Friday 25 March 2022

“काश्मीर फाईल्स”, त्यांच्या आणि आपल्या!









































“काश्मीर फाईल्स”, त्यांच्या आणि आपल्या!

 

मनोरंजनाच्या जगाचा तरुण वर्गावर प्रौढत्वाचे आदर्श उद्दिष्टे साध्य करण्याच्यादृष्टीने घडविताना चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असतो” … वॉल्ट डिस्ने

 

कोणत्याही युद्धात पहिला बळी जातो तो सत्याचा” … स्टार वॉर्स

मला उर्वरित जगाविषयी माहिती नाही, मात्र पहिल्या अवतरणामध्ये म्हटल्याप्रमाणे, वर उल्लेख केलेल्या दोन नावांचा माझ्यावर बालपणापासून मोठा (म्हणजे सर्वाधिक) प्रभाव राहिला आहे. आता माझी पन्नाशी उलटली आहे तरीही डिस्ने स्टार वॉर्सचा (चित्रपट मालिका) माझ्यावरील प्रभाव अधिक सशक्त झाला आहे. तुम्हाला स्टार वॉर्सविषयी माहिती नसेल तर मी तुम्हाला माफ करू शकतो, ती जॉर्ज ल्यूकास स्टीव्हन्स स्पिलबर्ग (जे नंतर या चित्रपटमालिकेपासून वेगळे झाले) यांच्याद्वारे निर्मित काल्पनिक चित्रपटांची एक मालिका आहे. ज्यामध्ये विज्ञान, तत्वज्ञान मानसशास्त्र यांचा अनोखा मिलाप साधण्यात आला आहे. मात्र तुम्हाला वॉल्ट डिस्ने हे नावच माहिती नसेल तर मी तुम्हाला माफ करू शकत नाही. कारण तुम्ही डिस्नेचे किमान दहा चित्रपट तरी पाहावेत त्यानंतरच या लेखाच्या विषयासंदर्भात किंवा कोणत्याही चित्रपटाविषयी कोणतीही टिप्पणी करण्यासाठी तुम्ही पात्र व्हाल! आपल्या देशातील माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडी, म्हणजेच काश्मीर फाइल्स हा या लेखाचा विषय आहे. या चित्रपटप्रेमी देशामध्ये ज्याप्रमाणे ८०च्या दशकामध्ये समाजाच्या केवळ दोनच वर्गवाऱ्या होत्या. एक म्हणजे ज्यांनी शोले पाहिला आहे दुसरी म्हणजे ज्यांनी शोले पाहिलेला नाही, आणि तेव्हा इंटरनेट वा समाज-माध्यमे नव्हती ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे, काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या देशात केवळ तीनच वर्गवाऱ्या असल्याचे वाटत आहे, एक म्हणजे कश्मीर फाइल्सविषयी आपल्याबाजूने टिप्पणी करणारे, दुसरी म्हणजे या चित्रपटाविषयी त्यांच्याबाजूने टिप्पणी करणारे तिसरी म्हणजे (यांच्या संख्या अतिशय मोठी आहे) त्यांच्या सेलफोनच्या मेसेज बॉक्समध्ये जे फॉरवर्ड केलेले मेसेज येतील ते इतरांना पाठवण्याचे काम करणारे. आता तुम्ही विचाराल की आपली बाजू त्यांची बाजू हे काय आहे, याचाच अर्थ असा होतो की तुम्ही काश्मीर फाइल्स पाहिलेला नाही. तर या चित्रपटामध्ये मुस्लिम (म्हणजे पाकिस्तानी मुस्लिम) काश्मीरी पंडितांमधील वैमनस्य या वैमनस्यातून झालेल्या काश्मीरी पंडितांच्या हत्या, अपमान त्यांना त्यांच्या घरातून म्हणजे काश्मीरमधून कसे बाहेर काढण्यात आले हे दाखविण्यात आले आहे.

