Tuesday 1 March 2022

टाटांचा विश्वास, हमारा बजाज, पुणे आणि बांधकाम व्यवसाय !

 










































































भारत फक्त एक महासत्ता व्हावा अशी माझी इच्छा नाही. तर भारत एक आनंदी देश व्हावा अशी माझी इच्छा आहे.” … जे.आर.डी.टाटा

आपल्या देशाचा विकास त्याचा आकार किंवा लोकशाहीमुळे होत नसून, या देशातील उद्योजकांमुळे जिवापाड मेहनत करणाऱ्या व्यक्तींमुळे होत आहे” … राहुल बजाज

फेब्रुवारी २०२२ मध्ये माझ्या वाचण्यात आलेल्या दोन बातम्या बहुतेकांनी वाचल्या असतील ते नेहमीप्रमाणे विसरूनही गेले असतील. मात्र मी स्वतः एक व्यावसायिक (लहानसा का होईना पण आहे) असल्यामुळे मला लिहावेसे वाटले; त्यातली एक बातमी होती एअर इंडियाविषयी म्हणजेच आपल्या देशाची अधिकृत (म्हणजेच सरकारी) विमान कंपनी अखेरीस टाटा समूहाकडे हस्तांतरित करण्यात आली दुसरी होती श्री. राहुल बजाज यांच्या निधनाची. या देशामध्ये अतिशय कमी लोक एक अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य करू शकले आहेत, ती म्हणजे आपल्या क्षेत्रात व्यावसायिक यश मिळवणे त्याचसोबत लोकप्रियता तसेच लोकांचा आदर मिळवणे. ते देखील जेव्हा तुमचा व्यवसाय एक असा उद्योग आहे जो बनियेगिरी (कोणतीही जात किंवा धर्माला दुखविण्याचा उद्देश नाही, तर पैसे कमावणे या अर्थाने घ्या)जो राजकारणासारखा म्हणजेच नेहमी भ्रष्ट मानला जातो. अशा क्षेत्रामध्ये असूनही वर नमूद केलेली कामगिरी साध्य करण्यासाठी काही विशेष गुण असणे आवश्यक आहे जेव्हा टाटा हे नाव येते तेव्हा तुमच्याकडे ते गुण असले तर त्यात काही आश्चर्य नाही. महान जेआरडी टाटांचे वारस रतन टाटा यांनी व्यावसायिक, लोकप्रियता आदर या तिन्ही आघाड्यांवर कामगिरीच्या बाबतीत यशस्वी होण्यासंदर्भात त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत वाटचाल केली आहे. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोली लावून टाटांनी पुन्हा एकदा, आयुष्याचे वर्तुळ नेहमी पूर्ण होते हे सिद्ध केले आहे. श्री. बजाज यांच्या बाबतीतही असेच होते, बजाज हे नाव केवळ राज्यातीलच नाही तर देशात घराघरात पोहोचलेले आहे आता बाहेरीलही अनेक देशांमध्ये पोहोचले आहे. तरीही टाटा नावाभोवती जे वलय (किंवा आदर आहे), बजाज यांना तो कदाचित मिळाला नाही. मात्र त्यामुळे श्री. राहुल बजाज यांनी जे काही साध्य केले त्याचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही. माझ्यामते, कोणाही बाबतीतच्या यशाची तुलना लोकप्रियता किंवा लोकांची निवड या निकषांवर केली जाऊ नये. तर केवळ एक अधिक चांगला समाज किंवा परिसर घडविण्यासाठी त्यांच्या योगदानामुळे काय परिणाम झाला याची तुलना केली जावी, विशेषतः जेव्हा वैयक्तिक यशाचे मोजमाप केले जाते. म्हणूनच वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर राहुल बजाज यांचे यश टाटांएवढेच आहे असे निश्चितपणे म्हणता येईल!

