित्र काढले, जे काढण्याची परवानगी आहे. ती वाघीण माझ्या समोरील साधारण ३० फुटांच्या घनदाट झाडीतून बाहेर आली तिने रस्ता ओलांडला, ते छायाचित्र खाली दिलेले आहे. कोअर बफर क्षेत्रामध्ये अशी बरीच गावे आहेत जिथे गावकऱ्यांना रस्त्यावरून चालत जाताना अगदी जवळून वाघोबाचे दर्शन होते. १०० पैकी ९९ वेळा वाघ माणसांकडे ढुंकूनही पाहात नाही. लोकहो, कोअर, बफर, खाजगी जंगल किंवा कोणतेही मानवी सुरक्षा तैनात नसलेले जंगल हे सगळे शब्द माणसांनी तयार केलेले आहेत. वाघ त्याच्या मर्जीप्रमाणे कुठेही जायला मुक्त आहे. आपण माणसांनीच त्याच्या हालचालींचा आदर केला पाहिजे त्याच्यापासून योग्य अंतर राखले पाहिजे, हेच योग्य होई. हे पाहा ते छायाचित्र मी वाघीण रस्ता ओलांडत असतानाचे छायाचित्र दाखवले होते त्याखाली वाक्य लिहीले होतेमला माझी जागा द्या, मी तुम्हाला तुमची जागा देते! त्याशिवायही बऱ्याच प्रतिक्रिया होत्या ज्यामधून लोकांना वाघ जंगलांविषयी तळमळ असल्याचे दिसून येत होते. तसेच त्यातून त्यांचे बरेच गैरसमजही दिसत होते संपूर्ण वन्य जीवनाविषयी जागरुकतेची गरज असल्याची जाणीव होत होती. मी त्यापैकी काही त्यांचे खरे नाव शब्दांसकट वापरत आहे, या प्रतिक्रिया फेसबुकवरून घेतल्या आहेत (ुणालाही दुखावण्याचा हेतू नाही)...

सुषमा वर्मा

आपण त्यांच्या क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे, त्यांची जागा हिरावून घेतली आहे त्यानंतर आपण तक्रार करतो की ते आपल्या जागेत येतात. हे बिचारे विस्थापित लोक कुठे जाऊ शकतात कुठे जातील (हो, माझ्यासाठी हेच खरे लोक आहेत)? ते माणसांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मार्गावर चालतात. मात्र त्यांची निवासस्थाने नष्ट झाली आहेत, त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे त्यांना शिकार करून खाण्यासाठी प्राणीही उरलेले नाहीत. म्हणून त्यांना कुठेतरी हल्ला करून त्यांची भूक भागवणे आवश्यक आहे. आपण याबद्दल विचार केला पाहिजे.

संजय देशपांडे

लेखक

सुषमा वर्मा मॅडम, कोअर, बफर, खाजगी जंगल किंवा कोणतेही मानवी सुरक्षा तैनात नसलेले जंगल हे सगळे शब्द माणसांनी तयार केलेले आहेत. वाघ त्याच्या मर्जीप्रमाणे कुठेही जायला मुक्त आहे. आपण माणसांनीच त्याच्या हालचालींचा आदर केला पाहिजे त्याच्यापासून योग्य अंतर राखले पाहिजे, हेच योग्य होईल!

 

ट्रेव्हर रेगो

प्रिय सर जर वाघ अशाप्रकारे नियमितपणे झाडीतून येऊन रस्ता ओलांडू लागले तर ते वन्य वाटणार नाहीत, आपण प्राणीसंग्रहात जाऊन प्राणी पाहातोय असेच वाटेल. आणखी एक गोष्ट मी पाहिलीय ती म्हणजे लोक हे प्राणी पाहण्यासाठी सामान्य वाहनांमधून येतात, ज्यांचे टप खाली केलेले असते. एखाद्या वाघाचा दिवस वाईट असेल, तर सगळ्यांचेच दिवस भरले असे समजा. अशावेळी वनरक्षकाकडे शस्त्र नसेल तर, ते असेल का याची मला शंकाच वाटते, तर तुम्ही वाघासाठी त्याच्या किंवा तिच्या कुटुंबासाठी दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण व्हाल, त्यानंतर वाघाला ठार केले जाईल.

अशी परिस्थिती निर्माणच का व्हावी त्यांना त्यांची जागा मिळू द्या.

 

संजय गंगवानी

गीरमध्ये आजूबाजूच्या परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येते अनुभव येतो.

वर्षा साठे

म्हणून मूळ रोड जंगलातून जातो तो बंद करावा असं वाटतं दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे

संजय देशपांडे

लेखक

वर्षा साठे तुम्ही किती रस्ते बंद कराल, हा प्रश्न आहे! सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्राण्यांचे वर्तन समजून घेऊन कसे जगायचे हे शिकणे, जंगलात काम करणारे लोक गावकऱ्यांना हे माहिती असते ते त्यानुसारच जगतात.

 

मुकेश रायजादा

सुंदर छायाचित्र, वाघांच्या जंगलांवर माणसांचे सर्वोच्च अतिक्रमण, वाघांनी इतर वन्यप्राण्यांनी कुठे जावे.

