Friday, 25 March 2022

गॉडफादरची पन्नाशी!!

 


















 


१४ मार्च २२,

गॉडफादरची पन्नाशी!!

"अर्थकारण म्हणजे बंदूक राजकारण म्हणजे या बंदुकीचा चाप ओढायची ताकद असणे”. गॉडफादर.

१४ मार्च १९७२ या दिवशी, म्हणजेच ५० वर्षांपूर्वी गॉडफादर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि इंटरनेट किंवा गूगल, वॉट्सऍप, इन्स्टा, फेसबुक किंवा कोणताही हॅशटॅग नसतानाही, जगभरातल्या लक्षावधी लोकांना माफिया डॉन या दोन शब्दांची ओळख झालीमी आत्तापर्यंत असंख्यवेळा ही कादंबरी वाचली आहे तसेच हा चित्रपट (म्हणजे तीन चित्रपटांची मालिका) पाहिला आहे. या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत झाल्याबद्दल म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षाबद्दल अनेक लेख प्रसिद्ध होऊन गेले आहेत. मात्र हा लेख समीक्षकाच्या किंवा चित्रपट जगतातील कुणा सुप्रसिद्ध व्यक्तीच्या दृष्टीकोनातून लिहीलेला नाही, तर समाजातील एका सामान्य चित्रपटप्रेमी व्यक्तीच्या दृष्टीकोनातून लिहीलेला आहे.

गॉडफादरच्या यशाने चित्रपट उद्योगाला या माध्यमाची खरी ताकद दाखवून दिली, कारण आता आपल्याला माहिती आहे की चित्रपटाचे यशाचे मोजमाप फक्त बॉक्स ऑफिसवर त्याला मिळणाऱ्या यशाने होत नाही. गॉडफादरने त्याही पलिकडे जात आपल्याला जाणीव करून दिली की एखादा चित्रपट लोकांना जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टीकोन किती बदलायला लावतो यावरूनच त्याचे यश समजते. गॉडफादर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईपर्यंत, चूक बरोबर, चांगले वाईट याविषयी कल्पना अतिशय साध्या स्पष्ट होत्या. तुमच्याकडे बंदूक असेल तुम्ही ताकदीच्या जोरावर लोकांना धमकावत असाल त्यांनी तुमचे ऐकले नाही तर त्यांना मारपीट करत असाल, तर तुम्ही वाईट माणूस आहात, असा साधा सरळ हिशेब होता. प्रत्येक गणवेशधारी हा चांगलाच माणूस असतो कायद्याचे पालन करणारी कुणीही व्यक्ती वाईट असते. खंडणी उकळणारा, अवैधपणे दारू विकणारा किंवा देशात अवैध स्थलांतरितांना मदत करणारा कुणीही माणूस कधी चांगला असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माफिया हा शब्द निषिद्ध असतो गुंडांपासून तुम्ही चार हात लांब राहता, त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडण्याचा किंवा त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुमच्याविरुद्ध घडलेल्या एखाद्या गुन्ह्यासंदर्भात तुम्हाला न्याय मिळाला नसेल तर एकतर तुम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागता, तोंड बंद ठेवता किंवा फक्त पांढरपेशा व्यक्ती म्हणून तुमच्या दुर्दैवाला कमकुवतपणाला दोष देता, तुम्ही याव्यतिरिक्त दुसरे काही करत नाही.

मात्र गॉडफादरने हे सर्व समज केवळ तीन तासांमध्ये बदलून टाकले कारण तुम्ही आता जाणता की पूर्णपणे वाईट किंवा चूक असे काहीच नसते, तर प्रत्येक वाईटालाही अनेक पदर असतात काहीवेळा वाईटातही चांगुलपणा दडलेला असू शकतो. आता तुम्ही असा विचार करता की सर्वच गुंड वाईट नसतात गुन्ह्यांमध्येही अत्यंत वाईट गुन्हे कमी वाईट गुन्हे असतात काही सद्हेतूने केलेले गुन्हेही असतात; उदाहरणार्थ निष्पाप लोकांना सतावणाऱ्या गुंडांना चोप देणे कायद्याच्या कचाट्यातून निसटणे कारण जगात वाईट पोलीस भ्रष्ट न्यायाधीश सुद्धा असतात, ज्यांना खरेदी केले जाऊ शकते. तुम्हाला एखाद्या गुन्ह्यामध्ये सहभागी होऊन सुद्धा खरोखर न्याय मिळू शकतो ज्यामध्ये डॉनसाठी काम करणाऱ्या भाडोत्री माणसांकरवी वाईट गुंडांना चोप देण्याचा समावेश होतो.