तर आता पुन्हा पहिल्या बातमीविषयी बोलू, ती म्हणजे टाटा समूहाने राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडिया ही तिच्या देशांतर्गत विमान वाहतूक सेवेसह म्हणजे इंडियन एअरलाईन्ससह (ती सक्रिय असावी अशी मी आशा करतो) विकत घेतली. आता मी टाटा समूहाविषयी विस्ताराने सांगणार नाही कारण आपल्यापैकी बहुतेकांनी कुठले ना कुठले उत्पादन वापरताना हे नाव ऐकले असेल, मग ते मीठ असो (टाटा नमक), चहा, कार, घड्याळ किंवा ऑनलाईन खरेदी सेवा. आपल्यापैकी काही नशीबवान लोकांनी देशातील सर्वोत्तम पंचतारांकित हॉटेल म्हणजेच ताज हॉटेलमध्ये त्यांच्या आतिथ्याचा अनुभवही घेतला असेल. टाटा हे नाव आपल्या आयुष्याशी कळत नकळत अनेक आघाड्यांवर जोडले गेले आहे. मी नमूद केल्याप्रमाणे दुसरी बातमी म्हणजे श्री. राहुल बजाज यांचे निधन, ते बजाज स्कूटरचे प्रणेते होते. ही स्कूटर या देशातील बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांच्या समृद्धीचे प्रतिक झाली, त्याचशिवाय बजाजची विद्युत किंवा यांत्रिक उत्पादनेही आहेत. टाटांनी एअर इंडियाचे अधिग्रहण केले श्री. राहुल बजाज यांचे निधन या दोन बातम्यांच्या संदर्भाने या दोन्ही नावांची इथे दखल घेतलेली नाही, तर या दोन्ही समूहांचा पुणे शहराशी किंवा प्रदेशाशी रिअल इस्टेटशी असलेला संबंध त्यामुळेच या शहराच्या भवितव्याला एक सकारात्मक दिशा कशी मिळाली यासंदर्भात दखल घेतली आहे.

पुणे आज राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांपैकी (आता प्रदेशांपैकी) एक मानले जाते, कारण इथे पाणी पुरवठा, सांडपाणी, अखंड वीज पुरवठा इतरही अनेक पायाभूत सुविधा चांगल्या आहेत ज्या आपल्या विकसनशील देशांमध्ये अजूनही अनेक शहरांमध्ये नाहीत, मात्र केवळ तेवढाच मुद्दा नाही. मला कल्पना आहे की माझ्या विधानामुळे अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतील. मात्र त्या लोकांनी आपल्या देशातील इतर पुण्यासारख्या शहरांना भेट द्यावी तिथल्या नागरिकांचे जीवन कसे आहे हे जाणून घ्यावे त्यानंतर कपाळाला आठ्या पाडाव्यात असे मला वाटते. मात्र मुद्दा केवळ भौतिक पायाभूत सुविधांचा नाही ज्या थोडाफार पैसा असेल मायबाप सरकारची इच्छा असेल तर उभारता येऊ शकतात. त्यापेक्षाही महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा ज्यांचे पुण्याला वरदान लाभलेले आहे. या सुविधा आहेत सांस्कृतिक, शैक्षणिक, करिअर अथवा रोजगाराच्या संदर्भातील पायाभूत सुविधा. इथेच केवळ शहराचा नाही तर मी ज्या उद्योगामध्ये आहे, म्हणजेच रिअल इस्टेटचा संबंध येतो कारण तुम्ही सर्व अद्ययावत पायाभूत सुविधांनी युक्त एक सुंदर शहर उभारू शकता ते सर्व महत्त्वाच्या गावांना किंवा शहरांना जोडू शकता. मात्र तुम्ही आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना या शहरामध्ये कसे राहायला लावाल, हे खरे आव्हान आहे. जेव्हा पुण्याच्या संदर्भात टाटा बजाज या दोन नावांनी हे आव्हान स्वीकारले!