जेव्हा आपण म्हणतो आपली बाजू तेव्हा त्याचा अर्थ आपण म्हणजे हिंदू (म्हणजेच भारतीय असा होतो) जेव्हा आपण म्हणतो की त्यांची बाजू म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ मुस्लिम (म्हणजेच पाकिस्तानी) असा होतो. दुर्दैवाने, आपल्यापैकी बहुतेकजण दोन गोष्टींमध्ये गफलत करतात, ते म्हणजे हिंदू म्हणजे भारतीय मुस्लिम म्हणजे पाकिस्तानी. मला माहिती आहे माझी अशी विधाने, बहुतेकांना आवडणार नाहीत (ते मला त्यांच्या बाजूने आहे म्हणून टॅग करतील), मात्र हीच वस्तुस्थिती आहे. वैयक्तिक बाबतीत सांगायचे तर मला कधीही जात किंवा धर्मावर विश्वास नव्हता, कारण त्यावर आपले नियंत्रण नसते. मी ब्राह्मण आहे कारण माझा जन्म ब्राह्मण पालकांच्या पोटी झाला. आपण कोणत्या घरात जन्म घेऊ यावर आपल्यापैकी कुणाचेच कधीही नियंत्रण नाही किंवा नव्हते, बरोबर? म्हणूनच, मला केवळ दैवयोगाने मला जी गोष्ट मिळाली आहे त्याविषयी मला लाज का वाटावी किंवा त्याचा अभिमान का वाटावा किंवा मी त्यास माझे कर्तृत्व किंवा माझे अपयश का मानावे? मात्र त्याचवेळी कुणीही आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला केवळ मी एखाद्या जातीमध्ये किंवा धर्मामध्ये जन्माला आलो म्हणून त्रास देत असेल किंवा छळ करत असेल तर हे योग्य नाही. माझा हाच मुद्दा आहे, चित्रपटाविषयी बोलताना आपले आणि त्यांचे यामध्ये फरक करताना प्रत्येकजण नेमका हाच मुद्दा विसरला आहे. मी मुक्तछंद कविता लिहीतो काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर मी द्वेषाविषयी म्हणजेच हिंदीमध्ये नफरतविषयी काहीतरी लिहीले माझ्या मित्रांना पाठवले. त्यावर मला आपले त्यांचे अशा स्वरुपाच्या असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या. समाज म्हणून आपण अजूनही किती संकुचित व गोंधळलेले आहोत हे त्यातून दिसून येते त्यातील काही प्रतिक्रिया मी येथे देत आहे. इथे कोणत्याही चित्रपटाचा किंवा काश्मीरच्या विषयाचा अपमान करण्याचा हेतू नाही, त्याविषयी मी माझे मत सर्वात शेवटी व्यक्त करेन, म्हणूनच कृपया खुल्या मनाने वाचा. मी माझ्या नफरत या कवितेचे शेवटचे कडवे त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही देत आहे

कई साल पहले एक फिल्म देखी थी उसका हीरो गाना गा रहा था, "नफरत करनेवालों के सीनेमे प्यार भर दूँमै वो परवाना हूँ पत्थरको मोम कर दूँ".. उस उम्र मे ना तो पत्थर से पाला पडा था और ना ही परवाने का मतलब पता थापर उस गाने के बोल दिल मे घर कर के रह गए, आज तक...

कल भी एक फिल्म देखीइस नफरत के  बीज का असर दिखाने वाली और उसका असर भी देखा फिल्म देखनेवालोंके  चेहरोपर.. दोस्तोये नफरतवाली शम्मा तो हर जगह दिखाई देती है अबपर उसपर जलके उसे बुझानेवाले परवाने अब दिखायी नही देते कही...”

 प्रतिक्रिया:

नमस्कार संजय सरआपले "नफरतविषयावरील विचार वाचले आणि प्रतिक्रिया लिहावीशी वाटलीप्रतिक्रिया खूप लांबलचक झाली आहे त्याबद्दल क्षमस्वएरवी आपण या ग्रूपवर बांधकामपर्यावरणवन्यजीव आदी विषयांवरील आपले लेख शेअर करतात्यातील बरेचसे वाचले आहेतदररोज विद्रूप होत चाललेल्या पुण्यातील स्थितीला सुधारण्यासाठी आपण लिहिलेले सुंदर लेखसुद्धा वाचले आहेत आणि आवडलेही आहेतआपल्या    कामाविषयी आदर आणि कौतुक आहेतरीसुद्धा आपले "नफरतविषयावरील विचार वाचून सखेद आश्चर्य वाटले.मागील एक महिन्यात  चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले - पावनखिंडझुंड आणि  काश्मीर फाईल्सयापैकी कुठला चित्रपट नफरत पैदा करतो हे आपण जरी स्पष्टपणे नाव घेऊन सांगितले नसले तरी अंदाज येतोत्यामुळे मीही काही गोष्टी नाव  घेताच लिहीणार आहे. गेली अनेक दशके "भाईचारा", "भाई-भाई", "एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावावगैरे तद्दन एकतर्फी आणि बुळचट संदेशांच्या सततच्या माऱ्यामुळे अनेकांचे ब्रेनवॉशिंग झालेले पाहिले आहेआपले विचार चांगलेच आहेत पण ते एकतर्फीएकाच समाजाला वारंवार सांगितले गेलेत असे मला वाटते…. (यापुढे टिप्पणीमध्ये कवितेतील माझे विचार कसे हिंदूविरोधी आहेत माझ्यासारख्या व्यक्तीकडून ते अपेक्षित नव्हते असे पुढे लिहीले होते, अर्थात ते अतिशय वाचनीय होते, हे मी मान्य केलेच पाहिजे!!)

संजय: आपले मनःपूर्वक आभार.. वरीलपैकी कोणत्याही चित्रपटामुळे वैमनस्य निर्माण होते असे मी मला म्हणायचे नव्हते तर मी जे काही लिहीले होते ते काश्मीर फाइल्सविषयी होते त्यामध्ये द्वेषाचे परिणाम काय झाले आहेत त्याविषयी सांगितले आहे, फक्त ते हिंदीमध्ये आहे, कृपया कवितेच्या शेवटच्या ओळी वाचा... आपला गैरसमज झाल्याबद्दल माफ करा..!

संजय:  ज्या लोकांनी जनतेला कठपुतळ्या बनवले आहे त्यांना हेच हवे आहे असे आपणा सर्वांना वाटत नाही का? याचा अर्थ काश्मीरी पंडितांसोबत जे काही झाले, शिखांसोबत १९८४ मध्ये जे काही झाले किंवा १९४८ मध्ये ब्राह्मणांसोबत जे झाले ते योग्य होते असा होत नाही, मात्र द्वेषामुळे जगभरात दहशतवादाची समस्या कधीच सुटणार नाही. यासाठी कायदा त्याहीपेक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये कायद्याचे भय निर्माण करणारी यंत्रणा तयार करणे ही काळाची गरज आहे...सध्या केवळ काश्मीरच का, सगळीकडेच त्याचा अभाव दिसतो, असे मला म्हणायचे आहे.

संजय: वाईट वाटून घ्यायची गरज नाही.. तुमच्या रोचक प्रतिक्रियेसाठी आभार..मात्र संवादातूनच निरोगी समाज घडू शकतो, बंदुकी तलवारींमुळे नाही. दुर्दैवाने कोणत्याही संवादामध्ये दोन्ही बाजूंनी तो तोडगा म्हणून स्वीकारला पाहिजे!

: *मी हजारो हिंदू दाखवतो  कश्मीर फाइलला विरोध करणारेमला एक मुस्लिम दाखवा  कश्मीर फाइलला सपोर्ट करणारा........हाच फरक आहे.

संजय: मान्य आहे... परंतु यावर काय तोडगा आहे

:हिंदू धर्मातील रीती, रुढी, परंपरा इत्यादींवर टीका करणारे तुम्हाला *एक ढुंडो हजारो मिल जाएंगे*

इतर धर्माच्या लोकांचा विचार केल्यास  तुम्हाला *औषधाला सुध्दासापडणार नाहीत.

