Thursday, 3 March 2022

रशिया, युक्रेन, पुणेकर आणि फ्लॅमिंगो!

 





































































 

नदीशिवाय मासा कसा जगेल? घरटे बांधण्यासाठी झाडेच नसतील तर पक्षी कुठे जातील? नामशेष होत चाललेल्या प्रजातींसाठी बनविलेल्या कायद्यामध्ये त्यांचे निवासस्थान सुरक्षित ठेवण्यासाठी एखादी अंमलबजावणी यंत्रणा असल्याशिवाय त्याचा काय उपयोग?” … जे इन्स्ली

जे रॉबर्ट इन्स्ली हे एक अमेरिकी राजकारणी, वकील अर्थतज्ञ आहेत ज्यांनी २०१३ पासून वॉशिंग्टनचे २३वे गव्हर्नर म्हणून पद भूषवले आहे. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. काहीवेळा एक समाज म्हणून मला अमेरिकेचे नेहमी कुतुहल वाटते, ते सर्वाधिक विकसित (अर्थात स्वघोषित) देश असल्यामुळे नाही कारण एकीकडे त्यांच्याकडे जे इन्स्लीसारख्या इतरही अनेक व्यक्ती आहेत ज्या पर्यावरणाच्या समस्यांविषयी अतिशय परखडपणे मते व्यक्त करतात. दुसरीकडे (जी वास्तववादी बाजू आहे) अमेरिका जगतिक पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे कारण औद्योगिकरण प्रदूषण यामुळे त्यांचा कार्बन फूट प्रिंट प्रचंड आहे. मात्र तेथील जे नागरिक निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा समतोल राखत आहेत त्यांचे आभार मानले पाहिजेत, नाहीतर मासे तसेच झाडे वाचवणे देवालाही शक्य झाले नसते ही वस्तुस्थिती आहे. मात्र विनोद म्हणजे, अमेरिकेमध्ये ते जी काही नैसर्गिक वसतिस्थाने उरली आहेत ती टिकवून ठेवण्याबाबत ते अत्यंत सजग आहेत किंवा काळजी घेत आहेत (म्हणजेच दाखवत आहेत किंवा प्रदर्शित करत आहेत) अतिशय काळजीपूर्वक त्यांचे संवर्धन करत आहेत, ज्यासाठी त्यांच्याकडे अत्यंत कडक कायदे आहेत. आपल्या प्रिय देशाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आपल्याकडे नैसर्गिक निवासस्थानांचे संवर्धन करणारे कायदे आहेत मात्र दुर्दैवाने आपण त्यांचे पालन करत नाही किंवा यंत्रणाही (म्हणजेच सरकार तसेच लोक) त्यांची गांभीर्याने अंमलबजवाणी करत नाहीत. हेल्मेट किंवा मास्क घालणे असो, सार्वजनिक जागी थुंकणे किंवा लघवी करणे असो किंवा रस्त्यावर किंवा नदीमध्ये कचरा फेकणे असो, आपण स्वतःच्या जिवाची काळजी करत नाही तर तेथे पर्यावरण किंवा एखाद्या प्रजातीची काळजी करणे तर दूरच राहिले. मला आठवते आहे मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली तेव्हा, न्यूयॉर्कमध्ये स्टॅचू ऑफ लिबर्टीपाशी एक फलक लावलेला होता (ते १९९६ साल होते) ज्यावर, कचरा फेकण्यासाठी $२५०० दंड केला जाईल असे लिहीलेले होते. आपल्या देशामध्ये रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यासाठी रु.,७०,००० पेक्षा अधिक दंडाचा विचार करून पाहा, आपण सगळे भिकेला लागू!