एक लक्षात ठेवा कोणत्याही शहराची खरी भरभराट त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांमुळेच होते, कारण हे नागरिक जे निर्माण करतात, जो खर्च करतात किंवा जसे वागतात, त्यावर शहराचे भवितव्य अवलंबून असते, हे इतिहास आपल्याला सांगतो. हे नागरिक शहराकडे आकर्षित होण्यासाठी त्या शहरात टिकण्यासाठी सर्वप्रथम काही कारण हवे. कारण जगात अशी अनेक शहरे आहेत जी सुरुवातीला भरभराटीला आली काही काळाने लोक तेथून निघून गेले कारण त्या शहरात राहण्याचे कारण संपले ते शहरही काळाच्या ओघात संपले हे अतिशय कटू सत्य आहे. पुण्यातही साधारण पन्नास-एक वर्षांपूर्वी आपण काय पाहिले की ते इतर कुठल्याही शहरासारखेच शहर होते, मात्र इथे नैसर्गिक पाण्याचा पुरवठा, वृक्षराजी मायानगरी मुंबई अर्थात तत्कालीन बाँबे जवळ असल्याने थोडे अधिक चांगले होते. तो कदाचित ६० किंवा ७० च्या दशकाचा उत्तरार्ध असावा, टाटांचीच एक कंपनी असलेल्या असलेल्या टेल्कोने इथे चार चाकी वाहन निर्मितीला सुरुवात केली बजाजने त्यांच्या सुप्रसिद्ध दुचाकी वाहनाचे म्हणजेच स्कूटरचे उत्पादन सुरू केले. तेव्हा फार कमी लोकांना अशी जाणीव झाली असेल की टाटा बजाज ही दोन नावे पुणे नावाच्या बुलेट ट्रेनची दोन चाके आहेत देशातील इतर कुठल्याही शहरापेक्षा ही ट्रेन पुढे निघून जाईल इथे जास्तीत जास्त लोक स्थायिक होतील, जे आपण सध्या अनुभव आहेतच.

देशासाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी म्हणूयात, टाटा बजाज यांनी त्यांच्या उद्योगातून झालेल्या नफ्यातून मोठा करभरणा करून महसूल परतावा या स्वरूपात खूप योगदान दिले. तसेच सामान्य भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खिशाला परवडतील अशा अनेक उत्पादनांची निर्मिती केली त्यांचे आयुष्य थोडेफार सुलभ केले. मात्र या दोन उद्योगसमूहांनी केवळ पुणेकरांचे आयुष्य अधिक सुखकर बनविण्यात योगदान दिले नाही तर त्यांनी इथे लक्षवधी लोकांचे आयुष्य घडवलेही. मी नमूद केल्याप्रमाणे पूर्वी पुणे हे केवळ एक सामाजिक सांस्कृतिक शहर होते, जे निवृत्तीवेतनधारकांचे शहर मानले जात असेल. मात्र बजाज टाटांमुळे हे शहर करिअरसाठी ओळखू जाऊ लागले जेथे लोक केवळ निवृत्तीनंतर नव्हे तर पैसे ज्ञान कमवण्यासाठी येतात, त्यांचे आयुष्य घडवतात नंतर आनंदाने निवृत्त होतात. मला असे वाटते या दोन नावांचे सर्वात मोठे योगदान (म्हणजेच भेट) हे पुण्याला घडविण्याचे आहे. कारण टेल्को बजाजमुळे नोकऱ्या आल्या, पैसा आला त्यांच्याशी संलग्न कारखाने सेवा पुरवठादारांद्वारे व्यापार, व्यवसाय, उत्पादनाच्या इतरही अनेक संधी निर्माण झाल्या. या सगळ्यामुळे केवळ रिअल इस्टेटलाच मदत झाली नाही तर इतर सर्व व्यवसायांना किंवा उद्योगांना म्हणजेच एकूणच समाजाला मदत झाली आहे. त्यानंतर इथे शिक्षण माहिती तंत्रज्ञान उद्योग भरभराटीला का आले कारण विद्यार्थ्यांना स्थानिक संस्थांमध्येच काम करण्याची संधी मिळू लागल्याने इथे अनेक शैक्षणिक संस्था उदयास आला. माहिती तंत्रज्ञान ही परजीवी शाखा आहे (कुणालाही दुखविण्याचा उद्देश नाही) कारण अधिक चांगली उत्पादने, कमीत कमी खर्चात तयार करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी आपल्याकडे कारखाने हवेत, जे इथे होते. त्यामुळे आण्विक प्रकल्पातील साखळी प्रक्रियेप्रमाणे, इथे प्रत्येक घडामोड गुणाकारासारखी घडत गेली. दुधात साखर म्हणजे पुण्यामध्ये याला टाटा बजाज यांचा परिसस्पर्श झाला, ज्याची फळे सर्वाधिक चाखली ती रिअल इस्टेटने.