:वैमनस्यामुळे समस्या सुटणार नाही हे मला मान्य आहे, परंतु कोण कुणाचा द्वेष करतो आहे हे तपासले पाहिजे? कोणत्याही हिंदू पुराणांमध्ये बिगर-हिंदूंचा उल्लेख काफीर असा करण्यात आले नाही. कोणत्याही हिंदू पुराणांमध्ये आपल्या अनुयायांन आपल्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांना मारण्यास सांगितले जात नाही. हिंदू धर्मावर विश्वास असलेला/पालन करणाऱ्या व्यक्ती इतर धर्मांमधून हिंदूत्वामध्ये बळजबरीने धर्मांतर करण्यावर विश्वास ठेवत नाहीत किंवा करत नाहीत. केवळ हिंदू धर्म, ‘वसुधैव कुटुंबकम  सर्वेपि सुखिनसन्तु सर्वे सन्तु निरामय:’ या सर्वसमावेशक विचारसरणीचा प्रसार करतो. तरीही धर्मनिरपेक्ष भारतामध्ये वरील विचारसरणीचे पालन करणाऱ्यांना जातीयवादी म्हटले जाते. हा मोठा दुर्दैवी विरोधाभास आहे की हीच पुरोगामी डाव्या विचारणीची टोळी, जी महिला स्वातंत्र्य, महिला सबलीकरण इत्यादींविषयी आवाज उठवते, ती कर्नाकटकमध्ये हिजाब बंदीला विरोध करते, मात्र केरळमध्ये करत नाही, कारण या दोन्ही राज्यांमध्ये कोणत्या पक्षांची सत्ता आहे हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा कुणीतरी त्यांना यासंदर्भात उघडे पाडते, हे वैमनस्याचे स्वघोषित पुरस्कर्ते त्या व्यक्तीला ब्लॉक करतात. त्यांच्या याच वागणुकीमुळे माझ्यासारख्या तटस्थ, खऱ्या अर्थाने उदारमतवादी व्यक्तीही धार्मिक अंगाने विचार करू लागते.

:असो, सर सर्व उत्तरांसाठी मनापासून आभार

:सद्य स्थितीवरील अतिशय जबरदस्त लेख.

भारताला तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे.

जर सगळेच संजयसारखे झाले तर कशाविषयीही कुणाविषयीही काळजी करायची गरज नाही. सलाम, देव तुमचे भले करो 

:खरंच 

या वैमनस्याचा शेवट कुठे आहे?

संजय: मान्य आहे..मात्र योग्य तोडगा शोधणे त्याची अंमलबजावणी करणे ही समस्या आहे, जे करण्याची धमक, आत्तापर्यंत कुठल्याही सरकारमध्ये नाही!!

: उफ्फ

मला माहिती नाही काय म्हणावे.

मला लहानपणापासून या गोष्टीचा अतिशय राग येतो मात्र आता माझा विश्वास अतिशय ठाम झाला आहे.

:हं, खरे आहे अगदी या सरकारलाही समान नागरी कायद्यासंदर्भात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

संजय: होय... आणि माझ्यावर विश्वास ठेवा बंदूका घेऊन कधीही द्वेषावर कायमस्वरुपी तोडगा निघणार नाही..मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक जात, धर्म व्यवसायाच्यासंदर्भात अवतीभोवती अनेक वाईट गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे पाण्याला अडविण्याचा प्रयत्न केल्यावर ते दुसरीकडे आपली वाट शोधते, त्याचप्रमाणे तुम्ही जेवढा जास्त बळाचा वापर कराल तेव्हा द्वेषाला फाटे फुटतीलच हाच अनुभव येईल..जगात सगळीकडे हे अनुभवले गेले आहे. पाहूयात काय होते, तोपर्यंत जय सियाराम!

अतिशय नेटके, हृदयस्पर्शी लेखन. प्रत्येकाने ही भावना अगदी क्षणभर का होईना कधीना कधी अनुभवली असेल, तरीही त्यामुळे प्रचंड उलथापालथ होते मन उद्विग्न होते. मात्र कश्मीर फाइल्समध्ये दाखविण्यात आलेले वैमनस्य भयंकर, क्रूर होते..त्यासाठी शब्द थिटे पडतात.