लेखाची सुरुवात अशी नकारात्मक करण्यासाठी माफ करा मात्र सत्य हे नेहमी कटू असते जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो तेव्हा ते अधिकच कटू असते, तर असो. मी पुण्याभोवतालच्या नैसर्गिक वसतिस्थानांना छायाचित्रे काढण्याच्या निमित्ताने अनेकदा भेट दिली आहे मात्र वाईल्ड वाईल्ड पुणे या माहितीपटाच्या निर्मितीसाठी (जंगल बेल्स, नेचर वॉक मगरपट्टा सिटी यांच्या सौजन्याने ) मी संवर्धनाच्या दृष्टिकोनातून या वसतिस्थानांना भेट दिली त्यांच्याशी समस्या जाणून घेतल्या या भेटींमध्ये जे काही पाहायला मिळाले त्यामुळेच ही कटुता आली आहे.  सर्वप्रथम मला तुम्हाला सांगावेसे वाटते की, गवताळ पट्टे असोत, पश्चिम घाटातील (मुळशी/ताम्हिणी) पट्टे असतो, भीमाशंकर किंवा उजनीसारखे जलाशय, ही सर्व नैसर्गिक वसतिस्थाने जैवविविधतेने समृद्ध होती ज्यांना आता फार मोठा धोका निर्माण झाला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे पुणे शहरातीलच नाही तर संपूर्ण पुणे प्रदेशातील पुणेकर किंवा नागरिक म्हणजेच आपणच आहोत. अनेक जणांना हे विधान आवडणार नाही, कारण ते म्हणतील आम्हाला दोष का देता कारण तुम्ही उल्लेख केलेल्या या ठिकाणांना आम्ही भेटही दिलेली नाही (उदाहरणार्थ उजनी पाणलोट क्षेत्र). नेमके हेच ही सुंदर वसतिस्थाने नष्ट होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे, कारण आपल्याला त्यांच्याविषयी माहितीच नाही तसेच आपल्याकडे या जागांना भेट देण्यासाठी वेळही नाही कारण आपल्याला त्यांचे महत्त्व माहिती नाही. आपल्याभोवती (म्हणजेच पुणे प्रदेशाभोवती) असलेल्या वसतिस्थानांविषयी या अडाणी दृष्टिकोनामुळेच अनेक अनेक वसतिस्थाने तसेच त्यांची घरे कायमस्वरुपी नष्ट झाली आहेत, ज्याप्रमाणे सध्या रशियन सैन्य यूक्रेनवर अतिक्रमण करून तेथील शहरे नष्ट करत आहे , तसेच !

काही जणांना पुणेकर रशियन सैन्याची तुलना जरा अतिशयोक्ती आहे असे वाटू शकेल. आपण या नैसर्गिक वसतिस्थानांवर रणगाडे बंदुका घेऊन हल्ला करत नसलो किंवा हवाई हल्ले करत नसलो तरीही आपण त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान करत आहोत. उदाहरणार्थ मी जेव्हा  फ्लॅमिंगो इतर पक्षांची छायाचित्रे काढण्यासाठी (माझ्या मैत्रिणीला ऑस्प्रे, या पाणथळ भागात आढळणाऱ्या बहिरी ससाणा वर्गातील शिकारी पक्षाची छायाचित्रे काढायची होती) उजनी पाणलोट क्षेत्राला भेट दिली, तेव्हा तो आठवड्याचा दिवस होता पर्यटक कमी होते तरीही मला तिथे प्लास्टिकरुपी कचरा आढळला. जो पाणथळ भागातील पक्षांसाठी प्रजातींसाठी बाँबपेक्षाही वाईट आहे. पर्यटकांनी केलेला कचरा उचलण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही विशेष तरतूद नाही, जे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी राजहंस पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने इथे येतात. त्याचप्रमाणे इथे स्वच्छतेसाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी कोणतेही फलक लावलेले नाहीत किंवा असे कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. ते स्वयंसेवी संस्थांद्वारेही होत नाहीत तसेच वनविभागाद्वारेही केले जात नाहीत, त्यामुळे त्यांचे निरीक्षण तर दूरच राहिले. ज्या स्थानिकांसाठी पर्यटन हे जगण्याचे एकमेव साधन आहे ते थोडेफार प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्याकडे दोन गोष्टींचा अभाव आहे, ती म्हणजे संसाधने (पैसे ) दुसरे म्हणजे योग्य ज्ञान इथेही आपण काहीही करून अपाय करत आहोत. आपण ज्याप्रकारे ताडोबा किंवा कान्हाला भेट देतो वाघांची छायाचित्रे काढतो परत येतो, त्याचप्रमाणे उजनी धरणाला भेट देण्यासाठी जे येतात, ते नौकाविहाराचा आनंद लुटतात, फ्लॅमिंगोच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढतात, मिसळ पोहे किंवा फिश करी चा आस्वाद घेतात परत जातात. ते बिसलेरी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, लेज चिप्सची पाकिटे, खाद्यपदार्थांच्या पार्सलचे कागद अशा स्वरुपातील प्रचंड कचरा मागे सोडून जातात.