 

कॅरोल पी

मला यामुळे मी जेव्हा बांधवगढला गेले होते त्याची आठवण झाली. मी पहाटे रेल्वेने लवकर पोहोचले जंगलातील कँपवर पोहचल्यानंतर सफारीसाठी निघालेली गाडी थोडक्यात चुकली, म्हणून मी उन्हं वर येण्यापूर्वी पायी भटकंती करण्याचे ठरवले. मी कँपमधील कर्मचाऱ्यांना जवळपास वाघ किंवा चित्ता आहे का चालत जाणे सुरक्षित आहे का असे विचारले. नाही नाही, मॅम अगदी सुरक्षित आहे असे उत्तर त्यांनी दिले. माझ्या कँपच्या शेजारी एक मोठी बोगनवेल मी पाहून ठेवली होती, त्यामुळे परत येताना रस्ता सापडला. २०० मीटरनंतर मी एका भिंतीपाशी आले, मी मार्गासाठी ती लक्षात ठेवली होती त्यानंतर पुन्हा कँपवर आले. दिवसांनी आम्हाला बी२ दिसला जो जिपपासून अगदी जवळ होता, तो त्या बुटक्या भिंतीपाशी उभा होता जी ओळखीची वाटत होती. मी वर पाहिले मला दिसले की काही दिवसांपूर्वी मी रस्ता शोधण्यासाठी जी बोगनवेल पाहिली होती, ती १०० मीटरपेक्षाही कमी अंतरावर होती. बापरे! त्यानंतर मी ठरवले की पुढील वेळेस कुणी मला सांगितले की मॅम अगदी सुरक्षित आहे, वाघ अजिबात नाही, तरी मी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही

राजीव सिंह सिसोदिया

माणसे वन्य जीवन दोन्हीसाठी हे धोकादायक आहे. अभयारण्ये सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

 

संतोष मनुपरंबील

कदाचित आपण "वाघ रस्ता ओलांडत आहे" अशा खुणा ठिकठिकाणी लावल्या पाहिजेत.

 

वर केवळ काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र त्या वाचून आपल्याला एक गोष्ट समजते की अनेक माणसांना केवळ वाघांचीच नाही तर वन्यजीवनाचीही काळजी आहे. मात्र केवळ काळजी करून उपयोग नाही, वन्य जीवनाच्या संवर्धनासाठी आपण योग्य गोष्टी करणे संघर्ष कमी करणे आवश्यक आहे. त्याचवेळी अशी अनेक माणसे आहे ज्यांना वन्यजीवनाशी काही घेणेदेणे नसते किंवा त्याविषयी अनभिज्ञ असतात आणि हेच लोक वन्यजीवनासाठी सर्वात मोठा धोका आहेत, ते वाईट आहेत म्हणून नाही तर ते वाघांसंदर्भात एकूणच वन्यजीवनासंदर्भात अनभिज्ञ आहेत जे माणसे वाघांदरम्यान ( इतर प्रजातींचाही) संघर्ष होण्याचे मुख्य कारण आहे परिणामी बहुतेक वेळा वाघांना त्यांचा जीव गमवावा लागतो. जागरुकता वाढविण्याशिवाय आपण इतरही अनेक गोष्टी करू शकतो, उदाहरणार्थ जंगलांशेजरी असलेल्या खुल्या विहीरींभोवताली सुरक्षा भिंत बांधणे, कोअर जंगलाला लागून असलेल्या भागामध्ये अनेक पाणवठे बांधणे, जंगलाभोवतालच्या वसाहतींना कुंपण घालणे, जंगलाच्या शेजारील प्रत्येक झोपडीला (घराला) लागून शौचालय बांधणे, अशी करण्यासारखी गोष्टींची लांबलचक यादी आहे, ज्यामुळे वाघाचे अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतील तसेच माणसे वाघांमध्ये (वन्यजीवनामध्ये) अपघाताने होणारे संघर्ष टाळता येतील. यासाठी ज्या स्वयंसेवी संस्था, वन विभाग माणसांना वाघांची खरी गरज समजली आहे त्यांनी एकत्र आले पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे, त्यासाठी माणसांचे वाघांचे आयुष्य थोडे सुसह्य तसेच सुरक्षित होण्यासाठी जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच अनेक गोष्टी करता येतील, एवढेच मी सांगू शकतो. यामध्ये जंगलाचा प्रत्येक भाग पर्यटनासाठी खुला करण्याचा समावेश होतो कारण तरच अधिकाधिक लोक वाघाला (वन्य जीवनाला) पाहतील, वाघाला समजून घेण्याचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे. आपण जर वाघाला समजून घेऊ शकलो तरच आपण त्याला वाचवू शकू , बरोबर ना? या विचारासह निरोप घेतो!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/11/roads-real-estate-delays-city.html

 

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 


1 comment:

  1. How to make money off of online casino games - Work
    How to make money off of online 제왕카지노 casino games - Check out this guide for หารายได้เสริม advice on making money online casino games. Play slot choegocasino games on your mobile, or with

    ReplyDelete