--

वरील सर्व प्रतिक्रिया वाचून त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल हे माहिती नाही (आलेल्या एकूण प्रतिक्रियांपैकी केवळ /१० प्रतिक्रियाच येथे दिलेल्या आहेत), मात्र मला असे वाटते की, जोपर्यंत आपण जात, धर्म, देश, लिंग किंवा रंग आणि चूक किंवा बरोबर याची सरमिसळ करणे थांबवत नाही तोपर्यंत आपली वैमनस्य किंवा जातीय दंगलींसारख्या गोष्टींपासून मुक्तता होऊ शकणार नाही. मी असे म्हणत नाही की आपण युद्ध थांबवू शकणार नाही काही कारण तो मानवाचा किंवा कोणत्याही सजीवाच्या मानसशास्त्राचा अविभाज्य भाग आहे. जगात चुकीचे वागणारी माणसे नेहमीच असतील त्यांनी चांगल्या माणसांना त्रास देणे थांबवावे यासाठी आपल्याला त्यांच्याविरुद्ध लढावेच लागेल. मात्र जेव्हा आपल्यामध्ये जात, धर्म किंवा देश यासारख्या मूलभूत गोष्टींच्या आधारावर फूट पडते, तेव्हा चांगल्या वाईटाची व्याख्या आपण कुंपणाच्या कोणत्या बाजूला उभे आहोत यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला दहशतवादी बट्टी किंवा बट् याला काश्मीरी पंडितांची हत्या करताना तो काहीतरी चुकीचे करत आहे असे एकदाही वाटत नाही; तो जे काही करतोय त्यामुळे इस्लामचे भले होईल असे त्याला वाटते. प्रत्येक आपल्या व्यक्तीच्या संदर्भातही हे लागू होते, त्याने किंवा तिने चित्रपटामध्ये जे काही पाहिले त्यामुळे ते अतिशय विचलित झाले आहेत मुस्लिमांचा बदला घेतला पाहिजे असा विचार करतात. याचा अर्थ असा होत नाही की काश्मीरी पंडितांच्या हत्या किंवा त्यांना झालेल्या त्रासाचे मी समर्थन करतो. मी कुठल्याही त्रासाचे किंवा छळाचे समर्थन करत नाही, आपल्यापैकी प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या स्वरुपात तो सहन केला आहे. उदाहरणार्थ माननीय इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ च्या दंगलींमध्य़े शिखांना त्रास सहन करावा लागला, १९४७ साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ब्राह्मणांना त्रास सहन करावा लागला, वर्षानुवर्षे तथाकथित उच्चवर्णीयांनी दलितांचे शोषण केले आहे आपल्या देशामध्ये सगळीकडे अजूनही अनेक निष्पाप लोक समाज / जात या नावाखाली मारले जातात. यातले बहुतेक लोक हे आपलेच असतात, नाही का?

सरतेशेवटी मला असे म्हणायचे आहे की, कोणताही धर्म किंवा जात कुणालाही मारण्याचा किंवा इतर धर्मांना किंवा जातींना किंवा सजीवांना त्रास देण्याचा अधिकार देत नाही. केवळ तुमच्याकडे बंदूक आहे दुसऱ्या व्यक्तीकडे नाही म्हणून तुम्ही हे करत असाल, तर ते चुकीचे आहे म्हणूनच आपल्याकडे कायदे आहेत लोकांना त्या कायद्याचे पालन करायला लावण्यासाठी व्यवस्था आहे. जर तुम्ही काश्मीर फाइल्स पाहून अतिशय अस्वस्थ झाला असाल तर आधी स्वतः कायद्याचा आदर करायला लागा व्यवस्थेला त्या कायद्यांचे पालन करायला लावा, जे तेव्हा झाले नाही ( आताही होत नाही) म्हणूनच मूठभर लोक बंदूकीच्या जोरावर इतरांचा छळ करण्याची हिम्मत करतो. खरोखर, अशाप्रकारचा विषय त्याचे सादरीकरण असताना, त्यात दाखविण्यात आलेल्या विषयाचा तसेच चित्रपटाच्या यशाचा फायदा घेणारे (गैरफायदा घेणारेही) असणारच, मात्र वॉल्ट डिस्नेने समाजावरील चित्रपटांच्या परिणामाविषयी हेच म्हटले आहे, बरोबर?

माझे विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी चमूला अशाप्रकारच्या विषयाला हात लावण्याचे धाडस दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यामुळे समाजाला (केवळ आपल्या देशालाच नाही) चांगले वाईट, बरोबर चूक यातील फरक समजण्यास मदत होईल. मला असे वाटते तिकीटबारीवर किती गल्ला कमावले, यापेक्षाही काश्मीर फाइल्सचे वरील यशच खरे मोठे आहे !!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2022/03/kashmir-files-ours-theirs.html

 



संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 


No comments:

Post a Comment