जमीन ही स्थावर मालमत्ता आहे सोन्यातील गुंतवणूकीसारखीच आहे किंबहुना कुठल्या ना कुठल्या स्वरुपामध्ये जमीन खरेदी करणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. तरीही तुम्ही राहण्यासाठी गुंतवणूक करताना राजस्थानातील वाळवंटामध्ये किंवा हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये किंवा मध्यप्रदेशातील घनदाट जंगलांमध्ये करू शकत नाही, नाही का? तुम्ही जमीन गुंतवणुकीसाठी किंवा राहण्यासाठी घर अशा ठिकाणी खरेदी करता जेथे तुमची गुंतवणूक वाढेल (असे तुम्हाला वाटते) किंवा तुम्हाला चांगल्याप्रकारे जगता येईल. तुम्ही केवळ अशाच ठिकाणी घर खरेदी करता म्हणूनच मध्य भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी थोडीफार मालमत्ता खरेदी करण्यासाठी पुणे हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण झाले हा कल अजूनही सुरू आहे. पीसीएमसी, म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे केवळ दोन उद्योग समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहेत. कारण हे शहर टाटा बजाज यांच्यांमुळे निर्माण झालेल्या रोजगारामुळे शेतजमीन पडिक जमीनींमधून तयार झाले आहे, एखाद्या उद्योग समूहाचे यश याहून अधिक काय असू शकते? जगभरात रिअल इस्टेटची भरभराट तीन गोष्टींमुळे होते एक म्हणजे रोजगार, शिक्षण संस्कृती. टाटा बजाज यांनी रोजगाराला प्राथमिक चालना दिली इथे संस्कृती आधीपासूनच होती, त्यामुळे आपसूकच शिक्षण आले त्यामुळे पुणे भोवतालच्या संपूर्ण प्रदेशात समाजाचा विकास झाला. म्हणूनच पुणे प्रदेशातील रिअल इस्टेट क्षेत्राने टाटा बजाज यांचे आभार मानले पाहिजेत. जर या दोघांनी पन्नास वर्षांपूर्वी आपापल्या उद्योगांची इथे सुरुवात केली नसती, तर आपल्यापैकी बहुतेकांना अजूनही आपल्या भवितव्याची चिंता करावी लागली असती,.

जेआरडी टाटा खूप पूर्वीच आपल्याला सोडून गेले, आज रतन टाटा अनधिकृतपणे निवृत्त झाले आहेत राहुल बजाज हेही या जगात नाहीत. मात्र त्यांनी आपल्याला जे वरदान दिले आहे ते नेहमी आपल्यासोबत राहील. केवळ त्यांची उत्पादने किंवा त्यांचे उद्योगच पुण्यामध्ये राहणार नाहीत तर त्यांचा समाजाविषयीचा दृष्टिकोन, त्यांना ज्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे होते ते कुठल्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचले हे सदैव आपल्यासोबत राहील. हा रिअल इस्टेट उद्योगासाठी खऱ्या अर्थाने अतिशय अनमोल ठेवा आहे. टाटा हे नाव विश्वासचे प्रतिक असेल तर बजाज हे नाव दूरदृष्टी परिश्रम यांचे प्रतिक आहे. आपण विश्वास, दूरदृष्टी परिश्रम या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही; हाच मंत्र रिअल इस्टेट क्षेत्राने (अर्थात, प्रत्येक भारतीय उद्योजकाने) जपला पाहिजे त्यानुसारच कृती केली पाहिजे. श्री. जेआरडी टाटा श्री. राहुल बजाज यांच्यासाठी हीच खरी आदरांजली असेल, तरच ते जेथे कुठे असतील तिथे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2022/02/trust-of-tata-humara-bajaj-pune-real.html  

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 


No comments:

Post a Comment