आता, गुंडांचा म्होरक्या कुणी वाईट माणूसच असला पाहिजे असे नाही जो लाच देणे, तस्करी, चोरी, मारहाण प्रसंगी योग्य कारणासाठी लोकांचा जीवही घेण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असेल, ज्याविषयीचे निर्णयही त्यानेच घेतले असतील. मात्र उगाच काळजी कशाला करायची, आपल्या सर्वांचीच काही एक काळी बाजू असते कधी ना कधी, आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या काळ्या, नकारात्मक बाजूला आपला ताबा घेऊ दिला आहे कायद्याच्या किंवा नैतिकतेच्या चौकटीत बसत नाहीत अशा गोष्टी करायला लावले आहे, बरोबर? म्हणूनच, केवळ डॉन कॉर्लिऑनवरच धमकावणे किंवा खंडणी वसूलणे (ज्याला तो संरक्षण देण्यासाठीचे पैसे म्हणतो), मद्याचा अवैध व्यवसाय करणे किंवा त्याला सहकार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे अशा कृत्यांसाठी वाईट माणूस असा शिक्का का मारायचा? त्याच्यात नक्कीच काहीतरी चांगुलपणा आहे कारण तो अंमली पदार्थांच्या व्यवसायाला किंवा वेश्या व्यवसायाला पाठिंबा देत नाही किंवा पांढरपेशा, चांगल्या निष्पाप व्यक्तींना मारत नाही (जोपर्यंत ते त्याच्या वाईटाच्या व्याख्येमध्ये बसेल असे वाईट कृत्य करत नाहीत). याशिवाय तो त्याच्या कुटुंबाची इतर कुणाही कुटुंबवत्सल माणसाप्रमाणेच काळजी घेतो, केवळ कुटुंबाचे संरक्षण करण्याची त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळेच तो सामान्य माणसांपेक्षा वेगळा आहे, मात्र अवतीभोवती असलेल्या इतर वाईट माणसांसारखा वाईट नाही.

गॉडफादरने या सिनेमाने संपूर्ण समाजाच्यासंदर्भात नेमके हेच केले आहे, कारण आता चित्रपटांमध्ये नायक किंवा आघाडीच्या भूमीकेतील व्यक्ती या समाजातील तथाकथित कायद्याचे पालन करणाऱ्या व्यक्तिरेखा नसतात. त्या स्वतःचे कायदे तयार करतात त्या कायद्यांचे पालन करणारा स्वतःचा समाज तयार करतात. मात्र आता त्यांना वाईट किंवा खलनायक म्हणता येणार नाही, जे आधी केले जायचेगॉडफादरने जगभरातील चित्रपट निर्मात्यांना पटकथा चित्रपटाच्या संकल्पनेमध्ये बदल करण्याची केवळ प्रेरणाच दिली नाही तर चित्रपटाच्या लक्षवधी प्रेक्षकांचा (म्हणजेच आम जनतेचा) चित्रपट पाहण्याचा दृष्टीकोन, अपेक्षा किंवा हेतूच बदलला. म्हणूनच गॉडफादर विशेष आहे, या चित्रपटातून जे काही मिळते त्यामुळे कुणीही तो पाहण्याचा मोह टाळू शकत नाहीत.


म्हणूनच गॉडफादर हा चित्रपट तयार करून, मला चांगल्या वाईटाच्या माझ्या स्वतःच्या स्पष्ट व्याख्या तयार करण्यास मदत करण्यासाठी मला न्यायाची संकल्पना थोडी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास हातभार लावण्यासाठी मारि पुझ्झो, फ्रान्सिस फोर्ड कपोला, मार्लन ब्रँडो, अल् पचिनो, आणि हो डॉन कार्लिऑन पण या सर्वांचे मन:पूर्वक आभार...

 

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2022/03/the-godfathers-fiftieth-birthday.html

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

No comments:

Post a Comment