एवढे पुरेसे नसते म्हणून की काय आपण जेव्हा आपल्या शहरात परत येतो जे उजनी धरणाच्या वरच्या अंगाला आहे तेव्हाही आपण आपल्या नागरी जाणीवांना धाब्यावर बसवून उजनीसारख्या वसतिस्थानांवर अतिक्रमण करत असतो. आपण (म्हणजे समाज) सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाही प्रक्रिया केलेले पाणी नदीमध्ये सोडून देतो. तसेच आपण सर्व नैसर्गिक नाले प्रदूषित करतो जे कधीकाळी ओढे होते हे सर्व प्रदूषित पाणी वाहून नेणारे प्रवाह जाऊन मुळा, मुठा नद्यांना मिळतात. जे सरतेशेवटी आपले सगळे बाँब, बुलेट (प्लास्टिकचे टाकाऊ पदार्थ कचऱ्याच्या स्वरुपातील) उजनी धरणात सोडल्या जातात जे राजहंस पक्षी इथरही शेकडो प्रजातींचे वसतिस्थान आहे ज्या धरणातील ताज्या पाण्यावर जगतात, जे अडाणीपणाने प्रदूषित केले जात आहे. त्याचवेळी आपण लाखो रुपये आपल्या वाढदिवसाच्या किंवा लग्नाच्या पार्ट्यांवर किंवा विदेशी सहलींवर खर्च करतो मात्र आपण या निसर्ग स्थानांवर खर्च करत नाही किंवा येथील आयुष्य थोडे अधिक आरामदायक कसे बनवता येईल याचा विचार करत नाही. उदाहरणार्थ, डोंगरगाव किंवा डाळजसारख्या (सोलापूर महामार्गाला लागून असलेल्या) ठिकाणी पाणथळ जागी पक्षी पाहण्यासाठी बोटींची सोय आहे, इथे आपल्याला बोटीत चढण्यासाठी व्यवस्थित (म्हणजे सुरक्षित) जेट्टीही नाहीवयोवृद्ध लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत, सर्वांना तरंगता लोखंडी प्लॅटफॉर्म वापरून उडी मारून बोटींमध्ये चढावे लागते, त्यामुळे पाण्यामध्ये पडण्याचा धोकाही असतो. मात्र कुणीही संघटना किंवा व्यक्ती तिथे एखादी लहानशी जेट्टी बांधण्यचा विचार करत नाहीत ज्यामुळे स्थानिकांचे तसेच पर्यटकांचे आयुष्य अधिक सोपे होईल. बोटींमध्ये चढण्याच्या बाबतीत ही परिस्थिती असेल, तर इतर पायाभूत सुविधांविषयी जेवढे कमी बोलू तेवढे अधिक चांगले उदाहरणार्थ नौकानयनासाठीचे प्रतीक्षा क्षेत्र किंवा पर्यटकांसाठी पुरेशी ( स्वच्छ) प्रसाधनगृहे इत्यादी. परिणामी जलाशय अधिक प्रदूषित होतात पर्यटक अशा ठिकाणी जास्त पैसे खर्च करत नाहीत ज्यामुळे स्थानिकांना फटका बसतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा आनंदी उल्हासित असता तेव्हा सहलीला गेल्यावर अधिक खर्च करता तुम्ही सहलीला गेल्या वर तेथे योग्य व व्यवस्थित पायाभूत सुविधा नसल्यामुळे वैतागला असाल तर कमी खर्च करता हे मूलभूत मानवी मानसशास्त्र आहे, उजनीचे पाणलोट क्षेत्र त्याला अपवाद नाही.

लोकांना (म्हणजे पुणे प्रदेशातील नागरिकांना) केवळ उजनी पाणलोट क्षेत्रच नव्हे तर अशा सर्व वसतिस्थानांना होणाऱ्या प्रदूषणाबद्दल जागरुक करणे ही काळाची गरज आहे. त्याचशिवाय त्यांना अशा जागांच्या संवर्धनासाठी त्यांच्या कर्तव्याची तसेच इथे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काय करता येईल हे समजून घेण्याची गरज आहे. अशा वसतिस्थानांना असलेल्या धोक्यांची दखल घेण्यासाठी वनविभाग आहे, मात्र खरा धोका जंगलाबाहेरून (वसतिस्थानाबाहेरून) म्हणजेच या वसतिस्थानांभोवतालच्या गावांमधून शहरांमधून आहे. त्याशिवाय, आपल्याकडे या जलाशयांच्या भोवती कारखानेही आहेत, कारण पाणी ही बहुतेक कारखान्यांची मूलभूत गरज आहे. आजूबाजूच्या भागातील जमीनी शेतीपेक्षाही, प्लॉट  पाडण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी अधिक वापरल्या जात आहेत, ज्यामुळे जलाशयाचे अधिक प्रदूषण होते. आपल्या या सगळ्या वर्तनाचा (म्हणजे हल्ल्यांचा) उजनी पाणलोट क्षेत्रासारख्या वसतिस्थानांवरील एकत्रित परिणाम म्हणजे, एकेदिवशी फ्लॅमिंगो इथे येणे बंद करतील दुसरे ठिकाण शोधतील. आता तुम्हाला पुणेकर रशियन लोकांमधील तुलना समजली असेल, कारण हल्ल्याचे स्वरूप, हल्ला करण्यामागील हेतू कदाचित वेगवेगळे असतील. मात्र या लादलेल्या युद्धाचा यूक्रेनवर जो परिणाम झाला तोच फ्लॅमिंगोवर होईल, नाही का?

 

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2022/02/punekars-russians-ukrainians-flamingos.html  

 

Marathi Version: 

http://jivnachadrushtikon.blogspot.com/2022/03/blog-post_3.html

 

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 


No comments:

Post a Comment